लोकायत आणि चार्वाक
लोकायताचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेव दर्शन आहे की ज्यात वेद, परलोक व देव या तिघांनाही फेटाळून लावले आहे. चेतनावाद हा सर्व धर्मांचा व दर्शनांचा अविभाज्य भाग आहे. शरीर ह्या हाडा-मांसाच्या गोळ्यापेक्षा चेतन जीव हा निराळा आहे हा झाला चेतनावाद. सर्व धर्म चेतनावादावर अवलंबून आहेत व लोकायतने त्यावर तोफ डागली म्हणून सर्व धर्मीयांनी चार्वाक मतावर कठोर टीकाच केली वेदप्रामाण्य नाकारल्यामुळे वैदिक धर्माने त्यांना नास्तिक ठरवले व तर ऐहिक सुखांचा आनंद घेणे सुचविण्यामुळे जैन, बुद्ध इत्यादी धर्माच्या तत्त्ववेत्त्यांनीही त्यांची कठोर निंदा केली.
मुळात, नवव्या शतकातील न्यासमंजिरीत एक वचन असे आहे :
यावज्जीवेत् सुखं जीवेत् नास्तिमृत्युरगोचर:।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:।।
" यावज्जीवेत् सुखं जीवेत् नास्ति मृत्युरगोचर:" यात कोठेही भोगवाद नाही.
तत्कालीन टीकाकारांनी विरोधकावर टीका करावयाची म्हणून त्याचा विपर्यास करून "यावज्जीवं सुखं जीवेत् ऋणं कृत्वा धृतं पिबेत्" हे वचन विद्यारण्य़स्वामींनी सोळाव्या शतकातील सर्वदर्शन संग्रहात भोगवादी लक्षण म्हणून दिले.
यावज्जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत्।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:।।
चार्वाक हा कोण होता, त्याचा काळ कोणता, त्याचा ग्रंथ कोणता, याचा नीटसा उलगडा होत नाही. चार्वाक तत्त्वज्ञान हे सर्वनिर्मूलवादी, पण जीवनातील प्रत्यक्ष अनुभवाशी नाते सांगणारे आहे. ही एक ‘चार्वाक दर्शन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या, नास्तिक मताचा प्रवर्तक, कोणी चार्वाक नावाची व्यक्ती असावी, असा एक समज आहे. ही विचारपरंपरा वेदांइतकीच प्राचीन आहे. तिचे खरे नाव लोकायतिक/ ‘लोकायत’ किंवा ‘बार्हस्पत्य मत’ (बृहस्पतीप्रणीत विचार) असे आहे. परंपरा ..शंकर..पुरंदर.. बृहस्पती.. अशी धरली जाई.कौटिलीय अर्थशास्त्रात लोकायत हे आन्वीक्षिकी म्हणजे तर्कविद्येचा भाग असल्याचे म्हटले आहे. पण या नास्तिक मताचा प्रवर्तक म्हणून, चार्वाक नावाची कोणी व्यक्ती होऊन गेली, याला इतिहासात पुरावा नाही.[१] [२]
चार्वाक ही व्यक्ती काल्पनिक होती, एकच होती का त्या विशिष्ट जीवनवादी तत्त्वज्ञानाच्या पुरस्कर्त्यांकरिता वापरलेली उपाधी होती, या बाबत तज्ज्ञांत वेगवेगळी मते आहेत. असे असले तरी हे चार्वाक जडवादी व जीवनवादी अशा लोकायत नावाच्या अवैदिक तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते या बाबत दुमत नाही. तत्कालीन इतर धर्मीय तत्वचिंतकांनी त्यांच्या या अनीश्वरवादी विरोधकांवर उपभोगवादी असल्याचा शिक्का मारून त्यांना टीकेचे लक्ष्य बनवले. महाभारतात चार्वाक नावाच्या कौरवांच्या बाजूने असलेल्या एका व्यक्तीचा उल्लेख आढळतो, पण तिथे लोकायत तत्त्वज्ञानाची कोणतीही चर्चा किंवा त्या व्यक्तिरेखेचा कोणत्याही विशिष्ट तत्त्वज्ञानाशी संबध असल्याचे आढळून येत नाही.
ह्या दर्शनात "प्रत्यक्ष" हेच प्रमाण आहे. या शब्दात, प्रति आणि अक्ष अशी दोन पदे आहेत. अक्ष म्हणजे इन्द्रिय; त्यामुळे प्रत्यक्ष म्हणजे जे इंद्रियांना अनुभवता येते ते. "शब्द" आणि "अनुमान" याला मर्यादा आहेत. यामुळे आत्मा, ईश्वर आणि स्वर्ग या गोष्टींना या तत्त्वज्ञानात स्थान नाही. जे ज्ञान इंद्रियांच्या द्वारे बुद्धीला होते तेच अस्तित्वात आहे असे समजले जाते. चैतन्य हे जडापासूनच निर्माण होते. चैतन्याला वेगळे अस्तित्व नाही आणि देह नष्ट झाला की ते नष्ट होते.
आकारामुळे निराकाराचा भास होतो, निराकार असे काही नाही, फक्त आकारच आहे. निर्माण झालेल्या ध्वनीमुळे आधी शांतता होती असे वाटते; शांतता असे काही नसते. [३]
चार्वाक तत्त्वज्ञान जडवादी असल्याने ही दृश्य सृष्टी केवळ जड द्रव्यांची परिणती आहे असे ठाम मत या दर्शनाने मांडले. ‘भूतेभ्यः चैतन्यम्!‘ हा त्याचा मुख्य सिद्धांत आहे. हे जड पदार्थ परस्परांच्या संपर्कात येतात नि आकार धारण करतात आणि हे विश्व साकारते. ते घटक विशिष्ट प्रमाणात एकत्र येतात आणि निरनिराळे देह उत्पन्न होतात व त्यात चैतन्य स्वयं उत्पन्न होते. अंतर्भूत घटकांचे प्रमाण बिघडले की, देह किंवा आकार नष्ट होतात, चैतन्यही नाश पावते. हाच मृत्यू. चैतन्य किंवा आत्मा जडाहून वेगळा नाही. तो देहात येतो, देहातून जातो, ही कल्पना वेडगळपणाची आहे, असे स्पष्ट मत या दर्शनात आढळते.
या दर्शनात अर्थ आणि काम हेच पुरूषार्थ म्हटले आहेत. धर्म आणि मोक्ष या संकल्पना नाहीत. सुखी होण्यासाठी माणसाने उद्योग करावेत, अर्थप्राप्ती करून घ्यावी. पण असा हा चार्वाकवादातल्या ’ऋणं कृत्वा घृतं पिबेत्, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः’.. या वाक्यामुळे काहीसे हेटाळले गेले. पण खरे पाहिले तर, हे तत्त्वज्ञान अयोग्य गोष्टी सुचवत नाही. उलट, ते सुखासाठी चोरी किंवा मद्यप्राशन योग्य नाही असे सांगून, हिंसेचा धिक्कार आणि शाकाहाराचे समर्थन करते. वेदान्त हा सत्य नसून वेद रचणारे निशाचर, धूर्त आहेत. अग्निहोत्र आणि वेदांचे पठण तसेच त्यांतील होमहवन हे उपयुक्त नाहीत. पौरोहित्यावर गुजराण करणाऱ्यांची चार्वाकाने निंदा केली आहे. सुख मिळवण्यासाठी प्रामाणिक श्रम करावेत, काव्य, नृत्य, संगीत या कलाही हव्यात, राजकीय स्थैर्य हवे आणि स्वार्थीपणा नको असा हा विचार आहे.
कृषिगोरक्षवाणिज्यदण्डनीत्यादिभि: बुधै:।
एतेरैव सदोपायैर्भोगाननुभवेद्भुवि ।।
शहाण्यांनी या जगात शेती, गोपालन, व्यापार, प्रशासन सेवा इत्यादी कामे करून मिळालेल्या द्रव्याच्या साह्याने सुखोपभोग घ्यावेत, हाच लोकायतांचा आदर्श आहे.
पंचज्ञानेंद्रियांनी ज्याचा अनुभव घेता येतो तेवढेच खरे.म्हणून आकाश हे महाभूत ते मानत नाहीत. लोकायत तत्त्वज्ञानानुसार महाभूते म्हणजे पृथ्वी,आप,तेज,वायू ही चार तत्त्वे; यांच्या संयोगांस शरीर, इंद्रिय अशा संज्ञा आहेत, त्यातून चैतन्याची निर्मिती होते. चेतनायुक्त शरीर म्हणजेच पुरुष. प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे. अनुमान प्रमाण नाही. त्यामुळे परलोक अस्तित्वात नाही. अर्थ व काम हेच पुरुषार्थ आहेत. वेदवाङ्मय हा धूर्तांचा प्रलाप आहे.
आत्मा नाही, त्यामुळे अर्थात पुनर्जन्म नाही. श्राद्ध, पक्ष इत्यादी पितरांसाठी करावयाचे विधी त्यांना पटत नाहीत. आत्मा मानणे म्हणजे जे दिसते (शरीर) ते नाही(विनाशी मानणे) आणि जे दिसत नाही(आत्मा) तो आहे(अविनाशी मानणे) असे म्हणणे. परलोक मानत नसल्याने, कर्मविपाकसिद्धांतावरही विश्वास नाही. तरी ह्या जन्मी जे करायचे ते करून घ्यावे, पुढचा जन्म वगैरे नसतो, हे त्यांचे मत आहे.
प्रत्यक्ष, अनुमान व शब्द या तीन प्रमाणांच्या आधारे घटना, परिस्थिती यांची चिकित्सा करून सत्यासत्यता पडताळून पाहता येते असा सिध्दांत चार्वाकांनी मांडला. ज्ञानेंद्रियांच्या आधारे होणारे ज्ञान हे मुख्य प्रत्यक्ष प्रमाण. निसर्गातील गोष्टींचा परस्परांशी संबंध असतो. जसे धूर आणि अग्नी, पाऊस आणि मृद्गंध. अशा रितीने एकमेकांशी संबंधित गोष्टींचे ज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाणानुसार झाले नाही तरी अनुमानाने ओळखता येते, हे अनुमानप्रमाण. ज्याला पदार्थाचे सत्य ज्ञान झाले आहे अशा खरे बोलणाऱ्या माणसाने पाहिलेले व सांगितलेले ज्ञान हे शब्दप्रमाण. अशी चार्वाकांनी या तीन प्रमाणांची मांडणी केली होती.
इतर ज्ञानप्रमाणांच्या मर्यादा विशद करताना हे दर्शन म्हणते- शब्द हे प्रमाण नव्हे. कारण, हे शब्द कुणीतरी उच्चारलेले असतात. त्यांचे नंतर संकलन होते. उच्चारणाऱ्यांची पात्रता काय, हा वादग्रस्त विषय होय. अपौरुषेय वेदांतले शब्द प्रमाण मानले, तर हाती काय येते ? जर्भरी, तुर्भरी असे निरर्थक शब्द वेदांमध्ये आढळतात. शिवाय स्वयंबहिणीने आपल्या भावाला कामपूर्तीसाठी गळ घातली, अशा अर्थाचे मंत्र वेदांमध्ये आहेत, असे हे शब्द प्रमाण धरायचे, हे वेडेपणाचे लक्षण की पांडित्याचे ? म्हणून वेदप्रामाण्य कुचकामाचे ठरते. अनुमान हेही तसेच. कशाचा तरी अनुभव घेऊन कुणीतरी काही अंदाज बांधतो- धूर असेल तेथे विस्तव असतोच, हा स्वयंपाकगृहातील अनुभव घेऊन, डोंगरावर धूर आहे त्याअर्थी तेथे आग आहे, असा अंदाज करता येईल. पण याला कित्येक मर्यादा पडतात. प्रत्येक व्यक्तिगणिक अनुमान वेगळे असू शकते. प्रत्येक प्रसंगात ते उपयुक्त ठरेलच असे नाही, म्हणून अनुमान प्रमाण या दर्शनाने अंशतः बाद ठरविले आहे.[४]
तर्क व प्रमाणांच्या आधारे धर्मशास्त्रांची कठोर चिकीत्सा चार्वाकांनी केली. लौकिक अनुमान व अलौकिक अनुमान असे अनुमाननचे दोन भाग करून अलौकिक अनुमान चार्वाकांनी नाकारले आहे. लौकिक अनुमानाचेही व्यावहारिक व तात्त्विक असे दोन भाग करून तात्त्विक अनुमानाच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. देहाहून वेगळा असा आत्मा नसतो. पुनर्जन्म, स्वर्ग-नरक, ईश्वर, मोक्ष इत्यादी अलौकिक गोष्टींचे अनुमान त्यानी नाकारले आहे. वरील गोष्टीं नाकारल्यामुळे धर्मशास्त्रांनी उभारलेला अलौकिकाचा सारा पसाराच अर्थहीन होतो.
अनुमानामुळेही पूर्ण सत्य कळत नाही. अनुमानाने मिळणारे ज्ञान हे व्यवहारोपयोगी असते, ते पूर्ण सत्याचा बोध करून देत नाही. त्यामुळे अनुमानाच्याही मर्यादा ओळखल्या पाहिजेत. ऋषी, मुनी, धर्मसंस्थापक, प्रेषित इत्यादींनी केलेली अनुमाने ही पूर्ण सत्य आहेत असे मानल्यामुळे आपले खऱ्या सत्याचे ज्ञान अपुरेच राहते. धर्मशास्त्रे सर्वश्रेष्ठ व स्वयंभू मानल्यामुळे ती, खोटेपणा आत्मविसंगती व पुनरूक्ती या दोषांनी काळवंडली आहेत, असे चार्वाक म्हणतात.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यापैकी मोक्ष हा परमपुरुषार्थ सर्वश्रेष्ठ मानला जातो. जन्ममरणाच्या फेऱ्यांतून आणि दुःखातून सुटका असे मोक्षाचे वर्णन केले जाते. चार्वाकांनी हा मोक्ष नाकारून ‘पारतंत्र्य म्हणजे बंध आणि स्वातंत्र्य म्हणजेच मोक्ष’ ही संकल्पना मांडली.
चार्वाक अर्थ आणि काम असे दोनच पुरुषार्थ मानीत होते. पण धर्म नाकारताना पारलौकिकाचे फळ देणारे साधन म्हणून तो नाकारला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. शिस्त आणि व्यवस्था हे महत्त्वाचे आहेतच पण त्यासाठी समाजाचे नियमन करणारी दंडनीती चार्वाकांनी ग्राह्य मानली आहे. धर्म- परलोकात सुख देणारा, पुण्यकृत्य- परलोकात सुख देणारे, पाप- परलोकात दुःख देणारे ही धर्माची संकल्पना चार्वाकांनी नाकारली. पण त्यांनी मानवी मूल्ये नाकारली नाहीत.
य़ज्ञाचे कर्मकांड, त्यात होणारा वेळेचा व द्रव्याचा नाश आणि त्यातील अपरिमित हिंसा हे चार्वाकांच्या यज्ञविरोधामागील कारण होते. चातुर्वण्य हे संस्कृतीचे अधिष्ठान मानायलाही त्यांचा विरोध होता. ऐतिहासिकदृष्ट्या येणारी वंशशुद्धी व तिच्यामुळे येणारा अहंकार यावर चार्वाकांनी कठोर टीका केली. वंशशुद्धी ही वस्तुस्थिती नसून आभास आहे, तो आपले वरिष्ठत्व टिकविण्यासाठी केलेला प्रचार आहे असे चार्वाक मानतात.
चार्वाकांनी ऋणाविषयी बेजबाबदारपणा मान्य केला नाही. समाजाला नियंत्रित करण्यासाठी दंडनीती नावाच्या स्वतंत्र विद्येचा पुरस्कार त्यांनी केला. चांगली कृत्ये, न्याय प्रशासन व कल्याणकारी शासन यांचा त्यानी आग्रह धरला होता.
यज्ञाच्या अग्नीत तूप जाळून अलौकिकाच्या अभिलाषा करण्यापेक्षा ते तूप पिऊन शरीर व मन धष्टपुष्ट व समर्थ करा असा लौकिक जीवनाबाबतचा सम्यक अर्थ त्यांनी सांगितला. प्रस्थापित हितसंबंधांवर आधारलेला धर्म नाकारून विधायक मार्ग दाखवून देण्याचे कार्य चार्वाकांनी केले. ऋणाला भिण्याचे कारण नाही आणि तूप पिण्यातही काही पाप नाही. संकटांनी खचून-पिचून जाऊ नका, कर्तबगारीने संकटांवर मात करा व स्वतःच्या कष्टाचा आस्वाद स्वतःच घ्या हा या तत्त्वज्ञानाचा मूलमंत्र सर्वांनाच सारखा आहे. [५]
वेदांच्या परंपरेतल्या, यज्ञयाग, पूजाअर्चा, अग्निहोत्र, श्राद्ध, स्वर्ग-नरक, कर्म- कर्मफळ, पूर्वजन्म- पुनर्जन्म, मोक्ष या सर्व कल्पना व कर्मकांड ही लोकांना लुबाडण्यासाठी, बनेल हितसंबंधीयांनी निर्माण केलेले भ्रमजाल आहे. पातिव्रत्य हे मूल्य नसून स्त्रियांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे, जुलमी पुरुषांचे एक हत्यार आहे. वर्णाश्रम व जातिभेद हे अशास्त्रीय आहेत. या विचारांची विधायक बाजू अशी- स्वतःची बुद्धी हेच खरे प्रमाण आहे. हे ऐहिक जीवनच खरे आहे. शेती, व्यापार, गोपालन, प्रशासन आणि उपयुक्त शास्त्रांचे अध्यापन अशा साधनांनी काम करून द्रव्य मिळवावे आणि सर्व सुखोपभोग मिळवून नीतीने जगावे. स्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे.
संदर्भ : चार्वाक . (२०१३, एप्रिल ६). विकिपीडिया, एक मुक्त ज्ञानकोश. Retrieved ०९:२५, मार्च ११, २०१४ from http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95&oldid=1153925. मराठी विकिपीडियातील लेख आणि त्यात नमूद संदर्भ
मराठी विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्प हा विकिप्रकल्प, विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे.यात आपण सहभागी होऊ शकता.धागा विकिपीडियाकरता असल्यामुळे नित्या प्रमाणे आपले या धाग्यावरील लेखन प्रताधिकार मुक्त होत आहे. विषयांतर टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागा साठी आपणा सर्वांना धन्यवाद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उत्तम लेख!
पॉपकॉर्न घेउन बसल्या गेल्या मेल्या आहे!
(पॉपकॉर्न +) माहिती पृच्छा
चार्वाकाविषयी
चार्वाक आणि कम्युनीस्ट
@ मात्र केवळ लोकायत या
एक पुस्तक सुचवतो.
तुम्हाला नक्की काय करायचंय?
माहितीत भर आणि त्याचा प्रतिवाद दोन्हीही हवे
मराठी विकिपीडियावर आपल्या संबंधीत लेखाचा संदर्भ उधृत करून?
शब्दांना आक्षेप
प्रतिसाद पुरुष सद्स्याला आहे म्हणून तसं म्हटलंय
गडबड
वाचतो आहे
आयला, असंय होय!
आपले बरोबर आहे
रोचक
रोचक
सध्या चार्वाक हा थोर होता आणि
याच्याशी सहमत व्हावेच लागते.
+२
कारण चार्वाक'च' 'झेपतो'...
हम्म..
अगदी तहे दिल से सहमत. अन
माझा व्यक्तीगत अंदाज
अर्थातच. मौखिक विरुद्ध लेखन
नाही जाळले नसतील तरी
हम्म...
.
तो अन हा चार्वाक एकच की कसे,
चार्वाक ही एकच व्यक्ती नसून
हा महाभारतातला भाग गुप्तकालीन
.
रोचक आहे खरे.
.
आकार, निराकार, प्रत्यक्ष
चार्वाक प्रॅक्टीकल आहे पण अंतिम नाही
कशाही इंटरप्रिट करता येत
अंतिम सत्य वगैरे जाऊं द्या
संक्षी तुम्ही विधानाने प्रॅक्टीकल आहात.
+७८६
+१११११११
भूत - वर्तमान
चार्वाकाला दर्शन का मानले गेले असावे?
बाय द वे ..
माझे मत
माझे मत भाग २
दर्शन
२ धागे
छान लेख. आभार.