Skip to main content

गुजरात विकासाचे मृगजळ..

लेखक बंडा मामा यांनी गुरुवार, 06/03/2014 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
अरविंद केजरीवाल ह्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सगळीकडे त्याची बातमी दिसू लागली. गुजरातच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे असे स्पष्ट केले असुनही, राजकीय रॅलीला परवानगी घेतली नाही असे लंगडे कारण दाखवुन पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच कुठेतरी पाणी मुरते आहे हे स्पष्ट आहे. संघपरीवाराचा जोर असणारा राम मंदिराचा मुद्दा आता मते मि़ळवुन देत नाही म्हणून 'विकास पुरुष' ही प्रतिमा निर्माण करुन त्यावर जोर देण्याची निती अवलंबली आहे. आणि त्यासाठी गुजुरातच्या विकासाचा उदो उदो सिस्ट्मॅटीकली भाजपा कडुन केला जातो आहे. प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्‍याच लोकांना चांगलेच ठाऊक आहे. एखादे आयसोलेटेड उदाहरण सोडल्यास, इन जनरल गुजरात अनेक कसोट्यांवर इतर अनेक राज्यांच्या बराच मागे आहे. सध्या केजरीवालने ह्याच मुळावर घाव घातल्याने अर्थातच भाजप कडून प्रचंड विरोध होणार हे स्पष्ट होते. त्यानिमित्ताने मला साधारण एक वर्षापुर्वीचा फ्रंट्लाईन मधे आलेला हा लेख आठवला. संपूर्ण गुजरातचा आढावा ह्यात एका बर्ड्स आय व्ह्यु प्रमाणे घेतला आहे. भरपूर आकडेवारीही दिलेली आहे. केजरीवाललाही हे चांगलेच माहित आहे, आणि म्हणूनच त्याने मुळावरच घाव केला आहे. लेख इथे वाचा: http://www.frontline.in/the-nation/mirage-of-development/article4430889… तातील काही तक्ते: chart chart chart आता ह्यातुन पुढे काय होणार हे मात्र रोचक असणार आहे.

वाचने 32369
प्रतिक्रिया 163

प्रतिक्रिया

योग्य जोड्या जुळवा: गट १: अ)गुजरातचा विकास ब)काँग्रेस आघाडीचे राज्य क)आप चे स्वच्छ आणि स्थिर प्रशासन गट २: अ)मृगजळ ब) मरूस्थळ क) हागणदरी

In reply to by मूकवाचक

आपने आपल्या अल्पवाधीच्या काळात भ्रष्टाचार वाढविण्याचेच कार्य केले आहे. पाण्याची चोरी लोकांना शिकविली.

हिमाचल प्रदेश मध्ये सामान्य माणसाचे 'रहन-सहन' महाराष्ट्रातल्या सामान्य माणसापेक्षा किती तरी पट चांगले. आहे. तरी ही प्रतिव्यक्ती आय महाराष्ट्रात जास्त आहे. (काही श्रीमंत लोकांमुळे- मुंबई पुणे काढून टाका महाराष्ट्र कदाचित बिहारपेक्षा ही मागे दिसेल. दुसरी कडे दिल्लीची प्रतिव्यक्ती आय दाखविल्या पेक्षा जास्त असू शकते.

एकंदरीत मोदींच्या कारभारात गुजरातचा नक्की काय विकास झाला ह्यावर मते मांडण्यात कुणालाच इंटरेस्ट दिसत नाही, आणि काही प्रतिसादातली भाषा आणि टोन बघता ह्यावर काही साधक बाधक चर्चा होऊ शकेल ह्याची सुतरामही शक्यता दिसत नाही. जय हो!

In reply to by बंडा मामा

काय आहे माहीत आहे का, जे पेराल ते उगवते. तुम्ही मोदींना क्रिटिसाउझ करायला लेख लिहिला. प्रतिक्रिया पण तशाच येणार नाही क? नाहीतर ह्र वाक्य कशाला हवे होते?
केजरीवाललाही हे चांगलेच माहित आहे, आणि म्हणूनच त्याने मुळावरच घाव केला आहे.
आणि हे पण
प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्‍याच लोकांना चांगलेच ठाऊक आहे
असो.

In reply to by बंडा मामा

बंडा मामा तुम्हाला गुजरात , मोदी ह्यांच्या विषयी लेख काढावासा वाटला हेच तर खरे मोदी ह्यांच्या सध्याच्या तरुणाई व जनतेवर पडलेल्या मोहिनेचे कर्तब आहे, आता नितीश कुमार ह्यांच्या बिहार मधील दाव्यांवर कोणी चर्चा करत का नमो नमः

In reply to by बंडा मामा

एकंदरीत मोदींच्या कारभारात गुजरातचा नक्की काय विकास झाला ह्यावर मते मांडण्यात कुणालाच इंटरेस्ट दिसत नाही,
कारण तो उद्देश्य मूळ धाग्यातच दिसत नाही. धाग्याचा सगळा रोख तर गुजरातची प्रगती कितीही झालिये असं म्हंटलं तरी ती कशी झालेली नाही हे दाखवण्यावर दिसत आहे....
काही प्रतिसादातली भाषा आणि टोन बघता ह्यावर काही साधक बाधक चर्चा होऊ शकेल ह्याची सुतरामही शक्यता दिसत नाही.
कारण सुरवात तुम्हीच केलेली आहे. जरा वेगळं मत दर्शवणारा प्रतिसाद दिसताच "स्वच्छ चश्मा वापरा" वगैरे उद्धटपणाचे प्रतिसाद तुम्हीच देऊन सुरवात केलेली आहे. आता मिपाकरांकडून लाक्षणिक मुखभंग झाल्यावर हे सगळं शहाणपण सुचतं आहे!!!! वर म्हंटल्याप्रमाणे पेरले ते उगवते!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

+१ धाग्याचा हेतू खोडसाळ वाटतो. बरं विकासाबद्दल चर्चा करायची तर 'मोदी यायच्या आधीची स्थिती आणि आत्ताची स्थिती यांची तुलना करावी' या वरती दिलेल्या सूचनेची सुद्धा दखल घेतलेली दिसत नाही.

In reply to by पिवळा डांबिस

स्वच्छ चष्म्यातुन बघा अशा साठी लिहिलं होतं कारण तुम्ही रॅली/सभा काढल्यामुळे अटक केली असे लिहिले होते. नंतर तुम्ही प्रतिसादात ते सावरुन घेतलं होतं. प्रतिसादातील भाषा/टोन हा मुद्दा तुमच्या प्रतिसादाला उद्देशुन नव्हता. तुम्हाला मागे आयुर्वेदाच्या चर्चेत मी टिका करणारे प्रतिसाद लिहिले होते म्हणून तुम्ही माझ्या विषयी काहीतरी पूर्वग्रह केलेला दिसतो.

केजू चं "आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून" असं काहीसं चाललं आहे. प्रशासनाची संधी होती तेव्हा सरकार मधून पळ काढला आणि आत्ता इतर जे प्रशासनात आहेत त्यांना नावे ठेवण्याची कामं चालू आहे.

केजरीवाल यांनी आचारसंहीतेचा भंग केला असे प्रथमदर्शनी पुराव्यानुसार सिद्ध होत आहे असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. ही बातमी सर्वच माध्यमात आली आहे पण ती वाचायला गुगलावे लागते. पहील्या पानावर गुजरात पोलीसांनी गुन्हा दाखल केल्याच्या अथवा सिसोडीयांच्या गाडीवर गुजरातमधे दगडफेक झाली असल्या बातम्या आहेत. आता ही दगडफेक तिसरी आहे. हे तक्रार न नोंदवता नुसते भाजपाने केले असे कसे म्हणू शकतात? आणि हो केजरीवालांच्या अभ्यासदौर्‍याचे पुढे काय झाले? का २५ गाड्यांचा ताफा आचारसंहीतेमुळे घेऊन जाता येत नाही म्हणून मधेच ड्रॉप घेतला? का लक्षात आले की एक अंबानी-अडानी म्हणत बसण्याव्यतिरीक्त काही करता येणार नाही आणि जनता इतकी अडानी नाही. (सगळे थोडेच आप समर्थक आहेत? *mosking* )

केजरीवाल यांनी गुजरातच्या आपल्या दौर्यात मिळवलेल्या अनुभवा बद्दल लिहिले आहे आणि सांगितले आहे . त्यांच्या ह्या भेटीचा उद्देश मोदींच्या विरुद्ध प्रचार करणे आणि त्या साठी कारणे शोधणे हे आधी पासूनच ठरलेले होते. त्यांच्या reports वरून Katherine Mayo या अमेरिकन बाईने १९२७ साली लिहिलेल्या Mother इंडिया या नावाच्या पुस्तकावरील महात्मा गांधी यानी दिलेल्या अभिप्रायाची आठवण झाली. त्या अभिप्रायातील पुढील वाक्य उद्धृत करत आहे. --- But the impression it leaves on my mind is that it is the report of a drain inspector sent out with the one purpose of opening and examining the drains of the country to be reported upon, or to give a graphic description of the stench exuded by the opened drains.-

काही गुजराती मित्रांशी(जे तेथील गावांमध्ये लहानाचे मोठे झाले) ह्यावर बोलणे झाले. गेल्या दहा/बारा वर्षात गुजरातमध्ये बर्‍यापैकी सुधारणा झाल्या आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. प्रत्येक गावात २४ तास वीज आहे.प्रशासन ईतर राज्यांसारखे भ्रष्ट्,वेळकाढू असायचे. मोदी आल्यानंतर ह्यात बर्‍यापैकी बदल झाले आहेत असे त्यांचे म्हणणे. हे जाणवण्यासारखे बदल झाल्यामुळे लोकांनी तेथे भाजपाला/मोदींना निवडून दिले. बंडामामा, आकडेवारे बाजूला ठेवा. ती पाहिजे तशी शिजवता येते.फ्रंटलाईनवाले तर त्यात पी.एच्.डी.आहेत. गुजरातमधील लोकांशी, मध्यम वर्गाशी प्रत्यक्ष बोला. मग अनुभव सांगा.

In reply to by मंदार दिलीप जोशी

असल्या थापा मीदेखिल भरपूर ऐकल्या आहेत. फेकू असे काहीतरी म्हणतात म्हणे आजकाल नेटवर यांना.

In reply to by आनंदी गोपाळ

माझा ही एक मोदी समर्थक मित्र गुजरात मध्ये एका शहरात जाउन आला अन तेथील विकास बघून त्याचे डोळे दिपले, तीन चार रस्त्यावर फिरून सखोल पहाणी दौरा केल्या नंतर त्यास असे आढळून आले की गुजरात मधला साधा चपराशी सुध्दा करोडपती असतो !

चेतन भगत या लेखकाच्या लिखाणाविषयी माझे मत फारसे चांगले नाही आणि मी त्याचा फॅन वगैरे तर अजिबात नाही.तरीही त्याचे ट्विटरवरील ट्विट इथे लिहायचा मोह आवरत नाही (कोणीही लिहिले असले तरी तो मुद्दा चुकीचा कसा ठरेल? ) : "मी अमेरिकेचे अध्यक्ष ओबामांच्या ऑफिसमध्ये आधी न वेळ न ठरविता मिडिया कॅमेरे घेऊन जाऊन थडकणार आहे.जर त्यांनी माझी भेट घेतली नाही तर ते एक तर भ्रष्ट आहेत किंवा मला घाबरत आहेत" :) नेहमीप्रमाणे केजरीवालने आपली नाटके चालूच ठेवली आहेत.एखादे लहान मूल आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायला भोकाड पसरते किंवा अन्य काही चाळे करते त्याप्रमाणे हा सगळा प्रकार चालला आहे असे स्पष्ट दिसते आहे.या असल्या माकडचाळ्यांच्या तुलनेत मोदी अनंतपटींनी उजवे आहेत. खरे तर मी पण या धाग्यावर वाचनमात्रच राहणार होतो.तरीही इतर अनेकांप्रमाणे मलाही लिहायचा मोह आवरता आला नाही. (केजरीवालचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाणारा) क्लिंटन

In reply to by क्लिंटन

सहमत. पण तरीही हे असले पक्ष येतात आणि मते तर कधी कधी जागाही घेऊन जातात. आजवरचा इतिहास पहाता यामुळे फायदा कमी आणि नुकसानच जास्त झालेले आहे.

In reply to by क्लिंटन

या असल्या माकडचाळ्यांच्या तुलनेत मोदी अनंतपटींनी उजवे आहेत. ते अनंतपटीने जाउंदेत किंचीत डावे असते तरी चालले असते आम्हाला! ;)

In reply to by क्लिंटन

Kejriwal प्रतिमा आणि बातमी स्त्रोत डिएनए इंडीया. केजरीवालांचे म्हणणे आहे की माजी मुख्यमंत्री म्हणून मोदींनीच त्यांना बोलवायला हवे होते. पण आपण (म्हणजे एके) दहशतवादी नसतानाही थांबवले, त्यातून हे समजते की ते (मोदी) लोकशाहीवादी नाहीत. *aggressive* मला वाटते आता केजरीवालना पण लॉलीपॉप देण्याची वेळ आलेली आहे.

In reply to by क्लिंटन

केजरीवालांचा नाटकीपणा आणि ढोंगीपणा आता डोक्यात जायला लागला आहे. पप्पू आणि मोदींना त्यांच्या हेलिकॉप्टर वापरण्यावरून धारेवर धरणारे केजरीवाल आज 'इंडिया टुडे'च्या काँक्लेव्हला त्यांच्याच चार्टर्ड विमानाने जयपूरहून दिल्लीला गेले. ढोंगीपणाचा हा कळस आहे. मुख्यमंत्रीपदावरून राजीनामा देऊन ३ आठवडे लोटले तरी अजून त्यांनी सरकारी निवासस्थान सोडलेले नाही. अफझल गुरूच्या फाशीला विरोध करणार्‍या व्यक्तीला त्यांनी आपचे तिकिट दिले आहे. ओरिसात नक्षलवाद्यांचे समर्थन करणार्‍याला सुद्धा आपचे तिकीट आहे. नाटकीपणा आणि ढोंगीपणा याबाबतीत कमालीचे नाटकी व ढोंगी असलेले आव्हाड, भुजबळ, वि.प्र.सिंग इ. मंडळी केजरीवालांच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाहीत. 'इंडिया टुडेच्या' कॉन्क्लेव्हमध्ये सुद्धा स्वतःबद्दल बोलताना, "अरविंदची लायकी नाही. अरविंद हा अत्यंत क्षुद्र व्यक्ती आहे." असा कांगावा आणि मेलोड्रामा करणार्‍या केजरीवालांचा आता संताप यायला लागला आहे. ढोंगीपणा करून मिळविलेले मुख्यमंत्रीपद या माणसाला २ महिने सुद्धा टिकविता आले नाही. पळपुटेपणा करून हे तिथून पळून आले आणि स्वतःकडे प्रामाणिकपणाचा मक्ता असल्याचा आव आणून निव्वळ ढोंग व ड्रामेबाजी सुरू आहे.

In reply to by श्रीगुरुजी

केजरीवालांचा नाटकीपणा आणि ढोंगीपणा आता डोक्यात जायला लागला आहे.
निवडणूक जस जशी जवळ येईल आणि निकालांची सुरुवात होईन तस तसे अजूनच तुमचे डोके दुखणार आहे. काही तरी घरगुती उपाय तयार ठेवा.

In reply to by बंडा मामा

सूचनेबद्दल मनापासून धन्यवाद! घरगुती उपायांसाठी केजरीवालांशी बोलणार आहे. त्यांचा खोकला अचानक बंद झालेला दिसतोय. खोकल्यावर कोणते घरगुती उपचार घेतले ते जाणून घ्यायची इच्छा आहे. बादवे, तुमच्या आशावादाचे कौतुक वाटते!

In reply to by श्रीगुरुजी

मध्यंतरी केजरीवालांसारखेच प्रशांत भूषणना पण खोकताना पाहीले. झालं काय तरूण मुले एनडीटीव्हीवर त्यांना अचानक भारती आणि काश्मीर वरून प्रश्न विचारायला लागली. त्याआधी भाजपा-काँग्रेस, भांडवलदारांच्या विरोधात बोलताना खोकल्याला खो दिला होता तो अचानक मग उफाळून आला.

केजरीवाल एक नंबरचा चालू माणूस आहे. प्रत्येकाचा मस्त उपयोग करून स्वतःचे महात्म्य वाढवून घेत आहे. सुरवातीला फारच आवडला पण आता रोजच्या नाटकाने कंटाळा आला बुवा. दिल्लीमधून पळून गेला. तिथे स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर ह्याला कळले की आपण फार काही करू शकत नाही मग आता बाकीच्यांवर सतत शिंतोडे उडवून आपले चर्चेत राहणे हे एकाच काम आहे. किती दिवस चालणार हे?

In reply to by चैतन्य ईन्या

केजरीवाल एक नंबरचा चालू माणूस आहे. वरील दोन ठळक केलेले शब्द एकाच वाक्यात म्हणजे द्वैरुक्ती आहे :D

शंभर!! :) बंडा मामा सिंदाबाद! नाई नाई- झिंदाबाद! बाकी केजरी महाराज सोळा मे ला काय पवित्रा घेणार याची उत्सुकता आहे. वीस वगैरे जागा मिळाल्या तर कुणा बरोबर जाणार? कारण सगळेच भ्रष्ट आहेत ते स्वतहा सोडून ,

शिळ्या कढीला उत आणायच्या या प्रयत्नात प्रतिक्रीयांचे शतक मारल्याबद्दल धागाकर्त्या चाचांचे, माफ करा, मामांचे हार्दिक अभीनंदन.

राहुल गांधी विमान वापरतो म्हणुन बोंबलणारा खेचरवाल काल इंडियाबुल्सच्या खाजगी विमानाने फिरत होता. त्याबद्दल पण लिहा ना आता.

तथाकथित बुद्धिजीवी वर्गाला वाटणारं डाव्या विचारांचं आकर्षण हेरून काँग्रेसने स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचा यशस्वीपणे बुद्धिभेद केला. गांधी बाबांचं नाव घेवून त्यात आणखी नव-बुद्धीजीवी वर्गाला (ह्यात ते चाचा, अमोलरत्न वगैरे आलेच) पण घुमवण्यात आले. आता त्या भंपक डाव्या विचारांचं वैयर्थ सिद्ध होत आले (कारण रुबल्स ची किमत घसरली, सबब खिसे भरले जात असले तरी मूल्य वाढण्यापेक्षा ओझंच जास्त होतंय ). मग आता पुढील 'फोरीन-रिटर्नड' पिढीला घुमावायचे कसे? कारण त्या लोकांनी परदेशातील सुधारणा आणि प्रगती तर स्वत:च अनुभवली आहे …. मग त्याना टांग मारण्यासाठी हे केजरीवाल चे प्यादे कॉंग्रेसने पुढे आणले आहे … एकूणात काय तर प्रत्यक्षात उद्योगक्षेत्राला चालना देवून रोजगार निर्मिती वाढवून सर्वसमावेशक विकास ( बापरे … हे काय असतं ?) साधण्यापेक्षा जनतेचा बुद्धिभेद करत राहावे आणि आपला आनी आपल्यापुढे हुजरेगिरी करणार्या चार दोन टाळ्क्यांच्या कुटुंबांचाच काय तो विकास करत राहावे … भारतीय जनते इतकी पुन्हा पुन्हा फसवणुक करून घेण्यास उत्सुक (योग्य तो संस्कृत शब्द हवा असल्यास व्यनि करावा, येथे लिहिणे उचित वाटत नाही) जनता जगात कोठेही पाहिली नाही ....

भारतातील उद्योगधंद्यातील १)हल्दीराम ग्रुपचे मालक,२)मायक्रोमक्स मोबाईल चे मालक,३)सहाराचे मालक आता तुरुंगात अहेत. खेचरवाल अंबानी व अदानीना तुरुंगात टाकायला उत्सुक आहेत. त्यातुन कोन वाचते बघु, मग विकास करु.

भारताला विकासाची गरज काय? भारत हा आधीच अतिशय, अत्यंत, महाभयंकर विकसित देश आहे ह्या देशाचा डोळे दिपवणारा आणि कान किटवणारा विकास इंडीया शायनिंग च्या काळात होऊन गेलेला आहे त्याची फळे पिढ्यानपिढ्या खाऊन संपणार नाहीत मग अजून काय करायचे उरले आहे?. चालू द्या! टेली शॉपिंग मधल्या बिफोर आफ्टर सारखे अवास्तव दावे करायला काय जातं? लालू प्रसाद ह्यांच्या काळातल्या बिहार किंवा समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेश सरकार पेक्षा किंवा अनेक सरकारां पेक्षा गुजरात सरकार ने नक्कीच चांगले काम केले आहे हे मात्र मान्य. पण काही विभागात निर्देशांक चांगले आहेत म्हणून त्याचा उदो उदो करून विकास पुरुष म्हणवून घायचे अन जिथे अपयश आले ते झाकून ठेवायचे किंवा नाकारायचे खोटी आकडेवारी म्हणून ओरड करायची हे सोयीचे राजकारण. काँग्रेसच्या महाराष्ट्र सरकार चे रोजगार हमी योजना मॉडेल देशात चालतंय. बंगाल मधल्या डाव्या आघाडीचे मिड डे मिल ही योजना पूर्ण देशात आता सुरु आहे. भाजपच्या छत्तीसगढ सरकारचे योगदान ही महत्वपूर्ण आहेच सरकारी योजनांची कर्यक्षम अंमल बजावणी अन लोकांपर्यंत डिलीव्हरी चे मॉडेल सगळ्या देशाने उचलले आहे. कुठल्याही पक्षाच्या चांगल्या कामाला कुणीही नाकारू शकत नाही. पण अवास्तव अतिरंजित दावे ही मान्य होतील असे नाही.

In reply to by जयनीत

लालू प्रसाद ह्यांच्या काळातल्या बिहार किंवा समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेश सरकार पेक्षा किंवा अनेक सरकारां पेक्षा गुजरात सरकार ने नक्कीच चांगले काम केले आहे हे मात्र मान्य.
अर्थातच मान्य आहे, पण तुलना लालू आणि मुलायमशी केली तर कुठलेही राज्य उठूनच दिसेल. मुद्दा आहे की मोदींनी विशेष असे काय केले आहे? विकास पुरुष हे संपूर्ण मार्केटिंग गिमिक असून तुम्ही दिलेला टेलेमार्केटींगचा मुद्दा अगदी चपखल आहे.

इथे केजरीवाल आणि आप ह्यांच्यावर टिका करणाऱ्यांनी आधी मोदींचे विकासाचे दावे सत्य कसे हे सांगावे. केजरीवालांचे १६ प्रश्न जर नीट पाहीलेत तर त्यातील बहुतेक प्रश्न हे सरकारी आकडेवारीवर आधारीत आहेत. उदा. ११% ची वाढ कृषीक्षेत्रात झाली म्हणायचे पण प्रत्यक्षात ती -१.१% झालेली आहे. इतके रेटुन खोटं बोलणारे चालतात पण केजरीवालांनी कुठला राजकीय डावपेच खेळला तर मात्र जळजळ. अनार्किस्ट केजरीवाल चांगले की देश सर्वबाजुने संकटात असतांना बाबरी मशीदीचा उन्माद निर्माण करणारे चांगले हे ज्यानेत्याने आपापले ठरवायचेय. केजरीवाल ह्यांचे राजकीय डावपेच भारताला नवीन नाहीत. कॉंग्रेस-भाजपा वर्षानुवर्ष तेच करत आहेत. पण आज तत्सम डावपेचांबद्दल त्यांच्या समर्थकांनी जो त्रागा चालवलाय त्याला दुट्टपीपणा म्हणावेसे वाटते. मिपावर आधीही मी आकडेवारीसकट एक धागा सुरु केला होता, पण वस्तुस्थितीपेक्षा श्रद्धा महत्वाच्या असतात हे तिथेही जाणवलं. आपलं राजकारणात त्यालाच अधिक महत्व असल्याने केजरीवालांच्या मुद्द्यांवर चर्चा होण्यापेक्षा केजरीवालांवर अधिक लोकांची श्रद्धा बसु नये असाच प्रयत्न भाजपा करत राहिल.

In reply to by शैलेंद्रसिंह

केजरीवाल यांनी निवडणूकी आधीच मोदीच पंतप्रधान होणार हे मान्य केलेले दिसतयं अर्थात म्हणूनच हार मान्य केली आहे असे वाटते. म्हणून नंतर परत पोटापाण्याकरता रस्त्यावर भागाबाई माकडचेष्टा कराव्या लागणार त्याचा सराव चालू केला की काय असे वाटते... असो. तुम्ही दिलेल्या आयबीएन्च्या बातमीत सुरवातीसच म्हणले आहे: He also made allegations against Modi's government but offered no evidence for his claims. त्यात सर्व आले...

In reply to by विकास

>>> He also made allegations against Modi's government but offered no evidence for his claims. त्यात सर्व आले... केजरीवालांनी गाजावाजा करत गेले ४ दिवस गुजरातचा दौरा केला. संपूर्ण ४ दिवस मोदींवर निराधार आरोप करणे या व्यतिरिक्त त्यांनी काहीही केले नाही. एकाही आरोपाला आधार किंवा आकडेवारी किंवा पुरावे नाहीत. आपण किंवा आपला पक्ष काय करणार आहे किंवा गुजरातची तथाकथित दुरावस्था आपण कशी सुधारू इच्छितो याविषयी अवाक्षरसुद्धा काढलेले नाही किंवा ४ दिवसातील ४ मिनिटेसुद्धा ते यावर बोलेलेले नाहीत. या माणसाला केवळ नशीबाने मुख्यमंत्रीपद मिळाले होते, पण तिथून ते शेपूट घालून पळून आले. इतरांवर फक्त टीका करण्यापेक्षा मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेऊन काही बदल घडवून आणण्याची त्यांना संधी होती. पण अंगी भिनलेल्या ढोंगी व नाटकीपणामुळे काहीही करून दाखविण्याची त्यांची अपात्रता सर्वांसमोर येऊ लागताच राजीनाम्याचे नाटक करून धूम ठोकली. संपूर्ण ४ दिवस त्यांना फक्त मोदीफोबिया झालेला होता. त्यांना या कामगिरीवर कोणी पाठविले आहे हे उघडच आहे. काँग्रेसने स्वतः नामानिराळे राहून मोदींवर हा भाडोत्री माणूस सोडलेला आहे. त्यांचे प्रश्न वाचून गंमत वाटली. एक प्रश्न मोदी प्रचारासाठी हेलिकॉप्टर वापरतात त्याबद्दल आहे. याच ४ दिवसात इंडिया टुडेचे खाजगी चार्टर्ड विमान वापरून ते दिल्लीवारी करून आले याची त्यांना ना खंत ना खेद ना काही विरोधाभास दिसला. मोदींच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांवर आरोप करताना आपण सोमनाथ भारतींना मंत्रीमंडळात घेऊन त्यांचे ठाम समर्थन करत होतो याचा सोयिस्कर विसर पडलेला आहे. निवडणुक संपल्यावर केजरीवाल बिग बॉसच्या पुढील सत्रात असणार हे आता नक्की झाले आहे. त्यांच्याबरोबर बिग बॉस मध्ये दिग्विजय, आव्हाड, भुजबळ, लालू, सिब्बल, तिवारी इ. नौटंकी मंडळी पण असणार.

In reply to by श्रीगुरुजी

आपण किंवा आपला पक्ष काय करणार आहे किंवा गुजरातची तथाकथित दुरावस्था आपण कशी सुधारू इच्छितो याविषयी अवाक्षरसुद्धा काढलेले नाही किंवा ४ दिवसातील ४ मिनिटेसुद्धा ते यावर बोलेलेले नाहीत. या संदर्भात काल एक निरीक्षण वाचले. जेंव्हा केजरीवाल हे गुजरातमधे जेंव्हा तावातावाने मोदींच्या विरोधात भाषणे करत होते तेंव्हा मोदीं चाय पे चर्चा कार्यक्रमातून जनतेशी विकासासंदर्भात बोलत होते. ...

धन्यवाद! बाकी, आता मोदी येणार म्हणून मनात मांडे खाणारी ही येडचाप लोकं बघून त्यांची दया येते, हे येडे २००४ मध्ये इंडिया शायनिंग म्हणत म्ह्णत असेच थोबाडावर आपटले होते. तरीही शिकले काहीच नाहीत, च्यायला!

In reply to by बाळकराम

तुम्ही कॉम्रेड कि काँग्रेसी,गुरुजी जसे भाजपेयी वाटतात तसे तुम्ही कोण?आणी नरेंद्र मोदी कोण माहीत नसेल तर कुठल्याही भाजप कार्यालयात जावुन विचारा सांगतील ते.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तुम्ही समजता तसा मी भाजपेयी नाही. मी भाजपेयी आहे हे अर्धसत्य आहे, पूर्णसत्य नाही. मी कट्टर काँग्रेसविरोधक आहे, पण तितक्या प्रमाणात भाजपचा समर्थक नाही.१९८९ मध्ये वि.प्र.सिंग पंतप्रधान व्हावेत असे मला वाटत होते, पण त्यांनी भ्रमनिरास केला. २०१३ मध्ये म.प्र., छत्तीसगड व राजस्थान मध्ये भाजप यावा व दिल्लीत आप ने सरकार बनवावे असे मला वाटत होते. अगदी तसेच झाले, पण केजरवालांच्या ढोंगीपणा व नाटकीपणामुळे भ्रमनिरास झाला. मी उमेदवार व पक्ष असे दोन्ही बघून मत देतो.

केजरीवाल अशी व्यक्ती आहे की ते अमेरिकेला जाऊन वॉशिंग्टन डीसी शहरात कॅपिटॉल हिल, व्हाईट हाउस च्या जवळपासच्या परिसरात रस्त्यावर बसलेल्या एखाद्या भिकार्‍याचा फोटो काढतील व तो प्रसिद्ध करून "अमेरिका विकसित देश आहे हे धादांत खोटे आहे. प्रत्यक्षात त्या देशात सर्व नागरिक रस्त्यावर भीक मागतात. हा बघा पुरावा." असे सांगत फिरतील.

बाकी चर्चा बिरचा आपलं काही काम नव्हे. फक्त इथे एकदोनदा तीन वेळा जिंकून येणे वगैरे 'लै भारी' असं लिवल्यालं दिसलं. म्हटलं बंगालमधे सलग ३६ वर्षे कम्युनिस्टांचं सरकार होतं हे जाता जाता कानावर घालू या. अरे हो आणखी एक. निवाशी भारतीयांपेक्षा अनिवाशांना मोदींची आक्रमक पाठराखण करणं अधिक आवडतं असं दिसतंय. फेसबुकवरच्याही सातत्यपूर्ण आक्रमक असणार्‍या मोदी-ब्रिगेडमधे अनिवाशांचेच बहुमत दिसते मला. म्हणतात ना ज्याचं जळणार नाही त्याला काय कळणार पुढे काय वाढून ठेवलंय ते. हे म्हणजे प्रेक्षक ग्यालरीत बसून ग्लॅडिएटरला अंगठा जमिनीकडे करून दाखवणे आहे. आमच्या केजरूबाबाचे समर्थक त्यामानाने डि-क्लास झालेले दिसताहेत. बाकी 'म्या भारी, माझा नेता लै भारी' वगैरे शड्डू ठोकणं चालू द्या.

In reply to by रमताराम

माझ्या टोपणनावाला साजेल अशी - 2πr बाकीची मज्जा इथे आहे. -- आपली नम्र π विक्षिप्त अनिवासी

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सकाळीच तो दुवा वाचला! हहपुवा! मला देखील त्यामुळे मज्जा करायला प्रेरणा मिळाली:

अगर वादा किया 'गॅसपे कम होगा अधिभार' तो केजरीवालभी बोलेगा... अबकी बार मोदी सरकार!


In reply to by विकास

थोडे थांबा फक्त गॅसच काय, सर्व महागाई(वीज,डीजेल-पेट्रोल,भाजीपाला,डाळीं-साळी,मटन मच्छी,सोने-चांदी)कमी होईल. फक्त चांगले काम करणाऱ्या पक्षाला मत द्यायला विसरू नका! निवडणूकीचा वेळापत्रक

In reply to by आयुर्हित

काल संध्याकाळी ह्यांनी कट्ट्यावरून आणलेला-

वाटीत चिवडा मोदींना निवडा. अख्ख्या भारताचा मूड आहे. मोदी काका ड्युड आहे.

(मोदींचे कवतिक होत असूनही कोणाला मत द्यावे ह्या विचारात पडलेली)माई

In reply to by विकास

हा हा हा ;) बादवे दिग्गीराजांच्या नावावर खपवला जाणारा एक कोटः काँग्रेसचा जो हात आहे त्यामागेही आरेसेसचाच हात आहे =))

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अख्ख्या भारताचा मूड आहे एके४९ सुड* आहे

* सुड म्हणजे स्युडो (नाटकी) आहे...

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

फिजिक्समध्ये पास व्ह्यायला हवा न्युटनचा फोर्स. भारताच्या प्रगतीसाठी लावा आता मोदींचा कोर्स.

माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

फिजिक्समध्ये पास व्ह्यायला हवा न्युटनचा फोर्स काँग्रेसला निवडाल तर अजून एक होईल बोफोर्स!


अनिवासी भारतियानाच खेचर्वाल चा खुप पुळका आला आहे. भारतात राहणारे खेचरवाल ला आता दिग्विजयसिंगाचा सच्चा वारस म्हणुन बघतात.