✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माज़ा अस्तित्वा - तंजावर मराठीतून पॉडकास्ट

श
शशिकांत ओक यांनी
Fri, 02/21/2014 - 12:56  ·  लेख
लेख
मित्रांनो, 1 मराठी भाषेचा अभिमान आपल्याला महाराष्ट्रात राहून साहजिक वाटतो. तसाच किंबहुना त्यापेक्षा काकणभर सरस अभिमान व कामगिरी 'जया' यांनी 'माज़ं अस्तित्व' या नावाने पॉडकास्ट सुरू करून केली आहे. आपली बोली भाषा टिकवून त्यातील विविध भाग रंजक व अभिनव प्रकारे कशी वापरता येतील असे सुचवणारे पर्याय शोधले आहेत. जगभरात पसरलेल्या तंजावरच्या मराठी भाषी बांधवांना एकत्र करून या बोलीभाषेसाठी एक शब्दकोश करायचे काम चालू असल्याचे भाग ७ मधे श्री. साई जनार्दन यांच्या भाषणातून कळते. हैयो हैयैयोंनी या स्थळाचा परिचय करून दिल्याबद्दल त्यांचे आभार. या शिवाय अन्य भागांचा परिचय मिसळपाव सदस्यांनी फावल्या वेळी ऐकून आपापल्या मित्रमंडळींना कळवून या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा ही विनंती...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
भाषा
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
अभिनंदन
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
10837 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

अतिशय धन्यवाद याच्यासाठी!!!!

बॅटमॅन
Fri, 02/21/2014 - 12:58 नवीन
अतिशय धन्यवाद याच्यासाठी!!!! त्या निमित्ताने ही बोली कळेल तरी. सहीच!!! शेअर तर होणारच.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

पैसा
Fri, 02/21/2014 - 13:06 नवीन
या मंडळींनी फार मोठं काम केलंय. हे प्रकल्प असेच सुरू राहू देत ही शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अरे वा!! मस्तच !!

सूड
Fri, 02/21/2014 - 14:21 नवीन
अरे वा!! मस्तच !!
  • Log in or register to post comments

सुपर्ब .....

धर्मराजमुटके
Fri, 02/21/2014 - 14:24 नवीन
सुपर्ब .....केवळ अप्रतिम शशिकांत साहेब ह्या माहितीसाठी. मी पाचवा भाग ऐकला. लग्नाबद्दलची माहिती आहे. तंजावर तामीलनाडूमधे असले तरी ही भाषा हेलाच्या बाबतीत कानडी भाषेच्या जवळ जाणारी वाटते. लग्नपद्धती बर्‍याच प्रमाणात महाराष्ट्रातील पद्धती जवळ जाणार्‍या आहेत. (हेल : उच्चार)
  • Log in or register to post comments

हेलाच्या बाबतीत कानडी

बॅटमॅन
Fri, 02/21/2014 - 14:46 नवीन
हेलाच्या बाबतीत कानडी भाषेच्या जवळ जाणारी वाटते.
हे वाचून
(हेल : उच्चार)
या स्पष्टीकरणामागचे कारण उलगडले. अर्थात बहुतेकांना ते कनेक्शन ध्यानात येईल याची शक्यता कमीच आहे ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

हेल

सुनील
Fri, 02/21/2014 - 15:36 नवीन
कन्नडमध्ये उच्चाराला हेल असा शब्द आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ळॉळ

बॅटमॅन
Fri, 02/21/2014 - 15:39 नवीन
'हेल'णे म्ह. कन्नडमध्ये बहिर्दिशेस जाणे असा अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

नाही हो !

धर्मराजमुटके
Fri, 02/21/2014 - 15:40 नवीन
नाही हो ! हा मराठी शब्द आहे. शुद्ध मराठीत सांगायच तर accent. म्हणजे उच्चारणाची लकब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

(No subject)

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/21/2014 - 18:33 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

पुमपुहारचे भीषण समुद्र स्नान

शशिकांत ओक
Sun, 02/23/2014 - 22:31 नवीन
Dhanyawad Jaya, for mentioning Misalpav.com from your podcast. You can keen reading comments here. http://www.misalpav.com/node/27100 Keep posting many interesting verbal expressions. I happened to write one personal experience in Marathi. Some portion of that has been written by my friend Amith Chandran in Tanjavouri Marathi. If found interesting, that part of story could be told in Tanjavoori accent for your listeners in future episodes. Can you read this in Devanagari? Dhanyawad Jaya, for mentioning Misalpav.com from your podcast. You can keen reading comments here http://www.misalpav.com/node/27100 Keep posting many interesting verbal expressions. I happened to write one personal experience in Marathi. Some portion of that has been written by my friend Amith Chandran in Tanjavouri Marathi. If found interesting, that part of story could be told in Tanjavoori accent for your listeners in future episodes. Can you read this in Devanagari? पुमपुहारचे भीषण समुद्र स्नान If yes, will email the article.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

काही नवीन शब्द वापरू या..

शशिकांत ओक
Fri, 02/21/2014 - 18:26 नवीन
मित्रांनो, हेल कळला. आपण तत्परतेने त्यांच्या साईटचे सदस्य झालात का? वाचकांना विनंती की े काही भागां ऐकून इतरांना उत्तंच माहिती सांगावी.
  • Log in or register to post comments

बारावा भाग

धर्मराजमुटके
Sun, 02/23/2014 - 17:15 नवीन
मी हा धागा वाचल्यापासून "माजं अस्तित्त्व" ला नियमितपणे भेट देत आहे. आज भागपॉडकास्टचा बारावा भाग ऐकला. त्यात जया राव ह्यांनी शशिकांत ओक ह्यांना आणि मिसळपाव.कॉम ला धन्यवाद दिलेत. या भागात जया राव ह्यांनी त्यांना ना महाराष्ट्राने स्वीकारले ना तामिळनाडूने अशी खंत बोलून दाखविली आहे. आपल्या या मराठी बांधवांच्या मदतीला धावून जाणे हे आपले कर्तव्यच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

माजं अस्तित्वा भाग - बारा

शशिकांत ओक
Sun, 02/23/2014 - 22:36 नवीन
मित्रांनो धर्मराज मुटके यांनी प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे इथे तो भाग ऐकायला मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

फारच महत्वाचा आणि सुंदर

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/21/2014 - 18:39 नवीन
फारच महत्वाचा आणि सुंदर प्रकल्प आहे ! अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे !
  • Log in or register to post comments

तंजावर मराठी

श्रीनिवास टिळक
Fri, 02/21/2014 - 20:35 नवीन
(१)तंजावर भागात गेल्या चारशे वर्षांपासून रहात असलेल्या आपल्या मराठी बांधवांनी भाषा टिकवून ठेवण्यासाठी काय प्रयत्न आणि प्रकल्प चालू केले आहेत त्याबद्दल ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. (2)भारतातला चार महिन्यांचा मुक्काम आटोपून मी नुकताच Montreal ला परत आलो आहे.सध्या उत्तर अमेरिकेत राहणाऱ्या मराठी बांधवाना आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भविष्यात काय करावे लागेल ह्याची कल्पना ही माहिती करून देईल.
  • Log in or register to post comments

आत्ताच पहिला भाग ऐकायला

खटपट्या
Fri, 02/21/2014 - 23:24 नवीन
आत्ताच पहिला भाग ऐकायला सुरवात केली. कोणी तरी कानडी मराठी बोलतंय असच वाटलं. हेल तर अतिशय गोड…
  • Log in or register to post comments

थोडा कोकणी टच देखील वाटतोय

खटपट्या
Fri, 02/21/2014 - 23:31 नवीन
थोडा कोकणी टच देखील वाटतोय
  • Log in or register to post comments

+१

सुनील
Sun, 02/23/2014 - 07:35 नवीन
थोडा कोकणी टच देखील वाटतोय
यस्स. उडुपी/दक्षिण कानडा विभागातील एखादा कोंकणी भाषक जसा मराठी बोलेल, तसे वाटते आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ओकसाहेब- धन्यवाद.

यसवायजी
Mon, 02/24/2014 - 12:24 नवीन
ओकसाहेब- धन्यवाद. जयातैंना शुभेच्छा. तेनालीरामाची गोष्ट फार आवडली. @सुनील- हो. माझा बेंगलुरुमधला भाचा असंच मराठी बोलायचा. उदा- तुज्या डोक्यंवर वग्गरणी गांलतो.:) (वग्गरणी- फोडणी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

वग्गरणी

बॅटमॅन
Mon, 02/24/2014 - 12:31 नवीन
वग्गरणी =)) वग्गरणी अन आवलक्की आठवून डोळे पाणावले. घरी गेलो की हच्चिद आवलक्की करायला सांगावी लागते आता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

आवलक्की- आल टैम फेवरिट डिश्श.

यसवायजी
Mon, 02/24/2014 - 12:37 नवीन
:) आवलक्की- आल टैम फेवरिट डिश्श.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

येस्स्स्स्स्स्स्स्स!!!!!

बॅटमॅन
Mon, 02/24/2014 - 12:42 नवीन
येस्स्स्स्स्स्स्स्स!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

अभिनंदन आणि धन्यवाद!

आयुर्हित
Sat, 02/22/2014 - 00:11 नवीन
अभिनंदन 'जया' यांचे 'माज़ं अस्तित्व' या नावाने पॉडकास्ट सुरू केल्या बद्दल. आणि ही माहिती पोचवल्याबद्दल शाशिकांतजी आपले धन्यवाद ! असाच आपला काही समाज पानिपत(हरियानात)ही आहे. कोणी आहे का त्यांच्या संपर्कात?
  • Log in or register to post comments

एपिसोड क्रमांक ६ ऐका. फारच

खटपट्या
Sat, 02/22/2014 - 00:33 नवीन
एपिसोड क्रमांक ६ ऐका. फारच सुंदर… एका ६ वर्षाच्या मुलीने तेनाली रामाची गोष्ट सांगितली आहे.
  • Log in or register to post comments

सुरेख...

पिशी अबोली
Mon, 02/24/2014 - 12:04 नवीन
सुरेख... :) असेच प्रयत्न निरनिराळ्या बोली बोलणार्‍यांनी केले तर किती बरं होईल... ही लिंक शेअर करतेय शक्य तिथे.. :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम! सुरेख!

भाते
Mon, 02/24/2014 - 14:20 नवीन
दोन तिन वर्षांपुर्वी मी बेळगावला गेलो होतो. तिकडे या उच्चारात कानडी ढंगातले मराठी पहिल्यांदाच ऐकले होते. त्यावेळी त्याचे नवलही वाटले होते आणि थोडेसे हसुही आले होते. त्याच वेगळ्या उच्चारातली मराठी भाषा पुन्हा एकदा ऐकायला मिळाली. धन्यवाद शशिकांत ओक पॉडकास्टचा दुवा दिल्यापद्धल. 'माज़ं अस्तित्व' आणि 'जया' यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

नविन भाग

भाते
Mon, 03/03/2014 - 15:28 नवीन
कालच्या सत्यमेव जयतेच्या प्रसारणानंतर महिलांच्या सुरक्षेचे मुद्दे या विषयावर आज हा नविन भाग ऐकायला मिळाला.
  • Log in or register to post comments

हो, मी पण हा भाग ऐकला

श्रीनिवास टिळक
Tue, 03/04/2014 - 06:30 नवीन
हो, मी पण हा भाग ऐकला आणि बरं वाटलं. एक गोष्ट खटकली ती अशी कि जवळजवळ अर्धा भाग इंग्लिश मध्ये आहे त्यामुळे विरस होतो.
  • Log in or register to post comments

तिनेही ते मान्य आहे

शशिकांत ओक
Tue, 03/04/2014 - 11:15 नवीन
असे म्हणत. 'मला हे केंव्हापासून मनमोकळे पणे बोलायचं होतं पण नेमका फोरम मिळत नव्हता'. म्हणून या भागात बोलताना तंजवुर मराठीतून कमी बोलत असल्याचे मान्य केले.
  • Log in or register to post comments

भाग - १५ माज़ा अस्तित्वा

शशिकांत ओक
Mon, 04/28/2014 - 19:59 नवीन
मित्रांनो, जया राव यांनी भाग १५ मधे पुढील तीन भागात त्या तंजावरी मराठीतून काय काय उपक्रम सादर करायचे म्हणतात ते ऐकायला इथे शिरकाव करा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा