गणपत आणी कोंबड्या
गणपत गावातील गरीब माणूस होता. त्याचे कोंबड्या वर प्रेम होते. त्याची स्वताची एकही कोंबडी नव्हती, परंतु त्याच्या आजू-बाजू ला बरयाच कोंबड्या होत्या. ह्या कोंबड्याना बघून तो खूप आनंदी होत असे. कधी कधी ह्या कोंबड्याना तो दाणे टाकीत असे.
कोंबड्याना दाणे मिळाल्यामुळे त्या पण गणपत वर खूप खुश होत्या. त्याने टाकलेले दाणे कोंबड्या लगेचच फस्त करीत. ह्या सगळ्या
कोंबड्या मध्ये काही कोंबड्या रोज एक अंडा देत. काही कोंबड्या फक्त दाणे खात पण अंडी देत नसत. अश्या कोंबड्याचा गणपतला खूप राग येइ.
सगळ्या कोंबड्यानी दिलेल्या अंड्या मधून गणपत फक्त एक अंडा रोज उचलत असे. ह्या एका अंड्यावर त्याची रोज ची उपजीविका चाले
असे करता करता बरीच वर्षे निघून गेली. कालांतराने त्याचे लग्न झाले आणि नंतर मुले. त्याचा रोजचा जीवनक्रम मात्र तोच होता - कोंबड्याना दाणे टाकणे आणि रोज एक अंडा उचलणे. लग्नानंतर च्या जबाबदारीमुळे, त्याचे व त्याच्या कुटुंबाचे पोट एका अंड्यावर भरेना. अंड्याचा आकार वाढावा म्हणुन त्याने जास्त दाणे टाकून बघितले, पण आकार वाढला नाही
त्याच्या मनात मग एक विचार आला, इतक्या सगळया कोंबड्या रोज एक अंडा देत आहेत मग मी फक्त एकच अंड का उचलतो?
…. त्याच्या जवळ ह्याचे उत्तर नव्हते
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म..
काही शंका.
१) कोंबड्यांनी अंडे, नाही, अंडा दिला नाही तर गणपतला राग का येत असे ? त्याचे व कोंबड्यांचे एक अंड्याचे अॅग्रीमेंट झाले होते का ?
२) रोज एक अंडा खाऊन एक माणूस काही वर्षे जिवंत राहू शकतो का ?
३) कोंबड्यांचा मालक काय करीत असे ?
असो.
धन्यवाद स्नेहांकिता तायी
धन्यवाद स्नेहांकिता तायी
धन्यवाद स्नेहांकिता तायी
धन्यवाद स्नेहांकिता तायी
??
माफ करा, पण नेमकं काय सांगायचं आहे? कळलं नाही.
खोडसाऴ पणा
कै च्या कै..
उगाचच धुरळा
कोंबड्यानी गणपत बरोबर नक्की
कोंबड्यानी गणपत बरोबर नक्की काय " एस एल ए " साईन केले होते?
अंडे न देणार्या कोंबड्यांसाठी एच आर कडे जाण्यासाठी गणपत कडे एस्केलेशन रूट का डीफाईन केला नव्हता?
जिव्न्क्थेची उत्कटता यात आहे.
अउर आनेदो.
मस्त कथा.....
आवडली..
छान कूट
धन्यवाद
धन्यवाद
अंड्याचा आकार वाढावा म्हणुन
आगागा! आधुनीक विज्ञानाने आकार कमी करण्यावर मरे पर्यंत इलाज केला जातो अशा जाहिराती वाचल्या आहेत पण त्या आकाराने आहेत त्यापेक्षा फार वाढु शकत नाहीत असे विज्ञान म्हणते. व त्यात सिलिकॉन बॅग्ज वगैरे घालुन आकार क्रुत्रीमपणे वाढवायचे फॅड अजुन आलेले नाहीये ;)
का?
क्लर्क का बरे आठवला?
असो.
पैला प्रतिसादा साठी आणखी एक लेखक
गोष्टीचे नावः- "कुडीयोंको
गोष्टीचे नावः- "कुडीयोंको डाले दाना"
त्याचे कोंबड्या वर प्रेम होते. त्याची स्वताची एकही कोंबडी नव्हती, परंतु त्याच्या आजू-बाजू ला बरयाच कोंबड्या होत्या. ह्या कोंबड्याना बघून तो खूप आनंदी होत असेहे सगळं अलंकारीक आहे. प्रतीकात्मक, रुपक आहे. त्याची एकही कोंबडी नव्हती म्हणजे त्याला गावातल्या पोरी भाव देत नव्हत्या. पण 'जब ऐसे चिकने चेहरे' पाहिले के तो आनंदी होत असे.
कोंबड्याना दाणे मिळाल्यामुळे त्या पण गणपत वर खूप खुश होत्या. त्याने टाकलेले दाणे कोंबड्या लगेचच फस्त करीत. ह्या सगळ्या कोंबड्या मध्ये काही कोंबड्या रोज एक अंडा देत. काही कोंबड्या फक्त दाणे खात पण अंडी देत नसत. अश्या कोंबड्याचा गणपतला खूप राग येइ.आता दाणे टाकतोय म्हणजे, कुछ खो रहा है तो कुछ पाना पडेगा ना. मग रोज एकच कोंबडी. जी देत नाही तिचा राग यायचा. साहजीकच आहे ना. आखीर मै मनोजकुमार भी तो इन्सान हय. हय की नाही??
हे असे बरेच वर्ष चालु होते. कालांतराने त्याचे लग्न झाले. मग खरा प्रॉब्लेम झाला. त्याची भुक वाढतच गेली.
-
इतक्या सगळया कोंबड्या रोज एक अंडा देत आहेत मग मी फक्त एकच अंड का उचलतो?…. त्याच्या जवळ ह्याचे उत्तर नव्हते
- :)) @ अंड - नो कमेंट्स. :))
हैट्ट
In reply to गोष्टीचे नावः- "कुडीयोंको by यसवायजी
=)) हैट्ट =))
यसवायजीलाही कूटप्रश्न सोडवायचा छंद लागलासा दिसते =)) लगे रहो =))
........................
In reply to गोष्टीचे नावः- "कुडीयोंको by यसवायजी
........................

@मग मी फक्त एकच अंड का उचलतो?
…. त्याच्या जवळ ह्याचे उत्तर नव्हते >>> अगा..आयायायायाया!!!
अश्लील.. अश्लील..
In reply to ........................ by अत्रुप्त आत्मा
*ROFL* अश्लील.. अश्लील.. *ROFL*

@ SYG
In reply to गोष्टीचे नावः- "कुडीयोंको by यसवायजी
मस्त झक्कास.....
लेखनविषय:: बालकथा
In reply to गोष्टीचे नावः- "कुडीयोंको by यसवायजी
लेखनविषय::
बालकथा
टाळ्या .
टाळ्या .
यसवायजी ला ही आजकाल कुट सोडवण्याचा छंद लागला .
@SYG
@SYG :))
mohite jeevan हा तुमचाच ID
mohite jeevan हा तुमचाच ID आहे का हो?
नाही
In reply to mohite jeevan हा तुमचाच ID by नंदू
नाही
धन्यवाद
धन्यवाद
कोंबडी आणि अंड्याचे वास्तव च
कोंबडी आणि अंड्याचे वास्तव च एवढे दुर्बोध आहे त्याला लेखक काय करणार
शिर्षकात नाम सार्धम्य आणि
शिर्षकात नाम सार्धम्य आणि आमच्या आवडत्या कोंबड्यांचा उल्लेख आल्याने अधिरतेने धागा उघडला.
पण कोंबड्यां ऐवजी पोपट झाला.
असो मोठ्या 'अंडा'साठी गावकर्यांनी शहामॄग पाळावा (म्हणजे गणपतच्या उपजिविकेचा प्रश्न सुटेल) असा फुकाचा सल्ला देऊन कोंबड्या शोधायला प्रयाण करतो.
:-)
In reply to शिर्षकात नाम सार्धम्य आणि by गणपा
:-)
आयशप्पथ सांगतो मला पहिल्यांदा
आयशप्पथ सांगतो मला पहिल्यांदा कवितेची ओळ वाटलेली.
"गणपत आणी कोंबड्या
पकडुनी त्यांच्या तंगड्या
घालावया लंगड्या
लावीतसे || "
इ.इ.
:)
In reply to आयशप्पथ सांगतो मला पहिल्यांदा by बॅटमॅन
:)
२०१४ नंतर थेट २०२६ मधेच …
२०१४ नंतर थेट २०२६ मधेच लेखन पुन्हा सुरू केलेत साहेब तुम्ही
अफलातून कौटुंबिक समस्या
बापरे कुटुंबीय पण अंडी खायला लागले? ऐकावे ते नवलंच !!
-गा.पै.