Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by हुप्प्या on Sat, 03/01/2014 - 10:05
भुजबळांच्या छगनने आपल्या कुटुंबियांसमवेत महाराष्ट्राला मनसोक्त लुटले आहे. करदात्यांचा प्रचंड पैसा आपल्या घशात घालून आपले उखळ पांढरे केले आहे. भ्रष्टाचाराच्या क्षेत्रातील अग्रणी तटकर्याशी अटीतटीची स्पर्धा सुरु आहे की काय अशी शंका यावी. http://www.loksatta.com/mumbai-news/pwd-miniter-chhagan-bhujbal-in-trouble-387788/ वरील बातमीच्या आधारे असे दिसते की छगनच्या कृपेने ठेकेदाराला ५ ते ६ हजार कोटीचा अवाजवी नफा झाला. अर्थात हे काही परोपकाराच्या भावनेतून नसावे. त्यातले कित्येक हजार कोटी "योग्य" जागी पोचवले असणारच. हे सगळे लोकलेखा समितीने म्हटले आहे. मागे भाजपाच्या किरीट सोमय्यानेही ह्याच प्रकारे आरोप केले होते. अर्थात सध्याच्या फ्याशनप्रमाणे हे विरोधी पक्षाचे कारस्थान असल्याचे "बिनतोड" कारण भुजबळाने पत्रकारांवर फेकले आहे. एक अंधुक आशा आहे की ऐन निवडणुकीच्या तोंडावर असले भयानक भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यामुळे निव्वळ छगनच नव्हे तर राष्ट्रवादीच्या बाकीही उमेदवारांना हार पत्करावी लागली तर ती एक इष्टापत्तीच ठरेल. ह्या आणि असल्या हरामखोरांना तुरुंगात डांबलेले दिसण्याचे भाग्य महाराष्ट्राला कधी बरे लाभेल?
  • Log in or register to post comments
  • 5763 views

प्रतिक्रिया

Submitted by नितिन थत्ते on Sat, 03/01/2014 - 11:11

Permalink

शीर्षकातील तीन भ पाहून

शीर्षकातील तीन भ पाहून भाजपच्या जुन्या जाहीरनाम्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प on Sat, 03/01/2014 - 12:05

In reply to शीर्षकातील तीन भ पाहून by नितिन थत्ते

Permalink

थत्तेचचा कोणता?

जरा आम्हालाही कळुद्या
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sat, 03/01/2014 - 12:43

In reply to थत्तेचचा कोणता? by अनिरुद्ध प

Permalink

"भूख, भय और भ्रष्टाचारमुक्त

"भूख, भय और भ्रष्टाचारमुक्त भारत"
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Sat, 03/01/2014 - 12:45

In reply to "भूख, भय और भ्रष्टाचारमुक्त by नितिन थत्ते

Permalink

(No subject)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sat, 03/01/2014 - 13:37

In reply to (No subject) by भाते

Permalink

शीर्षकात पण भू, भ आणि भ्र

शीर्षकात पण भू, भ आणि भ्र त्याच क्रमाने आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by मारकुटे on Sat, 03/01/2014 - 12:32

In reply to शीर्षकातील तीन भ पाहून by नितिन थत्ते

Permalink

जरा

भ्रष्टाचाराबद्दल बोला की !
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sat, 03/01/2014 - 11:36

Permalink

...

थँक्स फॉर ब्रिंगिंग इट टू अवर नोटीस
  • Log in or register to post comments

Submitted by मारकुटे on Sat, 03/01/2014 - 12:33

Permalink

भुजबळाचा पत्ता पवारांनी छान

भुजबळाचा पत्ता पवारांनी छान कापला आहे... अता सहाराच्या सुब्रतो रोय प्रमाणे पोलीसांच्या हातात कधी लागतो ते पहायचे....
  • Log in or register to post comments

Submitted by सुखी on Sat, 03/01/2014 - 14:12

Permalink

खर त्यान्नी खालेले पैसे कसे

खर त्यान्नी खालेले पैसे कसे परत आणायचे?
  • Log in or register to post comments

Submitted by मृगजळाचे बांधकाम on Sat, 03/01/2014 - 19:42

Permalink

भुजबळांची नासिक ला ५००० एकर

भुजबळांची नासिक ला ५००० एकर जमीन आहे,आता बोला
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Sat, 03/01/2014 - 20:05

Permalink

चुकून

'मृगजळाचे बांधकाम' हे चुकून 'मफलराचे बांधकाम' असे वाचले. राजच्या भाषणाचा परिणाम!
  • Log in or register to post comments

Submitted by मृगजळाचे बांधकाम on Sat, 03/01/2014 - 20:28

In reply to चुकून by तिमा

Permalink

हा हा हा

हा हा हा
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Sat, 03/01/2014 - 23:03

In reply to चुकून by तिमा

Permalink

मस्तवाल मग्रूर मफलरवाला

जेव्हा जेव्हा टीव्हीवर भुजबळ दिसतो तेव्हा संताप येतो. एक तर अत्यंत बेपर्वा पद्धतीने बोलणे, खालचा ओठ बाहेर काढून बोलण्याची ती एक पद्धत. माझा पूर्वग्रह असेल पण एक मुजोरपणा त्या वागण्यातून ओसंडून वाहत असतो असे वाटत राहते. कधी तरी निवडणुकीत सणसणीत दणका बसावा आणि हा इसम जमिनीवर यावा आणि ह्याच्या जमिनी सरकारजमा व्हाव्यात ही इच्छा. सार्वजनिक बांधकाम खात्याचे खाजगी बांधकाम खात्यात रुपांतर झाले आहे असे वाटते. हे गृहस्थ एकेकाळी शिवसेनेत होते तिथेही असलेच दिवे लावले असतील ह्यात मलातरी शंका वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 03/09/2014 - 13:06

In reply to मस्तवाल मग्रूर मफलरवाला by हुप्प्या

Permalink

हो राव हे मात्र खरं आहे.

>>>> जेव्हा जेव्हा टीव्हीवर भुजबळ दिसतो तेव्हा संताप येतो. एक तर अत्यंत बेपर्वा पद्धतीने बोलणे, खालचा ओठ बाहेर काढून बोलण्याची ती एक पद्धत. माझा पूर्वग्रह असेल पण एक मुजोरपणा त्या वागण्यातून ओसंडून वाहत असतो असे वाटत राहते. १०० टक्के सहमत. भूजबळ साहेब स्वभावाने लै भारी असतील पण चीड यावे असेच दिसतात ते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Sat, 03/01/2014 - 20:22

Permalink

काय होणार ... ?

काही होणार नाही. संजय दत्त कडे शिकवणी लावतील प़कडले गेले तर !
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sun, 03/02/2014 - 15:28

Permalink

उगा भुजबळा अडचणीत असा भ्रम

उगा भुजबळा अडचणीत असा भ्रम नसावा तेलगी प्रकरण झाले होते, आर आर आबा २६/ ११ उलट या लोकांना बढती मिळेल हे नक्की... पैसे खातात ते पक्षासाठीच ना
  • Log in or register to post comments

Submitted by मृगजळाचे बांधकाम on Sun, 03/02/2014 - 22:54

Permalink

लोक ५ वर्षे कॉंग्रेस ला

लोक ५ वर्षे कॉंग्रेस ला शिव्या देतात,आणि निवडणुका आल्यावर,सापाला दुध पाज्ल्यासारखे कॉंग्रेस ला मतदान करतात,जळगाव ला सुरेश दादा जैन पैसे खाल्ल्याच्या आरोपामध्ये जेल मध्ये आहे,आणि जळगाव मनपा मध्ये त्याचे panel भरघोस मतांनी निवडून आले आहे,आता बोला!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानव on Sun, 03/09/2014 - 12:19

In reply to लोक ५ वर्षे कॉंग्रेस ला by मृगजळाचे बांधकाम

Permalink

जेल मध्ये......?

गेले वर्षभर जे जे मध्ये मस्त चालले होते ...लहान-सहाने कृपा
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Tue, 01/13/2015 - 13:09

Permalink

...

एक निरीक्षण हुप्प्या हे वर्तमानाबरोबर नव्हे तर वर्तमानपत्राबरोबर आहेत. असे म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com