Skip to main content

भुजबळचा भयानक भ्रष्टाचार!

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 01/03/2014 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
भुजबळांच्या छगनने आपल्या कुटुंबियांसमवेत महाराष्ट्राला मनसोक्त लुटले आहे. करदात्यांचा प्रचंड पैसा आपल्या घशात घालून आपले उखळ पांढरे केले आहे. भ्रष्टाचाराच्या क्षेत्रातील अग्रणी तटकर्याशी अटीतटीची स्पर्धा सुरु आहे की काय अशी शंका यावी. http://www.loksatta.com/mumbai-news/pwd-miniter-chhagan-bhujbal-in-trou… वरील बातमीच्या आधारे असे दिसते की छगनच्या कृपेने ठेकेदाराला ५ ते ६ हजार कोटीचा अवाजवी नफा झाला. अर्थात हे काही परोपकाराच्या भावनेतून नसावे. त्यातले कित्येक हजार कोटी "योग्य" जागी पोचवले असणारच. हे सगळे लोकलेखा समितीने म्हटले आहे. मागे भाजपाच्या किरीट सोमय्यानेही ह्याच प्रकारे आरोप केले होते. अर्थात सध्याच्या फ्याशनप्रमाणे हे विरोधी पक्षाचे कारस्थान असल्याचे "बिनतोड" कारण भुजबळाने पत्रकारांवर फेकले आहे. एक अंधुक आशा आहे की ऐन निवडणुकीच्या तोंडावर असले भयानक भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यामुळे निव्वळ छगनच नव्हे तर राष्ट्रवादीच्या बाकीही उमेदवारांना हार पत्करावी लागली तर ती एक इष्टापत्तीच ठरेल. ह्या आणि असल्या हरामखोरांना तुरुंगात डांबलेले दिसण्याचे भाग्य महाराष्ट्राला कधी बरे लाभेल?

वाचने 5807
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

भुजबळाचा पत्ता पवारांनी छान कापला आहे... अता सहाराच्या सुब्रतो रोय प्रमाणे पोलीसांच्या हातात कधी लागतो ते पहायचे....

'मृगजळाचे बांधकाम' हे चुकून 'मफलराचे बांधकाम' असे वाचले. राजच्या भाषणाचा परिणाम!

In reply to by तिमा

जेव्हा जेव्हा टीव्हीवर भुजबळ दिसतो तेव्हा संताप येतो. एक तर अत्यंत बेपर्वा पद्धतीने बोलणे, खालचा ओठ बाहेर काढून बोलण्याची ती एक पद्धत. माझा पूर्वग्रह असेल पण एक मुजोरपणा त्या वागण्यातून ओसंडून वाहत असतो असे वाटत राहते. कधी तरी निवडणुकीत सणसणीत दणका बसावा आणि हा इसम जमिनीवर यावा आणि ह्याच्या जमिनी सरकारजमा व्हाव्यात ही इच्छा. सार्वजनिक बांधकाम खात्याचे खाजगी बांधकाम खात्यात रुपांतर झाले आहे असे वाटते. हे गृहस्थ एकेकाळी शिवसेनेत होते तिथेही असलेच दिवे लावले असतील ह्यात मलातरी शंका वाटत नाही.

In reply to by हुप्प्या

>>>> जेव्हा जेव्हा टीव्हीवर भुजबळ दिसतो तेव्हा संताप येतो. एक तर अत्यंत बेपर्वा पद्धतीने बोलणे, खालचा ओठ बाहेर काढून बोलण्याची ती एक पद्धत. माझा पूर्वग्रह असेल पण एक मुजोरपणा त्या वागण्यातून ओसंडून वाहत असतो असे वाटत राहते. १०० टक्के सहमत. भूजबळ साहेब स्वभावाने लै भारी असतील पण चीड यावे असेच दिसतात ते. -दिलीप बिरुटे

उगा भुजबळा अडचणीत असा भ्रम नसावा तेलगी प्रकरण झाले होते, आर आर आबा २६/ ११ उलट या लोकांना बढती मिळेल हे नक्की... पैसे खातात ते पक्षासाठीच ना

लोक ५ वर्षे कॉंग्रेस ला शिव्या देतात,आणि निवडणुका आल्यावर,सापाला दुध पाज्ल्यासारखे कॉंग्रेस ला मतदान करतात,जळगाव ला सुरेश दादा जैन पैसे खाल्ल्याच्या आरोपामध्ये जेल मध्ये आहे,आणि जळगाव मनपा मध्ये त्याचे panel भरघोस मतांनी निवडून आले आहे,आता बोला!!!!

एक निरीक्षण हुप्प्या हे वर्तमानाबरोबर नव्हे तर वर्तमानपत्राबरोबर आहेत. असे म्हणावे लागेल.