Skip to main content

मिपा दंगा....धागा क्र. १.....डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण होवू शकते का?

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 15/02/2014 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा फक्त दंगा करायलाच आहे.हा निव्वळ टाइमपास धागा असल्याने वैयक्तिक शेरेबाजी टाळावी. ह्यात कुठलाही स्वार्थ नाही...असलाच तर परमार्थच आहे.जेणेकरून तमाम मिपाकरांना एक २०० ते २५० मी. लांबी असलेल्या फडके रोडचे दर्शन घेता यावे. ह्या निमीत्ताने मला, महारष्ट्राचा तमाम भौगोलिक.ऐतिहासिक आणि सांस्क्रुतिक इतिहास पण समजेल. तुम्हाला डोंबिवली नको असेल तर. मध्यवर्ती ठिकाण म्ह्णून वडगांव बुद्रुक किंवा तळेगांव खूर्द वाटले तरी लिहा. नेहमीच्या पुणे,मुंबई आणि ठाणे करांना खास आमंत्रण.

वाचने 15943
प्रतिक्रिया 112

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

पुणेरी सूर्यही कालच तसे म्हणाला हे उगवत्यावेळेच्या नावाच्या वर्तमानपत्रात छापून आल्याचे कोणीतरी म्हटल्याचे ऐकले असे कोणीतरी म्हणाल्याचे कधीतरी ऐकले आहे असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

मुवि, या वाक्यासाठी डॉक्टरांचा बाजीप्रभू चौकात सत्कार असा कट्टा आयोजीत कराच!

In reply to by अजया

पण बाजीप्रभू चौकात सध्या चांगलेसे हॉटेल कुठलेच नसल्याने, २ ता.च्या "दिपक,कुवैत" ह्यांच्या बरोबर होणार्‍या कट्ट्याच्या वेळी योग्य ती काळजी घेण्यात येईल.

In reply to by सुबोध खरे

डॉ. खरे, तुम्ही मारलेला बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय. आता दुसरा आणून दिला नाहीत तर 'काही मुलं' आदळआपट करतील बर्का! ;)

In reply to by मुक्त विहारि

जाज्ज्वल्य अभिमानी पुणेकरांना वेळ नाही........??????????????????? का तथाकथित हुच्चभ्रू दुर्लक्ष करत आहेत?

In reply to by प्यारे१

कारण सध्या ते कसला तरी कट्टा करावा, ह्याचे बेत आखत आहेत, असे माहीतगार स्त्रोताकडून समजते.

In reply to by मुक्त विहारि

कालच डोंबिवली गूगल मॅप्स वर शोधून काढले. नाव ऐकले होते आधी बर्‍याचदा. बाकी असो वा नसो, पुणे हे मिपाचे मध्यवर्ती शहर नक्कीच आहे. पुण्यावर इतके धागे. आणि इतर शहरांच्या धाग्यांवरही पुण्याचीच चर्चा. आवरा!

In reply to by एस

डोंबिवलीला स्वतंत्र मुन्शिपालिटी/कॉर्पोरेशन पण नाय! आहे ते कल्याणला जोडीला घेऊन. हे म्हणजे स.पे. वाल्यांनी आम्हीच मध्यवर्ती म्हणण्यासारखं झालं! ;)

In reply to by पैसा

धागा डॉबोलीचा आणि उदो उदो सपेसकट पुण्याचा. आम्हीच मध्यवर्ती म्हणायची सपेवाल्यांना गरज पण पडायची नाही, पर्स्पर काम होऊन गेलेय की! :)

In reply to by यशोधरा

डोंबिवलीला मध्यवर्ती ठिकाण म्हणून मान्यता न द्यायला कित्ती जणं प्रयत्न करतात... तरी पण डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण....

In reply to by एस

आधीच पुण्यातले मध्यवर्ती ठिकाण नक्की कोणते, ते ठरत नाही... आणि त्यात आमच्या डोंबीवलीला पण सामील करायला निघाले आहेत.... असो, आमच्या वेळीची डोंबिवली नाही राहीली आता. मध्यवर्ती ठि़काण डोंबिवलीच

"डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण होवू शकते का?" का नाही?
  1. डोंबिवली हे डोंबिवलीचे मध्यवर्ती ठिकाण आहे.
    1. तिथे सगळ्या लोकल गाड्या थांबतात व रिकाम्या गाड्या भरुन पाठवल्या जातात
      1. तिथली (किंचित म्हातारी) लोकं गाडीत चढायला ठाकुर्लीला जातात
        1. कल्याण गाडी भरुन पाठवणे आणि भरून आणणे ही डोंबिवलीकरांनी घेतलेली जबाबदारी आहे
          1. डोंबिवलीकराचा प्रवास रेल्वेत सुरु होतो नी तिथेच संपतो
            1. डोंबिवलीत मध्यवर्ती ठिकाणी चार्चाकी घेवुन जाणारे चुXX समजले जातात

मुविंनी आम्हाला त्यांच्या पैल्या मंगळ कट्ट्यात नेले नाही त्याबद्दल त्यानी आयोजित केलेल्या कुठल्याही कट्ट्याला जायचे नाही असे ठरवलेय. ;) मग कट्टा डोम्बिवलीत करा नायतर स्पावड्याच्या ठाकुर्लीत करा. आम्हाला काय ;)

आपण, म्हणजे तुम्ही आणि मी, डोंबिवलीत राहतो म्हणजे डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण आहेच! हम जहांसे खडे होते है… च्या धर्तीवर वाचावे. :) मग पुन्हा हा धागा का काढला? धाग्याचे शिर्षक 'डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण आहे' असे हवे होते. :)

.. 'डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण आहे' असे हवे...!!!
(डोम्बोलिकर) विनोद१८

सगळे गिरगावतले इमिग्रंटच हो.. जरा जास्त पैसेवाले हिंदू कॉलनी/ शिवाजी पार्क झालंच तर पार्ल्यात गेले, बेताची परिस्थिती असलेले मुलुंड/ ठाण्यात अगदी बोरिवलीत गेले.. आणि काहीच नाही ते विरार किंवा डोंबिवली.. लोकलच्या चकरा कुणाला चुकल्यात.. बोचरं असलं तरी सत्य आहेच! तस्मात, सगळीकडे गिरगावकरच मूळ बा़की सगळे त्यांचे उत्तरीय.. तस्मात (चलो गवालीय टँक) चालीवर, चलो गिरगाव.. ;)

डोम्बिवलीमधेच दसर्‍याला, पाडव्याला मिरवणुकांमधे बायका नऊवारी नेसून, नाकात नथ घालून पायात रिबॉकचे बूट घालतात ना..?

In reply to by एम.जी.

हेही पादत्राणाचे डिझाईन रिबॉकने प्राचीन भारतीय चित्र/मुर्तीकलेवरून उचलले असावे? ;) ... अजंठामधल्या चित्रांतील उडणार्‍या यक्ष-गंधर्वकन्या मिनीस्कर्ट नेसलेल्या दिसतात, त्यांची नाही का पाश्च्यात्यांनी कॉपी केली? :)

In reply to by एम.जी.

>>डोम्बिवलीमधेच दसर्‍याला, पाडव्याला मिरवणुकांमधे बायका नऊवारी नेसून, नाकात नथ घालून पायात रिबॉकचे बूट घालतात ना..? तसं असलं तर त्या बदलापूरच्या सुना असण्याची शक्यता जास्त आहे. ;) स्वगतः पळा आता.

In reply to by एम.जी.

त्या मिरवणुकांमध्ये बघण्यासारखे इतर काहीच नसते असा तुमचा गैरसमज आहे का? तेवढे रिबॉकचे बूटच कसे तुमच्या लक्षात राहिले? :) ह. घ्या.

In reply to by भाते

तुमच्या डोंबोलीत कशाला आम्ही मरायला येऊ पाडव्याच्या मिरवणुका बघायाला. मिरवणुका आमच्या बदलापूरात पण असतात म्हटलं पाडव्याला!! आणि पोरी अगदी व्यवस्थित नऊवार, केसांचा खोपा त्यावर मोगर्‍याचे गजरे माळून मिरवत असतात. तुमच्या डोंब आळीसारखे रीबॉकचे शूज घालत नाहीत. माताय, बदलापूरचं इथे कोणी तरी आहे का? सपोर्ट करा रे. हे डोंब आळीतले लोक जरा अतीच करतायेत आता. =))))

In reply to by सूड

बघा तुम्हाला मिपाकर शोधावे लागतात.... आम्हाला कितीतरी मिपाकरच न्ह्वे तर माबोकर (माझा पहिला कट्टा माबोकरांबरोबरच झाला होता.) पण भेटतात. एकूण काय? तर डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण...

In reply to by मुक्त विहारि

>>बघा तुम्हाला मिपाकर शोधावे लागतात.... हो कारण बर्‍याच बदलापूरकरांना मिपा हेच जग वाटत नाही. आम्ही आपले उगा येतो डोकवायला आणि काड्या सारायला. ;)

दोनच गावे असात काय? मिये एक सुचवू? आमच्या वेन्गुर्ल्याक मद्यवर्ती का काय ता ठिकाण करा.. मद्यवर्ती,मत्स्यवर्ती ठिकाण असत...काय मु.वी नू येताव ?

मध्यवर्ती ठिकाण डोंबिवलीचे कट्टा सम्राट मुवि यांचे हार्दिक हबिणंदन!

ऐनवेळी नेट गंडल नायतर शतक आमीच केल असत . :-( जाउद्या . शतकी प्रतिसादकर्त्या अजया ताईंचे हार्दिक हाबिणंदण . :-)