Skip to main content

मिपा दंगा....धागा क्र. १.....डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण होवू शकते का?

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 15/02/2014 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा फक्त दंगा करायलाच आहे.हा निव्वळ टाइमपास धागा असल्याने वैयक्तिक शेरेबाजी टाळावी. ह्यात कुठलाही स्वार्थ नाही...असलाच तर परमार्थच आहे.जेणेकरून तमाम मिपाकरांना एक २०० ते २५० मी. लांबी असलेल्या फडके रोडचे दर्शन घेता यावे. ह्या निमीत्ताने मला, महारष्ट्राचा तमाम भौगोलिक.ऐतिहासिक आणि सांस्क्रुतिक इतिहास पण समजेल. तुम्हाला डोंबिवली नको असेल तर. मध्यवर्ती ठिकाण म्ह्णून वडगांव बुद्रुक किंवा तळेगांव खूर्द वाटले तरी लिहा. नेहमीच्या पुणे,मुंबई आणि ठाणे करांना खास आमंत्रण.

वाचने 15943
प्रतिक्रिया 112

प्रतिक्रिया

In reply to by धन्या

फ़डके रोड ही एक क्याटेगरी असते. ते विशेषनाम नसतं. सर्वनाम असतं. फ़डके रोड म्हणलं की शोभा इन्क्लुडेड!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हे असं कुनी फोड करुन सांगिटलं की कळतं बगा. असाच फ ने सुरु होणारा फर्ग्युसन कॉलेज रोड पुण्यात आहे. तिकडेही शोभा पाहण्यासारखी असते.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

पुण्यातला फडके रोड नक्की कोणता म्हणायचा मग . टिळक रोड , कर्वे रस्ता , की मग बाजीराव रस्ता.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

असेल ना!!!! पण दसरा,दिवाळीचा पहिला दिवस, ह्या दिवसांत फडके रोडवर कट्टा करण्यांत जी मजा आहे,ती एकदा तरी अनुभवा.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हा का? पन आमच्या गावात फडके रोड नाय! -मुविंचा शेजारी बा द वे हा 'ना.सी. फडके रोड की आ. क्रा. वा.बा. फडके रोड?'

In reply to by मुक्त विहारि

अं SS माS मु S जरा अंमळ वेळ चुकवलीत ना ! ३१ डिसेंबरच्या आधी तरी हा धागा टाकायचा म्हणजे समस्त लोक्सना आपण प्रात्यक्षिक दाखवलं असतं फडके रोडचे .


सद्ध्या ईकडे बे एरिआ मधे वारंवार कट्टे होत अस्तात, पण आजकाल जुने आयडी पण इकडे काही लिहायला कंटाळा करतात. असो, बर्‍याच दिवसांनी(वर्षांनी कदाचित) आज आलो इकडे. नुकतीच चतुरंग (आणि असेच बरेच जुने आयडी)शी भेट झाली(स्वगतः ते हेच का). मनसोक्त पत्ते खेळलो, जेवणं झाली, मजा आली. या निमित्ताने, काही नविन लोक्स बे एरिया मधे असल्यास त्यांनी संपर्क साधावा अशी विनंती. हां तर, डॉलीवुड (यामागे ईतिहास आहे) मधे फडके रोड हा अतिशय आकर्षक आहे कारण तिथे(डोंबिवली) ईतर काहीच सांगण्यासारखं नाही असा माझा अनुभव आहे. केडीएमसी जिंदाबाद. आपला, (मराठमोळा - मायला, सही कुठे गेली :-|)

In reply to by मराठमोळा

बे एरीयाच्या सॅन फ्रान्सिस्को नामक शहरातील ब्रॉडवे स्ट्रीट नामक रस्त्याचीही शोभा पाहण्यासारखी असते. रात्रीच्या वेळी विजेची रोषणाई नेत्रदिपक असते.

In reply to by मराठमोळा

थोडक्यात तुमचा छोटेखानी कट्टा झाला तर ह्या बे एरिआ मध्ये! (स्वगतः कुठे आला हा बे एरिआ? मुंबई, पुणे की आणखी कुठे! हलके घ्या, माझा भुगोल कच्चा आहे. :) ) मिपावर प्रत्येक कट्टयाचा फोटोसहित सविस्तर वृत्तांत टाकुन जळवण्याची परंपरा आहे. मनसोक्त पत्ते खेळलो, जेवणं झाली, मजा आली... हे वाचुन आनंद झाला पण फोटो आणि सविस्तर वृत्तांत आणखी आवडला असता.

In reply to by भाते

ऊ शाबजी, हमारा जानकारी के हिशाब शे बे बेंगाल का नीचे का तरफ में आता हय! तो बे आरिया बेंगाल में नयी तो कोलकाता में हुना चाईये! -प्यारेबहादूर

In reply to by अनन्न्या

तुमच्या गावात/शहरात/महानगरात शोभा पाहण्यासारखा रस्ता असेल तर मुविंची हरकत नसावी.

In reply to by टवाळ कार्टा

पण लिहितांना मात्र डोंबिवली असेच लिहीतो... काय करणार? थोडे फार लिहीता-वाचता येते आम्हाला....

In reply to by मुक्त विहारि

घ्या! अजून काय म्हणायचं आणि काय लिहायचं ह्यातच एकवाक्यता नै होय! :D

In reply to by यशोधरा

जसे, कोल्हापुरकर लिहीतांना भले, कोल्हापुर असे लिहीत असतील..पण म्हणतांना कोल्लापूर असेच म्हणणार,,,,,

अंगुस्तान विद्यापीठाच्या स्थापनेवेळी सर्व शिंपी महाराष्ट्राचा नकाशा व टेपा घेऊन तयार असतात महाराष्ट्राचा मध्य हुडकायला. तिथल्या भाषेत अर्थात 'मध्यवर्ती मराठी भाषे'त कामकाज चालावे या हेतूने- पण तो मध्यबिंदू नेमका पडतो गोदावरी नदीत - त्या प्रसंगाची आठवण झाली. बाकी मध्यवर्ती ठिकाण एकच- आमचे गॉथम ;)

In reply to by बॅटमॅन

@आमचे गॉथम >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif आणि आमचा स मस्त इहलोक! इहलोक हेची आत्म्याचे गाव,मध्यवर्ती मूळ स्वभाव। तेथे कैचा नि भाव ,एखाद्या शहराचा????????? ॥ http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd.png ऐसे असता तरी काही,देतसे आत्मा हळूची ग्वाही। ऐसे रोडी मन आत्'म्याचे,भारीच भारी घुटमळते॥ http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

बघाना एका दिशेला पनवेल तर दुसर्‍या दिशेला मुंबई (व्हाया ठाणे....) उशाला कल्याण तर तिसर्‍या दिशेला कर्जत आणि चौथ्या दिशेला कसारा.... थोडक्यात डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण...

In reply to by मुक्त विहारि

ओ कायपण लिहू नका. डोंबीवलीच्या चार दिशांना शेवटी "पाडा" असलेली आगरी लोकवस्तीची गावं आहेत.

In reply to by धन्या

अजिबात नाही.... मुळात डोंबिवली = डोंब आळी आता डोंबच नसेल तर म्रुत्युपश्र्चात तुम्ही इहलोक सोडून जाणार कूठे? म्हणूनच डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण

In reply to by मुक्त विहारि

स्वर्गाचा पत्ता नर्क बदल्लेला आहे का डोंबोली ही पैली पैरी आहे म्हण्जे? पळा पऽऽळा!!!!!!!!

In reply to by यशोधरा

काही माणसे पुण्यवान असतात पण त्यांना लगेच काही स्वर्गात प्रवेश मिळत नाही... म्हणून एक जन्म त्यांना डोंबिवलीत देतात.

In reply to by मुक्त विहारि

त्याचं कारण हे असावं की या पुण्यवान माणसांना स्वर्गाची शोभा पाहून त्यांचे डोळे एकदम दिपावतील. ते होऊन नये, डोळ्यांना शोभा पाहण्याची सवय व्हावी म्हणून त्यांचा जन्म डोंबीवलीत होत असावा. एकदा का आयुष्याची काही वर्षे डोंबीवलीच्या फडके रोडवरील शोभायात्रा पाहण्यात गेली की डोळे सरावतील. असं काहीसं असावं.

In reply to by धन्या

फडके रोडचे म्हत्व पटायला लागले आहे... अहो, तुम्ही एकदा याच ती शोभा यात्रा बघायला.

In reply to by धन्या

धन्या, तेरे कु नक्की शोभा होना या शोभायात्रा होना वो पैले तै(तय) कर. बाकी सब बाता बाद में ! ;) जन्नत जन्नत क्या कर्ते मियाँ ? तुम जाकु आये बोले ना जन्नत में? ह मेशा तो बोल्ते र्‍हयते, मय यु एस मे था तब्बी गये था कर्के!

In reply to by यशोधरा

देवाने यमराजाला विचारले,"ही लोकं नरकात पण मजा करत बसली आहेत"............. यमराज :-डोंबिवलीचे आहेत सगळे....... कुठेही टाका ,सेट होउन जातात..!! आली लहर केला कहर तोच खरा 'डोंबिवलीकर'. ;) :)

डोबिंवली -डोबिंवली चालुय , आमालाबी कळु द्या . पुर्व का पश्चिम . मायला माग आलतो डोबिंवलीला जायचे होत पुर्वेला पण पश्चिमेलाच 2 तास फिरत राहिलो . (मुंबै ची एकमेव वारी केलेला ) जेपी

In reply to by जेपी

मायला माग आलतो डोबिंवलीला जायचे होत पुर्वेला पण पश्चिमेलाच 2 तास फिरत राहिलो .
त्यात वाईट वाटून घ्यायाचं कायबी कारन नाय. मुंबैमद्ये नविन आलेल्या मानसाचं होतंय बगा आसं.

In reply to by धन्या

तर तर..... होणारच ना.... नविन माणसांना तरी पण सांभाळून घेते आमची मुंबई... पिन कोड ४२१२०१ म्हणजे डोंबिवली पुर्व.... आणि पिन कोड ४२१२०२ म्हणजे डोंबिवली पश्र्चिम... इतके साधे सरळ गणित आहे... उगाच ३ पेठांना एकच पिन कोड देण्यात काय शहाणपण?

In reply to by मुक्त विहारि

@उगाच ३ पेठांना एकच पिन कोड देण्यात काय शहाणपण? >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/free-fighting-smileys-156.gif चूक..चूक..चूक... =)) ते एका पिन्०कोड मधे तिन पेठा असं अचूक-बरोबर आहे! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-evil-grin-smileys-754.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

ओके... ठीक आहे... आय माय स्वारी... (हा असा मनाचा मोठेपणा फक्त डोंबिवली करांकडेच आहे.... म्हणूनच तर म्हणतो, डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण...)

In reply to by मुक्त विहारि

@(हा असा मनाचा मोठेपणा फक्त डोंबिवली करांकडेच आहे.... >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-016.gif @म्हणूनच तर म्हणतो, डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण...) >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-059.gif

In reply to by मुक्त विहारि

उगाच ३ पेठांना एकच पिन कोड देण्यात काय शहाणपण?
असं कसं? उगाच का पिनकोड वाया घालवायचे? फुकट आहेत म्हणून?

In reply to by जेपी

की, तुम्हाला नक्की कुठे जायचे आहे ते.... डोंबिवली पुर्वेला की पश्र्चिमेला? म्हणजे पत्ता म्हणून नीट उतरवून घ्यायचा नाही...आणि खापर मात्र डोंबिवली वर.... असो.... हलकेच घ्या.....

डोंबिवली महाराष्ट्रात आहे काय? रच्याकने मुविंनी 'डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण होवू शकते का' असे विचारले आहे. कशाचे मध्यवर्ती ठिकाण हे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे विशेषत: आपण पुणेकरांनी त्याकडे जास्त लक्ष देऊ नये. ;-)

In reply to by एस

पुणे सगळ्या जगाच्या मध्यवर्ती आहे असं पुण्याचा जाज्ज्वल्य अभिमान असणारे म्हणतात ना!

In reply to by पैसा

हो, बरोबरच अहे की ते. सगळं जगंच मुळी पुण्याभोवताली फिरतं. इतकंच काय पुण्यातले नसणारे इतरेजनही आपापल्या शहरांबद्दल बोलायचं सोडून शिव्या घालायला का होईना वा अजून काही कारणांनी किंवा विनाकारणही पुण्याबद्दल आणि पुणेकरांबद्दलच बोलतात. विरोधी भक्ती हो! ;)

In reply to by यशोधरा

हो ना आपले आरवणे ऐकण्यासाठीच सुर्य उगवतो असे पुणेरी कोंबड्यांचे ठाम मत असते

In reply to by सुबोध खरे

तुमच्या ह्या वाक्यात
आपले आरवणे ऐकण्यासाठीच सुर्य उगवतो असे पुणेरी कोंबड्यांचे ठाम मत असते
डोंबिवलीचे काश्मिर होण्यास पुरेपूर वाव आहे. ;)