✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

काळी मावशी

M
mohite jeevan यांनी
Fri, 02/21/2014 - 15:21  ·  लेख
लेख
माझा बाप लहानपनीच वारले,पुढे आईने मला वाढविले, जस जसा मोठा होत होतो तसा मी मला सर्व काही कळत होते. पण आचानक आईने ही साथ सोडली, आता मला माझी मावशी मला साभळंते. ती काळी आसल्याने तीला काळी मैना म्हणतात.आत ग़ेले पाच वर्ष तीच्या बरोबरच आसतो.तीची दोन मुलं,एक मुलग़ा व एक मुलग़ी आसते. मावशीला मी काळे म्हणतो, मावशीचा नवरा तो एक ग़वंडी आहे.त्याना मी काका म्हणतो. काळी मावशी नेहमी तबांखु खात आसते, कायम तीच्या ओठाखाली तबांखु ठेवलेली आसे. एक रात्री आम्ही सर्व आमच्या पडक्या घरात झोपलो आसता,छतावर चोर आला, काळी मावशी त्यावेळी नेमकी जाग़ी झाली, बिछान्यात न उठता तोंड वाकडे करुन समोर आसलेल्या ग़लासातील पाण्याचा घोट घेत,चुळ भरत तीने जवळच्या नाहणी मध्ये थुंकले आणि तीची नजर छतावर ग़ेली. मी जाग़ाच होतो. ‘आरे चोरा साभांळुन जरा ही झोपडी पडकी हाय पडशील,’ काळी मावशी त्या चोराला म्हणाली, थोड्या वोळाने चोर म्हणाला,’ बरं बरं,तु झोप मला चोरी करु दे’, ‘ आरे चोरी करायला हे घर कसं काय शोधलयसं,’ काळी मावशी म्हणाली, ‘मग़ काय करु सावकर लोकच्या घरी चोरी करायचं म्हणजे आवघड आसतं,’ चोर म्हणाला, ‘माझ्याकडं काय मिळणार तुला, तीन पोरं आहेत,त्याच्या जेवनाचे वांदे आहेत,आसं कर दुसरं घर शोध,’मावशी म्हणाली, ‘चोर कसा सापडला की मी चोर नाही म्हणतो तसे तर तु करत नाही ना,’चोर म्हणाला, ‘हे बघ तुला एक सल्ला देतो पुढे थोड्या आतंरावर,सावकराची घरे आहेत तेथे काही,प्रयत्न कर,’मावशी म्हणाली, ‘नको आसाच एकदा मी सावकराच्या घरी सापडलो आणि खुप मार खाल्ला होता,’चोर म्हणाला, ‘मग़ काम का करत नाहीस?,’मावशी म्हणाली, ‘काम करतो की पण तेवढ्यावर भांग़त नाही,’चोर म्हणाला, ‘का?’ मावशी म्हणाली, ‘घरात बायका पोरं आहेत,आई आहे,मग़ तेवढ्यावर कसे चालेल, ‘चोर म्हणाला, ‘पण तुला इथं कय पण मिळणार नाही,’मावशी म्हणाली, ‘ जरा चहा तर करुन देशील का?’चोर म्हणाला, ‘चहा करण्यासाठी घरात कायपण नाही?’,मावशी म्हणाली, ‘ठीक आहे जातो मी,’चोर म्हणाला, ‘ संभाळुन जा रे चोरा, तुझ नावं तर सांग़,’ मावशी म्हणाली, ‘चोरच नाव आहे माझं,जातो आत,’ चोर म्हणाला, ‘येत जा रे पुढच्या वेळी नक्की चहा देईन’,मावशी म्हणाली, आणि चोर ग़ेला, मावशीने तंबाखु खाल्ली, मी झोपलो, सकाळी उठुन विचार करत होतो की कोण चोर आसेल तो..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
67733 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

आय्ला

इरसाल
Fri, 02/21/2014 - 16:42 नवीन
लेख-लेखक-प्रतिसाद पाहुन सरळ धाग्याचे पान उंदराच्या सहाय्याने खाली खेचुन पयले प्रतिसाद देत हाये.आता वाचावयास "वर" जाइन म्हणतो. धन्यवाद. पहिला प्रतिसाद मुविंचा च असणार याची खात्री बाळगु काय ?
  • Log in or register to post comments

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र

इरसाल
Fri, 02/21/2014 - 16:44 नवीन
बॅट्याने माझा आज पोपट केला म्हणायचा ! ( असो उद्या पुन्हा माणुस कर हां काय ?)
  • Log in or register to post comments

असो उद्या पुन्हा माणुस कर हां

बॅटमॅन
Fri, 02/21/2014 - 16:49 नवीन
असो उद्या पुन्हा माणुस कर हां काय
ॐ भग्नि भागोदरी भगभुगे भग्मासे ॐ भट स्वाहा....इरसाल पोपटा, पुन्हा माणूस हो!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

हॅ......

इरसाल
Fri, 02/21/2014 - 16:58 नवीन
मी माणुस लिहीले आहे स्वप्निल जोशी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ठ्ठो

बॅटमॅन
Fri, 02/21/2014 - 17:08 नवीन
=)) ठ्ठो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

@ स्वप्निल जोशी नाही.>>>

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/21/2014 - 20:40 नवीन
@ स्वप्निल जोशी नाही.>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

एक कोडं

तिमा
Fri, 02/21/2014 - 17:18 नवीन
बिछान्यात न उठता तोंड वाकडे करुन समोर आसलेल्या ग़लासातील पाण्याचा घोट घेत,चुळ भरत तीने जवळच्या नाहणी मध्ये थुंकले हे कोडं काही उलगडलं नाही भौ! म्हंजी कितीपण व्हिजुयलाइज करायचा प्रयत्न केला तरी डोळ्यांसमोर काय हा व्हिडिओ येत नाही राव! हां, म्हणजे एकतर न्हाणीला एकदम खेटून झोपलं तर शक्य आहे. संवादांतून मावशी आणि चोराची प्रतिमा चांगली उभी केली आहे. मावशीची आणि चोराची वेव्हलेंथ चांगली जुळलेली दिसते. माझी स्वाक्षरी एवढी मनावर घेऊ नका राव!
  • Log in or register to post comments

किंवा न्हाणी दूर असली तरी

बॅटमॅन
Fri, 02/21/2014 - 17:22 नवीन
किंवा न्हाणी दूर असली तरी चूळफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असेल या मावशीबाईंनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

मावशीची आणि चोराची वेव्हलेंथ

आदूबाळ
Fri, 02/21/2014 - 17:25 नवीन
मावशीची आणि चोराची वेव्हलेंथ चांगली जुळलेली दिसते.
त्यांचं बरंच काय काय जुळलं होतं असं दिसतंय. त्याला "टाका भिडणे" म्हणतात. पण.
मी जाग़ाच होतो.
यामुळे हा संवादांचा फार्स मावशीबैंना रचावा लागला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

मावशी न्हाणीघरात झोपत नसेल

Atul Thakur
Sat, 02/22/2014 - 11:27 नवीन
मावशी न्हाणीघरात झोपत नसेल कशावरुन? जिवनभौंच्या कथेत काहिही शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

एक से बढकर एक प्रतिसाद आहेत

शिद
Fri, 02/21/2014 - 17:25 नवीन
एक से बढकर एक प्रतिसाद आहेत सगळ्यांचे... जाम हसतोय... =)) =)) =))
  • Log in or register to post comments

मावशीन चोराच ऐवढ प्रबोधन केल

जेपी
Fri, 02/21/2014 - 17:27 नवीन
मावशीन चोराच ऐवढ प्रबोधन केल . चोराने पण मावशीचे प्रबोधन केल पायजे तंबाकु सोडायसाठी . भलतच कुट कथा आहे . मुवि किदर हय तुम .
  • Log in or register to post comments

जेपी जेपी

इरसाल
Fri, 02/21/2014 - 17:40 नवीन
जेपी जेपी....अहो चुकलात तुम्ही तंबाकु नाय काय ते तबांखु असे आहे. याचाच अर्थ या धाग्याला तुम्ही निव्वळ टाईमपास समजता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

इरसाल भाऊ , तंबाकु काय तंबाखु

जेपी
Fri, 02/21/2014 - 17:45 नवीन
इरसाल भाऊ , तंबाकु काय तंबाखु काय टोबॅको काय खाण्याशी मतलब . धागा टिपी नाय . कुट सोडवण्यासाठी मुविंची वाट बघतोय
  • Log in or register to post comments

परत चुकलात

रामपुरी
Sat, 02/22/2014 - 03:51 नवीन
इथे टिबाटिंबाला महत्व आहे. ते तंबाकु नाही आणि तंबाखु पण नाही. ते "तबांखु" आहे. हल्ली ग खालचे टिंब गेल्याने बरेच वाचक नाराज आहेत यावरून समजून घ्या एका टिंबाला किती महत्व आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

अता मि जिवन्भौच्यां कथाचां

काळा पहाड
Fri, 02/21/2014 - 18:08 नवीन
अता मि जिवन्भौच्यां कथाचां फॅन जाल्लो.
  • Log in or register to post comments

अरे वा...

आनन्दा
Fri, 02/21/2014 - 20:19 नवीन
अरे वा... काळा पहाड आणि काळी मावशी :) ह. घ्या. प्लीझ. अवांतर - मला पूर्वी ह.घ्या म्हणजे हसून घ्या असे वाटायचे, खरा अर्थ नंतर कळला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

आयला जबरदस्त कूट.....

मुक्त विहारि
Fri, 02/21/2014 - 20:09 नवीन
सॉलीड..... जीवन भाऊ लगे रहो..... कुठल्याही पक्षाचे नांव न घेता, शालजोडीतले हाणावे, ते तुम्हीच....
  • Log in or register to post comments

सध्या

इरसाल
Sat, 02/22/2014 - 09:42 नवीन
कट्टा मंत्रालय हातात आल्याने मुविंचे जीवन्भौं च्या धाग्यावर झालेले दुर्लक्ष आक्षेपार्ह आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आगामी कट्ट्यावर एक परिसंवाद

खटपट्या
Fri, 02/21/2014 - 23:15 नवीन
आगामी कट्ट्यावर एक परिसंवाद आयोजित करा आता. विषय - १. "तुम्हाला समजलेले जीवनभाऊ" २. "जीवनभाऊंच्या कथा आणि प्रतिसाद" ३. "जीवनभाऊ नि मिपाला काय दिले" आणखी काही विषय असतिल तर सुचवा
  • Log in or register to post comments

४. जीवन भाऊंचे वांगमय आणि

काळा पहाड
Sat, 02/22/2014 - 00:15 नवीन
४. जीवन भाऊंचे वांगमय आणि तासगावची वांगी - एक तुलनात्मक अभ्यास. ५. Impact of Jeevan-bhou's literature on the personality and coping styles of working women from various professions ६. नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण योजने अंतर्गत कार्य करणार्या ग्रामसेविकांवर जीवन भाऊंच्या साहित्याचा झालेला आर्थिक व सामाजिक परिणामः एक अध्ययन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ह्म्म्म.

स्पंदना
Sat, 02/22/2014 - 09:22 नवीन
ह्म्म्म. वाचला कथा आणि वाचले मी. :)
  • Log in or register to post comments

मी पण आमुचे पक्व फळापरी

यसवायजी
Sat, 02/22/2014 - 11:53 नवीन
मी पण आमुचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो.. जिवन आम्हा कळले हो.. जिवनभौ आम्हा कळले हो.. 'काळी मावशी' कळली आणीक नशीब हे फळफळले हो.. जिवन आम्हा कळले हो.. जिवनभौ आम्हा कळले हो.. :))
  • Log in or register to post comments

अगागागागागागागागागागागागागागा

बॅटमॅन
Sat, 02/22/2014 - 13:14 नवीन
अगागागागागागागागागागागागागागागागागा =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

सही एकदम

पाषाणभेद
Sun, 02/23/2014 - 15:09 नवीन
सही एकदम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ह्याच्च

इरसाल
Sat, 02/22/2014 - 13:26 नवीन
धाग्यावरी लोकांची प्रतिभा एवढी का बरे फुलुन येत असावी. (चपाती, भाकरी, पिटा ब्रेड, खुबुस, तळलेली पुरी )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

आतल्या गोटातली बातमी-

यसवायजी
Sat, 02/22/2014 - 14:04 नवीन
मोजी एक डु-ऐडी आहे. पोषक वातावरण तयार करुन देणे, वाचनमात्र सदस्यांना लिहायला लावणे या जबाबदार्‍या (संपादक मंडळाकडुन !) त्यांना देण्यात आल्या आहेत. :)) म्हनुन्श्यान- ह्याच्च धाग्यावरी लोकांची प्रतिभा एवढी फुलुन येत असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

हुं हुं हुं

इरसाल
Sat, 02/22/2014 - 14:06 नवीन
बरोबर तसेच्च असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

मागच्याच आठवड्यात कुलकर्णी

पाषाणभेद
Sun, 02/23/2014 - 15:20 नवीन
मागच्याच आठवड्यात कुलकर्णी काकांचा Y शहीद झाला. तेथेही असल्या दंग्याचा चानस होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

कुटला हो कुटला धागा? म्या

यसवायजी
Sun, 02/23/2014 - 17:19 नवीन
कुटला हो कुटला धागा? म्या मिस्स केला भोतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

जरा अवांतर

माहितगार
Sat, 02/22/2014 - 12:40 नवीन
मोजींची कथा बरी आहे आवडली. अवांतर आपल्याकडे रंगाचा उल्लेख वस्तुतः वर्णवादी नसतो ती चांगलीच गोष्ट आहे. या कथेत लेखकाचा उद्देशही हिणवण्याचा नाही. पण इतर देश आणि प्रदेशातून येणारे लोक हेच उल्लेख तेवढेच सहजतेने घेउ शकणार नाहीत हे आपले लोक बर्‍याचदा लक्षात घेत नाहीत. दुसरंतर आपल्या कडे रंगाच फारसंप्रस्थ कधी नव्हत पण क्रिम विकणार्‍या नवनव्या कंपन्या जाहीरातींच्या माध्यमातून नवीन पिढीत भावना वाढवत आहेत असे वाटते.
  • Log in or register to post comments

सहमत!!!

बॅटमॅन
Sat, 02/22/2014 - 13:14 नवीन
सहमत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

‘हे बघ तुला एक सल्ला देतो

यसवायजी
Sat, 02/22/2014 - 13:36 नवीन
‘हे बघ तुला एक सल्ला देतो पुढे थोड्या आतंरावर,सावकराची घरे आहेत तेथे काही,प्रयत्न कर,’मावशी म्हणाली,
मला येक सांग़ा.. काळी मौशी म्हंजी बाई हाय काय बाईमानुस हाय?? ;) आनी हे 'आतंरावर' म्हंजी काय?
  • Log in or register to post comments

अरे, आपल्याकडं बायका पण नै का

बॅटमॅन
Sat, 02/22/2014 - 13:40 नवीन
अरे, आपल्याकडं बायका पण नै का म्हणत, "आम्ही जातो, येतो" इ.इ. ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

हां.. म्हणजे वास्तववादी

यसवायजी
Sat, 02/22/2014 - 14:05 नवीन
हां.. म्हणजे वास्तववादी चित्रण का काय म्हणतात ते तसं लिहलंय होय?? होगली औनाउन. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

=))

बॅटमॅन
Sat, 02/22/2014 - 14:36 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

ते आलो गेलो सोडा हो.

स्पंदना
Sun, 02/23/2014 - 09:15 नवीन
ते आलो गेलो सोडा हो. अतंराव हे एका राव माणसाबादलच बोलण हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

मुळात जीवन भाऊंच्या कथा ह्या सामान्य कथा नसून....

मुक्त विहारि
Sat, 02/22/2014 - 15:50 नवीन
त्या कूट कथा असतात.हे आम्ही बर्‍याच वेळा सप्रमाण सिद्ध केले आहे.शिवाय तर्क शास्त्राच्या नियमाप्रमाणे, एकाने लढवलेला तर्क, दुसर्‍या व्यक्तीला पसंत पडेलच असेही नाही. असो, तर आपण ह्या कथेकडे वळू या. ================================================ नेहमीप्रमाणेच ह्या कथेत देखील भाऊंनी बरेच क्ल्यु दिले आहेत. उदा. कथेचे नांव. ह्या कथेतील मावशीचे नांव गुणावरून न देता तिला तिच्या वर्णावरून दिले आहे.म्हणजे सामान्य माणूस आधी गूण न पाहता वर्णच पाहतो,शिवाय माय मरो आणि मावशी जगो, हे एक अंग पण लेखक सांगून जातो.) "अंग किती गोरं आहे नाही?" हा फेमस डायलॉग तुम्ही आठ्वले,शहाडे आणि मं.त ऐकला असेलच. दुसरा क्ल्यु : "ती काळी आसल्याने तीला काळी मैना म्हणतात." आता ही काळी मैना कुठे सापडते तर कोकणांत.कोकणच्या माणसाला मुळातच अर्धपोटी आणि उघडे राहावे लागते.त्यामुळे भारतातील एका विशिष्ट पक्षाला कोणीही तिथे विचारत नाही.हे सर्वमान्य मत कुणालाही ठावूक असेलच. तिसरा क्ल्यु : "ग़ेले पाच वर्ष तीच्या बरोबरच आसतो." इथे पाच वर्षे हा एक क्ल्यु देवून लेखक पुढील क्ल्यु देतो.... चौथा क्ल्यु : तीची दोन मुलं,एक मुलग़ा व एक मुलग़ी आसते. आता कुठल्या बाईला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, ते ओळखा.तरी पण न ओळखता आल्यास, लेखक अजून एक क्ल्यु देतो. पाचवा क्ल्यु : "मावशीचा नवरा तो एक ग़वंडी आहे." इथे गवंडी असणे हे प्रतिकात्मक आहे.गवंडी घरे बांधून देतो आणि त्याबदल्यात पैसे कमावतो.तुम्हाला पण असे बरेच गवंडी माहीत असतील. सहावा क्ल्यू : "काळी मावशी नेहमी तबांखु खात आसते, कायम तीच्या ओठाखाली तबांखु ठेवलेली आसे." इथे तबांखू हे प्रतिकात्मक आहे.व्यसनी माणसे सहसा आपले व्यसन सोडत नाही.आता जिचा नवरा गवंडी आहे, तिला तंबाखू तरी का होईना पण व्यसन हे असणारच.त्यासाठी लागणारा पैसा ती कुठून तरी आणत असणारच.तर तो पैसा ती कुठून आणते, ते पण भाऊंनीच सांगीतले आहे. सातवा क्ल्यू : "बिछान्यात न उठता तोंड वाकडे करुन समोर आसलेल्या ग़लासातील पाण्याचा घोट घेत,चुळ भरत तीने जवळच्या नाहणी मध्ये थुंकले आणि तीची नजर छतावर ग़ेली." बघा इतकी लांब चूळ फेकली.अगदी तोफेतून सुटलेल्या एखाद्या तोफगोळ्यासारखीच आणि नजर कुठे गेली तर छतावर.म्हणजेच आकाशांत आणि तिला चक्क चोर छतावर दिसला.म्हणजेच तिची द्रुष्टी भिंतींचा अडथळा पार करू शकत होती. थोडक्यात तिला दिव्य द्रुष्टी होती. आठवा क्ल्यू : "आरे चोरा साभांळुन जरा ही झोपडी पडकी हाय पडशील," मावशी झोपडीला पडकी म्हणते.का तर तिच्या झोपडीतून (म्हणजेच पक्षांतून) बरीच माणसे बाहेर गेली आहेत. पुढचे बरेच क्ल्यू आहेत.... उदा. "सावकर लोकच्या घरी चोरी करायचं म्हणजे आवघड आसतं," "‘माझ्याकडं काय मिळणार तुला, तीन पोरं आहेत,त्याच्या जेवनाचे वांदे आहेत,आसं कर दुसरं घर शोध," "‘नको आसाच एकदा मी सावकराच्या घरी सापडलो आणि खुप मार खाल्ला होता," "‘काम करतो की पण तेवढ्यावर भांग़त नाही," "जरा चहा तर करुन देशील का?’चोर म्हणाला, ‘चहा करण्यासाठी घरात कायपण नाही?’,मावशी म्हणाली. "येत जा रे पुढच्या वेळी नक्की चहा देईन." (ह्याला म्हणतात आश्वासन.) आता गेल्या १५/२० दिवसांतल्या राजकीय घडामोडी आठवा आणि चोर कोण असेल ते ओळखा. ================================================================ हा लेख तद्दन विनोदी आणि फालतू असून, मी कुठल्याही पक्षाचे किंवा व्यक्तीचे नांव घेतलेले नाही.तरी पण भारतातील काही पक्षांशी आणि व्यक्तींशी साधर्म्य आढळल्यास, तो योगायोग समजावा. =================================================================
  • Log in or register to post comments

आवडले!

भाते
Sat, 02/22/2014 - 20:04 नवीन
वा मुक्त विहारि, जीवनभौच्या कथेचे इतके सविस्तर आणि समर्पक विश्लेषण केलेत! अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आमचा मोजीभौंबद्दलचा आदर आता

हाडक्या
Mon, 01/19/2015 - 16:35 नवीन
आमचा मोजीभौंबद्दलचा आदर आता कैकपटीने दुणावला हो मुवि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

मोजी आणि पेशवा

मुक्त विहारि
Tue, 01/20/2015 - 08:55 नवीन
हे सामान्य लेखक नाहीत. त्यांच्या लेखांचे विश्लेषण करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे. फार अभ्यास करून मोजी आणि पेशवा लेख लिहायचे. जमल्यास पेशवा ह्यांचा खालील लेख वाचा... http://www.misalpav.com/node/21359
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

जीवनभौ हा मुविंचा डु.आय.डी

अजया
Sat, 02/22/2014 - 22:45 नवीन
जीवनभौ हा मुविंचा डु.आय.डी.आहे ! =))
  • Log in or register to post comments

जीवनभौ हा मुविंचा डु.आय.डी

जेपी
Sun, 02/23/2014 - 10:24 नवीन
जीवनभौ हा मुविंचा डु.आय.डी.आहे ! +१ *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

@हा मुविंचा डु.आय.डी.आहे ! >>

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/24/2014 - 00:53 नवीन
@हा मुविंचा डु.आय.डी.आहे ! >>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

कथा अतिशय सुंदर आणि आशयाने

लौंगी मिरची
Sun, 02/23/2014 - 00:27 नवीन
कथा अतिशय सुंदर आणि आशयाने खचाखच भरलेली आहे . तुमच्या मावशीचे खरेच कौतुक वाटते . काळी असुनहि तुम्हाला तीने सांभाळले . झोपायला पडके घर वापरत होती मावशी म्हणजे किती दुरद्रुष्टी आहे मावशीला तुमच्या .तबांखु खाउन म्होरीत थुंकणे , दाताखाली तबांखु धरणे वगैरे जे वर्णन आहे त्यामुळे कथेतले कितीतरी बारकावे तुमच्या लेखनीने हेरलेत हे ध्यानात येते. लिहित रहा , तुमच्या कथेंमुळे मिपा ला एक वेगळीच पेहेचान मिळालेली आहे हे लक्षात घ्या . जीवन भौ लेखनीला थांबवु नका , _/\_
  • Log in or register to post comments

लुनावाल्या ब्रम्हेंच्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 02/23/2014 - 10:58 नवीन
लुनावाल्या ब्रम्हेंच्या बालपणीची अजुन एक गोष्ट. :)
  • Log in or register to post comments

भेंडी

इरसाल
Mon, 02/24/2014 - 09:49 नवीन
लुनावाल्या ब्रम्हेंच्या बालपणीची अजुन एक गोष्ट. हा नवीन होता...म्हणजे आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

हम्म!!

सूड
Mon, 02/24/2014 - 19:53 नवीन
हम्म!!
  • Log in or register to post comments

अबाबाबाबाबा

नांदेडीअन
गुरुवार, 02/27/2014 - 22:39 नवीन
अबाबाबाबाबा भयंकर जब्राट प्रतिसाद सगळे ! कथेमधून एव्हढाच बोध झाला की काळ्याकुट्ट रात्रीच्या काळोखात काळ्या मावशीने चोराच्या मनातलं काळबेरं शोधून त्याला काळा-निळा करण्याऐवजी काळाचं भान ठेवून काळाकाळीची विनंती केली. (दुसरीकडे चोरी करण्याची.) भगवान ऐशी काळी मौशी सबको दे.
  • Log in or register to post comments

फ्रेंच आर्टिस्ट वाचुन कंटाळा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 01/19/2015 - 16:22 नवीन
फ्रेंच आर्टिस्ट वाचुन कंटाळा आला म्हणुन वर आणतोय मावशीबैला =))
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा