नाते आपुले तसेच आतून...
लेखनविषय:
जसे फुलावे रंग साजिरे
श्यामनिळ्याच्या मोरपिसातून
मुके तरी मोहाहुन मोहक
नाते आपुले तसेच आतून..
मी मुरली तू सूर खुळासा
मी यमुना तू माझी खळखळ
तू कविता, मी तुझ्या आतली
आर्त खोल दडलेली तळमळ
तू कान्हा मी अधीर राधा
राघव तू मी तुझी मैथिली
नर्तक तू मी नुपुर नादमय
छुमछुमणारे तुझ्या पाऊली
भेट घडे या वळणावरती
अनोळखीशी आज नव्याने
वर वर सारे परके तरिही
जुळले अंतर जुन्या दुव्याने
परस्परांतच परस्परांनी
पुन्हा नव्याने जावे गुंतून
अनोळखी देहात नांदते
नाते आपुले तसेच आतून..
© अदिती जोशी
वाचने
4041
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
फारच छान
खूप सुंदर आणि आर्त भावपूर्ण कविता!
वा! मस्त!
वाह! आवडली.
@भेट घडे या वळणावरती
आवडली
:) :) :)
क्या बात है!!! खूप आवडली.
शेवटच्या २ कडव्यांमध्ये 'चलो
सुंदर ,नादमयी कविता. खूप
आहा!
धन्यवाद..
परत वाचली
सुंदर, खुपच आवडली
आवडली
क्या बात है. मला आवडलं ते हे.....
सुंदर..
धन्यवाद..
क्याबात!!!
वा! क्या बात है!