Skip to main content

नाते आपुले तसेच आतून...

लेखक आनंदमयी यांनी रविवार, 16/02/2014 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
जसे फुलावे रंग साजिरे श्यामनिळ्याच्या मोरपिसातून मुके तरी मोहाहुन मोहक नाते आपुले तसेच आतून.. मी मुरली तू सूर खुळासा मी यमुना तू माझी खळखळ तू कविता, मी तुझ्या आतली आर्त खोल दडलेली तळमळ तू कान्हा मी अधीर राधा राघव तू मी तुझी मैथिली नर्तक तू मी नुपुर नादमय छुमछुमणारे तुझ्या पाऊली भेट घडे या वळणावरती अनोळखीशी आज नव्याने वर वर सारे परके तरिही जुळले अंतर जुन्या दुव्याने परस्परांतच परस्परांनी पुन्हा नव्याने जावे गुंतून अनोळखी देहात नांदते नाते आपुले तसेच आतून.. © अदिती जोशी

वाचने 4081
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

खूप सुंदर आणि आर्त भावपूर्ण कविता! अभिनंदन! असेचछान छान लिहित चला! अशीच एक छान रचना आठवली : युगायुगांचे नाते

@भेट घडे या वळणावरती अनोळखीशी आज नव्याने वर वर सारे परके तरिही जुळले अंतर जुन्या दुव्याने >>> अजी कत्ल हो गए जी....!!! @परस्परांतच परस्परांनी पुन्हा नव्याने जावे गुंतून अनोळखी देहात नांदते नाते आपुले तसेच आतून.. >>> यहां जी उठे फिर से :)

सर्वांचे मनापासून आभार!! __/\__ ..........................................................

भेट घडे या वळणावरती अनोळखीशी आज नव्याने वर वर सारे परके तरिही जुळले अंतर जुन्या दुव्याने परस्परांतच परस्परांनी पुन्हा नव्याने जावे गुंतून अनोळखी देहात नांदते नाते आपुले तसेच आतून.. -दिलीप बिरुटे

खूप दिवसांनी छान, सोप्पी तरल आणि तरीही सखोल कविता वाचायला मिळाली, नितळ सुंदर!