दासनवमीच्या निमित्ताने श्री समर्थ चरित्राचा अभ्यास व्हावा म्हणून काही प्रश्न काढले आहेत , त्यातील पहिले २५ प्रश्न :
१ श्री समर्थांचे पूर्ण नाव काय ?
२ श्री समर्थांच्या मातोश्रींचे नाव काय ?
३ श्री समर्थांचा जन्माचा वार, तिथी व शालिवाहन शक कोणते ?
४ श्री समर्थांचे जन्मगाव कोणते ?
५ श्री समर्थांच्या जन्मगावी असणार्या नदीचे नाव काय ?
६ बखरीप्रमाणे श्री समर्थांना रामरायचा अनुग्रह केव्हा झाला ते शालिवाहन शक कोणते ?
७ आजही समर्थांच्या लग्नावेळचे बोहले दाखवण्यात येते, ते गाव कोणते ?
८ श्री समर्थांची नियोजित वधू कोणाची मुलगी व तिचे नाव काय ?
९ श्री समर्थांनी विवाहमंडपातून पलायन केले ते शालिवाहन शक कोणते ?
१० श्री समर्थ नाशिकला पंचवटीत आले ते शालिवाहन शक कोणते ?
११ श्री समर्थांचे साधनास्थळ कोणते ?
१२ तेथे कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे ?
१३ साधंनास्थळी श्री समर्थांनी स्वहस्ते लिहिलेला सध्या उपलब्ध असलेला ग्रंथ कोणता ?
१४ साधनास्थळी श्री समर्थांनी कोणत्या मंत्राचे पुरश्चरण केले ?
१५ श्री समर्थांनी साधनाकाळात केलेल्या रचना कोणत्या ?
१६ करुणाष्टकांची रचना कोणत्या मंदिरात झाली ?
१७ समर्थांचा पहिला शिष्य कोण ?
१८ समर्थ स्थापित पहिला मारुती कोठे आहे ?
१९ त्याच्यासाठी रचलेले प्रसिद्ध स्तोत्र कोणते ?
२० टाकळीतील वास्तव्यात ग्रंथलेखनात कोणाचे साहाय्य झाले ?
२१ समर्थांनी दसपंचक गावच्या कुलकर्ण्याचे प्रेत उठवले या घटनेचे शालिवाहन शक कोणते ?
२२ समर्थांना ‘रामदास’ हे नाव कोणी दिले ?
२३ समर्थांनी भारतभ्रमणास प्रारंभ कोठून केला ?
२४ समर्थांच्या साधनेचा कालावधी किती वर्षे ?
२५ समर्थांच्या भारतभ्रमणाचा कालावधी किती वर्षे ?
माहीत असलेली उत्तरे प्रतिसादात लिहायला हरकत नाही.
वास्तविक सर्वच संतांच्या/ महापुरुषांच्या चरित्रांचा अभ्यास या पद्धतीने व्हायला हवा. .. (परिप्रश्नेन सेवया.. )
संदर्भासाठी पुस्तके :-
१. दासायन - श्री, अनंतदास रामदासी
२. त्रि खंडात्मक समर्थ चरित्र - नानासाहेब देव
३. समर्थ चरित्र - सं ख आळतेकर
दासनवमी ( २४ /०२/२०१४) नंतर उत्तरे www.dasbodhabhyas.org येथे मिळतील , पण तत्पूर्वीच येथे उत्तरे मिळतील अशी खात्री वाटते .
जय जय रघुवीर समर्थ !
वाचने
9419
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
कल्पना चांगली आहे.
पत्राद्वारे दासबोध अभ्यास
In reply to कल्पना चांगली आहे. by आतिवास
समर्थांच्या विचारांवर/ग्रंथावर
In reply to कल्पना चांगली आहे. by आतिवास
सेम
In reply to समर्थांच्या विचारांवर/ग्रंथावर by विटेकर
१ श्री समर्थांचे पूर्ण नाव
शिवगुरु समर्थ रामदास
In reply to १ श्री समर्थांचे पूर्ण नाव by प्यारे१
ते जन्म साल इसवीसनानुसार १६०८
In reply to १ श्री समर्थांचे पूर्ण नाव by प्यारे१
गोदावरी आणि दारना या नद्यांचा
In reply to ते जन्म साल इसवीसनानुसार १६०८ by प्यारे१
४ श्री समर्थांचे जन्मगाव कोणते ? -
In reply to १ श्री समर्थांचे पूर्ण नाव by प्यारे१
नाई माहित..
अजुन एक प्रश्न.....
मोठे भाऊ गंगाधर पंत ठोसरांना
In reply to अजुन एक प्रश्न..... by ज्ञानव
तेव्हा गंगाधरपंतांनी तिथेच
In reply to मोठे भाऊ गंगाधर पंत ठोसरांना by प्यारे१
सुनिल चिंचोलकर हे समर्थ
In reply to तेव्हा गंगाधरपंतांनी तिथेच by धन्या
धन्यवाद.
In reply to सुनिल चिंचोलकर हे समर्थ by प्यारे१
मेल आय डी
In reply to धन्यवाद. by धन्या
सुंदर उपक्रम !
मध्यंतरी एका पुस्तकात कथेच्या
मनाच्या श्लोकांमधले
ते श्लोक
In reply to मनाच्या श्लोकांमधले by धन्या
अशी जाणीव _____ विचार
मी फक्त दासबोध वाचलय त्यामुळे
जय जय रघुवीर समर्थ.
भौतेक प्रश्नांची उत्तरे वर
तमिळ भाषेचे जाणकार
उद्धव गोसाव्यासंबंधी संभाजी
कृपया खुलासा करावा
In reply to उद्धव गोसाव्यासंबंधी संभाजी by प्रचेतस
समर्थांनी सज्जनगडावरील काही
In reply to कृपया खुलासा करावा by शशिकांत ओक
काय दैवदुर्वीलास आहे पाहा...
In reply to समर्थांनी सज्जनगडावरील काही by प्रचेतस
एक प्रयत्न..
एक शंका
In reply to एक प्रयत्न.. by भटक्य आणि उनाड
दासबोध अन मनाचे श्लोक
उत्तरे
प्रश्नांमध्ये सगळीकडे समर्थ