Skip to main content

मराठी लोकांचे हिंदी बोलणे

लेखक दिव्यश्री यांनी बुधवार, 12/02/2014 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसामान्य पणे मराठी लोक हिंदी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत अस निरिक्षण आहे,आणि त्याला फारच कमी अपवाद असतील. मी देखील फार सुंदर हिंदी बोलते असे नाही.मराठी लोक जर कधी हिंदी भाषेत बोलले तर फार गमतीदार प्रसंग घडतात.आणि जो बोलतो त्यालाही ते नंतरच समजते.असाच एक किस्सा आमच्या बाबतीत घडला. तो इथे मांडते आहे. :) आम्ही डिसेंबर मध्ये इटली मधील Milano नावाच्या शहरात फिरायला गेलो होतो.पोहोचे पर्यंत बराच उशीर झाला रात्रीचे १२.३० वाजले होते .प्रचंड थंडी आणि त्यामध्ये हॉटेल शोधायचे होते.बरेचसे लोक अर्धवट झोपेतच होते. Milano मध्ये जे हॉटेल बुक केले होते तेथे जवळपास बर्याच गल्ल्या /बोळी होत्या.फिरून फिरून आम्ही दोनदा एकाच ठिकाणी आलो.आमचे अहो तेवढ्यात बोलले कितनी बोळी हैं यहा,बोळीबोळी मे से आणे जाने मे तकलीफ होती हय, त्या परिस्थितीत २ मिनिटे सगळेच ब्लांक झाले आता काय करायचं आणि नंतर पूर्ण ट्रीप संपे पर्यंत बोळीबोळी वरून चिडवत राहिले . *blush* ;) :D *lol* तुम्हीही असे काही किस्से असले तर जरूर शेअर करा.आपण सगळे हसुया. :) इथे कोणाला दुखायचं नाही, कोणत्याही भाषेचा ,व्यक्तीचा अपमान करण्याचा हेतू नाही. एक मजा म्हणून लिहिले आहे आणि सगळ्यांना विनंती आहे कि या लिखाणाकडे मजा म्हणूनच पाहावे .अवांतर मला लिहिण्याचा अनुभव आजीबात नाही तेंव्हा काही चुकल्यास आपण सांभाळून घ्यालच(न घेऊन जाणार कुठे.) ;) :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 31472
प्रतिक्रिया 155

प्रतिक्रिया

माझ्या मित्राने "उधर मत जावो ..उधर साप गया है .. चाव खायेगा" असे तारे तोडले होते .. बादवे .. "हत्ती चिखलात लोळतो" चे हिंदी भाषांतर काय ?

In reply to by अर्धवटराव

हाथी किचड में सुस्त पडा हुआ हैं!! अवांतर - या धाग्यात मराठी राजकीय पुढार्‍यांची अनेक विनोदी हिन्दी विधाने वाचायला मिळतील.

In reply to by अर्धवटराव

:-). भारतात काम करत असताना हिन्दी भाषिक सहकार्‍यांबरोबर 'विशुद्ध हिन्दी' भाषेत संवाद साधताना (उदा. शुरु से अंत तक, समयसीमा समाप्त होने वाली हैं, इस बारे में कोई संदेह नही) मजा यायची. त्याखेरीज आंग्लाळलेल्यांना 'Committed', 'Edition' वगैरेंचे हिन्दी प्रतिशब्द विचारून भंडावून सोडत असे :-). परदेशात काम करताना अशी संधी फारशी मिळत नाही :-(.

काल वॅलेन्टाईन्ट डेच्या निमित्ताने प्रेमी युगलांना भारतीय संस्कृती शिकवणारा शिवसैनिक पुढारी.. ' ये लोग बगीचे में जाके अश्लिल चाळे करते हैं..' :-D =))

मैने रात के भात(!)को आज फोडणी(?) मारा हय..*mosking* *JOKINGLY* 8P 8p

यॆ SSSS शतकी पार करून पन्नाशी पण पार . *pleasantry* चलो पार्टी टाइम ... *yahoo* *drinks* ठ्यांक्यू मिपाकारानो . BE READY For PARTYYY. :)

माझ्या मैत्रिणीचा साधारण ३ वर्षाचा मुलगा मराठी - हिंदी ची चटपटीत भेळ करतो . जस - तू मला प्यार करू नको , मी माझी चप्पल पेहाणतो ई . एकदा आम्ही गार्डनमध्ये गेलो होतो तेंव्हा दुसर्या मैत्रिणीचा मुलगा आगोदरच घसरगुंडीच्या शिडीवर चढून वर गेला , आणि वर उल्लेख केलेला जो होता त्याला त्या उंच शिडी वर चढता यात नव्हते . तर वरचा मुलगा कसा म्हणतो आंटी उसको कडेवर लो ना . :)

हम एक डोंगर पे गये थे. वहा इतने मक्कड थे इतने मक्कड थे, एक मक्कड तो मेरे मांडी पे आके बैठ गया. दुसरे टोक म्हणजे माझी मध्यप्रदेशात राहणारी बहीण मला तिच्या शुद्ध मराठी मधे सांगत होती ' सॉरी मला लेट झाला मी जरा देवाघरी गेली होती' ( देवळात).