Skip to main content

मराठी लोकांचे हिंदी बोलणे

लेखक दिव्यश्री यांनी बुधवार, 12/02/2014 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसामान्य पणे मराठी लोक हिंदी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत अस निरिक्षण आहे,आणि त्याला फारच कमी अपवाद असतील. मी देखील फार सुंदर हिंदी बोलते असे नाही.मराठी लोक जर कधी हिंदी भाषेत बोलले तर फार गमतीदार प्रसंग घडतात.आणि जो बोलतो त्यालाही ते नंतरच समजते.असाच एक किस्सा आमच्या बाबतीत घडला. तो इथे मांडते आहे. :) आम्ही डिसेंबर मध्ये इटली मधील Milano नावाच्या शहरात फिरायला गेलो होतो.पोहोचे पर्यंत बराच उशीर झाला रात्रीचे १२.३० वाजले होते .प्रचंड थंडी आणि त्यामध्ये हॉटेल शोधायचे होते.बरेचसे लोक अर्धवट झोपेतच होते. Milano मध्ये जे हॉटेल बुक केले होते तेथे जवळपास बर्याच गल्ल्या /बोळी होत्या.फिरून फिरून आम्ही दोनदा एकाच ठिकाणी आलो.आमचे अहो तेवढ्यात बोलले कितनी बोळी हैं यहा,बोळीबोळी मे से आणे जाने मे तकलीफ होती हय, त्या परिस्थितीत २ मिनिटे सगळेच ब्लांक झाले आता काय करायचं आणि नंतर पूर्ण ट्रीप संपे पर्यंत बोळीबोळी वरून चिडवत राहिले . *blush* ;) :D *lol* तुम्हीही असे काही किस्से असले तर जरूर शेअर करा.आपण सगळे हसुया. :) इथे कोणाला दुखायचं नाही, कोणत्याही भाषेचा ,व्यक्तीचा अपमान करण्याचा हेतू नाही. एक मजा म्हणून लिहिले आहे आणि सगळ्यांना विनंती आहे कि या लिखाणाकडे मजा म्हणूनच पाहावे .अवांतर मला लिहिण्याचा अनुभव आजीबात नाही तेंव्हा काही चुकल्यास आपण सांभाळून घ्यालच(न घेऊन जाणार कुठे.) ;) :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 31472
प्रतिक्रिया 155

प्रतिक्रिया

दिव्यश्री, खरं पाहता मी कांही प्रतिसादच देणार नव्हतो. कारण मूळ धाग्यात म्हंटल्याप्रमाणे 'एक मजा म्हणून लिहिले आहे आणि सगळ्यांना विनंती आहे कि या लिखाणाकडे मजा म्हणूनच पाहावे .' ह्या विनंतीला मान देऊन मी कांही इतर गंभीर धाग्यांकडे वळणार होतो पण सर्वसाक्षींच्या प्रतिसादावरील आपली प्रतिक्रिया वाचली आणि कांही गोष्टी डोक्यात आल्या त्या इथे लिहील्या आहेत.
सर्वसामान्य पणे मराठी लोक हिंदी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत अस निरिक्षण आहे,आणि त्याला फारच कमी अपवाद असतील.
हे अनुमान कशाच्या बळावर काढले आहे? माझा अनुभव असा आहे की पूर्व, दक्षिण आणि इतर अनेक राज्यांपेक्षा महाराष्ट्रात हिन्दी चांगली बोलली जाते. त्याचे कारण मराठी माणसाची हुशारी नसून शाळेतच 'हिन्दी' हा एक विषय आपल्या शिक्षणात अनिवार्य आहे. हिन्दी चित्रपट क्षेत्रात अनेक मराठी तारे-तारका व्यवस्थित हिन्दी बोलतात. लता मंगेशकर, आशा भोसले वगैरे गायिका अनेक वर्षे राज्य करीत आहेत. हिन्दी नाटकांमध्ये आणि मालिकांमध्येही अनेक मराठी कलाकार हिन्दी भाषा व्यवस्थित बोलत असतात. बिजेपी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेक मराठी नेते हिन्दी व्यवस्थित बोलत असतात. वरील प्रतिसादांमधील अनेक उदाहरणे ही मागिल पिढीच्या महिलांची आहेत. त्यांना बाहेरच्या जगात वावरायला, अन्य भाषिकांमध्ये मिसळायला संधीच कमी मिळाली त्यामुळे शाळेत शिकलेली हिन्दी भाषा वापरात राहीली नाही. पुरुषांचे सहसा तसे झालेले दिसत नाही. नोकरी धंद्यानिमित्त त्यांचे अन्य भाषिकांशी संबंध येतात आणि हिन्दी भाषा वापरात राहाते. कुठलीही भाषा वापरात असेल तर आणि तरच त्या भाषेवर आपलं प्रभुत्व राहतं. अगदी आपल्या मातृभाषेचेही तस्स्सेच आहे. मराठी वापरात नाही राहिली (इंग्रजी, हिन्दी मिसळले) की आपल्या मातृभाषेची शुद्धताही हळू हळू नष्ट होते. हिन्दी तर आपल्यासाठी परकी भाषा आहे.
मुळामध्ये मराठी लोक हिंदी बोलताना चुकतात
सर्व मराठी माणसं हिन्दी बोलताना चुकतात?
हिंदी हि आपली राष्ट्रभाषा आहे न?
हिन्दी ही राष्ट्रभाषा नाही हा मुद्दा वर येऊन गेला आहेच.
मग मातृभाषा आणि राष्ट्रभाषा या दोन्ही व्यवस्थित बोलत यायला पाहिजे ना?
आधी मातृभाषा व्यवस्थित (शक्य तितकी शुद्ध, 'बोलत' नाही 'बोलता' ) बोलता यायला पाहिजे. Milano, हॉटेल बुक, सगळेच ब्लांक झाले, पूर्ण ट्रीप संपे पर्यंत, जरूर शेअर करा, ह्या सर्व शब्दांना मातृभाषेत पर्यायी शब्द आहेत नं? Milano - मिलॅनो हॉटेल बुक - अगदी हॉटेलला 'विश्रांतीगृह' नाही म्हंटलं तरी 'आरक्षण' शब्द वापरता येईलच. सगळेच ब्लांक (ब्लँक) झाले - स्तिमित झालो, स्तब्ध झालो. पूर्ण ट्रिप संपे पर्यंत (संपेपर्यंत) - सहल जरूर शेअर करा - अवश्य आदानप्रदान करा मातृभाषा व्यवस्थित बोलता यायला पाहिजे हा तुमचा मुद्दा मला अगदी पटला. तुम्हालाही माझा मराठी भाषेचा आग्रह पटला असेल असे वाटते.
पण खरच नवीन सदस्यांना समजून घेण्यास जरा त्रास होतो असे मी बर्याच वेळा पहिले आहे.
इथला प्रत्येक जण कधी न कधी नविन असतोच असतो. आपल्या चुका कोणी दाखविल्या तर त्यात राग कसला? कोणी मुद्दामहून नविन सदस्याला 'छळत' नाही. भाषेबद्दल बोलताना, वरील धाग्यातील लिखित भाषेतील व्याकरणाच्या साध्या साध्या चुका जसे, स्वल्पविराम, पूर्णविरामा नंतरच्या शब्दात एक जागा सोडायला पाहिजे आणि कांही शब्दांची तोडफोड, ही अधोरेखित केली नाहीए नाहीतर हा एक स्वतंत्र लेखच होईल.
मी अगदी प्रामाणिकपणे लिहिले आहे
सर्वसाक्षींनीही अगदी प्रामाणिकपणे लिहीले आहे आणि माझा हा प्रतिसादही अगदी प्रामाणिक आहे. खात्री असावी आणि राग मानू नये. मला मराठी भाषेची आवड आणि अभिमान आहे. पण कधी कधी माझ्या तोंडूनही एखादा चुकीचा शब्द जातोच. मी मान्य करतो. पण कोणी चुक दाखवून दिली तर रागवत नाही, सुधारून घेतो. अशा बारीक बारीक सुधारणांमधून आपली मातृभाषा संमृद्ध होत जाते. वरील लेखनातही काही चुका आढळल्यास नि:संकोच सांगाव्यात.

In reply to by प्रभाकर पेठकर

तुमच्याशी वाद घालायचा अजिबात हेतू नाही. (बाकी काय बिशाद आहे आमची?) :) पण तुम्हीच
वरील लेखनातही काही चुका आढळल्यास नि:संकोच सांगाव्यात.
असं सांगितल्यामुळे खालील वाक्ये लिहायचा धीर करत आहे... सर्वप्रथम, Milano या शब्दाचं मराठीकरण मिलॅनो असं होत नाही. मुळात हा इंग्रजी शब्द नाही, इटालियन आहे. आणि माझ्या अनुभवानुसार स्थानिक इटालियन त्याचा उचार 'मिलानो' असा करतात. इंग्रजीतही त्या गावाला 'मिलान' असं म्हणतात, मिलॅन नाही. तेंव्हा विशेषनामे लिहितांना तरी त्यांचं मराठीलिपीकरण केलं नाही तरी चालावं... बाकी हॉटेल बुक, ट्रीप, शेअर करणे याबद्दल बोलायचं झालं तर गेल्या चाळीस वर्षांपासून मुंबईततरी हेच शब्द वापरले जातात. हॉटेलचं बुकिंग केलं, शाळेची ट्रीप गेली, डोसा शेअर केला असंच म्हणतात. महाराष्टात अन्यत्र कुठे तुम्ही म्हणता तसे पर्याय वापरले जात असतीलही, मी नाही म्हणत नाही. पण एखाद्याने ते वापरले नाहीत तर तो फार मोठा दोष म्हणता येणार नाही. बाकी तुम्ही 'जरूर' ला 'अवश्य' हा पर्याय का सुचवला ते माझ्या डोक्यावरून गेलंय!! तद्भाषीय शब्द वापरायला हवेत हे तर खरंच पण त्याचबरोबर कोणत्याही भाषेने सर्वसमावेशक असणं आवश्यक आहे, नाही का? चूभूद्या घ्या...

In reply to by पिवळा डांबिस

उगाच माझाही अवांतर आगावपणा: इटालियन लोक बोलताना बडबडगीत म्हटल्यासारखा आवाज लावतात. त्यामुळे "इतालियेन्न", "मिलान्नो", "दानियेल्ले", "सिमोनताक्की" असे उच्चार असतात. इतालियेन्न माणूस बोलायला लागला की त्याच्या लयबद्ध बोलण्याकडेच लक्ष लागून रहातं आणि आशय निसटून जातो - असा अनुभव कैकवेळा आला आहे. (जिज्ञासूंसाठी: इतालियेन्न तरुणी बोलत असताना तिच्या बोलण्याकडेही लक्ष जात नाही...)

In reply to by आदूबाळ

उगाच माझाही अवांतर आगावपणा: फ्रेंच इंग्रजी- फ्रेंच- आई वॉन्टं पेप्परं दुकानदार- या शुअर. ब्लॅक पेप्पर ऑर व्हाईट पेप्पर? फ्रेंच- टॉईलेट्टं.. पेप्परं..

In reply to by पिवळा डांबिस

>>>>Milano या शब्दाचं मराठीकरण मिलॅनो असं होत नाही. मुळात हा इंग्रजी शब्द नाही, इटालियन आहे. आणि माझ्या अनुभवानुसार स्थानिक इटालियन त्याचा उचार 'मिलानो' असा करतात. इंग्रजीतही त्या गावाला 'मिलान' असं म्हणतात, मिलॅन नाही. मिलॅनो हा माझा ऐकीव उच्चार आहे. त्याचा इटालियन उच्चार 'मिलानो' होतो ही माहीती मला तुमच्या प्रतिसादातून मिळाली आहे. माझी चुक मी सुधारली आहे. माझा आक्षेप, संपूर्ण मराठी लेखात 'Milano' ह्या इंग्रजी लिपीतील शब्दाला आहे. इटाली हा शब्द मराठीत लिहीता येतो तर 'मिलानो' का नाही? इटाली सुद्धा विशेषनाम आहे. >>>>एखाद्याने ते वापरले नाहीत तर तो फार मोठा दोष म्हणता येणार नाही. फार मोठा दोष आहे असे माझेही म्हणणे नाही. पण मराठी लिहायचा प्रयत्न तर करून पाहा. मराठी भाषा लिहायला, बोलायला, वाचायला, गोड नाही वाटत का? की मराठीच्या वापराने नेमका अर्थ न कळता भलताच अर्थ ध्वनीत होतो? >>>>बाकी हॉटेल बुक, ट्रीप, शेअर करणे याबद्दल बोलायचं झालं तर गेल्या चाळीस वर्षांपासून मुंबईततरी हेच शब्द वापरले जातात. हॉटेलचं बुकिंग केलं, शाळेची ट्रीप गेली, डोसा शेअर केला असंच म्हणतात. होय गेल्या ४० वर्षात हेच झाले आहे. ते थांबावे हाच उद्देश आहे. 'हॉटेल' शब्द बर्‍यापैकी मराठीत स्थिरावला आहे. 'आरक्षण असलेल्या हॉटेलाचा पत्ता शोधताना' ऐवजी 'हॉटेल 'बुक' केलेले होते ते शोधताना...' असा शब्द प्रयोग करून आपण 'बुक करणे' हा निविन शब्द मराठीच्या मूळ शब्दाला बाजूला सारून प्रस्थापित करतो आहोत. ते टाळता आलं तर पाहावं. 'आरक्षित हॉटेलचा पत्ता शोधताना..' असे म्हंटले तर अर्थ कळत नाही का? मराठी भाषेचा आग्रह धरणारे मराठी बांधवांकडूनच हास्याचा विषय ठरतात ह्यापरतं मराठी भाषेचे दुर्दैवं ते काय? हे वैयक्तिकरित्या तुम्हाला उद्देशून नाही तर एकूणातच मराठी भाषेला मिळणार्‍या सापत्न वागणूकीला उद्देशून आहे. कांही मराठी शब्द कांही जणांना बोजड वाटतात. कानाला ऐकायला सहजसुलभ वाटत नाहीत. त्यामुळे त्यांचा मिश्र मराठीला पाठींबा असतो. पण संस्थळाच्या अस्तित्वात आल्यानंतर, 'LOL', 'बाडीस', 'गुगलून पाहा', OMG आणि स्मायल्यांचा वापर एवढ्या सगळ्या गोष्टी आपण विनातक्रार शिकलो आणि वापरतोही. मग मातृभाषेतील नविन नाही तर वर्षानुवर्षे चालत आलेले शब्द आपल्याला अनाकलनिय का वाटावेत? बोजड का वाटावेत? ते शिकण्याकडे, वापरण्याकडे आपला कल का नसावा? हे समजत नाही. अगदी अवजड-बोजड मराठीच बोला असा माझा (किंवा सर्वसाक्षींचाही) आग्रह नाही. पण जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मराठी पर्यायी शब्द आवर्जून वापरले तर मराठी भाषा धेडगुजरी बनणार नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

माझा आक्षेप, संपूर्ण मराठी लेखात 'Milano' ह्या इंग्रजी लिपीतील शब्दाला आहे. इटाली हा शब्द मराठीत लिहीता येतो तर 'मिलानो' का नाही?
या तुमच्या पॉइंटाशी [क्षमस्व, 'मुद्द्याशी'; आता मराठी बोलले पाहिजे तुमच्याशी!! :) ] सहमत आहे.
पण मराठी लिहायचा प्रयत्न तर करून पाहा. मराठी भाषा लिहायला, बोलायला, वाचायला, गोड नाही वाटत का?
होय हो, वाटतं की. तुम्ही-आम्ही मिपावर खूप वर्षं लिहितोय. आपण जर 'मोकलाया दाही दिशा' स्टाईल लिहिलं तर एकमेकांना आक्षेप घेणं हे ठीक आहे!! पण त्यांनी अगोदरच सांगितलंय की त्या नवीन आहेत म्हणून! म्हणून कृपया तिला फोडा (सो प्लीज गिव्ह हर अ ब्रेक!!) :) नाहीतर नवोदित सभासदांना छळल्याबद्दल नीलकांताकडे तुमची चुगली करून एक चांदणी मिळवीन हां मी!!!
कांही मराठी शब्द कांही जणांना बोजड वाटतात. कानाला ऐकायला सहजसुलभ वाटत नाहीत. त्यामुळे त्यांचा मिश्र मराठीला पाठींबा असतो.
ते तर आहेच. पण त्याहीपेक्षा कधीकधी मुद्दाम अट्टहासाने अनैसर्गिक मराठी शब्द वापरण्याचा हट्ट हा जास्त जाचक वाटतो. उदा. जागा 'राखून' ठेवणं हे मला सरळ सोपं मराठी वाटतं. पण जागेचं 'आरक्षण' केलं असं म्हणणं म्हणजे आमच्या तोंडी सर्कारी तोबरा भरल्यागत वाटतं. मराठी भाषा धेडगुजरी बनू नये असं मलाही वाटतं पण त्यापेक्षा ती बदललेल्या स्वरूपात का होईना पण जास्तीतजास्त लोकांकडून वापरात रहावी असं जास्त प्रकर्षाने वाटतं. तिची पाली वा अर्धमागधी होऊ नये असं वाटतं... आणि मराठी भाषेला बदलाचं वावडं नाहिये. ज्ञानेश्वराच्या काळची मराठी तुकारामांच्या काळी बदलली होती, ती मग चिपळूणकरांच्या काळी आणखी बदलली, मग खांडेकर-फडक्यांच्या काळी अजून बदलली आणि आताही बदलतेय. जर तेराव्या शतकापासून एकविसाव्या शतकापर्यंत नवे शब्द येऊनही, बदलूनही जर मराठी अजून मराठीच असेल तर निव्वळ संस्कृतोद्भव शब्दांचा अट्टहास करण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं.... बहुत काय लिहावे? आपण सूज्ञ आहांतच... लेखनसीमा.

In reply to by पिवळा डांबिस

म्हणून कृपया तिला फोडा --- अशक्य हसतेय पिडाकाका!

In reply to by प्रभाकर पेठकर

पण हिंदीला परकी भाषा म्हणणं काहि पटलं नाहि बुवा... एकट्या हिदी सिनेमा आणि गाण्यांनी ४ मराठी पिढ्यांचं भावविश्व समृद्ध केलय. आयुष्यातली कुठलिही हळवी आठवण घ्या... ति एखाद्या हिंदी चित्रपट/प्रसंग/गाण्याशीच कनेक्ट होते. तसच जुन्या हिंदी टी.व्ही सिरेयल्स आणि बाकि कार्यक्रम... आज सुद्धा कोण मुलगा/मुलगी मराठी नट्यांची कॉपी करायचा प्रयत्न करते? मग ति भाषा आपल्याला परकी कशी?

In reply to by अर्धवटराव

>>>>हिंदीला परकी भाषा म्हणणं काहि पटलं नाहि बुवा.. अर्धवटराव, 'परकी' म्हणजे जी मातृभाषा नाही ती. 'परकी' म्हणजे लगेच परदेशी नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मुळामध्ये मराठी लोक हिंदी बोलताना चुकतात
ह्याकडे लक्षच गेले नाही.. मुळात मराठी लोक मराठी लिहीतांना चुकतात तर. "मुळा-मुठे"च्या पाण्याला काय वाटेल अश्याने? ;-) प्रतिसादाशी सहमत, पेठकर काका..

In reply to by प्रभाकर पेठकर

खरं पाहता मी कांही प्रतिसादच देणार नव्हतो. पेठकर काका तुम्ही या धाग्यावर येउन प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभारी आहे. हे अनुमान कशाच्या बळावर काढले आहे?>>>माझ्या अल्पमती नुसार.मला काही तुमच्या एवढा अनुभव नाही.मी महाराष्ट्रात पुणे ,नाशिक आणि काही ठराविक गावे /शहरे सोडली तर जास्त फिरले नाही. कुठलीही भाषा वापरात असेल तर आणि तरच त्या भाषेवर आपलं प्रभुत्व राहतं>>> प्रभुत्व सोडा हो मी फक्त भाषा व्यवस्थित बोलत यावी असं लिहील आहे. हिन्दी तर आपल्यासाठी परकी भाषा आहे. >>> हि माहिती माझ्यासाठी नवीन आहे. सर्व मराठी माणसं हिन्दी बोलताना चुकतात?>>> सर्व हा शब्द माझा नाही तरीही माझ्या निरिक्षणा नुसार बरेच वेळा हिंदी बोलताना चुकतात. Milano, हॉटेल बुक, सगळेच ब्लांक झाले, पूर्ण ट्रीप संपे पर्यंत, जरूर शेअर करा, ह्या सर्व शब्दांना मातृभाषेत पर्यायी शब्द आहेत नं?>>> हो आहेत. फक्त ते पटकन आठवले नाहीत मला तरी तुम्हालाही माझा मराठी भाषेचा आग्रह पटला असेल असे वाटते. >>>हो अगदी . इथला प्रत्येक जण कधी न कधी नविन असतोच असतो. आपल्या चुका कोणी दाखविल्या तर त्यात राग कसला? कोणी मुद्दामहून नविन सदस्याला 'छळत' नाही. >>>प्रत्येक जण नवीन असतो हे माहिती आहे मग जुन्या सदस्यांनी नवीन सदस्यांना समजून घ्यावे.त्यांच्या चुका जरूर दाखवाव्यात आणि नवीन सदस्यांनी त्या मान्य करून सुधाराव्या.नवीन सदस्याला छळतात असं मी लिहिले नाही आणि तो माझा उद्देशही नाही.मला कसलाही राग नाही. भाषेबद्दल बोलताना, वरील धाग्यातील लिखित भाषेतील व्याकरणाच्या साध्या साध्या चुका जसे, स्वल्पविराम, पूर्णविरामा नंतरच्या शब्दात एक जागा सोडायला पाहिजे आणि कांही शब्दांची तोडफोड, ही अधोरेखित केली नाहीए नाहीतर हा एक स्वतंत्र लेखच होईल. >>> लिहाच एक लेख किमान भविष्यातील चुका टाळंता येतील :)

In reply to by दिव्यश्री

>>>>माझ्या अल्पमती नुसार.मला काही तुमच्या एवढा अनुभव नाही.मी महाराष्ट्रात पुणे ,नाशिक आणि काही ठराविक गावे /शहरे सोडली तर जास्त फिरले नाही. प्रतिसादामध्ये 'मला कसलाही राग नाही' हे ठळक अक्षरात लिहायचं आणि उपप्रतिसाद मात्र उपहासाने ठासून भरलेले द्यायचा. वा! >>>>प्रभुत्व सोडा हो मी फक्त भाषा व्यवस्थित बोलत यावी असं लिहील आहे. माझंही तेच म्हणणं आहे. 'बोलत' नाही तर 'व्यवस्थित 'बोलता' यावी'. >>>>हि माहिती माझ्यासाठी नवीन आहे. परकेपणाची माझी व्याख्या मी अर्धवटरावांना दिलेल्या प्रतिसादात आहे. >>>सर्व हा शब्द माझा नाही 'सर्वसामान्य पणे मराठी लोक हिंदी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत अस निरिक्षण आहे' आणि 'कांही मराठी माणसं हिन्दी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत असं निरिक्षण आहे' ह्या दोन वाक्यातला फरक कळला तर माझ्या प्रतिसादातल्या माझ्या 'सर्व' ह्या शब्दाचा अर्थ कळेल. >>>>त्यांच्या चुका जरूर दाखवाव्यात आणि नवीन सदस्यांनी त्या मान्य करून सुधाराव्या. तेच तर केलं आहे. बाकी नविन सदस्यांना जुन्यांनी सांगितलेल्या कांही कांही गोष्टी पटत, रुचत नाहीत. समजून घ्यायच्या नसतात नुसताच त्रागा करायचा असतो त्याला कोण काय करणार? >>>>लिहाच एक लेख किमान भविष्यातील चुका टाळंता येतील माझ्या प्रतिसादातील ' स्वल्पविराम, पूर्णविरामानंतरच्या शब्दात एक जागा सोडायला पाहिजे आणि कांही शब्दांची तोडफोड' ह्या अप्रत्यक्ष सुचनेकडेही दुर्लक्ष करुन ह्या तुमच्या वरील प्रतिसादात पुन्हा त्याच चुका दिसतात ह्यावरून तुम्ही शुद्धलेखनाबद्दल किती गंभीर आहात हे दिसतंच आहे. त्यामुळे उगा लेख लिहून वेळ फुकट घालवायची इच्छा नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

चोकोलेट,बिस्किटे,ईस्त्री ,रेडिओ, गेस ,मिक्सर,टोवेल,पेन ,पेन्सिल, बेटरी,वायर पावडर(चेहर्याला लावतो ती ),सिग्नल,ग्लास(काचेचा ),हेअरडाय,नेलकटर ई.ई. रोजच्या वापरातील शब्दांना मातृभाषेत पर्यायी शब्द आहेत का ? आणि असतील तर आपण मराठीच शब्द वापरतो का ? अवांतर मला टो, बे,गे ही अक्षरे लिहिता आली नाहीत क्षमस्व .

In reply to by दिव्यश्री

चॉकलेटचं कसलं भाषांतर करायचंय? हे म्हणजे तुपाला "क्लॅरिफाईड बटर" आणि मोदकाला** "ग्रेटेड कोकोनट डंपलिंग" म्हटल्यासारखं आहे. पुलंच्या लेखनात कुठेतरी "उदजनध्वम" आणि "दंतधावनी" असे शब्द आल्याचं आठवलं :) **खायचा. बाईक चालवायचा नव्हे

In reply to by दिव्यश्री

जे परभाषिक शब्द मराठीत रुळले आहेत, तेही बदला आणि ओढूनताणून बोजड मराठीशब्द बनवा, असा आग्रह मी आजतागायत केला नाही. बोलायला, ऐकायला रुचणारे, अजून विस्मरणात न गेलेले मराठी शब्द वापरा एवढाच आग्रह आहे. जे शब्द दूसर्‍या भाषेतून मराठीत आले आहेत (असे शेकड्यांनी आहेत. फक्त इंग्रजीच नाही तर फारसी, अरबी, उर्दू अनेक भाषातून आलेले आहेत.) आणि आता आपण त्यांना स्विकारले आहे ते सोडून अजून इतर नविन शब्दांना आपले प्रचलित शब्द टाकून देऊन प्रस्थापित करू नका एवढेच सांगणे आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

आशा भोसले वगैरे गायिका अनेक वर्षे राज्य करीत आहेत.
मेरा गला थोडा "बैठ" गया है - आशा भोसले.

मी स्वतः डोंबीवलीतल्या भाजीवाल्याला "भैया एक रुपया का नाना देदो" बाजुला देवान कायमचा क्रिटीक गळ्यात बांधलेला (हो नवराच म्हणतात या प्राण्याला) "हा हा भैया, उसके साथ दादा भी दे दो। अकेला नाना क्या करेगा।" अर्थात त्या दिवशी डीनर पकल नाही.

In reply to by स्पंदना

तुमचे कुणीतरी डोंबिवलीत आहे, ह्याची योग्य ती दखल घेतल्या गेली आहे. आता तुम्ही डोंबिवलीत आलात की, झक्कास कट्टा करु या (कट्टेकरी) मुवि

In reply to by मुक्त विहारि

>>झक्कास कट्टा करु या देवा रे !! कोणाला कशाचं नि मुविंना कट्ट्याचं ;). ह. घ्या. हो.

In reply to by सूड

हे असे कट्टे व्हावेत असे आपल्या सगळ्यांना वाटतेच ना? आता खरे तर ठाणे हे मध्यवर्ती ठिकाण नसून, डोंबिवली आहे, हे एकूण तुमच्या लक्षांत आले असेलच. लवकरच मिपावर एक जाहीरात पण झळकेल. "ज्याचा डोंबिवलीत एक पण नातेवाईक नसेल, तोच खरा डू-आयडी" (एकूण आमच्या डोंबिवलीची जाहीरात करायचा हा क्षीण प्रयत्न वायाच गेला. असे म्हणावे लागत आहे. जाता जाता, धागाकर्त्याने ह्या उपप्रतिसादांकडे जास्त लक्ष देवू नये. हे "सूड" आमच्यावर नेहमीच "आसूड" ओढतात आणि मग आम्ही त्यांच्याबरोबर चहापान वगैरे करून परत मार्गी लागतो.)

In reply to by मुक्त विहारि

आता खरे तर ठाणे हे मध्यवर्ती ठिकाण नसून
णीषेध !!! -------------------------------------------------- जल्मापासुन ठाण्यात राहणारा…. आता पम्याच्या जवळ कळव्यात गेलोय

In reply to by यशोधरा

अकेला नाना क्या करेगा?
हे मस्तच आहे!!! त्या दिवशी नाय जेवण पकलं घरात तरी बेहत्तर, पण आपण तर असा डायव्लाक टाकायला मिळाल्याच्या आनंदात मस्तपैकी उडप्याकडचा इडली-वडा खाल्ला (आणि रुसुबाईला खिलवला) असता!!! :)

मराठी माणसाला हिंदी बोलता येत नाही हा गैर समज आहे , हिंदी मातृ भाषा नसलेल्या भारतीयांच्या मध्ये सर्वात सफाईदार हिंदी माझ्यामते मराठी माणसे बोलतात. दोन महत्त्वाची कारणे दोन्ही भाषा देवनागरीत असल्याने वाचायला सोप्या जातात व मुंबई मध्ये बॉलीवूड असल्याने लहानपणापासून हिंदी सिनेमे , गाणी , डायलॉग ह्यामुळे हिंदी उत्कृष्ट उच्चारांसकट बोलतांना अनेक मराठी माणसांना पहिले आहे. मराठी व हिंदी मध्ये अनेक शब्द समान आहेत , मी शाळेत असतांना चाचा चौधरी , नागराज , सुपर कमांडो ध्रुव , बिल्लू , असे राज व डायमंड कॉमिक्स आवडीने वाचायचो , मुंबईत आजोबांच्या चाळीत मारवाडी व उत्तर भारतीय अल्प संख्यांक असले तरी त्यांच्याशी हिंदीत संवाद साधला जायचा , गिरगावात गुजराती राहत असल्याने अनेक गिरगाव कर उत्कृष्ट गुजराती बोलतात. माझ्या पाहण्यात मुंबईत अनेक मराठी माणसे गुजराती बहुल भागात राहत असतील किंवा कामावर गुजराती जास्त असतील तर उत्कृष्ट गुजराती बोलतात , माझे कॉलेज पंजाबी बहुल लोकांचे होते म्हणून मला मुंबईत पंजाबी सुद्धा समजते पण बोलता येत नाही कारण कॉलेजात संपूर्ण संवाद हिंदीत चालायचा आणि दोन पंजाबी हिंदीतून बोलायचे पण बॉलीवूड चे शौकीन व अट्टल फिल्म बाज माणूस सिनेमे पाहून हिंदी शिकू शकतो , हिंदी हि भारतात मला कोणत्याही भारतीयांशी संवाद साधायला उपयोगी पडते. तेव्हा हिंदी चा आग्रह नाही व मराठी चा दुराग्रह नाही , पण खरच मुंबई व उपनगरात राहणाऱ्या लोकांचे हिंदी एवढे वाईट कसे असू शकते ह्यांचे मला नवल वाटते. बाकी गुजराती लोकांचे हिंदी उच्चार डोक्यात जातात तर बंगाली माणसाचे कानाला गोड वाटतात. खुद पाकिस्तान मध्ये बॉलीवूड मुळे लोक शुद्ध उर्दू सोडून हिंदी बोलायला सुरवात केली आहे ह्याचा उल्लेख मी माझ्या एका लेखात केला होता , माझ्या पाहण्यात अनेक अफगाणी पाकिस्तानात आश्रयास निर्वासित म्हणून काही वर्ष राहिल्याने व येथे बॉलीवूड सिनेमे पाहिल्याने उत्कृष्ट हिंदी बोलतात. माझे आजोबा सेह्गल च्या सिनेमांचे पारायण केल्याने तर बाबांनी राज , दिलीप , देव ह्यांच्या सिनेमांचे पारायण केल्याने उत्कृष्ट हिंदी बोलतात.

संविधान ने 14 सितंबर, 1949 को हिन्दी को भारत की राजभाषा घोषित किया था. भारतीय संविधान के भाग 17 के अध्याय की धारा 343 (1) में यह वर्णित है कि "संघ की राजभाषा हिन्दी और लिपि देवनागरी होगी. संघ के राजकीय प्रयोजनों के लिए प्रयोग होने वाले अंकों का रूप अंतर्राष्ट्रीय होगा. इसके बाद साल 1953 में हिन्दी को हर क्षेत्र में प्रसारित करने के लिये राष्ट्रभाषा प्रचार समिति, वर्धा के अनुरोध पर सन् 1953 से संपूर्ण भारत में 14 सितंबर को प्रतिवर्ष हिन्दी दिवस के रूप में मनाया जाता है.

ठिकाण - डोंबिवली सीएसटी लोकल, ठाणे डोअर वेळ - सकाळी ७.३२ आमचा डोअर कंपू नेहमीप्रमाणे टिंगलटवाळी करत उभा आहे. कोपर स्टेशनला एक तिशीतला (बहुतेक मुंबईच्या गर्दीला नवा असलेला) पोरगा धावत धावत येतो आणि दाराला लटकतो. आमच्या ग्रूपमधले सगळ्यात ज्येष्ठ काका - आरे, कयसा गाडी धरताय तुम? हात सटका तो पडेगा ना धाडकन निचे.. :))

खालील किस्से वाचलेत तर माझ्याशी हिंदी बोलायला बरेच जण घाबरतात. १. उसको तो लगेच शोधा, मेरे कू शोध के दिखा. (इंदूर मध्ये डब्बा-ऐस पैस खेळतांना) २. कोथिंबीर के जूडी कैसा दिया. ३. पानी वाला शहाळा नही चाहिये.थोडा खोबरा भी अंदर होना. ४. ये शेवगा की शेंग कैसा दिया. ५. आज पेरू नही चाहिये.दात निकाला है,उसका बी नही खा सकता.दात मे अडकता है.आज सफरचंद दे दो.

काही वर्षांपूर्वी अशीच कुठेतरी वाचलेली गंमत आठवली.. (इंग्रजी) 'बनाना' = (हिंदी) केला (हिंदी) 'बनाना' = (मराठी) केला (करणे ह्या अर्थी) :)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

ठीक है.... पोहनेको आता है की नवशिक्या है, नवशिक्या है तो साथ मे सुका भोपळा लेके जाव, नही तो बुडेगा.

दिल्लीतील एखाद्या उपहारगृहात जेवताना भातात एखादा बारकासा दगडाचा कण आला-वाढप्याला बोलावून विचारलं "भातमे खडा क्यों?" तर तो यडा म्हणाला "सर मै तो आपके सामने खडा हूँ?"

मी ऐकलेला एक संवाद मुंबईतील बस कंडक्टरशी तिकीटाची साठी बरोबर मोड देण्या बाबत हिंदीत झालेल्या वादात एक मराठी पासिंजर -" तू कौन आया मोठा बाजीराव ?"

In reply to by रमेश आठवले

अरे पण सगळे बस कंडक्टर मराठी च होते ना सेना कृपेनं? दोन मराठी लोक एकमेकांशी हिन्दी में काय्को बाता करते रे?

श्री. शर्मा (नवे साहेब-एक सरकारी हपीस): स्टेशनरी के एक अप्रूवल के लिये मतलब इतनी छोटी बात के लिये आप इतने लाचार क्यू हो जाते हो. श्री. पावसकर: (कोंकण येथे छापून तिथेच प्रसिद्ध केलेले एकजण): हम लाचार नही है. हमारी मान अभिमान से ऊंची है. हम किसीका नही खाते.. इ इ. नावे उदाहरणास्तव.

एकजण दिल्लीहून मुंबईत आला होता. त्याच्याबरोबर इथलाच मुलगा कामासाठी फिरत होता. इथल्या मुलाला फोन आला की तो सांगायचा,' मै अभी घाईमें है| बादमे फोन करेगा|' असे २-४ वेळेला ऐकल्यावर दिल्लीच्या मुलाला नवीन शब्द कळला, की मुंबईत रिक्षाला घाई म्हणतात ! ;) पुढे साधारण वर्षभरात त्याला घाई आणि रिक्षा वेगवेगळे कळायला लागलं. :D

धागा कर्तीला पन्नाशी अपेक्षित असलेला धागा पन्नाशीपार नेवुन शतकाजवळ येण्या मदत केल्याबद्दल सर्वसाक्षी यांचे जाहिर आभार . बाकी आपल्याकडे काय मटेरियल नाय बॉ .

In reply to by जेपी

"बाकी आपल्याकडे काय मटेरियल नाय बॉ ." साहजीकच आहे, लातूरकडे मराठीच चालत असेल. आमच्या कडे अद्द्याप "भय्या रत्नांग्री हापूस आंबाच देव.परवा दिया वैसा मत देव." असेच संभाषण चाललेले असते.

In reply to by जेपी

सर्वसाक्षी यांचे खरचं आभार मानणार आहे शेपरेट :) बाकी आपल्याकडे काय मटेरियल नाय बॉ .>>> अहो तुम्ही या धाग्यावर येउन प्रतिसात दिलात हेच खूप आहे. बाकी शतकी धागे काढण्याचे टिरेनिंग घ्यावे म्हणते.कृपया तर कोणी ट्रेनर असेल तर सांगा ... ;) :D

In reply to by दिव्यश्री

२/४ प्रतिसाद असे यावेत की धाग्याचे सार्थक झाले, असे वाटले पाहिजे. असो, (एसेमेस च्या जमान्यात, बैठकीच्या गाण्याला कोण विचारतो?)

In reply to by जेपी

आँ... किती घाई... (शतकी प्रतिसादकर्ता) जेपी असे वाचावे..... शतकी प्रतिसाद, शंभराव्वा प्रतिसाद दिल्याबद्दल जेपी यांचे हार्दिक अभिनंदन जेपींची एकच नाद, शंभराव्वा प्रतिसाद, नाद नाही करायचा, शंभराव्व्या प्रतिसादावरचा असलेला जेपींचा हक्क राखायचा होवू दे बँड विड्थचा खर्च, मिपा आहे घर्च... (जय हिंद.जय लातूर)

In reply to by मुक्त विहारि

@ मुवी , धन्यवाद मुवी , तुमचा मोजींच्या धाग्यावर पहिला प्रतिसादाचा हक्क कायम आहे आमचा शंभरावा प्रतिसाद देण्यचाा हक्क कायम राहिल आशा करतो . (जय हिंद जय डोबिंवली) जेपी

In reply to by जेपी

काही हरकत नाही.... आगे बढो... हम तुम्हारे साथ हय....

अजून एक जोक मराठी-हिंदी भेळेचा मुलगा (रिक्षावाल्याला): 'खाली'ए का? रिक्षावाला: हो आहे की... मुलगा: अरे वा! मला पण आहे !

धागा वाचकांचे आभार.धाग्यावर मौलिक प्रतिसाद देणार्यांचे आणि धाग्याला चार चांद लावणार्यांचे पेशल आभार. :) प्रतिसाद देऊन या फालतू धाग्याला शतकी धागा करणार्यांना मी इंड्यात आल्यावर स्पेशल पार्टी आज या ठिकाणी जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे याची कृपया नोंद घ्यावी :) खरतर हे मी चेपुवर आधी पोस्ट केल. मग सहज गम्मत म्हणून इथे आदानप्रदान करण्यासठी लिहिले.पण त्याचा मला त्रासच जास्त झाला.काही लोक अगदी माझ्या संस्कारांवर आले मग मी दुखावले गेले पण माझा कोणावरही राग नाही. काही सदस्यांनी मला या आधीच सांगितले होते कि संस्थळावर भावनिक होऊन चालत नाही पण मुळात मी इमोशनल आहे त्यामुळे मला खरच खूप त्रास झाला. कोणाला दुखावणे ,भाषेची टवाळी करणे हा माझा हेतू आजिबातच नव्हता.असो इथून पुढे लिहिताना लाखवेळा विचार करेन. फक्त शुद्ध भाषा बोलली गेली तरच ती जतन होणार आहे का? याचा सगळ्यांनीच विचार करा.आपण रोजच्या भाषेत कितीतरी वेळा हिंदी ,इंग्लिश शब्दांचा आधार घेतो म्हणून आपण भाषेची टवाळी करतो का?फक्त मराठीला कोणी वाली नाही म्हणून काही लोक जर अतीच आग्रह करतात.ते त्यांच्या जागी बरोबरच आहेत.त्यांनी थोडा विचार करावा कि आपल्या बोलण्याने / लिहिण्याने कोणी दुखावले तर जात नाही ना.असे जर झाले मग भागावानही बचाये मराठीको.

In reply to by दिव्यश्री

सुरुवातील इथे सगळेच जण इमोशनल असतात आणि मग ते भावनाप्रधान होतात.मिपाशिवाय त्यांना करमत नाही. रोज मिपाचे नांव काढल्याशिवाय त्यांना खाणे पण पचत नाही. रोज मिपाचा उद्धार तरी करतील नाही तर चार लोकांना जमवून एखाद्या लेखाची दिंडी तरी मिरवतील. असो, भारतात याल तेंव्हा आम्हाला पण विसरू नका.एक २/४ प्रतिसाद आम्ही पण दिले आहेत आणि त्या शंभराव्व्यावा प्रतिसाद देणार्‍याला तर अजिबात विसरू नका. करू एखादा कट्टा तुमच्या आणि तुमच्या पँटवाल्या बरोबर. सूड भाऊ ऐकताय ना?

In reply to by मुक्त विहारि

>>>सुरुवातील इथे सगळेच जण इमोशनल असतात आणि मग ते भावनाप्रधान होतात.मिपाशिवाय त्यांना करमत नाही. रोज मिपाचे नांव काढल्याशिवाय त्यांना खाणे पण पचत नाही. परिस्थिती शिरेस हय. लौकर जाके एक विन्जेक्शन लेके आवो!

In reply to by मुक्त विहारि

आमच प्यांटवालं म्हणत्यात ह्या मि.पा.व्यसन लागलं आहे तुला. ते खरंही आहे काही प्रमाणात. करू एखादा कट्टा तुमच्या आणि तुमच्या पँटवाल्या बरोबर. >>> व्वा जरूर .मला सगळ्यांनाच भेटण्याची खूप उत्सुकता आहे. :) आमच्या प्यांटवाल्यांची आणि तुमची गाठच घालून देणार आहे.तुम्ही शिकवा त्यास्नी काय बाय कराया( तुम्ही खूप छानच करता तुमच्या शिष्याला कितपत जमेल याची शंका आहे )... ;) :D

ऑटोतुन जाताना शेजारी जाताना दाढीवाले एकजण आणी दोन पोलीसवाल्या पोरी बसल्या होत्या . पोरीचीं बहुतेक घरी नेणारी व्हॅन हुकल्याचा त्रागा जाणवत होता . त्या दोघाचां संवाद मला मटेरीयल देऊन गेला .

In reply to by जेपी

दाढिवाले -तुमको क्या कम हे मॅडम एक गेली तो दुसरी आयेगी पोरी-उसका दुख नाही आता खिशे के पैसे देके देके जाव लागेल . मी उत्तरलो अबी अबी एक जगा मराठी लोकाची हिंदी वाच्या इतकी जल्दी प्रचिती आयेगी नय सोचा

गिरते गिरते पड्या

१. सरळ जाके डावीकडे वळो. वहाँ पेहीच ये बिल्डिंग 'गिरेगी'! २. मुझे ठंड बज रही है| ('थंडी वाजणे'चे शब्दशः भाषांतर)