नाय हो, ही वाट किमान २०-२५ वर्षे तरी जुनी आहे!!!!
इथे काही लोकं अशी आहेत ज्यांची मुलं आता लग्नाची झाली आहेत....
तुमच्या अनुभवाबद्दल अनादर दाखवण्याचा हेतू नाही....
पण हे जरा उशीरा आलं असं नाही वाट्त आपल्याला?.....
छोटूली : शिळी बातमी ! ,मीपन ह्याच वाटेने येजा करते पन खरच सांगते मलापन खुप भिती वाटते विमानात मी तर झोपूनच जाते बाबा !
ड्यांबीश भौ :नाय हो, ही वाट किमान २०-२५ वर्षे तरी जुनी आहे!!!!इथे काही लोकं अशी आहेत ज्यांची मुलं आता लग्नाची झाली आहेत....
छोटुली बै .. तुम्हाला भिती वाटते , तुम्ही झोपा झोडता याचा आम्हाला काय फायदा , लेखकाने इथे मस्त लेख लिहून आमची माहीती वाढवली. असे प्रतिसाद टाकून काड्या करनं सोडा ....
डँबिशराव .....आहो तुम्हाला जुणी असली म्हणून काय झालं ? याचा अर्थ कुणी लिहूच नये की काय ? आम्ही २०-२५ वर्ष उशीता जलमलो आणि आजुन अमेरिकेला गेलो नाय ही काय आमची चुक आहे का ? .. घारे साहेब उत्तम नाही .. अतिउत्तम लिहीलं आहे.. फक्त एक खटकलं .. थोडक्यात आटोपलं ... मस्त ष्टाइल आहे .. आजुन लिवा ब्वॉ ...
तुमच्या अनुभवाबद्दल अनादर दाखवण्याचा हेतू नाही....पण हे जरा उशीरा आलं असं नाही वाट्त आपल्याला?.....
आहो काका .. हे म्हणजे थोबाडात मारून लागलं का रे बाळा ? अस विचारण्यासारखं झालं :)
असो .. उत्तम लेख. मला तरी मजा आली वाचताना .. फुडला भाग मोठा लिवा .. यापुर्वी त्याविषयी लिहिलं आहे की नाय याचा इचार न करता
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
डँबिशराव .....आहो तुम्हाला जुणी असली म्हणून काय झालं ? याचा अर्थ कुणी लिहूच नये की काय ?
आम्ही कुठे असं म्हटलं? त्यांच्या अनुभवाबद्दल आमचं काहीच म्हणणं नाहीये.
तुमच्या अनुभवाबद्दल अनादर दाखवण्याचा हेतू नाही.... हे तुम्ही वाचलं असतत तर लक्षात आलं असतं.
आम्ही फक्त हे थीम खूप जुनं आहे असं सांगितलं. त्या विधानाला चॅलेंज करायची तुमची तयारी आहे काय टारझनराव? उद्या मी "पुण्यात मिसळ कुठे मिळते" या विषयावर नवीन धागा सुरु केला तर लोक सांगतीलच ना, "की बाबा, हे जुनं झालंय!"?
आम्ही २०-२५ वर्ष उशीता जलमलो आणि आजुन अमेरिकेला गेलो नाय ही काय आमची चुक आहे का ? ..
आता तुमच्या काय-काय चुका आहेत ते आम्ही काय सांगणार? ते तुम्हालाच माहिती!!
पण माणूस कधी जलमला आणि अमेरिकेला गेला की नाही यात काही चूक वा बरोबर आहे असे मलातरी वाटत नाही.
आहो काका .. हे म्हणजे थोबाडात मारून लागलं का रे बाळा ? अस विचारण्यासारखं झालं
मला तरी मी असं काही केलंय असं वाटलं नाही. बिचार्या घारेसाहेबांच्या थोबाडीत मारायला मी कशाला जाऊ? त्यांची माझी तर साधी ओळखही नाही. टारझनराव, माणसाने तिरक्या नजरेनंच बघायचं असं ठरवलं तर गोष्टी वाकड्या दिसणारच! असो, अपना अपना नजरिया है!
काकाश्री, तुम्ही आदरनिय आहात आम्ही रहाल .. अवमान करण्याचा कुठचाही हेतु नाही ... पण ..
आम्ही फक्त हे थीम खूप जुनं आहे असं सांगितलं.
हो अगदी मान्य आहे , याला माझा विरोध नाहीच ना .. पण आमच्यासाठी नविनच आणि माझ्या मते प्रतिसादांवरून बर्याच जणांसाठी नविन, फक्त एवढंच की असा प्रतिसाद नविन माणसाला पुढे लिहायला प्रवृत्त करत नाही. न जाणो उद्या कोणी हा विचार करून लिहिणारच नाही की .. मी जे लिहीतोय ते कदाचित २०-२५ किंवा १००-२०० वर्षांपुर्वी तर लिहीलेलं नाही ?
त्याला चॅलेंज करायची तुमची तयारी आहे काय टारझनराव?
नाही हो काका, मी पामर काय चॅलेंज करणार तुम्हाला ?
उद्या मी "पुण्यात मिसळ कुठे मिळते" या विषयावर नवीन धागा सुरु केला तर लोक सांगतीलच ना, "की बाबा, हे जुनं झालंय!"?
काय राव तुम्ही बी ? पुण्यात माणूस सहज मिसळ खाउ शकतो ... किंवा त्याला त्याविषयी सहज माहिती मिळू शकते.. पण विमानं अमेरिकेला कोणत्या वाटेनं जातात, किंवा पहिल्यांदाच प्रवास करणारा कोणत्या मनस्थितीत असतो ही माहीती प्रांजळ शब्दांत तितकी सहज उपलब्द असेल असं नाही वाटतं.
माणसाने तिरक्या नजरेनंच बघायचं असं ठरवलं तर गोष्टी वाकड्या दिसणारच!
सहमत आहे ... मी प्रतिसाद वाकड्या नजरेनं पाहिला .. मी आपला क्षमाप्रार्थी आहे. कुठे शब्द कमी जास्त झाला असल्यास कृ माफी करावी
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
एकदा बालगंधर्व नाट्यगृहासमोरून एक माणूस जात असतो .. गंमत म्हणून भविष्य पहावं म्हणतो .. आणि एकाला हात दाखवतो .. भविष्यकार त्याला सांगतो "बच्चा, तु तुझ्या घरातल्या बर्याच लोकांना खांदा देणार आहेस" .. माणूस भडकतो पैसे काही देतच नाही, थोडाच पुढे अजुन एक भविष्यवाला बसलेला असतो. माणूस त्याला हात दाखवतो ... भविष्यवाला म्हणतो " बच्चे , तु बहोत लंबा जियेंगा .. तेरी जिवनरेखा बहोत लंबी है " माणूस खुष होउन त्याला १०० रुपये देउन टाकतो .
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
पिडाकाकांचं म्हणणं योग्य वाटतंय, २०-२५ वर्षांपूर्वीचं मला माहित नाही, पण गेल्या दहा वर्षांतलं तरी जरूर!
आणि पुन्हा विमानाचे रूट्स ठरवताना दोन मुद्दे विचारात घेतातः
१. जमीनीपासून फार लांब जायचं नाही.
२. नॉन-युक्लिडीयन भूमीतीप्रमाणे लार्ज सर्कल्स हा सगळ्यात छोटा रस्ता असतो.
नकाशात मुंबई आणि न्यूयॉर्कला जोडणारी सरळ रेषा काढली तर ती अरबस्तान आणि उतर आफ्रिकेतल्या सहाराच्या वाळवंटावरून जाते. त्यामुळे आपले विमानही कदाचित युरोपला बाजूला ठेऊन सरळ आफ्रिकेवेरून अमेरिकेला जाईल असे वाटले.
त्यामुळे मला नाही वाटत तुम्ही जो सगळ्यात छोटा रस्ता सांगितला आहे तो सगळ्यात छोटा असेलच.
अदिती
युक्लिड किंवा त्याची बायको (नॉन युक्लिड) ह्यांविषयी मला माहिती नाही, पण जिथे सर्वात कमी इंधन लागते, तो सर्वात छोटा रस्ता !
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
वरच्या माझ्या प्रतिसादात सुधारणा:
लार्ज सर्कल नाही, ग्रेट सर्कल्स!
युक्लिड किंवा त्याची बायको (नॉन युक्लिड) ह्यांविषयी मला माहिती नाही, पण जिथे सर्वात कमी इंधन लागते, तो सर्वात छोटा रस्ता !
:-D
मलाही त्या दोघांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल माहिती नाही, पण ग्रेट सर्कल्सवरून गेलं तर सर्वात कमी इंधन लागेल. यात एक गृहितक आहे की पृथ्वीवर वातावरण नाही.
>> पृथ्वी अगदी अचूक गोलाकार आहे.
त्याने काही फरक पडतो का? सॉलिड / नॉन युक्लीडीयन जॉमेट्री फक्त नियमित गोल वस्तूंसाठीच नाही, सगळ्याच त्रिमितीय वस्तूंसाठी असते.
अर्थात नियमित गोलापेक्षा थोडा फरक पडेल ग्रेट सर्कल्स आखताना. पण तो किती पडेल, म्हणजे युक्लिडीयन भूमितीशी तुलना केली तर नगण्यच असेल, पण असेल.
अदिती
"फरक पडतो "हे आपणच सांगितले हे बरे झाले. सॉलिड / नॉन युक्लीडीयन जॉमेट्री जरी सगळ्याच त्रिमितीय वस्तूंसाठी असते (हे आजकाल जवळजवळ प्रत्येकालाच ठाऊक असते) तरी गोलाबद्दल बोलताना "नियमीत गोल" हे गृहितक मांडावेच लागेल असे वाटते.
अजून एक लक्षात घ्यायचा घटक म्हणजे पृथ्वीचे परिवलन. त्या इफेक्टचे नाव विसरलो, पण जर उत्तर गोलार्धात विमानाने सरळ रेषेत जायचा प्रयत्न जरी केला (आता घनाकृतीवर सरळ रेषा अस्तित्वात नसल्याने, वक्रतेचा परिणाम टाळण्यासाठी कमी अंतर पकडून चालू. उदा. मुंबई-अहमदाबाद), तरी ते नियोजित लक्ष्याच्या काही किमी उजवीकडे जाईल. दक्षिण गोलार्धात त्याच्या उलट.
छान लेख लिहीलाय. आपल्याला तर आवडला बुवा.
>>एक नवी वाट पाहिल्याचा बोनस मिळाला.
२०-२५ वर्ष जुनी वाट , शिळी बातमी वगैरे वर काहिंनी म्हटले असले तरी तुम्ही पहिल्यांदाच अमेरिकेला येत असल्याने (बरोबर ना?) तुम्हाला हे सर्व नवंच वाटणार. तुमचा अनुभव तुम्ही छान मांडलात. येउ देत अजून.
मिष्टर घारे...
तुमचा लेख आवडला. तुम्ही लिहिलाय पण छान. आणि माहिती जुनी असली तरी तुमच्या करता तर ती नविन होती ना? झालं तर मग... ;) असेच लिहित जा.
बिपिन.
लिखते रहो !!! :)
तालिबान्याच्या तोफेचा गोळा तर तिथपर्यंत चुकून येणार नाही ना याची काळजी वाटली. पण रमजानच्या महिन्यात रात्रीचा इफ्तार खाऊन ते सारे गाढ झोपी गेलेले असणार!
हा हा हा हा मस्त !!! :)
वा! अगदी थोडक्यात पण प्रांजळपणे मांडलेत..
मलाही विमान असे जाते हे माहित नव्हते.. जेव्हा मी पहिल्यांदा उडालो तेव्हा मलाही हा काहिसा अनपेक्षित मार्ग होता.
नंतर विचार केल्यावर .. काहि वाचल्यावर समजलं हा सर्वात जवळचा मार्ग कसा
बाकी, 'झेपावे उत्तरेकडे' ही शब्दरचना , झोपलेले तालीबानी वगैरे सह्ही ;)
लिहित रहा!! आम्ही वाचतो आहोतच !
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
लेख आवडला, तुमची शोधक नजरही.
जयंत नारळीकरांच्या आकाशाशी जडले नाते मध्ये ही असा उल्लेख आला होता की त्यानां
न्यूयॉर्कला जाताना की (येताना ते आठ्वत नाही)मावळलेला सुर्य परत उगवताना ( उलटा) दिसला होता.
बाकी नंदन यांच्या प्रतिसादा मधले पृथ्वीचे परिवलनाचे विमानाच्या मार्गावर होणर्या परिणामा बद्द्ल समजले नाही.(माझ्या समजुती प्रमाणे काही फरक पडला नाही पाहीजे).
---आनंद
न्यू यॉर्कमधे मनापासून स्वागत :)
इस्ट कोस्टला (खरंतर 'इष्ट कोस्ट' ला) बरेच मिपाकर आहेत. काहीही मदत लागल्यास जरूर कळवा.
(मदत नको असली तरी ओळख होणं चांगलंच असतं की :) )
माझ्या अज्ञानावर झालेली चर्चा वाचून काकाजींच्या शब्दात 'मजा आला'. आपली धरती वाटोळी असल्यामुळे सपाट नकाशावर दिसणारी अंतरे प्रमाणबद्ध नसतात एवढे सामान्यज्ञान माझ्याकडे होते. माझ्याकडे ग्लोब नसल्याने दोन ठिकाणांमधले अंतर सुतळीने मोजण्याचा प्रयोग मी कधी केला नाही. तरीही मुंबई व न्यूयॉर्क या दोन शहरांमधले अंतर अक्षांशांच्या बाजूने मोजण्यापेक्षा रेखांशांच्या बाजूने मोजले तर कदाचित कमी भरेल असे उगाचच वाटत होते. नंदन यांनी सांगितलेला इफेक्ट विमानाच्या उड्डाणाला उपकारक आहे की अपकारक आहे ते अजूनही समजलेले नाही. कदाचित एका दिशेने तो मदत करीत असेल आणि उलट दिशेने जातांना विरोध. दोन ठिकाणांमधले कमीत कमी अंतर कसे मोजायचे याचे तन्त्र निदान शंभर वर्षांपूर्वी विकसित झाले असावे. माझ्या समजुतीप्रमाणे उत्तरमार्गाने जाण्यात दोन तान्त्रिक अडचणी होत्या. अशा उड्डाणाला रशियाकडून अनुमति मिळणे आणि सलग सोळा सतरा तास उडण्यसाठी आवश्यक एवढा इंधनाचा साठा बरोबर नेता येणे. यांवर मात करून थेट उड्डाणे नेमकी कधी सुरू झाली ते मला समजले नाही.
बारा वर्षांपूर्वी एकदा मला कॅनडाला जाण्याची संधी मिळाली होती, तेंव्हा ऑफीसतर्फे माझे तिकीट लंडनमार्गेच निघाले होते आणि अकौंट्स डिपार्टमेन्टतर्फे माझा टीए क्लेम पास झाला. त्याअर्थी त्यांनासुध्दा सर्वात जवळच्या मार्गाची माहिती नसावी.
ज्या वाचकांनी प्रोत्साहन देणार्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांचे आभार. मजकुराचा शिळेपणा ज्यांनी नजरेला आणून दिला त्यांचेही आभार.
प्रतिक्रिया
नवी?
छोटूली :
गैरसमज!
काकाश्री,
माफी मागणे जरूर नाही!
असंच सुचलं एक ...
पिडाकाकां
भूमिती
वरच्या
गृहितक?
त्रिमितीय
"फरक पडतो
अजून एक
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अमेरिकेचि नवी वाट
शिळी बातमी !
छान लेख
मिष्टर
+१
सहमत ----- वाह
+१
सहमत !!!
नवीन माहिती
सहमत
थोडक्यात महत्त्वाचे
लेख आवडला
कॉरिऑलिस इफेक्ट
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
छान..
बाकी सगळं सोडा आनंदराव
चर्चा
छान आहे