आरोग्यवर्धक पाकक्रुती... भाग १ ... खजूराच्या वड्या....
आधीच सांगून ठेवत आहे.
१. हा पदार्थ आपापल्या कुवतीनुसार खावा.
२. तसा हा साखरयुक्त पदार्थ असल्याने, ज्यांना मधूमेह आहे, त्यांनी वैद्यकीय सल्ल्याने घ्यावा.
३. माझी फोटोग्राफी कशी आहे, हे आता वेगळे सांगायला नकोच.
४. मी अद्याप इथे फोटो चढवण्यात कुशल झालेलो नाही.जसे जमले तसे चढवले.कुणाला टोचल्यास मंडळ जबाबदार नाही. कुणालाच न टोचल्यास आम्ही आभारी आहोत.
५. भरपूर व्यायाम केल्याशिवाय ह्या पदार्थाच्या वाट्याला जावू नये.पण खूप थकवा जाणवत असेल तर नक्की खा.
६. संपादकांना नम्र विनंती, की माझ्या कडून काही लेखनाच्या चुका झाल्या असल्यास सुधारून देणे.तसदीबद्दल क्षमस्व.
आधीच सूचना देवून टाकल्या आहेत.तरीही पुढे वाचत असाल तर खरे मिपाकर..आणि ते पण नाखट..
===========================================================================
मध्यंतरी एका ताईला आरोग्यवर्धक (मिंग्लीश मध्ये "डायेट रेसीपी") पाकक्रुती हव्या होत्या.तसे मुळातच मी वजन राखून आहे.वजन आणि उंची समप्रमाणात आहेत का? हे तर दर ३ महिन्यांनी बघतोच पण शिवाय पोटाचा घेर पण जास्त वाढत नाही आहे ना? इकडे पण लक्ष देत असतो.जरा जास्त झाला की, गिरीभ्रमाणास जातो.भरपूर खातो आणि मनसोक्त भटकतो.पण कसे कुणास ठावूक, गिरीभ्रमण केले की जरा पोटाचा घेर कमी होतो.
आता अशा ठिकाणी जातांना कमीत कमी वजनांत जास्तीत जास्त उर्जा देणारे पदार्थ नेलेले उत्तम.मग कधी पाकातले चिरोटे,तर कधी डिंकाचे लाडू किंवा मग मेथीचे लाडू नेले की , भूक पण भागते आणि एक चार लोक जरा कौतूक पण करतात.आपल्या पदार्थांना कुणीतरी नावाजावे अशी इच्छा प्रत्येक बल्लवाची आणि सुग्रणीची असतेच असते.
असो. तर ह्या ताईंना नक्की कुठल्या कारणामुळे ही आरोग्यवर्धक पाकक्रुती हवी होती ते त्यांनी स्पष्ट न सांगीतल्यामुळे मी गिरीभ्रमण करणार्या लोकांसाठी किंवा जे व्यायाम करतात, त्या लोकांसाठी पा.क्रु. देत आहे.
मिपाच्या (अलिखित) धोरणाप्रमाणे पा.क्रु.ला लगेच सुरुवात केलेली नाही.जाणकारांच्या हे लक्षांत आले असेलच आणि नविन सभासदांनी योग्य ती दखल घेतली असेलच.
तर आता साहित्य.....
१. २ वाट्या खजूर (अर्थात बिया काढून.बायको मालिका बघत बसली की, मी बसल्या बसल्या तिच्याकडून वाल, लसूण सोलून घेतो.खजूराच्या बिया पण तिनेच काढून दिल्या.मालिकांचा असा पण उपयोग होतो.)
२. दोन वाट्या ओल्या नारळाचा कीस (दर शनिवारी हा कीस मी करून ठेवतो.हे आमचे आवडते काम आहे.एकदा हा कीस काढला की, आमची बायको आमच्या डोक्याला जास्त त्रास देत नाही.)
३. अंदाजे अर्धा कप दूध (दुधात किती पाणी आहे, त्या प्रमाणात कमी जास्त करणे.)
४. भरपूर बदाम (बदाम नसतील तर शेंगदाणे वापरलेत तरी चालेल.चवीत खूप मोठा फरक पडत नाही आणि प्रथिनांमध्ये पण खूप फरक पडत नाही.)
५. साखर (मला हिचे प्रमाण देता येत नाही.कारण मी नेहमीच अंदाजे साखर टाकतो आणि कसे कुणास ठावूक पण ती नेहमीच प्रमाणात असते.तरी पण साधारण पावणे २ वाट्या असाव्यात.खजूरात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने, खोबर्याच्या वडी करतांना मी जे साखरेचे प्रमाण घेतो, त्यापेक्षा थोडी कमी साखर घेतली होती.)
६. पिठीसाखर (जास्त करून ठेवा, कारण क्रुतीच्या वेळीस समजेलच)
७. साय (आता बायकोच्या तावडीतून हा पदार्थ कसा काढायचा, ते तुमचे तुम्ही ठरवा.हा पदार्थ देतांना जाम किटकिट करते आमची बायको.)
८. तूप (ताटाला लावायला.हा बायकोच्या समोर १ चमचा आणि तिच्या नकळत १ चमचा घेतला.आता बिंधास्त लिहीत आहे.कारण समजेलच.)
आता क्रुती.
सर्वप्रथम,बायको आसपास आहे का? हे बघून घेणे.ती घरात असावी पण स्वैपाकघरात नसावी.(खूलासा योग्य वेळ येताच करण्यात येईल.)
१. बदामाचे तुकडे करून घेणे.ते साहित्याच्या फोटोत आधीच दिले आहेत.
२. मिक्सरच्या भांड्यात थोडे दूध घालून मग त्यात खजुर आणि बदामाचे तुकडे घालून मिक्सर मधून फिरवणे.साधार्ण पेस्ट तयार होते.खालील फोटो बघा.
३. मंद आचेवर कढई तापायला ठेवणे.
४. एकीकडे ताटाला तूप लावून ठेवणे.
५, कढई थोडी तापली की नारळाचा कीस आणि साखर घालून गॅस थोडा मोठा करणे आणि एक ३/४ मिनिटे त्यांना ढवळत बसणे.साखर थोडी विरघळायला लागली की,
६. खजूर आणि बदामाचे आपण जे काही पेस्ट रुपी बनवले असेल ते घालणे.साय पण आत्ताच घालून घ्या.खालील फोटो बघा.
७. आता गॅस नध्यम आंचेवर ठेवा आणि मनसोक्त ढवळत बसा.कुठपर्यंत तर आपला चमचा त्या सारणात उभा राही पर्यंत.इकडे मस्त वास सुटायला लागला असेलच आणि बायको जवळ येवून उभी राहिली असेलच.
खाली फोटो देत आहे.
(प्रत्येक वड्यांच्या पा.क्रु.ची वेगवेगळी खासीयत असते, अगदी शास्त्रच म्हणाना.आल्याच्या वड्या होत आल्या, हे कसे ओळखायचे? तर कढईच्या आतील भागा भोवती साखर जमा व्हायला लागली की.तसेच ह्या वड्यांसाठी सारण तयार होत आले, हे ओळखायचे कसे? तर.... तर....)
८. आता गॅस मंद करा आणि जेमतेम १/२ मिनीटे अज्जुन परता आणि गॅस बंद करा.
९. परतलेला गोळा ताटावर घ्या.
१०. त्यावर पिठीसाखर ओता. जास्त ओतलीत तरी चालेल पण कमी नको.खाली फोटो देत आहे.
११. आता हा गोळा थापटण्या इतपत तापमानाला आला की, पिठीसाखरेसकट थापून घ्या.(इथे मी माझ्या बायकोची मदत घेतो.आम्ही शीतपेय पिणारे असल्याने चटके सहन होत नाहीत.)
१२. थोडा गरम असतांनाच वड्या पाडून घ्या.खाली फोटो देत आहे.
ह्या वड्या केल्या आणि बायकोला दिल्या.
"माझ्या सायीचे आणि तुपाचे सार्थक झाले", असे ती म्हणाली.ह्यापेक्षा अधिक उत्तम प्रतिसाद बायकोकडून मी अजिबात अपेक्षित करत नाही....
वाचने
30764
वाचनखूण
प्रतिक्रिया
54
वा
पाकृ चांगली वाटली. वड्या अजून
In reply to पाकृ चांगली वाटली. वड्या अजून by सूड
वड्या अजून बर्यापैकी चौकोनी करायला वाव आहे.....
साखरेच्या मखरातली पाकक्रुती!
अतिशय मोलाची माहिती
उत्तम पाककृती
वा... पाकॄ अगदी झकास लिहली
अस्सल...
In reply to अस्सल... by वाटाड्या...
बायको किचेनमधे नाही असं का बघायचं?
मिक्सरचे भांडे
In reply to मिक्सरचे भांडे by स्पंदना
तुपाला पण विसरू नका....
In reply to तुपाला पण विसरू नका.... by मुक्त विहारि
आवडल .
In reply to आवडल . by जेपी
+ + १
In reply to + + १ by दिव्यश्री
प्यांटवाले हा शब्दप्र्योग
In reply to प्यांटवाले हा शब्दप्र्योग by आनन्दिता
:D
सहि दिसत आहेत वड्या
In reply to सहि दिसत आहेत वड्या by दिपक.कुवेत
तुम्हि प्रत्यक्षात "किस" काढता हे बघुन डोळे प्वाणावलेत!
In reply to तुम्हि प्रत्यक्षात "किस" काढता हे बघुन डोळे प्वाणावलेत! by मुक्त विहारि
सुक्या खोबर्याचा तो 'कीस'
In reply to सहि दिसत आहेत वड्या by दिपक.कुवेत
मला समुद्र फारसा आवडत नाही
:)
हैशा!
पाकृ एकदम हलकी फुलकी (लिहिली)
In reply to पाकृ एकदम हलकी फुलकी (लिहिली) by गणपा
तुमचा साखरेचा 'अंदाज' पाहुनच एखादा मधुमेही कोमात जायचा बिचारा.
मस्त पाकृ... आम्हाला हे काही
लेक खुसशीत
छान पाककृती
वा! मस्त पाकृ!
In reply to वा! मस्त पाकृ! by अनन्न्या
कट्टा वृत्तांत वाचून होणारी जळजळ या वड्यांनी कमी होईल का हो?
सानिकास्वप्निल, गणपा इत्यादी
In reply to सानिकास्वप्निल, गणपा इत्यादी by हसरी
हा मुविंच्या फोटोग्राफीवर
In reply to हा मुविंच्या फोटोग्राफीवर by आदूबाळ
आल्याच्या वड्यांची पाकृ पण टाका ना.
In reply to आल्याच्या वड्यांची पाकृ पण टाका ना. by मुक्त विहारि
शेवटच्या पायरीचं राहूद्या,
In reply to शेवटच्या पायरीचं राहूद्या, by आदूबाळ
ओके
In reply to सानिकास्वप्निल, गणपा इत्यादी by हसरी
"फोटो कला" मला अजिबात येत नाही.
पिठीसाखर वरुन का घातलि? जास्त
In reply to पिठीसाखर वरुन का घातलि? जास्त by सोनल परब
ह्या वड्या थोड्या ओलसर होतात.
In reply to ह्या वड्या थोड्या ओलसर होतात. by मुक्त विहारि
रोजचे १०/१२ कि.मी. मग मुवि हे
रोजचे १०/१२ कि.मी.मग मुवि हे तुमच्या "आयडिचे नाव" लैच सार्थ आहे हे म्हणावंच लागेल :)मस्त पाकृ पण,
In reply to मस्त पाकृ पण, by यशोधरा
वैनींनाच डबल काम पडले असणार!
In reply to वैनींनाच डबल काम पडले असणार! by मुक्त विहारि
हायला माझा परतिसाद गायब ????
मुवींना फोटोवरुन टोला !!!!!!!
In reply to मुवींना फोटोवरुन टोला !!!!!!! by जेपी
मुवींना फोटोवरुन टोला !!!!!!!
In reply to मुवींना फोटोवरुन टोला !!!!!!! by मुक्त विहारि
बरोबर करतात!
In reply to बरोबर करतात! by प्यारे१
बरोबर करतात!
In reply to बरोबर करतात! by मुक्त विहारि
@शिपडो...और मीठ शिंपडो हमारे
>>>>>आम्ही शीतपेय पिणारे
@ प्रशांत आवले उर्फ प्यारे१
ए शाब्बश!
In reply to ए शाब्बश! by प्रमोद देर्देकर
येऊ दे काय येणारच, भाग १ आहे
In reply to येऊ दे काय येणारच, भाग १ आहे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
किती भागांची मालिका आहे हो मुविकाका?
मिपाची सहनशक्ती चांगली आणी
, सुंदर वड्या झाल्या आहेत
मस्तच...... आवडल्या वड्या
हे कायतर स्थानिक झालंं.