नळ आणि सुंदरी
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नळावरच्या लायनीत काल जावच लागलं
पुरषासारखा पुरुष असुन ..
त्या बायांच्या राज्यात आंग चोरुन उभ रहावच लागलं
वहीनी आमची चवथ्यांदा पोटुशी र्हाली
तीचं करुन करुन माय कमरंत वाकली
आज मग बाबुला उदबत्या विकाया धाडलं
आन माझ नशीब ह्या नळावरच आडलं
इतक्यात ती समोरुन जणू तरंगत आली...
मला थितं उभं पाहुन डोळ्यातुन हासली
तिचा लंबर आज माझ्या मागंच लागला होता
आन हा आजुबाजुचा ग्वोंगाट मला मुजिक वाटु लागला होता..
सावत्याच्या म्हातारीच आन शेजारच्या काकींच चांगलच जुंपलं होत...
हितं मात्र माझ आन तीचं एवाना बरोब्बर जुळलं व्हतं...
पयल्यांदाच हा नळ मला गंगे सारखा वाटला होता..
काठावरचा चाळीचा शीन स्वर्गावानी नटला होता..
हा हा म्हणता दोन तास दोन मिनीटात उडाले
शेवटी माझ्याशी बोलण्यासाठी तिने ओठ उघडले..
"नंबर तुझा आहे.. पण मला भरु देशील का पाणी?"
निसत्या आवाजानचं माझ्या मनात नाचु लागली गाणी..
येड्यासारखा मग मी नुसताच लाजलो
हसत हसत तिच्या मागे उभ र्हायलो
घागर भरुन होताच घरी लागली जाउ
च्यायला जाता जाता म्हणली..."धन्यवाद भाऊ !!! "
-ऋषिकेश
(२१ मे २००७)
*******
मि.पा. वर पहिल्यांदाच काही प्रकाशित करतोय. तेव्हा चुका सांभाळून घेणे
वाचने
7578
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
दमयंती
हा हा हा.
झ्याक कविता...:)
In reply to झ्याक कविता...:) by विसोबा खेचर
धन्यवाद
लई झाक भाऊ,
वा!
छान आहे
मस्त!
धम्माल.
छान