एम अँड दी बिग हूम
लेखनविषय (Tags)
ही आहे एक इंग्रजी कादंबरी.
लेखनाचा ढाचा कादंबरीचा आहे म्हणून कादंबरी म्हणायची. नाही तर हे लेखकाचं आत्मचरीत्र तर नव्हे अशी शंका यावी ईतकं प्रत्ययकारी लेखन आहे हे.
५० किंवा ६० च्या दशकात मुंबईच्या माहीम भागात वन बिएचके फ्लॅटमध्ये राहणार्या एका ख्रिश्चन चौकोनी कुटुंबाची ही गोष्ट.
कादंबरीच्या निनावी निवेदकाने सांगितलेली आपल्या मुळच्या गोव्याच्या कॅथॉलिक कुटुंबाची गोष्ट, ज्यामध्ये तो त्याची आई एम, त्याचे बाबा ज्यांना तो "बिग हूम" म्हणतो आणि त्याची मोठी बहिण सुझान यांच्याबद्दल सांगतो.
खरं तर ही निवेदकाच्या आईची, एमचीच गोष्ट आहे. ईतर पात्रे तिच्या अवतीभोवती फीरतात. नव्हे, त्यांना फीरावं लागतं.
सतत विडी ओढणार्या, चहा पिणार्या एमला निवेदकाच्या जन्मानंतर नैराश्य येते, ज्याला ती "कुणीतरी नळ सोडला" म्हणते. या नैराश्याचे रुपांतर हळूहळू द्विधृव व्यक्तीमत्व विकृतीमध्ये (बायपोलार पर्सनॅलिटी डिसऑर्डर) होते.
द्विधृव व्यक्तीमत्व विकृती ही मानसशात्रीय संज्ञा आहे. इंग्रजीत समजेल अशा शब्दांत सांगायचं तर मुड स्विंग्ज. या विकृतीने ग्रासलेला माणूस कधी खुप उत्साही, प्रफुल्लित असतो तर कधी तिव्र निराशेच्या गर्तेत जातो. बेबंद वागतो.
एमचंही असंच असतं. जेव्हा ती उत्साहीत असते तेव्हा ती तिच्या मुलांना जीवनविषयक तत्वज्ञान शिकवत असते, मानवी शरीरसंबंधांबद्दल मोकळ्या-ढाकळ्या शब्दांत बोलत असते. मात्र जेव्हा निराशा तिला घेरते तेव्हा ती इतकी टोकाला जाते की मनगटावरची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागते.
एमचं हे असं असणं सार्या घराने स्विकारलेलं असतं. मात्र निवेदक जसा जसा मोठा होऊ लागतो तशी तशी "आपण आईपर्यंत पोहचू शकत नाही." ही जाणिव तिव्र होऊ लागते. तो अधिक अधिक आईला, तिच्या बदलणार्या अनाकलनीय वागण्याला समजून घेण्याचा प्रयत्न करु लागतो.
हा शोध चालू असतानाच निवेदकाच्या हाती आईची डायरी लागते, ज्यामध्ये तिच्या अगदी शाळेच्या दिवसांपंसूनच्या नोंदी असतात.
या नोंदींची आईशीच चर्चा करत तो आईचं व्यक्तिमत्व उलगडू लागतो.
या डायरीमधील नोंदींतून निवेदक इमेल्डा अर्थात त्याची आई एम आणि त्याचे बाबा ऑगस्टीन ज्यांना सुझान आणि त्याने त्यांच्या बरेच वेळा पुर्ण उत्तर न देता केवळ "हूम" म्हणण्याच्या सवयीमुळे "बिग हूम" असे नाव ठेवलेले असते त्या दोघांची प्रेम कहाणी सांगत जातो.
शाळा संपल्यानंतर कॉलेजचं शिक्षण परवडू शकत नसल्यामुळे आधी शिक्षिकेची नोकरी करुन नंतर एका इंजिनीयरींग गुड्स कंपनीत स्टेनोग्राफर म्हणून लागलेल्या ईमेल्डाची ऑगस्टीन नावाच्या एका तरुण मॅनेजरशी ओळख होते. ओळखीचे रुपांतर प्रेमात होते. जवळपास बारा वर्षे प्रणयाराधन केल्यानंतर ते लग्न करतात.
अशी काहीशी ही प्रेमकहाणी.
त्यानंतर सुझानचा जन्म. सुझानच्या जन्मानंतरचा निवेदकाचा जन्म. आणि त्यानंतर "त्यांनी" हळूहळू ईमेल्डाला घाबरवणं.
एमची ही अवस्था मुलांनी आणि बिग हूमने स्विकारुन एमला समजून, सांभाळून घेणं, या सार्या प्रवासाची ओघवत्या भाषेत मांडणी म्हणजे "एम अँड दी बिग हूम".
घरात कुणी मानसिक विकृतीने ग्रस्त असेल तर सारे घर त्या व्यक्ती भोवती, त्या मानसिक व्याधीभोवती फिरु लागते. मात्र या गोष्टीचा बाऊ न करता परिस्थितीचा स्विकार करुन, त्या व्यक्तीला समजून, सांभाळून घेत, तिला पुरेसा आधार देत आपली आयुष्ये कशी जगावीत याचं सुंदर चित्रण या कादंबरीत आहे.
एम अँड दी बिग हूम
पृष्ठ संख्या: २३५
प्रकाशकः अलेफ बुक कंपनी
फ्लिपकार्टवरील सध्याची किंमत : रु २२१ + टपालखर्च रु. ४०
लेखकाचे संकेतस्थळः जेरी पिंटो डॉट कॉम
गुड रीड्स डॉट कॉम रीव्ह्यू
प्रतिक्रिया
आपली वाचनाची आवड सॉलीड आहे!
विशेषतः फाट्यावर मारले गेल्यावर
@मानसशास्त्र प्रत्यक्ष मानवी
होय. शास्त्राचा (विज्ञानाच) पहिला नियम पुरावा हा आहे.
मानसशास्त्रात अभ्यासले काय जाते ..?
एका वेगळ्या पुस्तकाची छान ओळख
मराठी अनुवाद मिळेल का कुठे ?
शक्यता कमी आहे. कुठे आढळल्यास
रोचक पुस्तक दिसतंय!!
अल्बर्ट कामू चे " द आउटसायडर"
सगळे समज गैरसमज जमिनीवर येतील
स्वतःबद्दलचे समज अन गैरसमज.
धन्यवाद !
छान परिचय रे धन्या.
पुस्तकाची ओळख आवडली...
सुरेख ओळख.
उत्सुकता चाळवली गेली आहे.
धन्या, उधार उसनवारीवर मिळेल
सुरेख ओळख