Skip to main content

अचानक कट्टा करू या का?

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 09/02/2014 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच मिळालेल्या बातमी नुसार ठिकाण : सी.के.पी. हॉल, ठाणे वेळ : सगळ्यांच्या विचारांती नक्की करू या. कशासाठी : सीकेपी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी तारीख : १६ फेब्रुवारी. मला १५ पण चालेल.तसेही १५ ता. मी ठाण्यातच आहे.पण दर कट्टा शनिवारीच कशाला? असा योग्य आक्षेप कुणी घेवू नये म्हणून. बाकी... दत्तगुरूंचे दर्शन घ्यावे ते गुरुवारी आणि मासे खावेत ते रविवारी सकाळीच असे माझे मत आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7423
प्रतिक्रिया 52

प्रतिक्रिया

आत्ताच मिळालेल्या बातमी नुसार>>>> बातमी कोणाकडुन मिळाली? सोर्स काय आहे? ठिकाण : सी.के.पी. हॉल, ठाणे तारीख : १६ फेब्रुवारी. वार : जर, २०१४ असेल तर, रविवार. मला १५ पण चालेल.>>>> म्हणजे १५ किंवा/आणि १६. १५ आणि १६ ला सी.के.पी. हॉल, ठाणे येथे काही खादाडी समारंभ (फुड फेस्टिवल) आहे का? (हा माझा प्रश्न) मासे खावेत ते रविवारी सकाळीच>>>>> म्हणजे अचानक कट्टा आणि तोही रविवारी सकाळी??? सर्वात महत्वाचे ---- कट्टा (धाग्याकर्त्याकडुन) प्रायोजित आहे का? मुक्त विहारि, संपादक मंडळ, मिपाकर, सगळ्यांनी कृपया हलकेच घ्या हो. संपादक मंडळ, अनावश्यक मजकुर/संपुर्ण प्रतिसाद अवश्य वगळावा/ऊडवावा ही नम्र विनंती.

In reply to by भाते

हो.. हा फूड फेस्टिवल आहे. आणि प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे. सध्या आमचा खिसा थोडा हलका झाला आहे.

In reply to by मुक्त विहारि

मुवि ना "कट्टा रत्न" हा पुरस्कार दिला तर .......? तर कोंण कोण राग येऊन मायबोलीत ( महायुती ? ) त जातील ?

.

नकळत कट्टे ठरले मुविकाका फॉर्मात आले मी किती कट्ट्यांना मुकतोय हे माझ्याच कसे लक्षात नाही आले? पुणेकरांना मुंबैत येणे, कधीतरीच जमत आहे मुंबैत कमी श्रमात जमते, हीच खरी गंमत आहे कट्ट्याचा पूर्वार्ध वाटेल, थोडंसंच जमलम उत्तरार्धात कळेल, रंग मस्त भरलम यदाकदाचित माझ्या कट्ट्याला तू म्हणशील ई ई ई... तरी मी कट्टा करून तुला असा हसेनः "ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!"

In reply to by बॅटमॅन

पण..... तुम्हाला तुमच्या गोथॅम शहरातून बाहेर यायला वेळ मिळेल तर ना? हे, असे कट्टे करता यावेत म्हणून तर आम्ही आमचे सगळे पाश सोडून दिले आणि ते बायकोच्या स्वाधीन केले.ती बसली आहे आमच्या अर्थाला सांभाळत आणि आम्ही जगण्यातला खर्‍याखूर्‍या अर्थाचा उपभोग घ्यायला मोकळे झालो. (आणि तसेही, आजकाल आमच्या कडे एक हक्काचा मिपाकर आहे म्हटले.) ह.घ्या. आणि माझ्या धाग्यावर धांगडधिंगा करायला तुम्हाला पुर्ण मोकळीक आहे.....हेवेसांनल.... (बॅटमॅन फॅन) मुवि

In reply to by सुहास..

तु भेट रे एकदा बॅट्या !! *)
या बॅट्याला लेकाला एकदा भेटायचंच आहे... हा नवा असला तरी आपल्या ग्रूपमध्ये फिट्ट बसेल असं वाटतंय... कुठे असतोस रे तू बॅटमॅना? :)

In reply to by पिवळा डांबिस

या बॅट्याला लेकाला एकदा भेटायचंच आहे... हा नवा असला तरी आपल्या ग्रूपमध्ये फिट्ट बसेल असं वाटतंय...
येस्सार!!! पिडांकाकांनाही भेटायची इच्छा आहेच!
कुठे असतोस रे तू बॅटमॅना?
खरे तर गॉथममध्ये पण सध्या 'जिथे काय उणे'.

In reply to by बॅटमॅन

पण सध्या 'जिथे काय उणे'.
ओके! तिथे येण्याआधी संपर्क करीन. बहुदा या वर्षातच!!! इन्शाला, सब ठीक हो जायेगा!!! :)

In reply to by भाते

येताय का? चला मस्त बियर पिवू, मासे खावु आणि येवू परत लोकलने. आणि फोटो काढून आपल्या इतर वेळेअभावी, न येवू शकणार्‍या मिपाकरांना आपल्या आनंदात सहभागी करू.

In reply to by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)

अहो, CKP हॉलमध्ये फूड फेस्टिवल ठरलेलाच आहे. त्याला फक्त कट्टा म्हणून हजेरी लावायची, असे सुचवताहेत ते.

In reply to by सुनील

तसेही मी आणि अजून एक मिपाकर जाणार आहोतच आणि साग्रसंगीत व्रुत्तांत पण लिहीणार आहोतच. पण बर्‍याच मिपाकरांची तक्रार असते, की आधी का नाही सांगीतले? आम्ही पण आलो असतो. शिवाय ठाणे आणि त्यातून सीकेपी हॉल हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने, बहाणे करायला चान्स मिळतो. तो मिळू नये आणि चार नाखट मंडळी मिळून धमाल करता यावी म्हणून ठरवले.

In reply to by मुक्त विहारि

केव्हा जायच व कुठे भेटायच ठरवा. मी ठाण्यातच राहतो. या निमित्तानी फ़ुड फ़ेस्टिवलला भेट द्यायला आवडेल.

In reply to by मुक्त विहारि

केव्हा जायच व कुठे भेटायच ठरवा. मी ठाण्यातच राहतो. या निमित्तानी फ़ुड फ़ेस्टिवलला भेट द्यायला आवडेल.

In reply to by मुक्त विहारि

केव्हा जायच व कुठे भेटायच ठरवा. मी ठाण्यातच राहतो. या निमित्तानी फ़ुड फ़ेस्टिवलला भेट द्यायला आवडेल.

In reply to by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)

मिपाला माझी ही पोस्ट इतकी का आवडली ३ वेळा रिपीट केली आहे.

In reply to by मुक्त विहारि

बर्‍याच मिपाकरांची तक्रार असते, की आधी का नाही सांगीतले? आम्ही पण आलो असतो. हे वाक्य फार चतुराईने पूर्वीच कोणीतरी इथे टंकलेय . चोप्य पस्ते करायला सोपं आहे.

In reply to by चित्रगुप्त

जरुर.... तशी पण एकदा तरी दिल्ली बघायचीच आहे. तेंव्हा त्याच वेळी दिल्ली कट्टा पण करू या...

मुविंनी 'कट्टेकरी' असं नाव धारण करावं अशी नम्र विनंती, तेही शोभून दिसेल ;-) (मुवि: गंमतीने म्हणते आहे, गैरसमज नसावा हीदेखील विनंती)

In reply to by आतिवास

बिंधास्त मस्करी करा. आमचा धागा आणि मिपाकरांचा धांगडधिंगा.

ठाण्यात सीकेपी हॉलमध्ये भेटा.... खुशाल सीकेपी पाककृती खा... अगदी सोड्याची खिचडी आणि वालाचं बिरडं खा!!!! (मनातल्या मनातः पोटात दुखणार बघा तुमच्या!!!) :)

अचानक करायच्या कट्ट्याचा धागा काढणे हा विरोधाभास नव्हे काय? त्यापेक्षा पुणेकर बरे!! एका फोनवर हजर होतात. स्वगतः काडी टाकली...आता पळा.. *JOKINGLY*

In reply to by सूड

हा ठरलेला कट्टा न्हवता. जसे.. मार्च मधला घारापुरी कट्टा एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात होणारा ओरीगामी कट्टा जून-जुलै मधली पावसाळी सफर वगैरे वगैरे.... हा बातमी समजल्यावर आणि डोक्यात किडा वळवळल्यावर ठरलेला कट्टा आहे.

जून-जुलै मधली पावसाळी सफर
ही २०१४ मध्ये कुठे आहे ते कळवा... अर्थात आम्ही आता वयोमानाप्रमाणे फक्त भुईकोट किल्ले किंवा सिंधुदुर्ग करतो.... तीन-चार मैलाचा चढ वगैरे ऐकुनच आम्हाला हार्ट-अ‍ॅटॅक येतो.... :)

MuVi, don't you have some other commitments on fifteenth ??

In reply to by भाते

मी आताच तिथल्या एका व्यक्तीशी बोललो. रविवारी सकाळी १० वाजल्या पासून ते रात्री ९/१० वाजेपर्यंत ही खाद्य जत्रा आहे. आपण रविवारी सकाळी ११ वाजता सीकेपी हॉलला भेटलो तर? आधी स्टॉल वगैरे फिरू आणि मग दु.१२ पासून हादडायला सुरुवात करू..... भरलेले पापलेट, सोड्याची खिचडी, कोलंबी भात, मटण वडे, खिम्याचे पॅटीस, कानोले, वालाचे बिरडे, जवळ्याची भजी हे आरोग्यवर्धक पदार्थ खायला आमची कधीच ना नसते.

In reply to by मुक्त विहारि

भरलेले पापलेट, सोड्याची खिचडी, कोलंबी भात, मटण वडे, खिम्याचे पॅटीस, कानोले, वालाचे बिरडे, जवळ्याची भजी
ओ मुविशेठ... कशाला ह्या पदार्थांची नावे घेत आहेत? हे सगळे पदार्थ म्हणजे आमचा जिव की प्राण... बादलीभर लाळ जमा झाली तोंडात.

In reply to by शिद

तुम्हाला जळवण्यासाठी वर दिलेल्या दुव्यातले सगळे पदार्थ मुविंनी मुद्दामुन चोप्यपस्ते केले. तेव्हा शक्य असल्यास वेळ काढुन कट्टयाला या असे अप्रत्यक्ष सुचवले त्यांनी सगळ्यांना. लक्षात ठेवा, आता कट्टा झाल्यावर आणखी जळवण्यासाठी वृत्तांतामध्ये त्यांचे फोटो टाकुन पुन्हा एकदा जळवतील ते.

In reply to by भाते

आता कट्टा झाल्यावर आणखी जळवण्यासाठी वृत्तांतामध्ये त्यांचे फोटो टाकुन पुन्हा एकदा जळवतील ते.
वाट पाहतोय... :)

माझ्यासाठी त्या निनाव चा फोटो काढून कुणीतरी डकवा.

In reply to by सूड

आयला, परवाच तर म्हणालात सगळ्या कट्ट्यांना येणार.तरी पण काळा घोडा महोत्सवाला आला नाहीत. (एकदा गेलात की पुढच्या वर्षापासून दररोज जाल.आम्ही लग्नाळलेले असून पण देवाच्या करणीने दिपून गेलो.बरोबर बायको असल्याने,आमची गत धोंडो भिकाजी जोश्या सारखी झाली.) आणि आता खाद्य जत्रेला पण नाही. असो. निनावाचा फोटो नक्की काढतो.

In reply to by चिप्लुन्कर

आणि पहिल्या पंगतीत जेवायला जास्त मज्जा येते. गर्दी नसल्याने होणारे फायदे. १. पदार्थ निवडीला वेळ मिळतो. २. आरामात बसून खाता येते. ३. पदार्थात नंतर येवू शकणारे घटक जास्त येत नाहीत. तस्मात, ११ वाजता भेटू आणि १२ ते १२:३० ला खायला सुरुवात करू, मी ११ ते ११:१५ पर्यंत तिथे पोहोचत आहे. काला घोडा महोत्सवाला पण आम्ही लवकर गेल्यामुळे, हाच फायदा झाला.