नमस्कार मिपाकरहो,
श्रीमान मुक्त विहारि यांच्या वनंतीने मी या कट्ट्याचा व्रूत्तांत लिहीत आहे, मिपावर लिहीण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न. (काही चूक झाल्यास माफ करावे, ही विनंती.)
ठरल्याप्रमाणे हाही कट्टा अगदी व्यवस्थित पार पडला, सगळे म्हणजे श्री. व सौ. हेमांगीके, अजया, मुक्त विहारि, सुबोध खरे, रामदास काका, सूड, भटक्या खेडवाला, भाते इ. माझ्याअगोदर आले होते आणि मी जरा उशीराच गेलो, स्पा कट्टा संपतांना आले.
हेमांगीके यांचे लेख वाचले होतेच त्याना भेटण्याची उत्सुकता होती, हेमांगीके म्हणजे कोणीतरी वयस्कर व्यक्तिमत्व असावे असे वाटले होते, त्यांना भेटल्यावर या मुलीने इतके सुंदर लेखन केले आहे, हे खरेच वाटेना, असो. सुरवातीला ओळख परेड झाली, फोटो सेशन झाले.(खाली फोटो चिकटवले आहेत.सदर काम मीच केल्यामुळे बर्याच फोटोत मी त्यात दिसत नाही.) नंतर गप्पा रंगल्या.नेहमीप्रमाणेच डॉ. सुबोध खरे, रामदास, भटक्या खेड्वाला, मुवि व अध्येमध्ये आम्ही इतर त्यामध्ये रंगलो होतो. सोबतीला खानपान होतेच ते खालील फोटोत दिसत असेलच.
हेमांगीके यांच्याशी हितगुज सुरु झाले.त्यांचे नवे लेखन व इतर विषय चर्चेत आले. कट्ट्याला डोंबिवलीकरांची उपस्थिती जास्त असल्याने डोंबिवलीमधल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. डॉ. सुबोध खरे व रामदास आपले इतर अनुभव शेअर करत होते, भटक्या खेड्वाला याना एका खाजगी कार्यक्रमाला जायचे असल्याने ते निघुन गेले. नंतर डॉ.खरे यांनी स्पाला फोन केला ते त्याप्रमाणे आले. या कट्ट्यामध्ये सर्वसाधारण अवातर गप्पा झाल्या.
श्री. रामदासानी डॉ. सुबोध खरेना पुस्तकरुपाने आपले अनुभव शब्द्बद्ध करण्याविषयी आग्रह धरला.तसेच मुंबईत काळाघोडा महोत्सव चालु आहे त्या संबंधी बोलले. तसेच जमल्यास तिकडे जाण्यास सुचविले. काहीनी त्यास अनुमोदन दिले. एकुणच फड चागला रंगला होता.
डॉ. अजया, श्री. रामदास याना जायचे असल्याने कट्टा आवरण्याची वेळ आली. इतक्यात मु.वि.नी जवळच असलेल्या डॉ. आंबेडकर सभाग्रूहामध्ये सुरु असलेल्या 'वन्यजीव फोटो प्रदर्शन' पाहण्यासंबधी विचारले. तिकडे जाण्यासाठी सगळेच तयार झाल्याने, सर्वानी तिकडे प्रस्थान केले. हे एक अतिशय सुंदर असे प्रदर्शन होते.
आजचा हा कट्टा श्री. व सौ. हेमांगीके यांनी प्रायोजित करुन एक नविन पायंडा पाडला त्याबद्दल त्यांना धन्यवाद.
आता काळा घोडा फेस्टिवल कट्ट्याला परत भेटू या.
वाचने
10070
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
कट्टा उत्तम झालेला दिसतोय.
अरे वा ! मस्त झाला की कट्टा !
वृत्तांत व फोटू आवडले.
मस्तच....!
छान झाला कट्टा
वृ आवडला.
लहान है वो!
In reply to वृ आवडला. by प्यारे१
लहान हय वह !
In reply to लहान है वो! by पाषाणभेद
छान व्रुत्तांत...
मलातरी हेमांगी के फार वयस्क
नवीन पायंडा :)
लोल
In reply to नवीन पायंडा :) by अर्धवटराव
असलं कसलं रे तुझं लाजणं... शी
In reply to लोल by स्पा
क्षणचित्रे
अरेरे...
In reply to क्षणचित्रे by अजया
जेवणाचे बील त्यांनी देऊनही त्यांना बोलू दिले नाही......
In reply to अरेरे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हम्म.
In reply to जेवणाचे बील त्यांनी देऊनही त्यांना बोलू दिले नाही...... by मुक्त विहारि
ठाण्यात एखादा कट्ट्याला मी हजेरी लावेन.....
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शुभेच्छा.
In reply to ठाण्यात एखादा कट्ट्याला मी हजेरी लावेन..... by मुक्त विहारि
आयला....
In reply to शुभेच्छा. by प्रभाकर पेठकर
किती तो मनकवडा स्वभाव.
In reply to आयला.... by मुक्त विहारि
>>ज्यांच्यावर कविता लिहिल्या
In reply to क्षणचित्रे by अजया
सूड लाजुषा
In reply to >>ज्यांच्यावर कविता लिहिल्या by सूड
लाजुषा?
In reply to सूड लाजुषा by स्पा
>>की लाजुक्षी?
In reply to लाजुषा? by पैसा
उगी, उगी!
In reply to >>की लाजुक्षी? by सूड
हो का?
In reply to उगी, उगी! by पैसा
अरे वा!!!
स्पा आला नव्हता म्हणून मी
@स्पा आपल्याला बिल द्यायला
In reply to स्पा आला नव्हता म्हणून मी by सुबोध खरे
वॄतांत आवडला.
छान वृ आणि फोटो.
खुप छान झाला कट्टा
कट्टा वृत्तांत आवडला.
@ वल्ली...
In reply to कट्टा वृत्तांत आवडला. by प्रचेतस
अगदी सहमत.
In reply to @ वल्ली... by मुक्त विहारि
हा हा हा
आवडले गेले आहे.
वा मस्तं...
पहिलाच वृत्तांत आहे म्हणताना
छान आटोपशीर वृतांत
मी पण तेच म्हणणार होतो. पण
In reply to छान आटोपशीर वृतांत by स्पा
चूका काढणारा
In reply to मी पण तेच म्हणणार होतो. पण by सूड
अरे किती वेळा लिहायचं की
In reply to छान आटोपशीर वृतांत by स्पा
सहमत
In reply to छान आटोपशीर वृतांत by स्पा
चित्रावर राईट क्लिक करून "ओपन
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
वृत्तांत आवडला.
वयाबद्दल अंदाज करायचाच कशाला
In reply to वृत्तांत आवडला. by किसन शिंदे
But Natural.
In reply to वयाबद्दल अंदाज करायचाच कशाला by यशोधरा
Men are always Men.
तसं न्हवं
In reply to वयाबद्दल अंदाज करायचाच कशाला by यशोधरा
तेच की..
In reply to वयाबद्दल अंदाज करायचाच कशाला by यशोधरा
खवचट काकूबै
In reply to तेच की.. by किसन शिंदे
बोल्ले ठाकुर्लीकर!
In reply to खवचट काकूबै by स्पा
चल्ल पळ्ळ ए!
In reply to तेच की.. by किसन शिंदे
तो दुसरा एक डोंबिवलीकर
In reply to वृत्तांत आवडला. by किसन शिंदे
(No subject)
...धन्यवाद...!!
प्रथम उंची-रुंदी न टाकता
In reply to ...धन्यवाद...!! by विनोद१८
धन्यवाद.
In reply to प्रथम उंची-रुंदी न टाकता by डॉ सुहास म्हात्रे
मस्तच... वृतांत आवडला