पाँचफोरोन दाल (Panch Phoron)
अतिशय सोपी व चविष्ट अशी ही बंगाली पद्धतीची डाळ आहे. पाँचफोरोन म्हणजे पाच प्रकारचे जिन्नस ह्यात वापरले आहेत मोहरी, जीरे, बडीशेप, मेथी-दाणे व कांद्याचे बी (कलौंजी). हे मसाले अख्खेच फोडणीत वापरले जातात.
साहित्य:
१ वाटी मसूर डाळ स्वच्छ धुवून १०-१५ मिनिटे भिजवणे
१ टोमॅटो चिरलेला
२ हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून जीरे
१/४ टीस्पून बडीशेप
१/४ टीस्पून मेथी-दाणे
१/४ टीस्पून कांद्याचे बी (कलौंजी)
१/२ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
१/२ टीस्पून लिंबाचा रस
तेल / राईचे तेल
पाकृ:
मसूर डाळ कुकरला मऊसर शिजवून घ्या.
शिजवलेली डाळ चांगली घोटून घ्या.
पाँचफोरोन एकत्र करुन घ्या.
कढईत तेल गरम करून पाँचफोरोन व मिरच्यांची फोडणी करून घ्या.
त्यात शिजवलेली मसूरडाळ, चवीप्रमाणे मीठ, हळद व आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवावे.
डाळीला उकळी फुटली की त्यात चिरलेला टोमॅटो घालून, ५-८ मिनिटे शिजवावे.
सगळ्यात शेवटी लिंबाचा रस घालून गॅस बंद करावा.
(पंजाबी लोणच्यासारखी पण माईल्ड) छान लागते. ह्या डाळी बरोबर मला वांग्याचे काप तोंडीलावणे म्हणून आवडले.

वाचन
16084
प्रतिक्रिया
0