मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाँचफोरोन दाल (Panch Phoron)

सानिकास्वप्निल · · पाककृती
अतिशय सोपी व चविष्ट अशी ही बंगाली पद्धतीची डाळ आहे. पाँचफोरोन म्हणजे पाच प्रकारचे जिन्नस ह्यात वापरले आहेत मोहरी, जीरे, बडीशेप, मेथी-दाणे व कांद्याचे बी (कलौंजी). हे मसाले अख्खेच फोडणीत वापरले जातात. . साहित्य: १ वाटी मसूर डाळ स्वच्छ धुवून १०-१५ मिनिटे भिजवणे १ टोमॅटो चिरलेला २ हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या १/४ टीस्पून मोहरी १/४ टीस्पून जीरे १/४ टीस्पून बडीशेप १/४ टीस्पून मेथी-दाणे १/४ टीस्पून कांद्याचे बी (कलौंजी) १/२ टीस्पून हळद मीठ चवीनुसार १/२ टीस्पून लिंबाचा रस तेल / राईचे तेल . पाकृ: मसूर डाळ कुकरला मऊसर शिजवून घ्या. शिजवलेली डाळ चांगली घोटून घ्या. पाँचफोरोन एकत्र करुन घ्या. . कढईत तेल गरम करून पाँचफोरोन व मिरच्यांची फोडणी करून घ्या. त्यात शिजवलेली मसूरडाळ, चवीप्रमाणे मीठ, हळद व आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवावे. डाळीला उकळी फुटली की त्यात चिरलेला टोमॅटो घालून, ५-८ मिनिटे शिजवावे. सगळ्यात शेवटी लिंबाचा रस घालून गॅस बंद करावा. .(पंजाबी लोणच्यासारखी पण माईल्ड) छान लागते. ह्या डाळी बरोबर मला वांग्याचे काप तोंडीलावणे म्हणून आवडले. .

वाचन 16084 प्रतिक्रिया 0