Skip to main content

रानपाखरं.......!

लेखक psajid यांनी मंगळवार, 28/01/2014 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
बांधलं मचाण वर गाण्यात गळा, मधुरता मंधी दुमला शेतमळा !! येऊन चोर जोंधळ्यात दडं, शिवार टिपीत चाललीत पुढं !! भिरभिरली गोफण सुटला दगड, चोर जोंधळ्यात त्येनं केलं उघड !! का म्हून सतावता सुखानं जगू द्यावं, किती सोसलं पिकासाठी तुम्हा ते नाय ठावं !! घरी तान्हं ठिवून आलिया राखणीला, सोनं ठिवलं तरच वरीसभर पीठ भाकरीला !! - साजीद यासीन पठाण दह्यारी (पलूस, सांगली, महाराष्ट्र)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2655
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

उत्कष्ट वर्णन केले आहे प्रथेचे! पण त्याच बरोबर आईच्या मनात दडलेली व्यथाही उत्तम रीतीने मांडली आहे. छान आहे कविता! आवडली. धन्यवाद

मस्त! अन साजिदभौ तुम्ही पलूसचे हे ठौक नव्हतं. सहीच! (मिरजकर) बॅटमॅन.

दाणे टिपायला आलेल्या पाखरांना चोर म्हटले आहे, ज्यांना उडवायला ती गोफण चालवत आहे. - आयुर्हित बरोबर ! साजिदभौ तुम्ही पलूसचे - (मिरजकर) बॅटमॅन.) होय पलूस तालुक्यातील दह्यारी हे माझं गाव ! अभिप्रायासाठी धन्यवाद !

पाखराची आई ही दाण्यांच्या शोधात शेतात आली. तिचे पिल्लू कधी न येणाऱ्या आई साठी वाट बघत असेल.... एकाच्या जगण्या साठी, दुसर्याला मरण. संसार म्हणत्यात ते हेच.....