बांधलं मचाण
वर गाण्यात गळा,
मधुरता मंधी
दुमला शेतमळा !!
येऊन चोर
जोंधळ्यात दडं,
शिवार टिपीत
चाललीत पुढं !!
भिरभिरली गोफण
सुटला दगड,
चोर जोंधळ्यात
त्येनं केलं उघड !!
का म्हून सतावता
सुखानं जगू द्यावं,
किती सोसलं पिकासाठी
तुम्हा ते नाय ठावं !!
घरी तान्हं ठिवून
आलिया राखणीला,
सोनं ठिवलं तरच
वरीसभर पीठ भाकरीला !!
- साजीद यासीन पठाण
दह्यारी
(पलूस, सांगली, महाराष्ट्र)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2655
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्कृष्ट!!!
चान . पण चोर शेतात कशाला
चोर शेतात कशाला शिरलेत ?
In reply to चान . पण चोर शेतात कशाला by म्हैस
मस्त!
बरोबर !
ओह्ह. मस्त.
पाखराची आई ही दाण्यांच्या