दक्षिण भारतीय पध्दतीचे गोडाचे आप्पे, नेई म्हणजे तूप... तुपात तळलेले गोड आप्पे :)
साहित्यः
१ वाटी तांदूळ ३-४ तास भिजवणे (उकडा तांदूळ ही चालेल)
३/४ वाटी चिरलेला गुळ
३/४ वाटी खवलेला ओला नारळ किंवा नारळाचे काप / तुकडे
१ केळं
१ टेस्पून तांदळाची पिठी
१ टीस्पून काजूचे तुकडे
१/२ टीस्पून वेलचीपूड
१/२ टीस्पून खायचा सोडा
आप्पे तळायला साजूक तूप (तूप नको असल्यास तेलाचा ही वापर करु शकता, पण तूप घातल्यामुळे आप्प्यांना येणारी चव कमालीची स्वादिष्ट लागते )
पाकृ:
भिजवलेल्या तांदाळतले पाणी काढून, तांदूळ मिक्सरला कमीत-कमी पाणी घालून मुलायम वाटून घ्यावे.
एका पॅनमध्ये गुळ घालून त्यात १/४ वाटी पाणी घालून मंद गॅसवर तो वितळेपर्यंत ढवळावे.
गुळाचे पाणी गाळून एका वाटीत काढावे, म्हणजे काही scum असेल तर गाळला जाईल.
वाटलेल्या तांदळाच्या मिश्रणात केळ्याचे काप घालून, कुस्करून एकत्र करावे.
आता त्यात खवलेला नारळ, वेलचीपूड, तुकडा काजू व लागेल तसे गुळाचे पाणी थोडे-थोडे करुन घालावे. (मिश्रण खूप सैल / पातळ झाले तर आप्पे तळताना खूप तेल पितं, त्यामुळे प्रमाण नीट बसवावे.)
गुळाचे पाणी घातल्यावर मिश्रण पातळ होतं म्हणून त्यात तांदळाची पिठी घालून नीट मिक्स करावे.
मिश्रण साधारण डोश्याच्या मिश्रणाइतपत घट्ट हवे.
सर्वात शेवटी खायचा सोडा घालून मिक्स करावे. ( खायचा सोडा घालायचा नसल्यास मिश्रण दोन-तीन तास झाकून ठेवावे.)
आप्पेपात्र गॅसवर ठेवून त्याच्या प्रत्येक गोलात साजूक तूप सोडावे.
चमचाभर मिश्रण प्रत्येक गोलात घालून तळावे.
एका बाजून नीट शिजले की उलटवावे, गरज वाटल्यास थोडे तूप सोडावे.
दोन्ही बाजूने सोनेरी रंग आला की काढावे.
स्वादिष्ट नेईअप्पम खाण्यासाठी तयार आहेत.

वाचने
19006
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह्ह्ह....
खमंग
सुरेख फोटू आणि सात्विक पाकृ!
तूप!
In reply to सुरेख फोटू आणि सात्विक पाकृ! by रेवती
लिंबाचे उपवासाचे लोणचे.
In reply to तूप! by कवितानागेश
नेईअप्पमला
In reply to लिंबाचे उपवासाचे लोणचे. by मोदक
आहा!
(No subject)
त्या प्लेटमध्ये नेईअप्पम
In reply to (No subject) by गणपा
काल पासुन किमान १०-१५ वेळा
In reply to त्या प्लेटमध्ये नेईअप्पम by डॉ सुहास म्हात्रे
मस्त
आ हा हा! सुंदर व चविष्ट पाकृ!
फोटोने डोळ्याचे पारणे फिटले!
सिंपल अन स्वीट डिश
हुम्म्म
In reply to सिंपल अन स्वीट डिश by सस्नेह
माझ्या माहितीप्रमाणे..
In reply to सिंपल अन स्वीट डिश by सस्नेह
माझी आजी तांदळाचे पीठ भिजवून
In reply to माझ्या माहितीप्रमाणे.. by विटेकर
मस्त
पाकॄ आवडली... नक्की करणार.
ऑ वॉव.
आय लव यु.. सानिकाताई!!!!
In reply to ऑ वॉव. by अर्धवटराव
तोंपासु!!!
(No subject)
शेवटचा फोटो बघून वारल्या गेले
सुंदर
छान पाकॄ आणि फोटो
काळे तीळ
In reply to छान पाकॄ आणि फोटो by दिपक.कुवेत
>>>>नेई म्हणजे तूप... तुपात
मस्तच
जबरदस्त. आमच्याकडे बरेचदा
किलर !!
मस्तच
वा वा वा.. मस्तच!! तोंपासु.
वाचनखूण साठवली आहे.
ताडीचे आप्पे
ताडी?
In reply to ताडीचे आप्पे by शिद
रेगुलर आप्पमच्या रेशिपीतही
In reply to ताडी? by सूड
कल्लप्पम
In reply to रेगुलर आप्पमच्या रेशिपीतही by बॅटमॅन
माहितीकरिता
In reply to कल्लप्पम by सानिकास्वप्निल
धन्यवाद...
In reply to कल्लप्पम by सानिकास्वप्निल
तुम्ही सांगितलेले ऐकायला
In reply to धन्यवाद... by शिद
मस्तच
मस्त..
अप्रतीम.
खासच!
सुंदर
दुष्ट बै कुठची!
लई भारी.
_/\_ _/\_ _/\_
जबरी आहेत. घरी आप्पेपात्र
मार डाला
सुंदर फोटू आणि पाकक्रुती..
मस्तच!!!
करून पाहिलेत!