Skip to main content

नेईअप्पम

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 26/01/2014 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण भारतीय पध्दतीचे गोडाचे आप्पे, नेई म्हणजे तूप... तुपात तळलेले गोड आप्पे :) . साहित्यः १ वाटी तांदूळ ३-४ तास भिजवणे (उकडा तांदूळ ही चालेल) ३/४ वाटी चिरलेला गुळ ३/४ वाटी खवलेला ओला नारळ किंवा नारळाचे काप / तुकडे १ केळं १ टेस्पून तांदळाची पिठी १ टीस्पून काजूचे तुकडे १/२ टीस्पून वेलचीपूड १/२ टीस्पून खायचा सोडा आप्पे तळायला साजूक तूप (तूप नको असल्यास तेलाचा ही वापर करु शकता, पण तूप घातल्यामुळे आप्प्यांना येणारी चव कमालीची स्वादिष्ट लागते ) . पाकृ: भिजवलेल्या तांदाळतले पाणी काढून, तांदूळ मिक्सरला कमीत-कमी पाणी घालून मुलायम वाटून घ्यावे. एका पॅनमध्ये गुळ घालून त्यात १/४ वाटी पाणी घालून मंद गॅसवर तो वितळेपर्यंत ढवळावे. गुळाचे पाणी गाळून एका वाटीत काढावे, म्हणजे काही scum असेल तर गाळला जाईल. . वाटलेल्या तांदळाच्या मिश्रणात केळ्याचे काप घालून, कुस्करून एकत्र करावे. आता त्यात खवलेला नारळ, वेलचीपूड, तुकडा काजू व लागेल तसे गुळाचे पाणी थोडे-थोडे करुन घालावे. (मिश्रण खूप सैल / पातळ झाले तर आप्पे तळताना खूप तेल पितं, त्यामुळे प्रमाण नीट बसवावे.) गुळाचे पाणी घातल्यावर मिश्रण पातळ होतं म्हणून त्यात तांदळाची पिठी घालून नीट मिक्स करावे. मिश्रण साधारण डोश्याच्या मिश्रणाइतपत घट्ट हवे. सर्वात शेवटी खायचा सोडा घालून मिक्स करावे. ( खायचा सोडा घालायचा नसल्यास मिश्रण दोन-तीन तास झाकून ठेवावे.) . आप्पेपात्र गॅसवर ठेवून त्याच्या प्रत्येक गोलात साजूक तूप सोडावे. चमचाभर मिश्रण प्रत्येक गोलात घालून तळावे. एका बाजून नीट शिजले की उलटवावे, गरज वाटल्यास थोडे तूप सोडावे. दोन्ही बाजूने सोनेरी रंग आला की काढावे. . स्वादिष्ट नेईअप्पम खाण्यासाठी तयार आहेत. .

वाचने 19006
प्रतिक्रिया 54

प्रतिक्रिया

वाह्ह्ह.... नेहमीप्रमाणे स्वादिष्ट फोटो. ;)

मस्त प्रकार. उत्तम सादरीकरण

सुरेख फोटू आणि सात्विक पाकृ! करणारच करणार. तयार अप्प्यांचा फोटू ग्रेट आलाय. या पदार्थाला तोंडी लावणे काय करायचे? (हा प्रश्न आहे).

In reply to by मोदक

नेईअप्पमला स्वतःची छान चव आहे त्यामुळे मला तरी त्याच्याबरोबर काही नको असे वाटते...तरीही माऊताई आणी मोदक म्हणतात त्याप्रमाणे तूप, लिंबाचे लोणचे चालेल ही कदाचित.

आहा! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

काल पासुन किमान १०-१५ वेळा धागा उघडुन पाहिला. आमची प्लेट अजुन रिकामीच आहे. (हो नै तर एक्का काकांना डौट यायचा की ते यायच्या आधीच मी सगळे अप्पे गट्टम केले.) बादवे हा प्रकार सगळ्यात पहिल्यांदा अंधेरीच्या ऑफिसमध्ये चाखला होता. दुपारच्या नाश्ट्याच्या वेळी कँटिनमधालं पोरगं नारळाच्या चटणी (चटणी कसली चोथायुक्त पाणीच ते) सोबत घेऊन यायचं. किंचीत गोड-नमकीन(मराठी?) टेस्ट मस्त वाटायची.

आजच आप्पे किती दिवसात खाल्ले नाहीत असे म्हटले आणि योग्य वेळी पाकृ मिळाली. नेहमीप्रमाणेच सुंदर फोटू. लवकरच करून बघते.

आ हा हा! सुंदर व चविष्ट पाकृ! काय सुरेख फोटो आलेत हो! सोडा नकोच.मिश्रण २-३ तास झाकलेले बरे. गुळ व साजुक तूप हा तर खूप चांगला आरोग्यदायी पर्याय आहे. त्यात मला वाटते काजूचे कच्चे तुकडे टाकण्यापेक्षा काजुची पेस्ट किंवा भुकटी बरी. सोबत खायला रबडी उत्तम. फक्त यावर उतारा म्हणून आठवडाभर ५ किलोमीटर जास्तीचे चालणे करावे. उत्तम पदार्थ दिला आपण. धन्यवाद.

In reply to by सस्नेह

तुम्ही जर याला 'गुलगुले' म्हणत असाल तर तुम्हाला गोड शेव पण माहित असेलच. बादवे-तुम्ही कुठल्या ?

In reply to by विटेकर

माझी आजी तांदळाचे पीठ भिजवून गुळाचा पाक घालून गुलगुले करायची. त्यात बेसनपीठ घालत होती की नाही आठवत नाही.

झक्कास... हा प्रकार मला अजिबात आवडत नाही... पण लिखाण आणि फोटो, नेहमीप्रमाणे...सुसाट ....

पाकॄ आवडली... नक्की करणार. गेल्या विकांताला अनन्याचे पुडिंग, काल चिली गार्लिक बेबी कॉर्न पुढल्या विकांताला हे नेईआप्पम... माझ्या जीभेची चंगळ अहे बुवा!!!!

है कोई जवाब? स्वर्गीय सुख यापरतं काय वेगळं असेल??

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

फोटो , पाक कृती आणि पदार्थ देखील ! खाण्याच्या बाबतीत मी चार्वाक पंथी आहे .. जीव आहे तोपर्यन्त भरपूर तूप पिऊन घ्या !(च्यायला .. ह्या डायबेटीस च्या .. ..! )असो. आमच्याकडे काल तिखट्वाले अप्पे होते .. झ़कास .. मजा आली. "कानडीने केला मराठी भ्रतार" असे असल्याने अनेक कानडी पदार्थ घरीच खायला मिळतात. हल्ली ती अंजली चे नॉनस्टिक वाले अप्पेपात्र आले .. पूर्वीच्या लोखंडी पात्रात एक झकास खरपूस वास असायचा ! कमी तेलाच्या भानगडीत त्याची मात्र हाकालपट्टी झाली ! Appe

In reply to by दिपक.कुवेत

काळे तीळ घालू शकता ना पण गुळ+खोबरं+केळं ह्यासोबत दाताखाली काजू छानच लागतो :) काळे तीळ अचप्पम मध्ये घातलेले चांगले वाटतात..अर्थात आपल्या आवडीप्रमाणे बनवावे. धन्यवाद.

>>>>नेई म्हणजे तूप... तुपात तळलेले गोड आप्पे चुकीची माहिती आहे. निजधामाला नेणारे म्हणजे नेई असे ते अप्पम म्हणून नेईअप्पम. ;) बाकी प्रेझेन्टेशनला मार्क नाहीत. (संपलेत) गोडाचे बुलबुले खाऊन बघितलेत. फार आवडले नव्हते. ह्याचं ठाऊक नाही.

खल्ला.................स सानिकांची डिश म्हणजे जीव जाळणे आणि पोटात खड्डा (भुकेने) पडणे. दोन्ही गोष्टी एकदम होतात. लइच त्रास होतो बघा ! आमच्या नशिबी कधी मिळेल (म्हणजे पोटात कधी पडेल) ? असे वाटते !!

जबरदस्त. आमच्याकडे बरेचदा होतात नाश्त्याला. पण काहीही म्हणा; तुम्ही टाकता ते फोटो विशेष उल्लेखनीय असतात. नेहमीच आवडतात. फस्ट क्लास.

व्वाह, खूप छान रेसिपी आणि फोटो

भारी! नारळ-गूळ आणि तांदूळ हे एकत्र आले की तूप आलेच! खांडवी नारळाच्या दूधाबरोबर छान लागते, कदाचित या आप्प्यांबरोबरही नारळाचे दूध चांगले लागेल.

आमच्या गावाला हे आप्पे ताडी मिसळुन बनवतात. साधनसामुग्री थोड्याफार फरकाने सारखीच पण पिठामध्ये ताडी मिसळुन रात्रभर आंबवत ठेवतात. ताडी जितकी खट्टी (आंबूस) तितके आप्पे फुगतात ब चवीला पण छान लागतात.

In reply to by सानिकास्वप्निल

धन्यवाद!! (पाककलेच्या प्रांगणात नुकता पालथा पडू लागलेला) बॅटमॅन.

In reply to by सानिकास्वप्निल

धन्यवाद... @सुडः ताडीचे आप्पे खाल्ले तर कळणार सुद्धा नाही सांगीतल्याशिवाय ;)

In reply to by शिद

तुम्ही सांगितलेले ऐकायला मनुष्य जागा असायला हवा ना! कधी नव्हे असं काही पोटात गेल्यावर कुंभकर्ण व्हायचा त्याचा!

मस्त दिसत आहेत ग आप्पे, स्वाती

आमची सौ तुम्ही दिलेल्या प्रत्येक पाककृती बनवते.

माझ्या सासूबाईंचा फेव्हरिट पदार्थ! त्या चुलीवर लोखंडी आप्पेपात्रात करायच्या ते लै भारी लागायचं. आता गॅस आल्यावर ती चव हरवली.

फोटो आणि पाकृ. दोन्ही पहिलाच फोटू पाहून तोंडाला पाणी सुटले

आता स्वयंपाकघरातल्या भांड्यांमध्ये आप्पेपात्र, जे सर्वात मागे पडले आहे ते, शोधणे आले. गोड वर्ज्य असल्याने तिखटमिठाचे, मिश्र डाळीचे आप्पे करावेत म्हणतो. पण जर का गोडाचे पथ्य नसते तर गुळ, केळं, खोबर्‍याचे बारिक तुकडे आणि काजू म्हणजे ढिगभर आप्पे सुद्धा पुरले नसते. पाककृती (नेहमी प्रमाणेच) सुंदर आणि चित्ताकर्षक आहे.

जबरी..... तोंपासु !!!

मार डाला सानिकातै! इतके सुंदर फोटु बघुन नक्की करावेसे वाटतात, आता वेळ कधी मि़ळतो त्यावर आहे.

करून पाहायला हवे एकदम नवीन पदार्थ आहे.

तांदळाचे पिठ नसल्याने किंचीत कणीक घालून केलेत.. चविला छान झाले होते! छायाचित्र टाकणार होतो पण असू देत :-) पाकृकरिता धन्यवाद!