करड्या (शतशब्दकथा)
लेखनप्रकार
"आर ए करड्या... कुठं मेलास रं !!"
सकाळपासनं करड्या दिसला नाही कोठेच.. सारखा ढुशी मारायचा प्वटात. आई लई ओरडायची पण करड्याची शिंगे लागली नाहीत कधीच..
सकाळपासनं म्याबी झ्याक बिझी व्हते. नव्या वहीनीला स्वैपाकात मदत केली. जेवण झाल्यावर मात्र करड्याची लई आठवण आली.
दादाच्या लग्नाअगोदर दोन दिवस आधीच आमच्याकडं करड्या आला होता. तेव्हापासनं सारखा माझ्याबरोबरच असायचा, जीव लावला त्यानं. माझा बायफ्रेंड म्हणायचे त्याला सगळे.. एकटाच गेला असेल माळावर बोंबलत चरायला.. चकणीला विचारते..
"काय गं चकणे, करड्याला घेऊन गेली व्हतीस?"
"आता करड्या करड्या करतेस.. मटण लई दाबात ओरपत होतीस की त्याचे" कुजकट चकणी बोल्ली.
पोटात ढवळलेच माझ्या.. करड्या आतनं ढुशी मारतं होता..
वाचने
4263
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
भारीच !
भारीयं .. शेवटाच्या पंचला एक ढुशी इथेही बसली..
आवडलं!!
झक्कास
पु.श.श.क.शु.(पु. शतशब्दकथेला शु.)
सॉल्लिड जमलीये!
प्रयत्न आवडला.
भाषेचा एकच टोन सलग ठेवला असता तर आणखी मजा आली असती.
बाकी ठराविक समाज सोडून बोकडाला सहसा घरच्या घरी मारलं जात नाही असं वाटतंय.
(शक्यतो पाळलेला असला तर, इथं तो त्याच कामासाठी आणलेला असला तर वरचं वाक्य रद्दबातल)
छान..! *THUMBS UP*
मस्तच.
मस्त !!!
मस्त.
कुठेतरी असा प्रसंग पाळलेल्या सशाबद्दल वाचला होता.
In reply to मस्त. by चिन्मय खंडागळे
कुठेतरी असा प्रसंग पाळलेल्या सशाबद्दल वाचला होता.
लिंक मिळेल काय? मलाही वाचायला आवडेल. काही दिवसांपुर्वी प्रवास करताना एका आडगावी काही लहान मुली बोकडाबरोबर खेळताना दिसल्या त्यावरून हे सुचले..
मस्त.
बाकी प्यारे १ म्हणतात त्याप्रमाणे भाषेबद्दल मलाही प्रश्न पडला - पण अशी 'मिश्र' भाषा असू शकते हे ध्यानात आलं.
सर्वांचे आभार...!!
बाकी आतिवास यांच्यासारखी शतशब्दकथा लिहायला मला जमेल असे वाटत नाही. प्रयत्न करीन.
भाषेचा एकच टोन ठेवायला मला जमले नाही. मुळात माझा स्वतःचा बोलण्याचा टोन एक कधीच नसतो. कोल्हापुरचा असल्याने कोल्हापुरी स्टाईल बोलतो पण बर्याच वेळेला साध्या मराठीतच बोलतो.
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo:
छान आहे
कथा आवडली.
क्लास्स्स्स्स्स
करड्याच जाण मनाला चटका लावून गेलं
बाकी ठराविक समाज सोडून बोकडाला सहसा घरच्या घरी मारलं जात नाही असं वाटतंय.जेवायला खूप लोक असतील तर खेडेगावात मटन , चिकन दुकानातून आनना परवडत नाहीत . म्हणून सर्रास बोकड, कोंबडा घरी आणून ठेवला जातो. आणि मग कार्यक्रमाच्या दिवशी कापतात. आमच्या गावाला तर नेहमीच.
छान
शतशब्दकथा.चांगला प्रकार आहे.आणखिन हि शतशब्दकथा आहेत का इथे? या प्रकारच्या कथा लिहायला कोण सुरुवात केली?
In reply to शतशब्दकथा.चांगला प्रकार आहे by एसमाळी
शतशब्दकथा मिपावर आतिवास यांनी आणल्या. आणि या प्रकाराचं बारसं करण्याचं श्रेय चिगो यांचं.
ही मिपावरची आद्य शशक - http://www.misalpav.com/node/24179
In reply to शतशब्दकथा मिपावर आतिवास यांनी by इनिगोय
'शशक' हा शब्द आवडला :-)
झ्याक लिवलंय!!
लिहा अजून
मस्तच,
चटका लावणारी कथा.
मिपावर शतशब्दकथांचा पण वेगळा विभाग सुरु करावा काय?
छान!
ट्विस्ट जमला आहे चांगला.
भारीच !