श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यात फरक कसा आणि का करावा ह्या बद्दल अज्ञान.
'ईश्वर पुजा' म्हणजे मुर्ती पुजा नाही.
देव चराचरात वसलेला आहे. ही शिकवण आचार विचारात अंगीकारता आली पाहिजे. समाज प्रबोधन व्हावे.
एखाद्या विविक्षित दिवशी जमणार्या भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन भाविकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सक्षम प्रशासनाने घेऊन अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाय योजना केल्या पाहिजेत.
पुढच्यास ठेच मागचा शहाणा. दुसर्यांच्या अनुभवातून मागचा शहाणा झाला पाहिजे.
आदरणीय श्री. प्रभाकर पंत,
'ईश्वर पुजा' म्हणजे मुर्ती पुजा नाही.
-- जे आपणास पटते तेच सर्वांनी करावे असे आपण लोकशाहीत म्हणू शकत नाही. तुम्हा आम्हाला मुर्तीपुजा पटत नसली तरी करोडो भारतीयांचा त्यावर विश्वास आहे. त्यामुळे मुर्तीपुजेला विरोध हा या प्रश्नावर तोडगा होऊ शकत नाही.
देव चराचरात वसलेला आहे. ही शिकवण आचार विचारात अंगीकारता आली पाहिजे. समाज प्रबोधन व्हावे.
--होय, परंतू यासाठी जो काळ जाईल त्यात अशा घटना घडतच जातील. त्यामुळे एखादा तात्काळ उपाय हवाच.
एखाद्या विविक्षित दिवशी जमणार्या भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन भाविकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सक्षम प्रशासनाने घेऊन अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाय योजना केल्या पाहिजेत.
--अगदी हेच ते उत्तर. पण कसे?
केंद्र व राज्य सरकारे मंदिरांचे करोडो रुपये दर वर्षी हडप्प करतात. कागदावर ते पैसे पुन्हा धर्माच्या (रिलिजिअस) कामांसाठी वापरले असे दाखवले गेले तरी ते मुख्यतः हज सबसिडी, मदरशांची परिस्थिती सुधारणे, अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांना मदत असे उधळले जातात. विषेशतः केरळ, आंध्र,प. बंगाल, महाराष्ट्र या लुटीत अघाडीवर आहेत. राजस्थानचे आकडे माझ्याकडे नाहीत.
ज्या मंदिरांमधून करोडो रुपयांची लूट सरकारे करतात तेथल्या मुलभूत सुविधांकडे मात्र पूर्ण डोळेझाक केली जाते. मंदिरांच्या जमिनी विकून मिळालेले पैसे तसेच रोकड मिळकत ही जर अशा धोकादायक पुरातन मंदिरांच्या जिर्णोद्धारात केली तर चेंगराचेंगरीने किड्यामुंग्या प्रमाणे मरणारे हिंदू भावीक मरणार नाहीत.
आपला,
(दु:खी) भास्कर
आम्ही येथे वसतो.
प्रतिक्रिया
भाऊ १००
१०३...
http://www.bbc.co.uk/hindi/re
हे
१८०
हे
अंधश्रद्धा.....
पण कसे?
चालायचंच!