समुद्र......!!
किनाऱ्यावर भेटतात सगळे जरी …
तुझा एकटेपणा कुणा दिसला का कधी
आकाशाचा रंग लेऊन घेतोस
तुझा रंग कधी पहिला का कुणी
हसतोस फक्त लाटांमध्ये ..... तू
रडतोस खोल आत कुठेतरी ………. !
रोज तसाच दिसतोस तू ,… अथांग…
प्रत्येक एकट्याला अरे , तुझाच संग ….
तुझ्या लाटांबरोबर ओठावरचे हसू …
तुझ्या क्षितीजाबरोबर डोळ्यातले आसू ….
पायाखालून निसटलेल्या रेतीचा आधार शेवटी …
हसतोस फक्त लाटांमध्ये …तू ,
रडतोस खोल आत कुठेतरी ……….
रोज नव्याने जगतोस तू ,… एकटा
सूर्याचा दाह झेलतो तू असा ....
जणू चंद्राच्या चांदण्यांचा सडा ,
तुझ्या मिलनाला …सगळेच पारखे…...
तूझ्या किनाऱ्यावरले घरकुलही पोरके ....
म्हणूनच का .......
हसतोस फक्त लाटांमध्ये …तू ,
रडतोस खोल आत कुठेतरी ……….
खळाळणारा तू… पण किती अबोल तुझी भाषा ,
वेड्यावाकड्या पाण्यातही दाखवतोस सरळ रेषा …
देतोस हिम्मत कधी, तर कधी धैर्य… पाहून कुणाचा उसासा …
कधी साथ कुणा तुझी … तर कधी दिलासा …
अरे ! मरणालाही तू देतोस जगण्याची आशा …।
तुझं सगळं तुझ्यापाशी , आमचंही सग्गळं तुझ्यापाशी
कारण ……
हसतोस फक्त लाटांमध्ये …तू ,
रडतोस खोल आत कुठेतरी ……….
-----फिझा.
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
छान झालीये रचना.
आवडली.
का बरं रडतो हा समुद्र ???
का बरं रडतो हा समुद्र ???
उत्तम भाव. खूप आवडले.
उत्तम भाव. खूप आवडले.
व्याकरणाच्या काही किरकोळ चुका
व्याकरणाच्या काही किरकोळ चुका खटकल्या.
जसे की
इथे झेलतोस असयला हवं.
बाकी उत्तमच.
सेंटीमिटर काव्य!
सेंटीमिटर काव्य!
खुप छान भावना ! जबरदस्त कविता !!!
तुझा एकटेपणा कुणा दिसला का कधी?
कवयीत्री एक जबरदस्त "मनकवडा" असल्याची जाणीव करून देतात या ओळी!
मनापासून आवडले हो!
देतोस हिम्मत कधी, तर कधी धैर्य… पाहून कुणाचा उसासा …
कधी साथ कुणा तुझी … तर कधी दिलासा …
अरे ! मरणालाही तू देतोस जगण्याची आशा …।
सर्वांनी याची नोंद घ्यावी असे एक आदर्श उदाहरण दिलेले आहे.
कवितेचा नायक अबोल असला तरी त्याच्या मनातल्या सर्व भावना स्पष्ट करणारी एकंदरीत खूप छान कविता आहे ही.
आपला मिपास्नेही: आयुर्हीत
सुंदर !!!
सुंदर !!!