समुद्र......!!
किनाऱ्यावर भेटतात सगळे जरी …
तुझा एकटेपणा कुणा दिसला का कधी
आकाशाचा रंग लेऊन घेतोस
तुझा रंग कधी पहिला का कुणी
हसतोस फक्त लाटांमध्ये ..... तू
रडतोस खोल आत कुठेतरी ………. !
रोज तसाच दिसतोस तू ,… अथांग…
प्रत्येक एकट्याला अरे , तुझाच संग ….
तुझ्या लाटांबरोबर ओठावरचे हसू …
तुझ्या क्षितीजाबरोबर डोळ्यातले आसू ….
पायाखालून निसटलेल्या रेतीचा आधार शेवटी …
हसतोस फक्त लाटांमध्ये …तू ,
रडतोस खोल आत कुठेतरी ……….
रोज नव्याने जगतोस तू ,… एकटा
सूर्याचा दाह झेलतो तू असा ....
जणू चंद्राच्या चांदण्यांचा सडा ,
तुझ्या मिलनाला …सगळेच पारखे…...
तूझ्या किनाऱ्यावरले घरकुलही पोरके ....
म्हणूनच का .......
हसतोस फक्त लाटांमध्ये …तू ,
रडतोस खोल आत कुठेतरी ……….
खळाळणारा तू… पण किती अबोल तुझी भाषा ,
वेड्यावाकड्या पाण्यातही दाखवतोस सरळ रेषा …
देतोस हिम्मत कधी, तर कधी धैर्य… पाहून कुणाचा उसासा …
कधी साथ कुणा तुझी … तर कधी दिलासा …
अरे ! मरणालाही तू देतोस जगण्याची आशा …।
तुझं सगळं तुझ्यापाशी , आमचंही सग्गळं तुझ्यापाशी
कारण ……
हसतोस फक्त लाटांमध्ये …तू ,
रडतोस खोल आत कुठेतरी ……….
-----फिझा.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3096
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
का बरं रडतो हा समुद्र ???
उत्तम भाव. खूप आवडले.
व्याकरणाच्या काही किरकोळ चुका
सेंटीमिटर काव्य!
खुप छान भावना ! जबरदस्त कविता !!!
सुंदर !!!