गरवारे कॉलेज मध्ये असताना आमचा एक छान ग्रूप जमला होता .बर्याच वर्षानी आम्हि काही दिवसापुर्वि एक मस्त गेट टुगेदर केल. खाण -पिण आणि गगन भेदी गप्पा . सगळे साधारण २८ ते ३० या वयोगटातले .या गप्पांमध्ये मला आणि माझ्या एका मित्राला एक गोष्ट strike झाली की आमच्या गप्पांमध्ये खूप वेळा 'आपल्या वेळेस अस नव्हत ' हे वाक्य अनेक वेळेला repeat झाल होत ……. आईला ! भर तिशीतच आम्हाला nostalgia आला कि काय ? मला अस वाटत होत की हा निवृत्त झाल्यावर , सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून झाल्यावर पोरटोर मोठी झाल्यावर येणारी हि गोष्ट असते . कुठेतरी काहीतरी चुकत आहे खास.
म्हणजे अस पाहा . तेंडूलकर निवृत्त होत आहे. फेडरर उतरणीला ला लागला आहे . रहमान रहमानच राहिला आहे का असा प्रश्न पडला आहे . बाळासाहेब पण गेले. फेकू आणि पप्पू शी relate होता येत नाही . तिशीतच घर घेतलि. गाड्या आल्या . परवाच असाच माझा एक मित्र मला फोन वर उसासून म्हणाला ," झाल सगळ करून . आता पुढच्या आयुष्यात काय करू यार? whats next ?" मुक्त अर्थव्यवस्थेचा खंदा समर्थक असणारा मी पण जागतिकीकरण च्या या बाय प्रोडक्ट मधून आलेल्या प्रश्नाने भोवंडून गेलो . कमी अधिक फरकाने मी पण या complex चा शिकार होतोच कि .
१९९१ नंतर देशात जे वादळी बदल सुरु झाले त्यात अनेक जुन्या गोष्टी वाहून गेल्या. २००० नंतर या बदलांची गती अजूनच वाढली. ८० च्या दशकात जन्मलेली पिढी हि त्या जुन्या काळाची पण साक्षीदार आणि या भोवंडून टाकणाऱ्या काळाची पण वाटेकरी . एक उदाहरण द्यायचं झाल तर आम्ही पोस्टाने टपाल पण पाठवली आहेत आणि आता तितक्याच सहजपणे इमेल संस्कृतीचे पण वाटसरू बनलो . आई वडिलांची सरकारी नौकरी च सुरक्षित आयुष्य पण जवळून बघितलं आणि आताच्या अति असुरक्षित नौकरया तर आम्हीच करत आहोत . आम्ही शाळा सुटल्यावर मैदानावर जाऊन उन्हातान्हात खूप खेळलो आहोत आणि video games पण जाम खेळलो आहोत. स्वतःच घर -आंगण ते बंदिस्त flat संस्कृती हा प्रवास पण झरझर झाला . त्या अर्थाने आमची पिढी हि 'transition ' मधली पिढी . जागतिकीकरणाचे सगळे फायदे ओरपून घेतल्यावर त्याचे तोटे नको असणारी पिढी . प्रचंड भोवंडून टाकणाऱ्या जगाप्रमाणे बदलताना आमची पिढी तिशीतच थकून गेली आहे . ऐन उमेदीतच आपल आता पुढे काय होणार या भीतीने कोकरासारखी दबून गेली आहे .
कुणी नोंद घेतली आहे कि नाही ते माहित नाही पण social networking वर गेल्यावर कुणी या पिढीतल्या लोकांची status बघितलीत तर जाणवेल की ती प्रचंड nostalgic अस्तात. आपल्या शाळा-होस्टेल-कॉलोनी चे group बनवून तिथे ती लोक (आम्ही ) ते दिवस किती भारी होते आणि आता कस सगळ बोर होत चाललय असल्या चर्चा करत अस्तात. दोन पूर्णपणे वेगळी जग पाहिल्याच्या धक्क्यातून हि पिढी कधी बाहेर येईल असे वाटत नाहि.
आपली पिढी हि नशीबवान आहे आणि तिने खूप बघितले /सोसले आहे हा फेनोमेना जागतिक आणि सार्वकालिक आहेच. पण स्थानिक, जागतिक बदल पचवून त्या बदलांचा भाग बनलेली पिढी हि एकमेवच . जागतिकीकरण मधून एकाकी करणाकडे चालणारा प्रवास या ८० च्या दशकात जन्मलेल्या पिढी बरोबरच संपेल बहुदा .
प्रत्येक पिढीला काही समस्यांचा सामना करावा लागतो. आम्हाला काही वेगळे करावे लागते असा दावा नाही पण lets give davil his credit . खूप पाहिलं रे तुम्ही पोरांनी लहान वयात असे कुणी मायेने तरी भरून पावल.
पण तरी तोच माझ्या मित्राने विचारलेला प्रश्न दशांगुळे व्यापून उरतोच . Whats Next ? कुठेतरी काहीतरी लोचा आहे खास.
वाचने
27013
प्रतिक्रिया
93
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचनखूण
आय टी व्यतिरिक्त...
आयटी हे एक प्रातिनिधिक उदा. म्हणून घेतले.
In reply to आय टी व्यतिरिक्त... by प्रभाकर पेठकर
खूप दिवसांनी एक चांगली चर्चा
सततच्या स्पर्धात्मक्तेने आता
हेच दुखणं
In reply to सततच्या स्पर्धात्मक्तेने आता by अग्निकोल्हा
कंटाळा आणि वैफल्य हा फक्त
In reply to हेच दुखणं by पैसा
मिस करणे ओके
In reply to कंटाळा आणि वैफल्य हा फक्त by अग्निकोल्हा
पण एखादी गोष्ट नेमकी शब्दबध्द
In reply to मिस करणे ओके by पैसा
८० च्या दशकातला आजकाल नोस्ताल्जिक होताना दिसतय
छान लेख.
आयला,
In reply to छान लेख. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
१. आली लहर केला कहर...
आणखी एक..
In reply to १. आली लहर केला कहर... by भिकापाटील
ऐन तिशीतच पुढे काय? असा
>> कंपू असेल पाठिशी,तर
अमोल उद्गिरकर
तिशीतच घर घेतलि. गाड्या आल्या . परवाच असाच माझा एक मित्र मला फोन वर उसासून म्हणाला ," झाल सगळ करून . आता पुढच्या आयुष्यात काय करू यार? whats next ?"सहज एक विचार मनाशी करून पहावा... माझ्या आजोबांचा प्रचंड मोठा वाडा जमीनजुमला होता. त्यामानाने वडिलांचे घर छोटे होते. माझे घर त्याहूनही लहान आहे. तर मागच्या पिढीच्यापेक्षा मी अधिक संपन्न कसा !आझाद इस्सा (जन्म १९८२) या
झक्कास.
In reply to आझाद इस्सा (जन्म १९८२) या by नगरीनिरंजन
Whats Next?
(No subject)
लेख्न आवडले, पटले
सहमत, छान ले़खन