डॉणपाट्या .. मला वाटलेलंच तु असं काहीतरी लिवशील .. मी बी नविन नविन ऑनसाइट आलेलो तेंव्हा हे सगळं अनुभवलेलं ... :) लिहीलय मस्त डिटेल मधी.... आणि तु जर्मन किबोर्ड वर टाइपल्यामुळं मला तुझा 'आदर' वाटतो
मला पु.ल. च्यां लेखनाची आठवण झाली.
आता शितल आणि डॉण्या .. *र्किट च्या डोळ्यावर येणार .... सावधान
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
लेख आवडला.
सगळीकडेच स्वत:च्या उत्कर्षासाठी जीवघेणी व गळेकापु स्पर्धा सुरु झाल्याने आजकाल कर्मचा-याचे मानसीक स्वास्थ म्हणावे एवढे स्थीर नाही. नेहमीच माणुस कसल्या ना कसल्या धांधलीत राहतो. आता या ओघाने "घाणेरडे अंतर्गत राजकारणही" येतेच, त्याचाही प्रचंड मानसीक ताण येऊन त्याचा परिंणाम त्याच्या अख्ख्या कुटुंबावर होतो ...
पैसा जरी मिळत असला तरी या एक्स्ट्रा मनी साठी आजकाल ऑफीसमध्ये उशीरापर्यंत थांबणे ओघानेच येते आणि ह्यात त्याच्या "कौटुंबिक जीवनाचा" नेहमीच बळी पडतो.
हे विशेष पटले.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
जियो डानराव :) .. मस्त लेख .. प्रवाही अन हलका फुलका.
आम्ही असतो इथे मस्त टेचात रहात पण तिकडे आमचे आईवडील "लेकरु कधी ८ दिवस निवांत गावाकडल्या घरात राहिल" ह्याची वाट बघत असतात आणि हो; फक्त वाटच बघत राहतात.कारण हे "कॉर्पोरेट कल्चर" त्याला एवढाही वेळ मिळु देत नाही. थोडक्यात काय तर "हा ही टेन्शन मुळे सदैव काळजीत, भेट होत नसल्याने बायका-मुले नाराज व आईवडीलांचे काळीज तुटण्याला तर माझाकडे उपमाच नाही" ...
सर्वांगिण विचार झालाय :)
एकदम फर्मास जमलीय लेखाची भट्टी.
कोणती वाक्यं उचलावीत आणि सोडावीत हेच कळेना मला. मस्त.
आंद्या म्हणतो तसा सर्वांगिण विचार झाला आहे.
आणि जरी जास्त पगार्=जास्त काम = वैयक्तिक आयुष्याचं खोबरं होणे हा निर्णय आपणच घेतला असला तरी मनाच्या कोपर्यात कुठेतरी सलणारी ही खंत बरोबर पकडलीयेस रे.
हापिसातलं घाणेरडं राजकारण, अप्रेझलसाठी चालणारी साठमारी, रेसिझम, कामानिमित्त परक्या गावी रहावं लागणं, कुटुंबियांना मुळीच वेळ देता न येणं....सगळं सगळं कसं बरोबर उतरवलय.
उत्तम लेखाबद्दल आपले हार्दिक हाबिणंदण!
-(९:३० ते ६:३० च्या चाकोरीतला, एम.एन.सी.त सरकारी पध्दतीने काम करणारा आणि बॉसला फाट्यावर मारणारा ) ध मा ल.
पण हा मार्ग आपणच निवडला आसल्याने त्याच्तील फायद्या- तोट्याची जबाबदारी ही आपलीच आहे. आयुष्यात काही तडजोडी ह्या कराव्याच लागतात. जसे जास्त पगार तर जास्त काम
हे पहा बंडोपंत, मी बोललो आहे, १०० रुपये मिळेल ह्या महिन्यापासुन. पोराची काळजी घ्या. त्याच्यासाठी गाईचे दुध लावा, तब्येतीला चांगले असते लहान पोराच्या. बाकी काही लागले तर सांगा. " असा आपुलकीचा सल्ला देऊन जात असे
असे साहेब आता 'कचेरी'तूनही दिसत नाहीत. असो.
प्रत्येक सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक स्थित्यंतरांमध्ये फायदे तोटे हे असतातच. माणसाचं मन इतकं स्वार्थी असतं की त्याला फायदे सगळे हवे असतात पण त्या बरोबर येणारे तोटे नको असतात. 'काट्याविना न हाती कधीही गुलाब यावा' ही निसर्गाची योजना. पण 'काट्याविनाच हाती नेहमी गुलाब यावा' ही मानवाची स्वार्थी भावना. इतरांपेक्षा जास्तीचा पगार, जास्तीचा मानमरातब मिळवायचा असेल तर आयुष्यही खडतर बनणारच. बढती मिळाली की जबाबदार्या वाढतात. कनिष्ठ पदावर असताना कचेरीची वेळ संपली की लगेच टेबल आवरून घरी पळता येत नाही. पायलटच्या (आणि विमानातील इतर स्टाफच्या) नोकरीत भरपूर पगार आणि मानमरातब मिळाला तरी आयुष्यावरील रोजची टांगती तलावार त्या बरोबरच येते.
अभिनेत्यांना, अभिनेत्र्यांना जे चंदेरी आयुष्य भोगायला मिळते तिथे त्यांनाही अनेक खडतर मार्गावरूनही वाटचाल करावी लागते.
आयुष्यातील उद्देश, अग्रक्रम ठरवावेत आणि मार्ग आखावा. साशंकता असेल तर परतीचे दोर कापून टाकू नयेत. निर्णय फिरविण्याचे धाडस दाखवावे.
छोटे डॉन,
लेख छान झाला आहे.
>पण आज "माणसाला" जास्त किंमत आली आहे.<
हे तितकेसे पटले नाही. पैशाला-व्यवसायाला किंमत अवास्तव आहे..आणि तो स्वार्थ साधायला कंपन्या माणसांची काळजी घेतात. बहुधा माणसाला हा शब्द अवतरणात ठेउन तुला तेच सुचवायचे असावे.
आणि कुटुंबियांना वेळ फक्त त्याच गावात नोकरी असताना देता येतो.. नोकरी दुसरीकडे असणे हे अनेक वर्षांची स्थिती आहे. कोकणातून-मुंबईत. आता इअतर शहरांतून पुण्यात-बंगळुरुमध्ये किंवा देशाच्या बाहेर. त्याला काय इलाज !
लेख छान.
--लिखाळ.
प्रतिक्रिया
सुरेख लेख
मस्त लेख आहे..
डान्या
छोटा डॉन.... मस्त जमलाय लेख्
छान!
सह्ही लिहिले आहेस
झकास डॉणेश
छान
हम्म ..
खोना
क्या बात
लेख मस्त
प्रामाणिक आणि वास्तवदर्शी
वावा..
मस्त लेख ....
लेख खूप
प्रिमा....
सुंदर लेखन..
वाह
असेच म्हणतो
शाबास रे भाल्या...
.
झक्कास आहे राव
मस्त
मस्त रे
काळ बदलला...
डॉन, उत्तम
छान