✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपाकरलक्षणे समास द्वितीय

स — सस्नेह, Wed, 01/01/2014 - 16:07
मिपाकरलक्षणे समास प्रथम | | श्री मिसळ पाव || | डूआयडीलक्षणनाम समास द्वितीय | मागा सांगितली लक्ष णे | मिपाकरांअंगी बाणे | आता ऐका सोंग घेणे | असोनी येक आयडी |१ | तयां नाव डुआयडी |नामे असती बहु फाकडी | खवतुनी लाडीगोडी | करिती सदा |२| घेई सोंगे कलह लावण्या | जुने स्कोर सेटल करण्या | अथवा उगा मजा बघण्या | आयड्यांची |३| बोली स्त्रीआयडींशी मधुर | मयतरी करण्या अति आतुर | प्रतिसादी जो बहु चतुर | तो येक डुआयडी |४| वाचाळ चोंबडा चौकस |कुटीळ अंतस्थ मानस | कुवत नसता भंकस | करी तो येक डुआयडी |५| शत्रुआयडीवरी खाय दाढा |संपादकांशी दीन बापुडा | निर्लज्ज ढोंगी पाषाण कोरडा | तो येक डुआयडी |६| काव्य साहित्य ना लेख |काथ्या कुटुनी करी राख | पाकृ चोरी काही येक | दुज्या संस्थळीची |७| संपादक-शत्रू लेखक-शत्रू | कवी-शत्रू कलाकार-शत्रू | बल्लव-शत्रू सुगरण-शत्रू | तो येक डुआयडी |८| आयडीचेनी अष्टगुणे | जया अंगी खोड्या बाणे | सकळांचे काढी उणे | तो येक डुआयडी |९| संयम राखो नेणे कदा | चेष्टा करू पाहे सर्वदा | हसून खिजवी आयडींस सदा | तो येक डुआयडी |१०| बहुतांचे मनींचे तुटे | उगा करी व्यनी खोटे | क्षण बरा क्षणां पालटे | तो येक डुआयडी |११| समस्तांशी मत्सर धरी | बहुतांचे पडीक धागे उकरी | छद्मनामे स्कोर सेटल करी | तो येक डुआयडी |१२| आनंदें आयडी बोलत जेथे | करी वटवट जाऊनी तेथे | खफ आणि खव बळेच मंथे | तो येक डुआयडी |१३| स्त्री आयडींशी सलगी देणे | कंपुंच्या संनिद्ध बैसणे | नव आयडींस उगा खिजवणे | तो येक डुआयडी |१४| काड्या सारुनी कौतुक पाहे | स्मायल्या सोडूनी निवांत राहे | बाजार उठवूनी आपण नोहे |तया गावीचा |१५| ऐसी लक्षणे डूआयडींची असती | बोलिली काही येक यथामती | सावधान असावे श्रोतीं | डूआयडींपासुनी |१६| पारखावी लक्षणे मनीं | आयडी -डूआयडींची दोनी | वावरावे संस्थळी धरुनी | खूण गाठ |१७| ज्ञानार्थ बोलिले लक्षण | असता मिपाकर विचक्षण | पामरें केले परिक्षण | क्षमा केली पाहिजे |१८| इति श्री मिपाबोधे लक्षण परिक्षण संवादे शब्द मेळ साधे समास समाप्त.

प्रतिक्रिया द्या
15281 वाचन

💬 प्रतिसाद (50)

झकास

चाणक्य
Wed, 01/01/2014 - 16:35 नवीन
जोरदार चालू आहे ....येउद्या अजून
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Wed, 01/01/2014 - 19:13 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

+100

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/02/2014 - 08:31 नवीन
और भी आने दो :) दिलीप बिरूटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

+१०००

दिपक.कुवेत
गुरुवार, 01/02/2014 - 12:14 नवीन
सॉल्लीड....अजुन येउ द्या (ओरीजनल आयडिचा) दिपक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाहाहा...

पिंगू
Wed, 01/01/2014 - 16:54 नवीन
हाहाहा...
  • Log in or register to post comments

जोरदार बॅटींग येउ दे अजुन.

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 01/01/2014 - 17:02 नवीन
जोरदार बॅटींग येउ दे अजुन.
  • Log in or register to post comments

मस्तच,,,,

मुक्त विहारि
Wed, 01/01/2014 - 17:30 नवीन
झक्कास. हहपुवा.
  • Log in or register to post comments

भारी

सुहास..
Wed, 01/01/2014 - 17:38 नवीन
भारी
  • Log in or register to post comments

भारीच!

आदूबाळ
Wed, 01/01/2014 - 17:50 नवीन
भारीच! तृतीय समास मिपावर रुसला कोपर्‍यात बसला अशा आयडींवर पाहिजे.
  • Log in or register to post comments

वाह वाह !!

सूड
Wed, 01/01/2014 - 17:54 नवीन
वाह वाह !! ;)
  • Log in or register to post comments

>>शत्रुआयडीवरी खाय दाढा

सूड
गुरुवार, 01/02/2014 - 14:53 नवीन
>>शत्रुआयडीवरी खाय दाढा |संपादकांशी दीन बापुडा | निर्लज्ज डोंगी पाषाण कोरडा | तो येक डुआयडी |६| हे वाचून मीनाक्षीची आठवण आली. कुठे असेल बिचारी देव जाणे!! *cray2*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आंदो

जेपी
Wed, 01/01/2014 - 17:59 नवीन
आंदो
  • Log in or register to post comments

स्नेहा, सॉलिड अभ्यास दिसतो

यशोधरा
Wed, 01/01/2014 - 18:02 नवीन
स्नेहा, सॉलिड अभ्यास दिसतो आहे! :)
  • Log in or register to post comments

लक्षणे

तिमा
Wed, 01/01/2014 - 18:03 नवीन
डु आयडीची लक्षणे आवडली. आता ज्येष्ठ सभासदांवर येऊ द्या.
  • Log in or register to post comments

मस्त ! और आंदो जल्दी जल्दी !!

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/01/2014 - 18:45 नवीन
मस्त ! और आंदो जल्दी जल्दी !!
  • Log in or register to post comments

ही लक्षणं वाचून आता 'डू आयडी'

आतिवास
Wed, 01/01/2014 - 18:59 नवीन
ही लक्षणं वाचून आता 'डू आयडी' ओळखता येतोय का ते पाहते :-)
  • Log in or register to post comments

मस्तच!

अनन्न्या
Wed, 01/01/2014 - 19:03 नवीन
दंडवत!
  • Log in or register to post comments

आपल्याकडून मूळ दासबोध ऐकणे

arunjoshi123
Wed, 01/01/2014 - 19:12 नवीन
आपल्याकडून मूळ दासबोध ऐकणे किती सुखद असावे!
  • Log in or register to post comments

छानच

राही
Wed, 01/01/2014 - 19:31 नवीन
डुआय्डीलक्षणनाम द्वितीय समास खूपच आवडला.
  • Log in or register to post comments

इथे पहावा

चित्रगुप्त
Wed, 01/01/2014 - 19:53 नवीन
ऐकता ड्वायडीची लक्षणे कुश्चिळ आणि विलक्षणे मारोन फाट्यावर विचक्षणे निद्रेसि भजावे /१/ अथवा घ्यावा तोचि छंद स्वताशी हासोन मंद मंद डुआयडी घेओन स्वच्छंद मिपावरी धुडगुसावे /२/ ऐसा निश्चयो जाहला डुआयडी पाहिजे घेतला तरी योजावे कोणत्या नामाला कळेना जाले /३/ श्रोते पुसती कोण नाम घेता साधेल अवघे काम वाचकासि फुटेल घाम कोण्या नामे /४/ आता असो हे बोलणे सत्वर दुआयडीस घेणे क्रियेवीण काही बोलणे वाचाळता /५/ स्त्रिआयडींची त्सुनामी वर्णिली चित्रगुप्ते नामी दुवा दिला येईल कामी 'इथे' पहावा /६/ http://www.misalpav.com/node/24707
  • Log in or register to post comments

बहोत खूब !

सस्नेह
Wed, 01/01/2014 - 22:13 नवीन
लगे रहो चित्रगुप्तभौ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

=))

पैसा
Wed, 01/01/2014 - 20:07 नवीन
लै भारी! थांबू नको. लिहीत रहा!!
  • Log in or register to post comments

फर्स्ट क्लास!!!!

इन्दुसुता
Wed, 01/01/2014 - 21:17 नवीन
फर्स्ट क्लास!!!!
  • Log in or register to post comments

अगाईगं. च्यायला त्या

arunjoshi123
Wed, 01/01/2014 - 21:20 नवीन
अगाईगं. च्यायला त्या अमेरिकेचा जीडीपी कितीही होवो, जोपर्यंत चित्रगुप्त साहेबांसारखे लोक आमच्या देशात आउटपुट देताहेत तोपर्यंत आमचेच जीवनमान उच्च.
  • Log in or register to post comments

__/|\__ आफाट मारलय धरून!

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/01/2014 - 21:21 नवीन
__/|\__ Image removed. आफाट मारलय धरून! पहिले सहा बाण तर इतके बेकार खोल मारलेत की क्या केहेने? Image removed. रक्तबंबाळ..रक्तबंबाळ केलय अगदी!
  • Log in or register to post comments

मस्त. मजा येतेय वाचायला.

कवितानागेश
Wed, 01/01/2014 - 21:43 नवीन
मस्त. मजा येतेय वाचायला.
  • Log in or register to post comments

ए अजून अजून....

मितान
Wed, 01/01/2014 - 22:10 नवीन
ए अजून अजून.... =))
  • Log in or register to post comments

ह्याह्याह्याह्या….

हतोळकरांचा प्रसाद
Wed, 01/01/2014 - 23:34 नवीन
:D :))
  • Log in or register to post comments

खतरनाक. आता दृष्ट्रांत

पाषाणभेद
गुरुवार, 01/02/2014 - 10:03 नवीन
खतरनाक. आता दृष्ट्रांत येवूद्यात.
  • Log in or register to post comments

छप्परफाड....

नाखु
गुरुवार, 01/02/2014 - 10:25 नवीन
वाचाळ चोंबडा चौकस |कुटीळ अंतस्थ मानस | कुवत नसता भंकस | करी तो येक डुआयडी |५| या आणि ईतर रचना म्हणजे: वेचूनी शब्द किमान| आशय फेडे तुमान| टवाळ घुसखोरांचा पर्दाफाश |डु-आयडींचा परामर्श ठायी ठायी |
  • Log in or register to post comments

लगे रहो चित्रगुप्तभौ !+१

जेपी
गुरुवार, 01/02/2014 - 10:27 नवीन
लगे रहो चित्रगुप्तभौ !+१
  • Log in or register to post comments

झकास्स्स !

मदनबाण
गुरुवार, 01/02/2014 - 10:27 नवीन
झकास्स्स !
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

गवि
गुरुवार, 01/02/2014 - 11:25 नवीन
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद..!! ( हॅ हॅ हॅ )
  • Log in or register to post comments

धन्यवादासाठी मा. संपादकांचे

सस्नेह
गुरुवार, 01/02/2014 - 15:15 नवीन
धन्यवादासाठी मा. संपादकांचे धन्यवाद ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

दंडवत ___/\___

नित्य नुतन
गुरुवार, 01/02/2014 - 11:27 नवीन
दंडवत ___/\___ *clapping*
  • Log in or register to post comments

झकासच

स्पा
गुरुवार, 01/02/2014 - 11:40 नवीन
झकासच
  • Log in or register to post comments

मस्त !

मारकुटे
गुरुवार, 01/02/2014 - 11:46 नवीन
मस्त !
  • Log in or register to post comments

व्वा...!!!

वासु
गुरुवार, 01/02/2014 - 11:55 नवीन
वा वा... वा वा
  • Log in or register to post comments

अगो.... सांभाळून हो!

प्यारे१
गुरुवार, 01/02/2014 - 12:15 नवीन
अगो.... सांभाळून हो! (परिक्षण अम्मळ गंडलंय. खर्‍या आयडींची लक्षणं देऊन डुआयडी म्हणताय काय? ;) )
  • Log in or register to post comments

खर्‍या आयडींची लक्षणं देऊन

सस्नेह
गुरुवार, 01/02/2014 - 14:40 नवीन
खर्‍या आयडींची लक्षणं देऊन डुआयडी म्हणताय काय?
नै रे प्यारेभौ, ते डुआयडी मेले अगदी बेमालूम आहेत बघ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हाही भाग जबरीच!!!

बॅटमॅन
गुरुवार, 01/02/2014 - 13:07 नवीन
हाही भाग जबरीच!!! पण काही थोडं रिपिटिशन दिसतंय, हा डुआयडीचा परिणाम तर न्हवे ;)
  • Log in or register to post comments

भारी हां...

यसवायजी
गुरुवार, 01/02/2014 - 13:39 नवीन
डुआय्ड्या लै वेंजॉय करत्यात काय?? म्या बी एक ऐडी घेतुच आता... ;)
  • Log in or register to post comments

जरा एकदा दत्तोबांवर पण लिहा

मारकुटे
गुरुवार, 01/02/2014 - 14:02 नवीन
जरा एकदा दत्तोबांवर पण लिहा
  • Log in or register to post comments

श्री गुरुदेव दत्त !

सस्नेह
गुरुवार, 01/02/2014 - 14:44 नवीन
तो अधिकार हभप प्यारेमहाराजांचा ! (ते एकटेच हात धुवून मागे लागलेत तर दत्तगुरु परेशान झालेत. आम्ही लागलो तर गुप्तच व्हायचे...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

दत्त दत्त

मारकुटे
गुरुवार, 01/02/2014 - 14:46 नवीन
दत्त दत्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

१४ नुकतंच उजाडलंय. का त्रास

प्यारे१
गुरुवार, 01/02/2014 - 15:49 नवीन
१४ नुकतंच उजाडलंय. का त्रास देताय गरीबाला? ३६३ दिवस जायचेत अजून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

जातील जातील दिवसच ते जातील

मारकुटे
गुरुवार, 01/02/2014 - 16:29 नवीन
जातील जातील दिवसच ते जातील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मुळात प्यारे१ हा हभप बाबा

सुहास..
गुरुवार, 01/02/2014 - 15:55 नवीन
मुळात प्यारे१ हा हभप बाबा सातारकर महाराजांचा ड्यु आयडी आहे ;)
  • Log in or register to post comments

नामा, नामा... असं कसं बोलतोस

प्यारे१
गुरुवार, 01/02/2014 - 17:44 नवीन
नामा, नामा... असं कसं बोलतोस रे???? हम्म्म! कळ्ळं का काय सांगितलं त्ये? बाबामहाराजांची काय ती रसाळ वाणी महाराजा. एकदा ऐकावं नि ऐकतच रहावं. राम क्रिष्ण हरि|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

मस्स्स्स्स्त!!!!

प्रीत-मोहर
Fri, 01/03/2014 - 09:36 नवीन
मस्स्स्स्स्त!!!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा