Skip to main content

झिंगूनी गुत्त्यात सार्‍या...

लेखक धन्या यांनी मंगळवार, 31/12/2013 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
गझलसम्राट सुरेश भटांची माफी मागून "थट्टीफस" निमित्त: झिंगूनी गुत्त्यात सार्‍या मी हो नाही बेवडा दाबले जरी चिकनचिली मज वाटे ते घेवडा कोण जाणे कोठुनी हे नवे दोस्त आले पुढे मी असा की जमे "असा" मित्रमेळा एव्हढा असे ही खिशात माझ्या चपटी औषधापरी हे कंट्रीचे प्रेम माझे देशभक्त मी हो केव्हढा कोणत्या इयत्तेत कळेना मी प्यावयास लागलो अन्‌ कुठे मित्र गेले पुढे मी विकत राहीलो वडा सांगती गुण माझे सारखे बायको अन्‌ चार पोरे नवरा माझा दारुडया अन्‌ बाप आमचा बेवडा न पिणार्‍यांच्या मध्यरात्री झिंगणारा स्वच्छंदी मी त्रास नको घरच्यांना म्हणून बाहेर राहतो एव्हढा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5763
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

ठ्ठो.. मस्तच..

वा वा धन्या क्या बात है! थट्टी फस ला अगदी 'शास्त्रापुरती' घ्यावी (आता उरलो शास्त्रापुरता)

=)) काय बे धन्या आँ.... लैच सौम्य व्हर्जन टाकलंस म्हणायचं. ;)

In reply to by प्रचेतस

लैच सौम्य व्हर्जन टाकलंस म्हणायचं.
अनाहितासारखं काही गण्याहिता वगैरे असतं तर तिकडे टाकलं असतं वर्जिनल व्हर्जन :D

In reply to by प्रचेतस

@लैच सौम्य व्हर्जन टाकलंस म्हणायचं.>>> =)) +१ टू अगोबा हत्ती =))
पण..
झिंगूनी गुत्त्यात सार्‍या मी हो नाही बेवडा दाबले जरी चिकनचिली मज वाटे ते घेवडा =)) हे लै खत्तरनाक! =))

बाहेरच्या फुट्कळ गिर्‍हाईकांना साधा "सपक" माल आणि "पेशल" फकस्त "अट्ट्लंना"* *अट्ट्लःअगदी टल्ली होणारे. वरिजनल माल शोकेस मध्ये बघीतलेला. "विंडो शॅआपर"

In reply to by सूड

पण तरीही विडंबन छान झालय. स्वगतः शी बाबा. हल्ली रोजच या सूडक्याशी सहमत व्हायची वेळ येतेय. ;)

मजा नाही आली. सूडने म्हटल्याप्रमाणे मीटर हुकलेलं आहे. त्याहीपेक्षा, विडंबन करायचं म्हणजे कवितेत जे आहे त्याऐवजी दारू, ग्लास वगैरे टाकायचं हे इतकं घिसंपिटं झालेलं आहे की आता कंटाळा आलेला आहे. तुमच्याकडून यापेक्षा अधिक मोठी अपेक्षा होती. (आठवा, सखूची पिशवी...) डांबुनी वीडंबनांना दारु-ग्लासी-पेग ला गुंतुनी गुत्त्यात राही. भाव का ना वेगळा?

In reply to by राजेश घासकडवी

तुमच्या मतांशी सहमत आहे. हे खुपच सपक विडंबन आहे. वर काहींनी म्हटल्याप्रमाणे मुळ विडंबन धारदार होतं, अगदी सखूची पिशवी फाडून टाकेल असं. काही कारणास्तव मी ते इथे देऊ शकत नाही. :)

In reply to by धन्या

मुळ विडंबन धारदार होतं, अगदी सखूची पिशवी फाडून टाकेल असं.
व्यनितून न पाठवता नुसतंच असं लिहायचं ही सरासर नाइन्साफी आहे. पाठवून द्या.

होउन जौदे आज ३१ आहे......

=))