रेजोल्यूशन
२०१३ आता संपेल. आपण हॅप्पी न्यू इयर म्हणत सगळ्यांना शुभेच्छा देऊ, पार्ट्या होतील, दारूचे पाट वाहतील, टीव्ही वर अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम प्रसारित होतील, त्याच धुंदीत जमल्यास गेल्या वर्षीचा जमाखर्च मांडत आपण पुढच्या वर्षाला आलिंगन देऊ. व्हॉट्सॅप्प, फ़ेसबुक, इत्यादी माध्यमातून जगाला विश केलं जाईल, विविध ‘रेजोल्यूशन्स’ केली जातील, जगाशी शेअर केली जातील. सगळं काही दरवर्षी सारखंच.
दुस-या दिवशी आपापल्या कार्यालयात जाण्याची तीच धडपड, तोच ट्रॅफिक, तोच हॉर्न चा ठणाणा, तेच बेशिस्त, बेछूट वाहन चालवणं, तीच ट्रेन ची गर्दी, तेच दुस-याला लोटून आपण पुढे जाणं, त्याच गर्दी ओथंबून वाहणा-या बसेस, तीच लळालोंबी, सगळं पुन्हा तेच असेल. मग त्यात असल्यास घराची काळजी असेल, कुणा आपल्याच्या आरोग्याचं, करियर चं, शिक्षणाचं टेन्शन असेल, आणि या सगळ्यामुळे आपण राहतो त्या देशाबद्दल, राज्याबद्दल, शहराबद्दल आपल्या मनात द्वेष, आणि तोंडात शिव्या असतील, एक अनामिक वैफल्य असेल.
आपल्यात एक विचित्र शर्यत वाढीला लागलीय. त्यात फक्त स्वत:चा विचार आणि दुस-याच्या पुढे जाण्याचं उद्दिष्ट या दोनच गोष्टी आहेत. हटवाद आहे, चंगळवाद आहे, शक्तिवाद आहे. विचार, तत्व, मूल्य, संस्कार, सामंजस्य, आदर, स्वाभिमान या गोष्टींना आता जागाच उरलेली नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून हे प्रतीत होतं. रस्त्यावरून गाडी चालवताना, दुस-या गाडीच्या पुढे नाक खुपसून जाण्यात आपल्याला श्रेष्ठता वाटते. आपण रस्त्यावर चालणा-या व्यक्तीला रस्ता क्रॉस न करू देता तिच्याकडे डोळे वटारून बघत आपली गाडी पुढे दामटतो. आपण उगीचच सिग्नल ला आपल्या पुढे उभ्या असलेल्या गाडीच्या पुढे जाण्यासाठी आपल्या गाडीचा जीव काढतो. दुकानात आपण आपल्या मापाचा शर्ट, ड्रेस मिळाला नाही अशा क्षुल्लक कारणावरून हकनाहक एखाद्या सेल्समनला चार शब्द ऐकवतो. बसमध्ये, ट्रेनमध्ये, एखाद्याचा चुकून पायावर पाय पडला, तर ‘डोळे फुटले का’, ‘आंधळा आहेस का’ अशा उक्त्या उच्चारायला लागतो. हा द्वेश, ही नकारात्मक उर्जा, ही ईर्ष्या आपण क्षणोक्षण घेऊन वावरत असतो आणि आपल्या वागण्यातून तिचा सतत प्रसार, आणि प्रचार करत असतो. कारण मात्र पडताळून पहात नाही. या उर्जेचा स्फोट मग कधी घरी, कधी ऑफिसात, कधी कुणा व्यक्तीवर तर कधी वस्तूवर होतो, आपण पर्यायाने स्वत:लाच त्रास देतो, आणि आपल्याच सुखाचा मार्ग क्लिष्ट करत जातो.
आपल्या मनात प्रश्नांचा एक झरा अव्याहत वाहत असतो. मी काय करू, मी कशाला करू, मला काय मिळणारंय, माझं काय जातं, मला कोण विचारतो, मलाच का, मी का ऐकून घेऊ, माझ्याच बाबतीत का आणि असे असंख्य प्रश्न. सगळ्यात एकच साम्य, ते म्हणजे ‘मी’. आपण किती स्वार्थी, आत्मकेंद्री विचार करतो याची आपल्याला खरोखर कल्पना नसते. आणि का न करावा; सगळेच तसां विचार करतात, आपण नाही केला तर आपणच मागे राहू हे आपलं स्वत:ला समजावणंही असतं. पण ते समजावणं हे पुन्हा तशाच वागण्याकडे नेणारं असतं.
चांगल्या सवयी, चांगली मूल्य जपायला किंवा ती आत्मसात करायला आपण इतके निरुत्सुक का असतो? आपल्यावर झालेले संस्कार, आपल्याला शाळेत शिकवलेली मूल्य, दिलेली थोरांची उदाहरणं, ही तेवढ्यापुरतीच होती का? परवा रस्त्यावर पडलेलं केळ्याचं साल उचलून रस्त्याच्या कडेला असलेल्या कच-याच्या डब्यात टाकल्यावर एक सहकर्मचारी मला म्हणाला, ‘उचलणारा एक असशील, टाकणारे लाखो आहेत’. हा विचार त्याच्या मनाला शिवलाही नाही की उचलणारे दुसरे आपण होऊ शकतो, किंवा व्हावं. पुढे काही मिनिटांनी गोळीचं वेश्टन त्यानेही रस्त्यावरच टाकलं होतं. एखाद्या रांगेत उभं असताना पुढे घुसण्याचा मोह आपल्याला होतोच होतो. आपल्या मधे कुणी घुसलेलं मात्र आपल्याला चालत नाही, आपण चरफडतो. ‘रांगेचा फायदा सर्वांना’ हा केवळ एक सुविचार म्हणून उरतो. रस्त्यावरचे सिग्नल आपण पाळत नाही, कुणी पाळले तर त्याच्यावर विनोद करून तो व्हॉट्सॅप्प वर फ़ॉरवर्ड करून हसतो जरूर. कारण आपण एकट्याने सिग्नल पाळून काय होतंय, सगळ्यांनी पाळला पाहिजे हे आपलं उत्तर असतं. पण हे सगळे म्हणजेच आपण; हा विचार केला जात नाही. बाईकने जाताना एखाद्या आजोबांना, आजीला, रस्ता क्रॉस करायचा असेल आणि आपण दोन क्षण बाईक थांबवली तर आपलं काहीच नुकसान होत नाही, उलट दिलाच तर ते आशीर्वाद देतील आपल्याला; पण आपण हे करत नाही. त्या दोन सेकंदानी आपण कुठे पुढे पोहोचणार आहोत हा विचार आपण करत नाही. समोरचं वाहन थांबलं, की सेकंदकाटा पुढे सरकायच्या आत आपल्या वाहनाचा हॉर्न चारदा वाजलेला असतो. आपण डाव्या-उजव्या, असेल त्या बाजूने त्या वाहनाच्या पुढे आपलं वाहन दामटण्याचा प्रयत्न करतो, पुढे ट्रॅफिक अजून वाढवतो, आपला जीवही धोक्यात घालतो, जाता जाता त्या अडलेल्या वाहनाचालकाला शिव्या घालतो, पण त्याची गाडी बंद पडलीय का, किंवा त्याला काही झालंय का, हा साधा विचारही करत नाही. का? इतकी कसली घाई असते आपल्याला? एखाद्या ति-हाईताशी सार्वजनिक ठिकाणी बोलताना आपण तलवार उपसूनच बोलतो. ‘ ‘अरे’ ला ‘कारे’’ हे समीकरण आहे आपलं. पण नम्रपणे बोललं तर समोरचाही ऐकतो, आणि नम्रपणे, प्रेमाने बोललं तर आपण छोटे होत नाही, हे शाळेत शिकवलेलं तत्व शाळेच्या वहीतच विरलेलं असतं.
सामंजस्य दाखवणं, आदर देणं, म्हणजे कमीपणाचं नाही, हे आपण आधी समजलं पाहिजे. हे एक दुष्टचक्र आहे. आणि हा संयमाचा अभाव, हा राग, हे आत साठलेलं वैफल्य ह्या त्या दुष्टचक्राच्या व्युत्पत्ती आहेत. आपण हे दुष्टचक्र कुठेतरी थांबवू शकतो. याचे दूरगामी परिणाम वाईट आहेतच, पण प्रत्येक क्षणी स्वत:वर आपण यामुळे किती ताण देतो, त्यातून काय काय व्याधी होऊ शकतात हा विचार आपण आपल्याशीच करायला हवा. एखादी गोष्ट मिळायला किंवा घडायला हवी, तर त्यासाठी प्रयत्न करायचे, की ती त्या च्या त्या वेळी मिळत नाही म्हणून चिडून त्याचा राग आपल्या इतर वागण्यात व्यक्त होऊ द्यायचा आणि अनेकांना उगीचच दुखवायचं हे ठरवावं. आपण नियम पाळले, म्हणून आपण भ्याड ठरत नाही आणि ते मोडले म्हणून शूर ठरत नाही, हे आधी समजून घेतलं पाहिजे. उलट नियम पाळून आपण आणखी चार जणांना ते पाळायला उद्युक्त करावं, आपल्या आजूबाजूच्यांसमोर, पुढच्या पिढीसमोर चांगलं उदाहरण ठेवावं, हे मनाला पटवायला हवं. वर्चस्व गाजवूनच मोठं होता येतं, असं नाही. सामोपचाराने वागून एकाच वेळी अनेकांच्या मनात आपण मोठे होतो, आणि तेच खरं मोठेपण असतं. रस्त्यावर कचरा टाकणे, थुकणे, हे करून काय मिळतं, आणि तोच कचरा आपण व्यवस्थित कच-याच्या कुंडीत नेऊन टाकला, तर काय बिघडतं याचा आढावा घ्यायला हवा. थोडा आळस बाजूला ठेवायला हवा.
आपण हे सगळं करत नाही, आणि मग परदेशांच्या तुलनेत आपल्या देशाला नावं ठेवतो. आपला देश सध्या एका बदलाची वाट बघतोय. नवीन वर्ष बदलाचं असेल असे वारे वाहत आहेत. आपण सगळे सुद्धा एकत्रितपणे बदलू शकतो, एकमेकांना चांगल्या बदलात सामील करून घेऊ शकतो. वुई कॅन ऑल बी गुड मेन अॅण्ड विमेन. काहीही करताना आपण एक क्षणभर विचार करूया. योग्य अयोग्य चा ताळेबंद मांडूया. चांगलं वागूया. चांगल्या सवयी लावूया, समोरच्याला मान देऊया, आपणही तो कमवूया. ति-हाईत का असेना, त्याच्याशी हसून बोललो तर बिघडलं कुठे? हसून बोलूया. नियम पाळूया. सौजन्य, सामंजस्य, आपुलकी, माणुसकी, एकता, प्रामाणिकपणा, ही सगळी मूल्य रंगांसारखी आहेत, त्यांना एकत्र आणून आपल्यासकट आपल्या समाजाचं, गावाचं, देशाचं एक सुंदर चित्र आपण बनवूया. आपण माणसं आहोत, माणसांसारखं वागूया. २०१४ साठी; नव्हे नेहमीसाठी, एखादं रेजोल्यूशन असंही करूया. तेंव्हा, काय बरोबर आहे, आणि काय चूक; तुम्हीच विचार करा.
आपण हे सगळं करत नाही, आणि मग परदेशांच्या तुलनेत आपल्या देशाला नावं ठेवतो. आपला देश सध्या एका बदलाची वाट बघतोय. नवीन वर्ष बदलाचं असेल असे वारे वाहत आहेत. आपण सगळे सुद्धा एकत्रितपणे बदलू शकतो, एकमेकांना चांगल्या बदलात सामील करून घेऊ शकतो. वुई कॅन ऑल बी गुड मेन अॅण्ड विमेन. काहीही करताना आपण एक क्षणभर विचार करूया. योग्य अयोग्य चा ताळेबंद मांडूया. चांगलं वागूया. चांगल्या सवयी लावूया, समोरच्याला मान देऊया, आपणही तो कमवूया. ति-हाईत का असेना, त्याच्याशी हसून बोललो तर बिघडलं कुठे? हसून बोलूया. नियम पाळूया. सौजन्य, सामंजस्य, आपुलकी, माणुसकी, एकता, प्रामाणिकपणा, ही सगळी मूल्य रंगांसारखी आहेत, त्यांना एकत्र आणून आपल्यासकट आपल्या समाजाचं, गावाचं, देशाचं एक सुंदर चित्र आपण बनवूया. आपण माणसं आहोत, माणसांसारखं वागूया. २०१४ साठी; नव्हे नेहमीसाठी, एखादं रेजोल्यूशन असंही करूया. तेंव्हा, काय बरोबर आहे, आणि काय चूक; तुम्हीच विचार करा.वर्गीकरण
प्रतिक्रिया
अप्रतीम लिहील आहेस रे,
थेंक्स!
+१ अप्रतिमच!
सुंदर विचार ! ते दुसरा काय
+१
+१
मस्त लेख...
अशा रेजुलेशनचीच आज आपल्याला
छान लिहिलय. विचार आवडले.
धन्यवाद
वेल्लाभट गुरुजी,
जे लोक असे वागत आहेत त्यांचा
आवडले...
उत्कृष्ट विचार
अगदी...
@बिजुरिया : खरंच हो...
आपला हा गृप मला JOIN करावयास
फेसबुकात Do The Right Thing
@ I was happy having Done The
वा..वा..
सुंदर विचार.
@इन्दुसुता, वाटाडया....
मस्त...
फार छान मांडलेत विचार
मौलीक विचार.
स्वयंशिस्त/स्वावलंबन ही...
अगदी शब्दाशब्दाशी सहमत.
प्रचंड आवडलं
खरयं... हल्ली तर मला माझाच
अप्रतिम... !!!
सुहास, मदनबाण, दीपक, नादखुळा,
सुंदर
फारच छान लेख