✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मुंबई कट्टा

स
सुबोध खरे यांनी
Sat, 12/14/2013 - 18:26  ·  लेख
लेख
आजच सकाळी मुक्त विहारींकडून असे कळले कि श्री इस्पिकचा एक्का भारतात आले आहेत आणी पुण्यात वास्तव्याला आहेत. आपण त्यांना भेटूया असे आम्ही ठरविले आहे. त्यावर मी त्यांना दूरध्वनी( हा मुक्त विहारीनीच दिला) केला आणी ते शनिवार दिनांक २१ डिसेम्बर रोजी परत विदेशी जात आहेत. त्यांचे विमान सायंकाळी ७.३० ला सुटत आहे आणी त्यांना ४.३० ला चेक इन करायचे आहे म्हणून आम्ही त्यांना सहार विमानतळाजवळ एखाद्या हॉटेल मध्ये साधारण २ वाजता भेटायचे ठरविले आहे. ज्या मित्रांना तेथे येण्याची इच्छा आहे त्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. खर्च स्वतःचा स्वतःने करायचा आहे. (प्रायोजक मिळाला तर सोन्याहून पिवळे) या वेळेत आणी स्थळात बदल होणे नाही. कारण एक्का साहेब थोडा वेळ अगोदर येत आहेत आणी त्यांना चार वाजल्यानंतर थांबणे शक्य नाही. तरी सर्वांनी अगत्य येण्याचे करावे. वय वजन उंची आकार लिंग जात धर्म देश याचे कोणतेही बंधन नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
23549 वाचन

💬 प्रतिसाद (129)

प्रतिक्रिया

तुमचं ते भ्रमभरीत खाऊन संपलं

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 14:31 नवीन
तुमचं ते भ्रमभरीत खाऊन संपलं की सांगा हां पिरा आज्जी. पुढची डिश घेऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अनाहीतांच्या नावाने गळे

पियुशा
गुरुवार, 12/26/2013 - 14:52 नवीन
अनाहीतांच्या नावाने गळे काढ्णार्यात तु पण सामील झालास का रे ब्याट्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नाही हो, इतकी डेरिंग कुठे

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 14:55 नवीन
नाही हो, इतकी डेरिंग कुठे आमची. इथं राहायचंय ना शेवटी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

काही का असेना. लैच एन्टरटेन

अभ्या..
गुरुवार, 12/26/2013 - 14:56 नवीन
काही का असेना. लैच एन्टरटेन करतात ह्या बाई. मस्त मज्जा येते. येउ दया अजुन. :-D :-D . . (ह्या अधिकृत प्रवक्त्या आहेत काय अनाहीताच्या? असल्या तर बरोबर आहे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हा हा हा अगदी अगदी

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 14:58 नवीन
हा हा हा अगदी अगदी :D बाकी अधिकृत प्रवक्त्या असल्यास माहिती नै पण स्वयंघोषित आहेत खर्‍या. ब्रोब्र कं पिरा तै/आज्जी/बाळ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

काकू राह्यलं !!

सूड
गुरुवार, 12/26/2013 - 15:02 नवीन
काकू राह्यलं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अरे हो की!! धन्स हो सुडक्या.

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 15:04 नवीन
अरे हो की!! धन्स हो सुडक्या. बाकी काकू हा शब्द अगदी त्रिगुणात्मक आहे खरा . काकू हे संबोधन, काथ्याकूटचा शॉर्टफॉर्म अन का-कू करणे असे तीनही गुण लागू होतात त्याला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हॉय रे हॉय!

पैसा
गुरुवार, 12/26/2013 - 15:09 नवीन
(ह्या अधिकृत प्रवक्त्या आहेत काय अनाहीताच्या? असल्या तर बरोबर आहे )
चुकून पण बरोबर बोल्लास! पिरा आगे बढो. हम तुम्हारे साथ है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मिपासंपादकांना आगीत तेल

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 12/26/2013 - 15:28 नवीन
मिपासंपादकांना आगीत तेल ओतायला परवानगी आहे का? +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हो हो!

पैसा
गुरुवार, 12/26/2013 - 15:37 नवीन
मी तर सगळ्यांसारखीच मिपा सदस्य. तस्मात काड्यांचे भारे आणि केरोसिनची बाटली घेऊन बसलेय कीबोर्डाच्या बाजूला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

बापरे ! असं इथे उघडपणे

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 12/26/2013 - 15:42 नवीन
बापरे ! असं इथे उघडपणे लिहीलंत तर पोलिस येतिल ना स्फोटक पदार्थांच्या साठ्याचा शोध घेत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अगदीच्च चुकीचा प्रश्न!

प्यारे१
गुरुवार, 12/26/2013 - 15:39 नवीन
अगदीच्च चुकीचा प्रश्न! जाताजाता : निखील वागळे संपादक आहेत आयबीएन लोकमत चे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आता काही लेख आले असतिल

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 12/26/2013 - 15:46 नवीन
आता काही लेख आले असतिल आक्रस्ताळे आणि जन्मजात राज्कीय विनोदाने ओतप्रोत भरलेले. पण म्हणून आयबीएन लोकमत आणि मिपा ची तुलना ! ना ना !! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

राजकीय शहाणपण अथवा चतुराई

प्यारे१
गुरुवार, 12/26/2013 - 15:56 नवीन
राजकीय शहाणपण अथवा चतुराई म्हणतात ती हीच्च का? पळ काढल्या गेला आहे. ;) उगाच अवांतर बरंका: संपादकांचं काम राहून गेलेल्या मुद्द्यांवर लक्ष वेधून घेऊन त्यावर 'चर्चा' घडवणं हे असतं. काही संपादक त्यांचं 'हे' काम नीट करत नाहीत ही तक्रार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

तो काड्यांचा ढीग आणि ती

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 12/26/2013 - 16:04 नवीन
तो काड्यांचा ढीग आणि ती रॉकेलची बाटली यांचा ताबा घेतलेला दिसतोय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अह्म्म अहम्म.... कट्टा वॄतांत

पियुशा
गुरुवार, 12/26/2013 - 15:32 नवीन
अह्म्म अहम्म.... कट्टा वॄतांत भलतीकडेच चाललेला आहे याची क्रुपया नोंद घ्यावी नाहीतर एकतर धाग्याचे " कश्मिर" तरी होइल नै तर पंख तरी लागतील धाग्याला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

.............................

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/27/2013 - 00:02 नवीन
Image removed. ................................................

चालू द्या!

=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

झाली साफसफाई? काही काही

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 15:48 नवीन
झाली साफसफाई? काही काही म्हणून ठेवू नका तुम्ही ;)
  • Log in or register to post comments

त्या बॅटमॅन च्या नादाला कशाला

युगन्धरा@मिसलपाव
गुरुवार, 12/26/2013 - 15:51 नवीन
त्या बॅटमॅन च्या नादाला कशाला लागतात कोण जाणे ????
  • Log in or register to post comments

हो ना. लग्न झाले म्हणजे

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 15:54 नवीन
हो ना. लग्न झाले म्हणजे आभाळाला हात टेकले असे मानणार्‍यांनी उगीच कुणाच्या नादी कशाला लागावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युगन्धरा@मिसलपाव

तु तरी काड्या का करतोस रे

युगन्धरा@मिसलपाव
गुरुवार, 12/26/2013 - 15:57 नवीन
तु तरी काड्या का करतोस रे बॅटया?
  • Log in or register to post comments

आहो युगन्धरा तै, मी

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 15:58 नवीन
आहो युगन्धरा तै, मी काड्याबिड्या काही करत नाही हो. अतिशय साधा सरळ सज्जन मुलगा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युगन्धरा@मिसलपाव

अतिशय साधा सरळ सज्जन मुलगा आहे.

मुक्त विहारि
गुरुवार, 12/26/2013 - 16:35 नवीन
+ १०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धन्यवाद मुवि सर!!

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 16:43 नवीन
धन्यवाद मुवि सर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

वाटत तर नाही तसे दादा.....

युगन्धरा@मिसलपाव
गुरुवार, 12/26/2013 - 16:02 नवीन
वाटत तर नाही तसे दादा..... असो धागा कोणता आणि विषय चाललाय कोणता. संपादकांनी जरा लक्ष घालावे.
  • Log in or register to post comments

अरारा!

भाते
गुरुवार, 12/26/2013 - 17:51 नवीन
धाग्याचे काश्मिर झाले!
  • Log in or register to post comments

अरेरे इनो घ्यावे

विशाखा राऊत
Fri, 12/27/2013 - 01:18 नवीन
अरेरे इनो घ्यावे :)
  • Log in or register to post comments

सारखे सारखे तेच सोल्युशन

अभ्या..
Fri, 12/27/2013 - 01:24 नवीन
सारखे सारखे तेच सोल्युशन देण्यापेक्षा तुम्हीच जरा 'इनो'दाने घ्यावे. वावडे नसल्यास ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा राऊत

@'इनो'दाने घ्यावे. >>>

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/27/2013 - 14:55 नवीन
@'इनो'दाने घ्यावे. >>> =)) कोटि कोटी प्रणाम! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा