Skip to main content

मुंबई कट्टा

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 14/12/2013 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
आजच सकाळी मुक्त विहारींकडून असे कळले कि श्री इस्पिकचा एक्का भारतात आले आहेत आणी पुण्यात वास्तव्याला आहेत. आपण त्यांना भेटूया असे आम्ही ठरविले आहे. त्यावर मी त्यांना दूरध्वनी( हा मुक्त विहारीनीच दिला) केला आणी ते शनिवार दिनांक २१ डिसेम्बर रोजी परत विदेशी जात आहेत. त्यांचे विमान सायंकाळी ७.३० ला सुटत आहे आणी त्यांना ४.३० ला चेक इन करायचे आहे म्हणून आम्ही त्यांना सहार विमानतळाजवळ एखाद्या हॉटेल मध्ये साधारण २ वाजता भेटायचे ठरविले आहे. ज्या मित्रांना तेथे येण्याची इच्छा आहे त्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. खर्च स्वतःचा स्वतःने करायचा आहे. (प्रायोजक मिळाला तर सोन्याहून पिवळे) या वेळेत आणी स्थळात बदल होणे नाही. कारण एक्का साहेब थोडा वेळ अगोदर येत आहेत आणी त्यांना चार वाजल्यानंतर थांबणे शक्य नाही. तरी सर्वांनी अगत्य येण्याचे करावे. वय वजन उंची आकार लिंग जात धर्म देश याचे कोणतेही बंधन नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23605
प्रतिक्रिया 129

प्रतिक्रिया

आता 'अनाहिताचे' (असेच कांहीतरी नांव आहे नं?) 'महिला मंडळी' कट्टे सुरु होतील.

In reply to by बॅटमॅन

कट्टा करून वृत्तांत टाकला तर कोणीतरी येऊन सांगायचा, "ह्या:, हा काय कट्टा आहे? आम्ही कसे तेव्हा पिऊन रात्रभर पडत होतो!"

In reply to by पैसा

बस का? आमच्या कट्ट्यात कधी असं झालेलं दिसलंय का? ;)

In reply to by प्रचेतस

तुम्ही ताक पिता. पडताय कसले?

In reply to by बॅटमॅन

कमेंटांची भिती माझं खेटर.. आणि स्वतंत्र विभाग काढण्यासाठी जेव्हा पुरूष लोक एका धाग्यावर बोंबा मारत होते तेव्हा तुम्हाला नक्की कुणाच्या कमेंटांची भिती वाटत होती?

In reply to by बॅटमॅन

"निघता विषय बालिकांचा.. पहा येई लगोलग कोण.. लागता विरोधी सुर स्त्रिद्वेष्ट्यांचा.. नाक खुपसे ब्याटम्यान"... हेच का?

In reply to by पिलीयन रायडर

आम्ही स्त्रीद्वेष्टेविरोधी असल्याचे कबूल केल्याबद्दल धन्यवाद! बाकी तो नाकावरचा शेंड्यावरील राग इथूनही दिसतोय बरे =))

In reply to by पिलीयन रायडर

मतप्रदर्शन केले असते. पण उगाच संपादिकांची कामे का वाढवा, म्हणून थत्ते चाचा व्हायचे ठरवले आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

असे व्हायचा प्रयत्न करतो आहे पण अजून वास्तव स्वीकारण्याइतका निगरगट्टपणा नै आलेला.

In reply to by पिलीयन रायडर

पिरा ताई, लोकांना कुणाच्या कॉमेंटची भीती वाटत नव्हती तर GOLF ( GENTLEMEN ONLY LADIES FORBIDDEN ) अशा प्रतिसादासाठी स्वतंत्र विभाग काढावा असे काथ्या कूट चालले होते. अजूनतरी आपली मिपा संस्कृती स्त्रियांसमोर सभ्य शब्दात बोलावे असे सांगते. आता तुम्ही फोडून सांगा म्हणताय म्हणून सांगितले.

In reply to by सुबोध खरे

खरे काका.. तोच तर मुद्दा आहे ना.. भिती हे कारण नाहीये "अनाहिता" च्या निर्मिती मागे.. (आणि तसंही, मि.पा वरच्या बायका कमेंटस ना भितील??) जसं तुम्हाला तुमचे विषय आहेत, तसे आम्हाला आमचे.. आम्हालाही आमच्या असभ्य गप्पा मारायच्या असतील तर!? सो तुम्हाला तुमचा विभाग हवा की नको आणि का हवा ह्यावर बायका चर्चा करणार नाहित (ह्या उलट अनाहिता बद्दल मात्र पुरूषांनी पण हिरीरीने चर्चा केल्या होत्या.. असो..).. पण तुमचा विभाग निघालाच तर त्या मागची कारणं आम्हाला नक्की माहीती असतील.. "घाबरले म्हणुन स्वतःचा विभाग काढला रे.." असले फालतु मुद्दे आम्ही काढणार नाही!

In reply to by पिलीयन रायडर

पिरा ताई अहो बैट मैन चे अजून लग्न झालेले नाही त्यामुळे त्याला बायकांच्या गप्पात कुतूहल असणारच. एकदा लग्न होउदे म्हणजे मग त्या काय गप्पा मारतात त्याबद्दल काहीच स्वारस्य राहणार नाही. बायकांचे आवडते विषय म्हणजे मुले, दागिने किंवा खरेदी आणि मोलकरीण. एकदा त्याला कळूदे मग पहा

In reply to by सुबोध खरे

कुतूहल तादृश कै नै. किमानपक्षी अनाहितामध्ये प्रवेश मिळवावा इथवर तर नाहीच नाही. अन लग्न न झाले तरी बर्‍याच पोरींचं संभाषण ऐकलं आहे अन महिलांचंही. तेवढा विदा पुरेसा आहे =))

In reply to by पिलीयन रायडर

अनुभव नक्की कशाचा नाही आणि नक्की कशाचा अनुभव इथे रिलेव्हंट आहे पिरा आज्जी? बैकांचे बोलण्याचे विषय काय असतात हे कळायला लग्न व्हावं लागत असेल तर तो पुरुष दुर्दैवी समजला पाहिजे. लग्न झालं नाही याचा अर्थ आमच्या आसपास स्त्रीजात वावरत नाही असा होत नाही हे तुम्हांस कळेल तो सुदिन. भ्रमाच्या भोपळ्याचे भरीत करून खा जावा जरा =))

In reply to by पिलीयन रायडर

जर तसे असेल तर माजघरातल्या गप्पांना माजघरातल्या गप्पा म्हणण्याने जळजळ क्कॉ बर्रे होत्तेय ;)

In reply to by बॅटमॅन

कुणाला जळजळ होतेय? माजघर हा शब्द आम्हाला नाही बुवा टोचत.. त्यात वाईट ते काय? आणि हो.. बालसंगोपन, झबल्यांचे डिझाईन, नट्टापट्टा हे ही आमचे लाडके विषय आहेत.. आम्हाला जे आवडतं त्या बद्दल आम्ही खुष आहोत.. आणि माजघरात बसुन निवांत गप्पा मारणेही आमचा आयुष्याचा महत्वाचा भाग आहे.. ह्यात जळजळ कुठे आहे दादा?

In reply to by पिलीयन रायडर

ते "हो आहेत या माजघरातल्या गप्पा...तुमाला प्राब्ळम??" वैग्रे वाचून अंमळ जळका वास आला हो तै. बाकी जळजळ होत नाही ना, मग उत्तमच आहे. तेवढाच इनो वाचला..काय?

In reply to by पिलीयन रायडर

काही का असेना. लैच एन्टरटेन करतात ह्या बाई. मस्त मज्जा येते. येउ दया अजुन. :-D :-D . . (ह्या अधिकृत प्रवक्त्या आहेत काय अनाहीताच्या? असल्या तर बरोबर आहे )

In reply to by अभ्या..

हा हा हा अगदी अगदी :D बाकी अधिकृत प्रवक्त्या असल्यास माहिती नै पण स्वयंघोषित आहेत खर्‍या. ब्रोब्र कं पिरा तै/आज्जी/बाळ?

In reply to by सूड

अरे हो की!! धन्स हो सुडक्या. बाकी काकू हा शब्द अगदी त्रिगुणात्मक आहे खरा . काकू हे संबोधन, काथ्याकूटचा शॉर्टफॉर्म अन का-कू करणे असे तीनही गुण लागू होतात त्याला =))

In reply to by अभ्या..

(ह्या अधिकृत प्रवक्त्या आहेत काय अनाहीताच्या? असल्या तर बरोबर आहे )
चुकून पण बरोबर बोल्लास! पिरा आगे बढो. हम तुम्हारे साथ है!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मी तर सगळ्यांसारखीच मिपा सदस्य. तस्मात काड्यांचे भारे आणि केरोसिनची बाटली घेऊन बसलेय कीबोर्डाच्या बाजूला!

In reply to by पैसा

बापरे ! असं इथे उघडपणे लिहीलंत तर पोलिस येतिल ना स्फोटक पदार्थांच्या साठ्याचा शोध घेत !

In reply to by प्यारे१

आता काही लेख आले असतिल आक्रस्ताळे आणि जन्मजात राज्कीय विनोदाने ओतप्रोत भरलेले. पण म्हणून आयबीएन लोकमत आणि मिपा ची तुलना ! ना ना !! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

राजकीय शहाणपण अथवा चतुराई म्हणतात ती हीच्च का? पळ काढल्या गेला आहे. ;) उगाच अवांतर बरंका: संपादकांचं काम राहून गेलेल्या मुद्द्यांवर लक्ष वेधून घेऊन त्यावर 'चर्चा' घडवणं हे असतं. काही संपादक त्यांचं 'हे' काम नीट करत नाहीत ही तक्रार आहे.

In reply to by बॅटमॅन

अह्म्म अहम्म.... कट्टा वॄतांत भलतीकडेच चाललेला आहे याची क्रुपया नोंद घ्यावी नाहीतर एकतर धाग्याचे " कश्मिर" तरी होइल नै तर पंख तरी लागतील धाग्याला :)

In reply to by युगन्धरा@मिसलपाव

हो ना. लग्न झाले म्हणजे आभाळाला हात टेकले असे मानणार्‍यांनी उगीच कुणाच्या नादी कशाला लागावे?

वाटत तर नाही तसे दादा..... असो धागा कोणता आणि विषय चाललाय कोणता. संपादकांनी जरा लक्ष घालावे.

धाग्याचे काश्मिर झाले!