अर्थक्षेत्र भाग - ३ - (ट्रेडिंगपद्धतीची ओळख.)
===================================================================================
अर्थक्षेत्र भाग - १ - (शेअर मार्केटमधला पहिला लॉस )
अर्थक्षेत्र भाग - २ - (पहिल्या लॉस नंतरची सुरुवात )
===================================================================================
ट्रेडर म्हणजे जो ट्रेड करतो तो आणि ट्रेड म्हणजे "खरेदी आणि विक्री." खरेदी केलेली वस्तू जो पर्यंत तुम्ही विकत नाही तो पर्यंत ट्रेड कम्प्लीट झाला असे म्हणता येणार नाही. थोडक्यात देवाण आणि घेवाण म्हणजे ट्रेड.
आर्थिकदृष्ट्या कमाल फायदेशीर आणि समाधानकारक ट्रेडिंगकरिता प्रत्येकाने प्रथम कोणत्या पद्धतीचे ट्रेडर होणे योग्य आहे ते तपासले पाहिजे. त्यासाठी आपले व्यक्तिमत्व, आपला वेळ आणि आपले भांडवली गुंतवणूक किती असली पाहिजे ते जाणून घेणे आवश्यक आहे. आपली रिस्क घेण्याची क्षमता लक्षात घेऊनच ट्रेडर्स एक किंवा अधिक विभागान्द्वारे आर्थिक वृद्धी लक्ष केंद्रित करतात.
- वृद्धीकेंद्रित ट्रेडिंग. : ह्या प्रकारात त्या कंपन्या विचारात घेतल्या जातात ज्या स्वतःच्या वाढीबरोबरच नफ्याचा समतोलही ठेऊ शकतात. अशा वेळी सामान्यतः ज्या कंपन्यांमध्ये जलद वाढ होण्याची शक्यता आहे अशा नवीन नवीन कंपन्यांचा विचार हे व्यापारी करतात. जशी कंपनीची आर्थिक किंवा सर्वांगीण वाढ होईल तशी वेळपरत्वे शेअरची किंमत आणि पर्यायाने व्यापार्याचा फायदा वृद्धिंगत होत जातो. आयपीओद्वारा केलेली गुंतवणूक वृधीकेंद्रित गुंतवणूक किंवा व्यापाराचे उत्तम उदाहरण आहे. त्याद्वारे उत्तम नफा मिळण्याची शक्यता असते पण ते शेअर्स येताना अपयशाचा धोकासुद्धा घेऊन येतात. जे व्यापारी वृध्दीकेंद्रित व्यापारनीती अवलंबतात त्यांना आपल्या अन्तः प्रेरणेवर विश्वास ठेऊन निर्णय घेणे जास्त महत्वाचे असते.
- किंमत किंवा भाव अधिष्ठित व्यापारनीती. : ह्या प्रकारात व्यापारी त्या शेअर्सच्या शोधात असतात ज्यांचा बाजारभाव वाजवीपेक्षा कमी (UNDERVALUED)असतो आणि कंपनीची आर्थिक तब्येत अतिशय उत्तम असल्याने भविष्यात त्याचा बाजारभाव वाढण्याची शक्यता अधिक असते. असे शेअर्स शोधण्यासाठी ज्या कंपनीचे शेअर्स बाजारभावापेक्षा कमी आहेत त्या कंपनीचे बाजारात असलेले स्पर्धक आणि त्यांची किंमत ह्याची तुलना करून निर्णय घेतला जातो. पण हि तुलना करताना एका गोष्टीचे भान ठेवणे गरजेचे आहे कि बाजारभावापेक्षा कमी भाव पातळीसाठी कंपनीने काही लबाडी तर केलेली नाही ना ! एकदा का UNDERVALUED बाजार्भावाबरोबरच कंपनीच्या प्रामाणिकपणाबद्दल खात्री पटली, म्हणजे रिस्क कमी आहे जे जाणून हे व्यापारी निर्धास्तपणे आपली खरेदी उरकतात.
- उत्पन्न किंवा कमाई देणारे ट्रेडिंग : हि सगळ्यात जुनी व्यापारनीती आहे ज्यात भांडवल सुरक्षितता हे मुख्य तत्व आहे. कमी हे मुख्य धोरण असल्याने सामान्यतः मोठ्या आणि सर्वश्रुत कंपन्यांचा विचार इथे केला जातो किंवा निवडल्या जातात.उत्पन्न किंवा कमाईअधिष्ठित तत्वधारक व्यापारी हे जुन्या, स्वतःच्या पायावर घट्ट उभ्या असलेल्या, चांगले व्यवस्थापन असलेल्या अशा कंपन्याच बाळगून असतात.
Book traversal links for अर्थक्षेत्र भाग - ३ - (ट्रेडिंगपद्धतीची ओळख.)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उत्तम माहिती .
वाचतोय.
+१
आंसय व्ह्य
ENGLISH TERMS
उत्तम माहिती.
Syndicate Bank घ्या ९२ च्या
अशा टीप्स चं काय करायचं?
तुम्ही पण थोडा अभ्यास केला पाहीजे.
२००६-२००९
Syndicate बँकेच्या टीप बद्दल
कुणीतरी...
कलाकृतींच्या लिलावात
ह्या भागात...
पुलेशु...
छान!
धन्यवाद.....