Skip to main content

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती : एक विचार

लेखक प्यारे१ यांनी सोमवार, 16/12/2013 04:42 या दिवशी प्रकाशित केले.
दत्त जयंतीनिमित्त भगवान दत्तात्रेयांच्या आरतीचा विचार करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगानं आधी दोन आरत्यांचा ( गणपतीच्या नि देवीच्या ) नि प्रतिसादांचा आढावा घेतला जावा ही विनंती. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवतांच्या अंशावताराची जयंती. खरंतर देव जन्म घेतात का असा प्रश्न येतो पण भाविकांना ईष्ट देवतेचं स्मरण करायची संधी मिळावी, त्याद्वारे भक्ती वाढीस लागावी हा हेतू. दत्त जयंतीची कथा : अत्रि नामक ऋषींच्या पतिव्रता पत्नीची अनसूयेची परिक्षा घेण्यास स्त्रीमत्सरानं सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती उतावीळ होतात, आपापल्या पतिराजांना तयार करतात नि अत्रि नसताना त्यांच्या आश्रमात पाठवतात. भिक्षा मागताना आम्हाला नग्न होऊन भोजन दे अशी अट घालतात. ती आपल्या पातिव्रत्याच्या जोरावर तिघांना लहान बाळ करुन आपलं स्तन्य (दूध) वाढते. अनसूयेवर तिघे प्रसन्न, त्यांच्या बायका गप्प. वर माग म्हटल्यावर तुम्हा ति घांनीही माझं दूध प्यायलेलं आहे त्यामुळे तुम्ही तिघेही आता माझे पुत्र आहात इथेच वास करुन असा म्हटल्यावर त्रिमुखी दत्त बनून अवतार धारण होतो. कथेबाबत अनेक प्रकारे उहापोह होऊ शकतो. मनोरंजनाचं साधन नसलेल्या नि गुलामीनं पिचत पडलेल्या समाजातला कथेकरी बुवा आपल्या कल्पनाविष्कारानं कथा अशा प्रकारे सांगू शकतो ह्यात आश्चर्य नाही. रुपकं म्हणून वापरलेल्या गोष्टींना घट्ट परंपरांचं स्वरुप येऊन त्यात कर्मठपण कधी आलं ते सांगता येत नाही. सध्या फक्त एवढंच लक्षात घेऊ या की पातिव्रत्याचं सामर्थ्य दाखवण्याबरोबर मनाची निर्वासन (वासनारहित) अवस्था असेल, भगवंताकडे जाताना कुठलाही आडपडदाच काय तर यत्किंचित देखील झाकलेपणा नसला तर, विचारांची क्लॅरिटी असेल तर भगवंत स्वतः घरी येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो. पूर्ण आरती : त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा । नेती नेती शब्द न ये अनुमाना॥ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥ सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त । अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥ पराही परतली तेथे कैचा हेत । जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥ दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥ प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥ दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥ मी तू पणाची झाली बोलवण ।एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥ (पाठ आहे पण हाताशी पटकन khapre.org वर मिळाली. कॉपी करुन घेतली) आरती शब्दाचा एक अर्थ 'उपास्याबद्दल रती असेपर्यंत म्हणजे प्रेम असेपर्यंत करावयाची ती' असा आपण पाहिलेला आहेच. पुन्हा सांगावं असा हा विषय आहे. अध्यात्माबद्दल सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज असते. कारण ऐकलेलं पटकन 'आत' पोचत नाही . कारण इतर गोष्टींनी मन 'व्यापलेलं' असतं. असो. ही संतश्रेष्ठ शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी रचलेली आरती आहे. २१ वेळा अंगावर थुंकणार्‍या यवनास शांतपणे आपल्या वागण्याद्वारे सुधारणारे, पितर भोजनावेळी ब्राह्मणभोजनाऐवजी दीनदलित जोडप्यांना जेवू घालणारे समाज सुधारक, यात्रा करुन परतताना गाढवाच्या मुखी गंगाजल ओतून भूतदया करणारे असे एकनाथ महाराज! स्वत:च्या उदाहरणातून शांतपणे समाजसेवा करता येते हे त्यांनी तेव्हाच दाखवून दिलेलं आहे. पंगतीला पत्नीच्या पाठीवर एका उद्धटाने उडी मारली तेव्हा 'अगं सांभाळ, त्यांना पाडशील' म्हणून मिश्किलपणं त्याची जागा दाखवून देणारे, भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन नि अध्यात्माचे अवघड सिद्धांत सहज समजावून सांगणारे एकनाथ महाराज. कार्यालयीन कामकाजात एक पै चा हिशेब सापडेना म्हणून रात्रभर जागून तो शोधणारे व्यवहार दक्ष नि खाजगी कामासाठी सरकारी दिवा विझवून, स्वखर्चाच्या तेलाचा दिवा जाळणारे एकनाथ महाराज. विस्मृतीत गेलेल्या ज्ञानेश्वरीला शुद्ध प्रत करुन पुन्हा प्रचार करणारे एकनाथ महाराज जणू ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्याभोवतीची ही कर्मठपणाने फासणारी मुळीच जणू सोडवतात. अशा सर्वार्थाने श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी रचलेली ही भगवान दत्तात्रेयांची आरती आहे. मागे एका प्रतिसादात लिहील्याप्रमाणं भगवदतत्त्व सगळीकडं सारखंच. एकाच व्यक्तीला काका, मामा, बाबा, भाऊ, दादा, सर, साहेब, बंड्या म्हटल्याप्रमाणं कार्यानुसार नि कारणानुसार त्याचं नाम बदलतं. विश्व निर्मितीच्या कार्य शक्ती नि तेव्हाच्या अधिष्ठानाला ब्रह्मदेव, विश्वाचा पसारा सुरु राहण्याच्या कार्यशक्ती च्या अधिष्ठान देवतेला विष्णू नि तोचा संहार करण्याच्या शक्तीच्या अधिष्ठानाला महेश असं नाव आहे. हीच त्रैमूर्ती. ज्या 'मोडस' मध्ये (अनुषंगाने) ती काम करते ते त्रिगुण. हालचालीशिवाय कार्य शक्य नाही. कुठलीही गोष्ट सुरु करण्यासाठी आवश्यक हालचाल अथवा जी क्रिया लागते तिला रजोगुण म्हणतात. नि सांभाळण्यासाठी आवश्यक असतं ते स्थैर्य. टिकणं. ह्या टिकण्याच्या मागं असणारा भाव असतो तो सत्त्वगुणाचा म्हणून ओळखला जातो. नि संपवण्यासाठी आवश्यक असतो तो तमोगुण म्हणजे संहार करण्याची क्रिया. हल्लीच्या कोलॅबोरेशन च्या जमान्याच्या भाषेत बोलायचं तर दत्त भगवान हे एक 'टायअप' आहे तिन्ही गुणांच्या अभिव्यक्तीचं, तिन्ही प्रकारच्या शक्तींचं! पण ह्या तीन क्रिया म्हणजे भगवान दत्त नव्हेत किंवा हे तीन गुण म्हणजे दत्त नव्हेत. तर त्रिगुणात्मक म्हणजे तिन्ही गुणांचा आत्मा म्हणून म्हणजे ज्याला आपण मूळ स्त्रोत म्हणू शकू असे हे दत्त भगवान आहेत. मुळात ते काहीच करत नाहीत. ज्याप्रमाणं वीजेच्या बलावर हीटर नि रेफ्रिजरेटर दोन्ही चालून अनुक्रमे गरम नि थंड करण्याची कामं होतात पण वीज गरम किंवा गार नव्हे त्याप्रमाणं दत्त त्रिगुणात्मक आहेत खरे पण त्रिगुण म्हणजे दत्त नव्हेत तर त्रिगुण ज्याच्या अधिष्ठानावर काम करतात ती गोष्ट (इथं थोडं आणखी विश्लेषण म्हणजे असं एक जागी दाखवता येईल नि दुसरीकडं येणार नाही असं ते नसतंच मुळी. सबाह्य अभ्यंतरी पुढं येईलच) दत्त म्हणजे दिलेला. कुणी दिला? कसा दिला? आपण वर पुराणातली कथा पाहिली. दत्तांच्या आईचं नाव अनसूया नि वडलांचं नाव अत्रि. कथा फार काही 'सांगणार्‍या' असतात. बहुतेकदा रुपक कथाच असतात त्या. आओअण नीट पाहिलं तर ह्या कथा पुष्कळ काही देऊ शकतात. अ त्रि म्हणजे जे तीन च्या पलिकडे आहेत असे ते. तीन गोष्टींची भली मोठी यादी आहे. तीन गुण -सत्त्व, रज, तम , तीन काल - भूत, वर्तमान, भविष्य, तीन अवस्था - जागृती, स्वप्न, सुषुप्ति, तीन देह- स्थूल, सूक्ष्म, कारण देह अशा सगळ्याच्या पलिकडं गेलेल्या व्यक्तीमध्ये दत्ताची अभिव्यक्ती शक्य आहे. (अथर्वशीर्षामध्ये त्वं गुण, देह, काल, अवस्था त्रयातीतः असं जे गणनायकाचं वर्णन आहे ते हेच्च्च्च! एकाच व्यक्ती चा हाक मारताना पुतण्याकडून काका नि दुसर्‍या बाजूनं भाच्याकडून मामा म्हणून उल्लेख येतो तसंच) हेच अनसूया ह्या आईबद्दल. अन-असूय= असूया नसलेला/ली हे मनाचं स्वरुप असलेल्या व्यक्तीमध्ये दत्त भगवान येतात. मुळात हे दत्त वगैरे का आणायचे जीवनात? माणसाच्या जीवनात अनेक प्रकारच्या संघर्षामध्ये स्पर्धा, मत्सर, हेवेदावे असतात पण ज्या व्यक्तीला असूया नाही त्याला ह्या कशाचा त्रास होत नाही. आपल्याला वाटेल मग प्रगती कशी होणार? स्पर्धेशिवाय प्रगती कशी शक्य आहे ? उदाहरण घेऊ. शाळेत असताना एकाला ७५ % मिळाले तरी इतर ७०% च्या आसपास असल्यानं पहिला नंबर मिळायचा. एकदा असंच एकानं सांगितलं तुला ७५% मिळतात म्हणजे २५ % येत नाही का? डोळे उघडले. परिक्षा कितीची आहे? १०० % ची आहे ना? मग आपण १०० % साठी काम केलं पाहिजे. दुसरा ७० % वर असो अथवा ९५ % वर! स्पर्धा कुणाची? कुणाशी? ह्या विचारामध्ये आपण इतरांशी तर नाहीच तर स्वतःशीसुद्धा स्पर्धा नाही करत. मला १०० % यावं एवढा भाव निर्माण होतो. भूतकाळाची नि भविष्याची चिंता मुख्यत्वे भीतीपोटी असते. भीतीचा उगम पुन्हा आपण असू का नसू ह्यामध्ये असतो. एकदा आपण शरीर नाही तर चैतन्य आहोत हा भाव आत पक्का झाला की जमतं. थोडं अवघड वाटतं पण आधीच्या लेखात म्ह्टल्याप्रमाणं जर 'जे माझं आहे ते मी नाही' हे पक्कं झालं की माझा मोबाईल, घड्याळ म्हणजे मी नाही हे जसं मान्य तसं माझा हात, माझा पाय, माझं शरीर, माझं नाव, माझी शैक्षणिक पदवी, माझी संपत्ती, माझे नातेवाईक, माझं मन, बुद्धी चित्त म्हणजे मी नाही हे लक्षात येतं, पटतं. हळू हळू हे आत्मसात व्हायला लागतं. ह्यातून भीती जाते, चिंता जातात, काळजी जाते. अनसूयेच्या पोटी येणारे दत्त ह्यासाठी आपल्यामध्ये आणावेत. असूया गेली नि भूत भविष्याच्या चिंता गेल्या की बरंचसं मन मोकळं होतं. मन मोकळं झालं की आनंद असतो, आनंद असला की समाधान असतं. आपण पहिल्या ओळीतला पहिला चरण बघतोय अजून. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा 'जाणा' वर म्हटलेलं सगळं हे जाणण्याचीच तर प्रक्रिया आहे. नेमकं काय आहे हे एकदा समजलं की पुढचं सगळं एकदम स्वच्छ होऊन जातं. माहिती असणं वेगळं, समजणं वेगळं, समजून घेणं वेगळं नि जाणणं वेगळं. हे जाणल्यावर पुन्हा वेगळं काही जाणण्याची गरज तर राहत नाहीच पण वखवख देखील थांबते. हे एकदा समजलं म्हणजे जणू 'मास्टर की' सापडली! त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा.: असा हा (तिन्ही गुणांचे स्वामी एकत्र आलेला) अवतार तिन्ही लोकांचा राणा म्हणजे राजाच जणू. (बाकी आनुषंगिक म्हणून तमोगुणाचे स्वामी म्हणून शंकर तमोगुणी नाहीत तर ते त्याचे स्वामी आहेत. बर्‍याच जणांचा तसा समज पुराणकथांचा पाठिंबा असल्यानं जाणवतो खरा मात्र हे खरं नाही. आमच्या घाटपांडे काकांनी पोलिसात असताना अनेक जणांची पाठ फोडली असेल पण म्हणून ते रागीट ठरत नाहीत तसंच काहीसं! असो. महाशिवरात्रीला शंकराची आरती बघू अशी महादेवाला प्रार्थना!) नेति नेति शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनिजन समाधी न ये ध्याना| जोवर नेमका भाव समजत नाही तोवर गूढ आकलन होत नाही त्यामुळंच हे वेद शास्त्र नेति नेति (हे नाही, ते नाही असं) म्हणत राहतात नि कुठल्या अनुमानाप्रत येऊ शकत नाहीत. वर म्हटल्याप्रमाणं जे माझं ते मी नाही चा विचार अगदी ह्याच प्रकारे करता येऊन नेति नेति नि शंकराचार्यांच्या आत्मषटकाला जाऊन पोचतो. 'न जाणता कोटीवरी| साधने केली परोपरी| तरी मोक्षास अधिकारी| होणार नाही||' असं म्हणतानाचा समर्थ रामदासांचा भाव, 'तीळ जाळिले तांदूळ, काम क्रोध तैसेचि खळ' म्हणणारे तुकाराम महाराज, 'वस्तुर्सिद्धीर्विचारेण न कश्चित कर्मकोटिभि' ह्या सगळ्याचा नि सुरवरमुनिजन योगी 'समाधी न ये ध्याना' चा एकंदर अर्थ हाच की योग्य मार्गानं सारासार विचार नि विवेक करुनच नेमकं काय हे समजून घेऊनच मोक्षपद प्राप्ती करुन घेतली जाऊ शकते (मुळात ते नित्यप्राप्त च आहे, चुकीच्या धारणांमुळं बंधन वाटतं (आरशावर घाण असली तर प्रतिबिंब दिसत नाही पण ते असतं तसं. आरसा स्वच्छ करावा लागतो)) जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता | आरती ओवाळीता हरली भवचिंता भव चिंता: भव म्हणजे संसार. दुसरा अर्थ माझ्यापुरतं असलेलं जग. आपल्या आजूबाजूचंच. सगळ्याचा विचार काही ठराविक लोकांसाठी सोडून देऊ. (असतात तसे. असो द्यावेत) श्रीगुरु कॄपेने दिल्या गेलेल्या ह्या दत्तांच्या कृपेने माझी संसारविषयक म्हणजे एकंदर प्रपंचाची 'काय होईल नि कसं होईल'ची चिंता दूर झाली आहे असं नाथ महाराज म्हणतात तेव्हा ते आपल्यासाठी जास्त असतं. संत स्वतःसाठी बोलताना सुद्धा सगळ्यांचं हीतच पाहतात. सबाह्य अभ्यंतरी म्हणजे सगळीकडे व्यापून असलेलं तत्त्व ते तूच आहेस. विश्वनिर्मिती ते विश्वाचा लय ज्याच्या सत्तेवर (बेसवर) चालतो ते चैतन्यरुप म्हणजे दत्त. ही गोष्ट अभाग्याला मात्र कळू शकत नाही. पराहि परतली तेथ कैचा हा हेत, जन्ममरणाचा पुरलासे अंत| आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलण्याची मूळ सुरुवात होते ती म्हणजे परावाणी. परा, पश्यन्ती, मध्यमा नि वैखरी अशा चार वाणी आहेत. वैखरी म्हणजे आपण जे बोलतो ते. मात्र परावाणी मध्ये मूळ सुरुवात होते असं मानतात. ते तसंच का मानायचं? गणित सोडवायला एक 'क्ष' लागतो म्हणून. बस्स्स. समीकरण सोडवून 'क्ष' चं विसर्जन च अपेक्षित आहे. तर ही जी परावाणी आहे ती सुद्धा परतते असं दत्तात्रेयांचं स्वरुप आहे. थोडासा विचार करुया. आपण कधी कधी शांत बसतो. अगदी शांत. काहीच विचार नाही. तेव्हा काय होतं? आतलं सगळं शांत असतं. मन हे करु का ते करु असं काम नसतं करत, बुद्धीला घ्यायला कुठला निर्णय नसतो, चित्त काही साठवून ठेवायला नसल्यानं गप्प असतं, तसंच विचाराचा उगम असलेली परावाणी सुद्धा आपल्या मूल स्थानावर असते. चक्र सुरुच नाही ना कसलं! त्यामुळं शांतीचा अनुभव येतो. ह्यालाच परावाणीचं मूलस्थानी परतणं म्हणायचं. जास्त डिटेल्स नकोत पण जेव्हा सगळं अत्यंत शांत असतं तेव्हा दत्ताचं दर्शन झालं असं म्हणायचं. हे कधीकधी एका जन्मात शक्य होत नाही म्हणून 'जन्ममरणाचा अंत पुरतो'. जन्मो जन्म सुद्धा घालवावे लागतात. दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला : अशा सातत्याच्या विचारातून कधीतरी जाणून घेतलेल्या अनुभवातून दत्त हा अनुभव येतो त्याला शाश्वततेकडे नेणार्‍या सतभावानं प्रणिपात म्हणजे अहं सोडून नमस्कार केला.(भाव म्हणजे जो स्थिर असतो तो तर भाव-ना म्हणजे अस्थिर भाव, अभाव म्हणजे नाहीच्च! ) अशा रितीने तत्त्व समजल्यानं आशीर्वाद लाभला नि जन्ममरणाचा फेरा म्हणजे हे जे 'मी नि माझं' चं खरं स्वरुप समजलं त्यामुळं त्या बंधनातून माझी मुक्तता झाली. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन, मीतूपणाची जाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान|| तत्त्व समजलेलं आहे, त्यामाग ची प्रेरणा जाणलेली आहे, जनार्दनस्वामी जे श्रीगुरु आहेत त्यांची कॄपा झालेली आहे अशा दुग्धशर्करायोगानं प्रारब्ध योगानं नि स्वप्रयत्नानं नाथ महाराजांना त्रिगुणातीत, अनसूय बुद्धीनं मिळालेल्या दत्ताचं ध्यान लागलंय, हे ध्यान लागल्यानं मनाचं, बुद्धीचं, चित्ताचं, अहंचं काम थांबून मनाची उत-मन म्हणजे जणू मन शिल्लकच नाही अशी अव स्था झालेली आहे. एकच तत्त्व सगळीकडं असल्याचा अनुभव, अनुभूती आल्यानं वेगळेपणा शिल्ल क नाही, मी आणि तू असं काही नाहीच सगळीकडं एकच एक असल्याचा भाव जागृत झालेला आहे. असाच आनंदाचा ठेवा सगळ्यांना प्राप्त व्हावा हीच विनवणी श्री दत्तात्रेय, एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी नि श्रीगुरुंच्या चरणी अर्पण करतो. सगळ्यांना दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 45608
प्रतिक्रिया 246

प्रतिक्रिया

In reply to by म्हैस

बाई, मला एक कळत नाही तुमचं.. मी अत्यंत कुतुहलाने हा प्रश्न विचारतेय. तुम्ही धार्मिक / अध्यात्मिक / अस्तिक वगैरे वाटता. कुणी देवादिकांविरुद्ध बोलले की तुम्ही हिरीरीने वाद घालायला येता. पण मुळात प्रश्न असा की तुम्हाला फरक का पडतो लोकांच्या बोलण्याचा? बॅट्या काहीही बोलेल, जर तुमचा विश्वास आहे देवावर तर बॅट्या काय कुणाच्याही बोलण्याने काय फरक पडणारे? शिवाय वर एकदा तुम्हीच लिहीलय की अनुभव / प्रचिती आल्याशिवाय कळणार नाही. मग ज्यांना अशी प्रचिती येईल ते ठेवतील देवावर विश्वास, नाही येणार ते नाही ठेवणार.. तुम्ही का त्रास करुन घेताय? मी मागेही एकदा तुम्हाला सांगितलं होतं, काय मत बनवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुमचा प्रतिसाद असाही लिहिता येईल ना:-
तुम्ही म्हणताय कुठला देव आहे कि नाहीये ह्त्याच्याने तुम्हाला काही फरक पडत नाही . मग तुम्हाला फरक पडत नसेल तर मी नाही म्हणल्यावर तुम्हाला एवढा राग यायचा काय कारण आहे? तुमचा त्याच्यावर विश्वास असेल तर द्या न (बाकीच्यांच बोलणं) सोडून .
देव खरच आहे की नुसतीच कल्पना आहे हा मोठा विषय झाला.. पण तोवर देव न मानणारे असतीलच..ते टीका करतीलच, तुम्ही जमल्यास मनावर घेणं सोडुन द्या..

असं होतं (आणि ते अनुसयेला समजलं नव्हतं.. आणि म्हणुन दत्त महाराज तिचे गुरु झाले..).. मग तरीही आणखीन हे कशासाठी?
ह्या प्रश्नच अर्थ समजला नहि. कृपया उलगडून सांगितला तर उत्तर देत येईल .
दत्ता सारखा पुत्र (म्हणजे कथे नुसार साक्षात ब्रह्मा, विष्णु आणि महेश) असताना, आधिक तोच गुरु झालेला असताना सुनेसाठी दागिने जमवणे अशा गोष्टींची गरज काय?
आपल्या मुलाने लग्न करण , सुनेसाठी दागिने जमवणं हे तीने एका आईच्या भूमिकेतून केला आहे . कारण ती पतिव्रता वगेरे असली तरी सत्याची जाणीव तिला नवती . ती अज्ञानीच होती असा मी आधीच एका प्रतिसादात म्हणलाय. दत्त पुराणात म्हणल्याप्रमाणे दत्त महाराज किशोरवयीन झाल्यावर अनुसया त्यांना लग्नाचा आग्रह करू लागली तेव्हा दत्तांनी त्याला नकार देवून अनुसयेला सत्याची जाणीव करून दिलीये . तेव्हा हे दागिने वगेरे जमवणं आधी . आणि दत्तांनी आपल्या आईचा गुरु बनण हे नंतर असा क्रम आहे
सामान्य माणसांच जाउ द्या..पण देवादिकांनाही हे मोह का असतिल? आपण शरीर नाहिच आहोत तर ह्या नश्वर शरीराला सजवण्याचे डोहाळे का लागावे?
ह्याचा हि अर्थ समजला नाही . इथे दत्त महाराज कुठे स्वताच्या शरीराला सजवण्याच्या मागे लागले आहेत?

पिलीयन रायडर बाई तुम्ही एकीकडे म्हणताय कि काय मत बनवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . अहो मी पण माझी मतच मांडते आहे न . ब्याट्या म्हणतोय देव नाहीये आणि मी म्हणतेय अहे. एवढाच फक्त चाललाय न . ब्याट्याने माझ्या म्हणण्याला दुजोरा द्यावा किवा त्याने माझी मतं मान्य करावीत वगेरे असं मी कुठे म्हणलय? उलट माझ्यासारख्या लोकांमुळे भोन्दुबबांच फावत वगेरे म्हणून तोच माझ्याशी वाद घालतोय . मी फक्त मला असलेली माहिती इथे देत आहे . आणि ब्याट्याला काही बोलल्यामुळे तुम्हाला मला प्रतिसाद द्यावासा वाटत असेल तर दत्त महारानांना काही बोललं तर मला प्रतिसाद द्यावासा वाटला ह्यात मी चुकीची कशी ठरतेय ?
तुम्ही धार्मिक / अध्यात्मिक / अस्तिक वगैरे वाटता
खरं आहे ते. मी तशी आहे . कारण मी स्वतः अनुभव घेतला आहे . जोपर्यंत मला अनुभव नवता तेव्हा माझी मतं सुधा बॅटमॅन सारखीच होति. वेळ आल्यावर जसा मला समजलं तसाच त्यालाही समजेल एवढाच म्हणलाय न मी . जोपर्यंत त्याची वेळ येत नाही तोपर्यंत त्याने आंधळेपणाने देव आहे म्हन्नार्यांवर किवा नाही म्हन्नार्यांवर विश्वास ठेवावा असा मी म्हणताच नहिये.जोपर्यंत आपण स्वतः ती अनुभवत नाही तोपर्यंत ती आहे किवा नाही हे आपण खात्रीने सांगूच शकत नाही न . आणि मत मांडण्याच म्हणाल तर एखाद्या काल्पनिक, गोष्टील्या किवा सध्या सुध्या गोष्टींवर तुम्ही काहीही मतं मांडू शकता . पण देव , धर्म ह्याच्यावर मतं मांडताना भान ठेवायला नको का? कारण ह्या गोष्टी खूप sensitive अस्तत. तसं नसतं तर देव धर्मावरून दंगली वगेरे झाल्या असत्या का?

In reply to by म्हैस

पण देव , धर्म ह्याच्यावर मतं मांडताना भान ठेवायला नको का? कारण ह्या गोष्टी खूप sensitive अस्तत. तसं नसतं तर देव धर्मावरून दंगली वगेरे झाल्या असत्या का?
देवधर्मावरून भावना भडकवणारे अन दंगली करणारे एकजात गाढव आहेत. (सॉरी गाढवांनो तुमचा अपमान करण्याचा हेतू नव्हता पण भाषेचे लिमिटेशन दुसरे काही नाही.) अन मी देव नाहीये वगैए काहीच विधान केलेले नाही. हा गैरसमज दूर करावा. अन भोंदूबाबांचं फावतं ते देव अस्तित्वात आहे म्हणण्याने नव्हे तर त्याच्याशी संबंधित भाकडकथांनाही तितकेच महत्त्व देण्याने.

In reply to by बॅटमॅन

>>>>अन भोंदूबाबांचं फावतं ते देव अस्तित्वात आहे म्हणण्याने नव्हे तर त्याच्याशी संबंधित भाकडकथांनाही तितकेच महत्त्व देण्याने. बरोबर आहे. ह्याबरोबर सत्ता, संपत्ती, यश, किर्ती, प्रतिष्ठा ह्यांच्या खर्‍या नि खोट्या हव्यासापायी सगळ्या (धर्माला नि देवाला सुद्धा) वेठीला धरलं जातं. दुर्दैवानं सगळ्याच संप्रदाय प्रमुखांनी देवाचं मार्केटिंग 'सिन्स बिगिनिंग' केलेलं आहे. बाकी देवानं काही करणं म्हणजे कुणा अतिमानवी व्यक्तिनं काही हस्तक्षेप करणं अशी अपेक्षा असेल तर ती चुकीची आहे एवढंच सांगू शकतो. :) बाकी कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. मात्र एखाद्याची तहान भागवायचीच असेल तर ओंजळभर पाणी मिळेलच ह्याची खात्री आहेच्च. इत्यलम!

In reply to by म्हैस

पण देव , धर्म ह्याच्यावर मतं मांडताना भान ठेवायला नको का? कारण ह्या गोष्टी खूप sensitive अस्तत
बाकी काय ओ म्हैसतै, बहुसंख्य महाराष्ट्रवासीयांचे कुलदैवत खंडोबा असताना त्याला थिल्लर म्हणताना तुमचे हे भान कुठे गेले होते हो?

In reply to by प्रचेतस

हा प्वाइंट तर मी विसरलोच होतो वल्लीशेठ, आठवण करून दिल्याबद्दल आभार. म्हशे, खंडोबाबद्दल काहीबाही बरळताना ही अक्कल कुठे गेली होती हे सांग मग पाहू तुझी दत्तभक्ती अस्सल की बेगडी ते.

बाकी काय ओ म्हैसतै, बहुसंख्य महाराष्ट्रवासीयांचे कुलदैवत खंडोबा असताना त्याला थिल्लर म्हणताना तुमचे हे भान कुठे गेले होते हो?
म्हशे, खंडोबाबद्दल काहीबाही बरळताना ही अक्कल कुठे गेली होती हे सांग मग पाहू तुझी दत्तभक्ती अस्सल की बेगडी ते.
१० वेळा माझा खंडोबाच्या लेखावरचा प्रतिसाद वाचा . मी खंडोबाला थिल्लर म्हणलाय कि ५ बायकांशी लग्न करण्या मागच्या उद्देशाला थिल्लर म्हणलाय ते पुन्हा नित वाचा . तसाच मी असाही विचारला होता कि खंडोबा हे दैवत आहे ह्याचा referance द्य. आजपर्यंत खंडोबा कुणाला प्रसन्न झालाय ,त्याने भक्तांना दर्शन दिलाय असा आजपर्यंत कधी कुणी सांगितलाय का? किवा दत्तांवर जसे अनेक ग्रंथ आहेत . अनेक लीलाचरित्र आहेत , स्तोत्र आहेत आणि त्याचा दत्त अस्तित्वाचा अनुभव दत्ताभाक्तान्म्ना प्रत्यक्ष येतो तसा अनुभव खंडोबा भक्तांना आलाय का? वैरागी दत्त कुठे आणि दुसर्या स्त्रीच्या मोहात पडून म्हाळसाइ ला फसवून घर सोडून जाणारा खंडोबा कुठे? बाकी तुम्हाला खंडोबा बद्दल काय माहिती आहे ते सांगा अधि. कारण फक्त विरोधाला विरोध करणारा हा प्रश्न आहे असा मला वाटतंय

In reply to by म्हैस

चार पुस्तके लिहिल्याने अमुक दैवत मोठे होते हा शोध लावल्याबद्दल अभिनंदन म्हशे =)) म्हणजे देव मोठा करायचा तर तेसुद्धा माणसानंच करायचं म्हण की. आव आणायचा भक्तीचा पण करायची ईश्वरनिंदा हे कै खर्‍या भक्ताला शोभत नाही. दत्तभक्तांना चालत असेल तर माहिती नाही बॉ.

In reply to by बॅटमॅन

>>चार पुस्तके लिहिल्याने अमुक दैवत मोठे होते हा शोध लावल्याबद्दल अभिनंदन म्हशे नायतर काय !! बरं का म्हैसबाई, तुम्ही एकदा काय लिहायचं ते ठरवाच!! एका धाग्यावर देव सगळीकडे असतो म्हणता इकडे दोन देवांमध्ये भेदभाव? बाकी दत्तमहाराजांप्रमाणे खंडेरायाबद्दल कोणी पुस्तके लिहीली आहेत का हा प्रश्न विचारुन आपण पुन्हा एकदा आपल्या आयडीला जागल्या आहात हेवेसांनल.

In reply to by म्हैस

=)) अहो म्हैसतै तुम्हाला जसा दत्त दैवत आहे असं वाटतंय तसा बाकीच्यांना खंडोबा हे दैवत का वाटू नये? खंडोबावर पण ग्रंथ आहेत. महाराष्ट्राची चार दैवते हे ग. ह. खर्‍यांचे किंवा दक्षिणेचा लोकदेव खंडोबा हे ढेर्‍यांचे ही पुस्तके वाचा जरा. मग सगळे रेफरन्स मिळतील. बाकी माझं जाऊदे, मी देव वैग्रे काही मानत नै. पण दुसर्‍या देवांवर टिका करतांना आपण आपलेही भान सोडत आहोत हे जरा ध्यानात ठेवा म्हणजे झालं.

प्यारे , batman माझ्या प्रतिसादामध्ये मी कोणाचा वैयक्तिक उल्लेख केला नहिये. पिलियन रायडर ने batman चा नाव त्यांच्या प्रतिसादात घातल्यामुळे साहजिक रोख batman कडे गेला

चार पुस्तके लिहिल्याने अमुक दैवत मोठे होते हा शोध लावल्याबद्दल अभिनंदन म्हशे
मी काय म्हणतेय ते तुला समजतंय का? पुस्तके वाचल्याने दत्त अस्तित्वाचा अनुभव येतो असा म्हणलाय मि… आधी नित काय लिहिलंय ते वाच अन मग खरड .
महाराष्ट्राची चार दैवते हे ग. ह. खर्‍यांचे किंवा दक्षिणेचा लोकदेव खंडोबा हे ढेर्‍यांचे ही पुस्तके वाचा जरा
हि फक्त माहिती अहे. एखादी गोष्ट सांगावी तशी …. त्याने खंडोबाचा साक्षात्कार झालाय का आजपर्यंत कुणाला? अहो सगळ्या महाराष्ट्राच काय ? माझाही कुलदैवत पालीचा खंडोबा आहे . आणि खंडोबाची बहिण मानली गेलेली इंजाबाई कुलदेवी आहे . वर्षानुवर्षे आम्ही सुधा खंडोबाची भक्ती केलीये ……. आमच्या देव्हार्यात खंडोबाचे टाक आहेत . केवळ लहानपणापासून हे आपला कुलदैवत आहे हे मनावर ठसाव्ल्यामुळे ……. आणि संपूर्ण महाराष्ट्राचीही हीच धारणा असेल तुम्ही नीट बघितलं तर खंडोबाच्या बाबतीत नुसतीच कर्मकांड , जत्रा उरूस वगेरे आहेत. महाराष्ट्राच कुलदैवत असला भक्ती अशी नहिच.

In reply to by म्हैस

म्हशे, तुला माहिती नाही म्हणून खंडोबाची प्रचीती कुणाला येत नाही असे धडधडीत खोटे विधान कसे करू धजावलीस? सांप्रदायिक झापड सोडून अन्य देवतेकडे बघायची कुवत नसेल तर फायदा काय? खंडोबाचे भक्त तुला ठाऊक नसतील म्हणून काय झालं? अशी मुक्ताफळे उधळण्याचा अधिकार तुला कोणी दिला?

In reply to by बॅटमॅन

असं कसं ? देव नसतो आणि त्याची प्रचिती येऊच शकत नाही असे विधान विज्ञानवादी करतात ते चालतं आणि म्हशीचं बोलणं नाही चालत ! दिस इज नोत फेअर... आयटेल्यु संपादित

In reply to by बॅटमॅन

मा.श्री. ज्यांनी हा प्रतिसाद संपादित केला त्यांसः फेअर आणि ब्रौन यांमधील मजेने केलेली कोटी समजली नसेल तर संपादित करणे हे उत्तर नव्हे.

In reply to by बॅटमॅन

आणि ज्यांना पुल स्टाईल रेकणे ही कोटी समजली नसेल त्यांचे देव भले करो.. (कुणीपण असो दत्त किंवा खंडॉबा.. करा एकदाचं भलं)

In reply to by बॅटमॅन

ब्याट्या, भैंस के आगे रोना अपने नैन खोना!! काही उपयोग नाही. बाई आयडीला सार्थ करतायेत येवढंच !! *dash1*

In reply to by म्हैस

@त्याने खंडोबाचा साक्षात्कार झालाय का आजपर्यंत कुणाला?>>> =)) मला...मला झालाय

खंडो"बा

चा साक्षात्कार! येथे असंख्य धाग्यांवर खंडन करत फिरतो नाही का तो खंडो'बा! समांतर- चक्क आपण ज्याच्याशी भांडतोय..तोच हा आपला खंडोबा'चा नवा अवतार...ही साधी अनूभूती दत्तसांप्रदायिक आध्यात्मिक म्हैशीस(अजूनपर्यंत) येऊ नये,याचं आंम्हास लै लै आश्चर्य वाटतं! http://www.sherv.net/cm/emo/laughing/yellow-laughing-smiley-emoticon.gif

प्यारेकाकांचा धागा जेजुरीला पोचला!

In reply to by पैसा

अहो दत्त हा रूद्राचा अंशावतार तसा खंडोबा पण रूद्राचाच अंशावतार. मग जेजुरी काय नैतर गाणगापूर काय. एकच की. =))

In reply to by प्रचेतस

मंदीरातून लाखो भुंगे येउन औरंगजेबाच्या सैन्यावर त्यांनी हल्ला केल्याची गोष्ट खंडोबाचीच आहे ना? सहज विचारतेय.. ;)

In reply to by कवितानागेश

हो पण त्यावेळेस म्हणे दत्त महाराज खंडोबाला भेटायला आले होते.. सहज ! त्यांनी कमंडलूतील पाणी फेकले. त्या थेंबांचे भुंगे झाले आणि पुढचं घडलं. आमच्या आगामी दत्त वर्सेस्स खंडॉबा या पुस्तकात सर्व दिले आहे. आगाऊ मागणी खरडीत करावी,.

In reply to by कवितानागेश

हो. जेजुरीच्या खंडोबाची, वेरूळच्या कैलासनाथाची, भुलेश्वरच्या महादेवाची पण अशीच काहीशी गोष्ट आहे. =))

In reply to by प्रचेतस

>>मग जेजुरी काय नैतर गाणगापूर काय. एकच की. हो!! हे आपल्यासारख्या माणसांना समजू शकतं, म्हशीला कोण समजावणार ?? *mosking* *JOKINGLY*

In reply to by पैसा

व्हाया मुलखेड मार्गे ;) आहे ते! इसमें कौनसी बडी बात हो गयी जी? अजी गॉड तो गॉड होते है जी! और वैसे भी मिपा पे अवांतर तो यु एस पी है ना जी? -विनय पाठक मोड चलो दिल्ली!

थांबा थांबा बॅटमन.. "देव नसतो आणि त्याची प्रचिती येऊच शकत नाही" असे विधान तुम्ही करता आहात असा सरळसरळ आरोप मारकुटे तुमच्यावर करताहेत.. तुम्हाला हे मान्य आहे का? बॅटमन.. उत्तर द्या... हो किंवा नाही .. प्यारे.. तुम्ही थांबा.. तुम्हाला मी नंतर वेळ देणार आहे. बॅटमन तुम्ही उत्तर द्या.. वाचकांचा कौल बघूया.. "दत्तकथांना भाकड म्हणावे की नाही" १ टक्का "माहीत नाही" असं म्हणताहेत ९९ टक्के "हे थांबवा" असं म्हणताहेत.. ब्रेकनंतर मी थेट प्यारे यांच्याकडे जाणार आहे.. तोपर्यंत ..

स्कोर सेटलींग म्हणायचं हा नवा पलायनवाद आहे! कथा बोगस आहे कारण वर्णन केलेल्या गोष्टी वास्तविक नाहीत. आणि कथेचा अर्थ काहीही काढा; हे कन्क्लूजन :
विचारांची क्लॅरिटी असेल तर भगवंत स्वतः घरी येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो.
बेसलेस आहे कारण कुणाच्या घरी कुणी येत नाही. मुळात दत्त असं कुणी नाहीच तर येणार कोण? लेखात शेवटी तर भलताच यू टर्न मारला आहे:
जास्त डिटेल्स नकोत पण जेव्हा सगळं अत्यंत शांत असतं तेव्हा दत्ताचं दर्शन झालं असं म्हणायचं.
शांतता आरती पूर्वी होतीच! आरती नंतरची आणि पूर्वीची शांतता एकच आहे. तस्मात आरती व्यर्थ आहे. ________________________ याव्यतिरिक्त लेखकानं प्रतिसादात पूर्वप्रकाशित लेखाचा संदर्भ दिलायं ते लेखन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या लेखावरची सहजची ही कमेंट :
स्पष्ट मत - सगळा शब्दछल आहे. लिहणारे पण तेच, अर्थ समजवणारे पण तेच. पुन्हा जुने शब्द / मत खोडून कालानुरुप नवे मत सांगणारे पण तेच. कित्येक शतकानुशतके ह्या अश्या मांडण्या करुन विशिष्ट लोकांची पोटे भरली, पण अजुन पुरे झाले नाही आहे असेच दिसते.
सगळं सांगून जाते त्यामुळे या लेखालाही लागू आहे! (संपादित)

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही थकाल पण काही उप्योग होणार नाई. जाऊ द्या बसा निवांत मजा पहात... माणसानं स्वतःला सुधारावं दुसर्‍याला सुधरण्याच्या भानगडीत पडू नै ! काही उपेग होत नै... लै आले गेले... कुनी सुधरलं नाई... हे नाही तर ते चालूच आहे घ्या मळा थोडी मारा फक्की आन मजा घ्या

In reply to by संजय क्षीरसागर

आरती नंतरची आणि पूर्वीची शांतता एकच आहे. तस्मात आरती व्यर्थ आहे.> जन्मण्यापूर्वीची आणि मेल्यानंतरची अवस्था एकच आहे. तस्मात जगणं व्यर्थ आहे! :D

In reply to by कवितानागेश

हा हंत ! दत्तोबांना च्यालेंज !! कोण आहे रे तिकडे जरा गाण्गापुराला नेऊन आणा बाहेरचं लागिर आहे... उतरवाव लागेल

In reply to by बॅटमॅन

आश नाझ्ग दुर्बातुलुक, आश नाझ्ग गिम्बातुल, आश नाझ्ग थ्राकातुलुक, अघ बुर्झुम ईशी क्रिम्पातुल!!!! हे काय आहे? आणि तुझ्यासाठी "नाका वलच्या लागाला औशध कॉय.." हे गाणं म्हणु का?

In reply to by पिलीयन रायडर

हे काय आहे?
लॉर्ड ऑफ द रिंग्ज नामक प्रकार ठाऊक असेलच. त्यातल्या त्या सॉरॉननिर्मित रिंगवरचे एल्व्हिश लिपीतले आणि मॉर्डॉरच्या ब्लॅक स्पीच मधले इन्स्क्रिप्शन आहे. त्याचा अर्थ "One ring to rule them all, one ring to find them, one ring to unite them all and in the darkness bind them" असा होतो.
आणि तुझ्यासाठी "नाका वलच्या लागाला औशध कॉय.." हे गाणं म्हणु का?
स्वतःसाठी म्हणा खरे तर ;)

अखिल विश्वात एक शक्ती भरून राहिली आहे, मग तिला निसर्ग, प्रकृती, चेतना, प्राण, देव, ईश्वर काहीही म्हणा; इथपर्यंत ठीक आहे. पण पुढे या शक्तीला दिलेले सगुणस्वरूप ही निव्वळ मानवाची कल्पना आणि निर्मिती आहे. मानवाने आपल्या सुखासाठी, स्वास्थ्यासाठी, मानसिक स्थैर्यासाठी अनेक संकल्पना आणि रचनांची निर्मिती केली. त्यातल्या काही ऐहिक तर काही तात्त्विक. घरे ,रस्ते, वीज, पाणी, संगणक, अणुविज्ञान, टेलिफोन, स्तोत्रे, आरत्या, माहात्म्ये, चरित्रे, मंत्र, तंत्र, तर्क,न्याय हे सर्व मानवनिर्मित आहे. (जरी यातली काही वेदांगे आहेत आणि वेद अपौरुषेय मानले तरी). आता यातल्या काहींच्या अतिरेकाचे काही हानिकारक परिणाम झाले, साइड-ईफेक्ट्स झाले, हेही मान्य व्हावे. जसे, पर्यावरणाची हानी, ग्लोबल वॉर्मिंग, अणुयुद्धे, नरसंहार, आत्यंतिक सुखलोलुपतेमुळे शारीरिक आणि मानसिक सौख्याचा विनाश वगैरे. याचे एक कारण सुचते, ते असे की ही सर्व मानवनिर्मित संसाधने (अथवा साधने म्हणू) कशी वापरायची तेही मानवानेच ठरवले. (दुसरे कोण ठरवणार? मानवनिर्मित ईश्वर तर 'मानवनिर्मित अणुबाँब मानवावरच टाक', अशी आज्ञा करीत नसणार? आता 'ईश्वरानेच तशी बुद्धी मानवाला दिली' असे म्हटले तर वादच खुंटला.) या साधनांचा योग्य वापर करण्यात मानवाची बुद्धी कमी पडली/पडते, म्हणून हे श्रद्धेचे, अंधश्रद्धेचे, भोंदू बाबांचे, जपतप-अनुष्ठानाचे, निष्क्रियतेचे, जबाबदारी झटकण्याचे प्रश्न निर्माण होतात. समजा आरंभी देवाने ही सृष्टी निर्माण केली असे मानले तरी पुढची जबाबदारी मानवावरच आहे. "....पुरोवाच प्रजापति:, अनेन प्रसविष्यध्वम, एष वोsस्त्विष्टकामधुक" असे त्यानेच म्हणून ठेवले आहे. अगदी कर्मफल आणि पुनर्जन्म मानला तरी या जन्मात आपली बुद्धी वापरून योग्य आचरण करण्याची जबाबदारी केवळ मानवाची आहे. ती देवावर ढकलून उपयोगाचे नाही. चित्त एकाग्र आणि विकाररहित राखू शकल्यास अधिक सूक्ष्म आकलन होऊ शकते, निर्णयक्षमता वाढते हे आपण अनुभवतो. त्यासाठी काही मार्ग सांगितले आहेत. पण ही अधिकची आकलनशक्ती, ज्ञान का मिळवायचे, हे मानवाने ठरवायचे आहे. आजपर्यंत मानव प्रत्येक गोष्ट त्याच्या आदिम प्रेरणेनुसार केवळ स्वान्तसुखाय करीत आलेला आहे. देव पाहिजे, कशासाठी तर मानवाच्या सुखासाठी. पर्यावरण जपले पाहिजे, मानवाच्या हितासाठी. गाय उपयुक्त पशू आहे,कारण ती आपल्यासाठी दूध देते (तिच्या वासरांसाठी नव्हे). अशा तर्‍हेने हे विश्व मानवकेंद्रित आहे असे धरूनच मानव वागतो. सर्व सृष्टी जणू मानवाने स्वतःसाठी वेठीला धरली आहे. त्यात 'देव' ही कल्पनासुद्धा आलीच.

In reply to by राही

प्रतिसाद आवडला. मात्र आपण म्हणता तसं हा एक सर्वंकष मानवजातीचा जबाबदारीचा भाग झाला. मात्र साधारणतः दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सगळ्या जगाशी घेणंदेणं नसतंच. आपल्या रुटीनमध्ये आवश्यक घ टकांचा विचार करुन त्या अनु षंगानं जर आपण आ धीच श्रद्धापूर्वक एखादी उपासना करत असू तर अशा प्रकारच्या विचाराचा उपयोग व्हावा असं मत आहे. आजदेखील (किंबहुना हल्ली जास्त) अनेकानेक लोक सगुणोपासनेमध्ये आपली मनःशांती शोधतात. दत्त जयंती साजरी होते हे वास्तव आहे. जर ती तशी होत असेल तर एखाद्या देवळात जाऊन 'बंद करा हे सगळं, दत्त वगैरे काही नाहीये, उगाच वेळ काढताय कशाला' म्हणून उपयोग नाही ना? श्रद्धा आहे तर तिचा फोकस अशा पद्धतीनं ठेवल्यास जास्त उपयोग होईल असं सांगणं जास्त समावेशक नाही का? बाकी वर लेखात म्हटल्याप्रमाणं समीकरण सोडवण्यासाठीचा क्ष नंतर विसर्जीत करावा नि गोडबोलेंना दिलेल्या प्रतिसादात रिझल्ट मिळाल्यावर सिस्टीम देखील सोडून द्यावी ह्याकडं कुणाचं लक्ष गेलं नाहीये का? असो!

In reply to by प्यारे१

रिज़ल्ट काय हवा ह्याविषयीच तर भ्रांती आहे. अख्खी गीता स्थितधी: होण्यासाठी उपाय सांगते. किंबहुना तेच लक्ष्य आहे असेही सांगते. कारण बुद्धी स्थिर झाली की कर्माकर्माचा विवेक होऊ शकतो. पण आपण तर कर्म काय असावे हे आपल्या तुटपुंज्या आणि अस्थिर बुद्धीच्या साहाय्याने आधीच ठरवू पहातो आणि तदनुसार कृती व्हावी म्हणून प्रार्थना/जप/अनुष्ठान.......इ. करतो. लक्ष्य कोणते असावे हे जाणण्यासाठी या साधनांचा उपयोग झाला तर ते योग्य ठरेल. पण आपण इतके दुटप्पी की लक्ष्य अपूर्ण अशा मानवी बुद्धीने (आधी) ठरवतो आणि ते गाठण्यासाठी देवाची मदत मागतो. आणि रिज़ल्ट मिळाल्यावर सिस्टिम सोडून द्यावी असे नाही. कारण रिज़ल्ट तात्पुरता असू शकतो त्यामुळे सिस्टिमला रोज घासूनपुसून लख्ख ठेवणे जरूरीचे असते. ऐहिक यश हवे असेल तर ते कितीही मिळाले तरी कमी पडते. 'हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते'. सिस्टिम सोडली म्हणजे शिस्त मोडली. अमुक एक गोष्ट मिळाली,आता समाधान झाले, असे असते का? शाश्वत समाधानाचा मार्ग वेगळा आहे, तो या (अनुष्ठानादि) अंगांनी बहुधा सापडत नाही. मुंगी होऊन मुंगीच्या मार्गाने किंवा पक्षी होऊन आकाशमार्गाने फळाप्रत जावे हे काही एका टप्प्यापर्यंत ठीक. मुद्दलात जे दिसते तेच आणि तिथेच फळ असते का, की तिथे पोचल्यावर भ्रमनिरास होणार असतो? आपण ठरवलेल्या आणि अंदाजलेल्या फळाप्रत पोचण्यात इतकी शक्ती खर्च होते की पुन्हा मागे वळून दुसरा मार्गही अनुसरता येत नाही. हे असे होते याचे कारण आपण फळ ठरवलेले असते. आपण साध्यावर लक्ष्य केंद्रित करतो, साधनावर नाही. म्हणून साधनशुचिता(सुद्धा) महत्त्वाची.

In reply to by राही

रिझल्ट काय ? आत्यंतिक शांती, तृप्ती, समाधान नि आनंद. कुठल्याही व्यक्ती, वस्तू अथवा परिस्थिती असण्या अथवा नसण्यानं न बदलणारा आनंद. स्वत: स्वतःशी प्रामाणिक राहून तो शोधायचा. शोधायचं कुणाकडं? त्याचेही क्रायटेरिया ठरलेत. आहे. सगळं आहे. जुन्या पुस्तकांमध्ये (ग्रंथ) आहे. आपलं लक्ष नसतं. स्थितप्रज्ञ कोणास म्हणावे? आहे की! त्याच्याकडेच जावं? तो नसेल तर तसं बनण्याचा प्रयत्न करता करता वाट सापडते. भक्त कोण? यो मद्भक्त स मे प्रियः - कोण? अनपेक्ष, शुचि दक्ष, उद-आसीन, गतव्यथा, सर्वारम्भ परित्यागी. जो हर्षाच्या, शोकाच्या लाटेत वाहत नाही, ज्याच्या कांक्षा नसतात. शुभ अशुभाच्या संकल्पना स्वच्छ आहेत तो. मार्ग वेगळे असले तर साधन सुद्धा सांभाळावं लागतंच. फरगेट सिस्टीम म्हणताना रिझल्ट मिळाल्यावर ती सोडायचीये. आधी नाही. नंतर देखील सोडायची, मोडायची नाहीच.

In reply to by प्यारे१

आनंद, शांती, तृप्ती, समाधान हे साध्य आहे पण ते अचीवेबल नाही, अटेनेबल आहे. ती सहजस्थिती (असायला हवी) आहे. इंद्रिये चंचल, प्रमाथी, बलदंड आहेत, पुन्हा पुन्हा सैरावैरा धावतात आणि मग 'वायुर्नावमिवाम्भसि' अशी प्रज्ञा डळमळू लागते. ती सावरायला साधनावरची मांड पक्की हवी, साधने पक्की हवीत, पुन्हा पुन्हा तपासून घ्यायला हवीत. इंद्रियदमन हा उपाय नव्हे, इंद्रियांना बळेच तात्पुरते दुसरीकडे (नाम जप, पारायण इ.) वळवणे हाही उपाय नव्हे. इंद्रियांचे कार्य तटस्थपणे पहाणे,सदैव आत्मभान राखणे हे महत्त्वाचे. अशा आत्मजाणीवेत विहरू लागले की आपोआप चित्तवृत्ती निवळतात, विकारांचे उद्रेक कमी होतात कारण उद्रेकाच्या क्षणी आत्मभान जागृत असते. समर्थांचे 'अखंड सावधान' ते हेच असावे. असो. एक दृष्टिकोण मांडला, इतकेच. प्रतिवाद करायचा नव्हताच, आणि, कदाचित आपण सर्व एकच गोष्ट वेगवेगळ्या तर्‍हांनी सांगत असू ही शक्यता देखील आहेच.

In reply to by राही

:) अगदी बरोबर आहे. आरसा स्वच्छ करावा तरच प्रतिबिंब दिसते. आरसा स्वच्छ करण्याचं काम साधनं करतात. ते झालं की परिणाम समाधान, आनंद, तृप्ती नि शांती हा आहे. (बाहेरुन आणण्याबाबत काहीही म्हटलेलं नाहीये. कारण ते तसं आणता येत नाही.) >>>आपण सर्व एकच गोष्ट वेगवेगळ्या तर्‍हांनी सांगत असू ही शक्यता देखील आहेच. आणि हेच मला भूषणास्पद वाटतंय. सारेगमपधनिसा ह्या सातच सूरांतून आजपर्यंत संगीत निर्मिती झालीये. तसंच काहीसं असेल. :)

In reply to by राही

सुखावून गेला!
अखिल विश्वात एक शक्ती भरून राहिली आहे, मग तिला निसर्ग, प्रकृती, चेतना, प्राण, देव, ईश्वर काहीही म्हणा; इथपर्यंत ठीक आहे. पण पुढे या शक्तीला दिलेले सगुणस्वरूप ही निव्वळ मानवाची कल्पना आणि निर्मिती आहे.
येस! त्या चैतन्यातूनच सर्व प्रकट होतं, त्यातंच जगतं आणि त्यातच विलीन होतं. ते चैतन्य आणि आपण वेगळे नाही त्यामुळे भक्तीची (किंवा कोणत्याही साधनेची; ज्याविषयी तुम्ही पुढच्या प्रतिसादात विस्तृत लिहीलंय) गरज नाही.
....आता यातल्या काहींच्या अतिरेकाचे काही हानिकारक परिणाम झाले, साइड-ईफेक्ट्स झाले, हेही मान्य व्हावे. जसे, पर्यावरणाची हानी, ग्लोबल वॉर्मिंग, अणुयुद्धे, नरसंहार, आत्यंतिक सुखलोलुपतेमुळे शारीरिक आणि मानसिक सौख्याचा विनाश वगैरे. याचे एक कारण सुचते, ते असे की ही सर्व मानवनिर्मित संसाधने (अथवा साधने म्हणू) कशी वापरायची तेही मानवानेच ठरवले.
यू विल बी सप्राइज्ड. साधनांचा अयोग्य वापर हे उघड कारण दिसत असलं तरी मुळ कारण आहे स्व-विस्मरण ! हे स्व-विस्मरण काय आहे ते कळायला स्वरुपाचा उलगडा व्हायला हवा. ट्राय टू अंडरस्टँड धिस, ज्याला आपण अमृत आहोत याचा उलगडा होईल तो युद्धाची विफलता जाणेल. आपण अस्तित्वाशी समरुप आहोत हे लक्षात आलं की आपसूक पर्यावरणाला कमीतकमी धक्का लागेल. आपल्या विदेहत्त्वाचा बोध झाला की शरीराचा यथायोग्य वापर होतो आणि आपण स्वयेच शांती आहोत हे जाणलेल्याला मनःशांतीसाठी काहीही करायची गरज नाही!
या साधनांचा योग्य वापर करण्यात मानवाची बुद्धी कमी पडली/पडते, म्हणून हे श्रद्धेचे, अंधश्रद्धेचे, भोंदू बाबांचे, जपतप-अनुष्ठानाचे, निष्क्रियतेचे, जबाबदारी झटकण्याचे प्रश्न निर्माण होतात.
असं नाही. धीस इज वेरी इंटरेस्टींग. मृत्यू या अत्यंत मुलभूत मानवी भीतीवर आणि जगणातल्या सर्व विवंचनांवर `देव' हा एकमेव आणि रामबाण उपाय आहे कारण तो सर्वाचा कारक (आणि तारक) आहे ही खुळी कल्पना सर्वाच्या मुळाशी आहे. या कल्पनेनं धर्मगुरु पोटं भरतात आणि राजकारणी त्यांच्याशी संधान साधून सामाजिक विघटनातून सत्ता उपभोगतात. बडव्याला फुल कल्पना असते की देव दगडाचा आहे आणि सर्वस्वी निरुपयोगी आहे पण स्वतःच्या पोटावर कोण लाथ मारुन घेणार? आणि राजकारण्याला दोन गोष्टी पक्क्या माहिती असतात : एक, समुहाला जीवनात बदल घडवण्यासाठी कुणी तरी तारणहार हावायं आणि दोन, सर्वात जास्त ट्रॅफिक धर्मस्थळी आहे. त्यामुळे सर्व यशस्वी राजकारणी दोनच गोष्टी करतात : एक, जनतेच्या उज्वल भविष्याचे आपण कर्ते आहोत हे पटवून देतात आणि आतून धर्मगुरुंशी संधान ठेवून असतात.
चित्त एकाग्र आणि विकाररहित राखू शकल्यास अधिक सूक्ष्म आकलन होऊ शकते, निर्णयक्षमता वाढते हे आपण अनुभवतो. त्यासाठी काही मार्ग सांगितले आहेत. पण ही अधिकची आकलनशक्ती, ज्ञान का मिळवायचे, हे मानवाने ठरवायचे आहे. आजपर्यंत मानव प्रत्येक गोष्ट त्याच्या आदिम प्रेरणेनुसार केवळ स्वान्तसुखाय करीत आलेला आहे. देव पाहिजे, कशासाठी तर मानवाच्या सुखासाठी. पर्यावरण जपले पाहिजे, मानवाच्या हितासाठी. गाय उपयुक्त पशू आहे,कारण ती आपल्यासाठी दूध देते (तिच्या वासरांसाठी नव्हे). अशा तर्‍हेने हे विश्व मानवकेंद्रित आहे असे धरूनच मानव वागतो. सर्व सृष्टी जणू मानवाने स्वतःसाठी वेठीला धरली आहे. त्यात 'देव' ही कल्पनासुद्धा आलीच.
स्वकेंद्रिततेचं मूळ कारण पुन्हा भीतीच आहे (`माझं काय होणार'? ही सतत अस्वस्थ करणारी चिंता) आणि भयाचं कारण स्व-विस्मरण आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

धन्यवाद. देवाचा बाजार फक्त धर्ममार्तंडांनी किंवा राजकारण्यांनीच मांडला आहे असे नाही. तो तर प्रत्येकानेच मांडलाय. कारण देव ही अंकल्पना त्याच्या तथाकथित सुखासाठी आहे. या अंकल्पनेमुळे त्याला चैन (हिंदीतला अर्थ) आणि आराम मिळाल्यासारखे वाटते. आणि ज्यामुळे सुख मिळेल अशी आशा असते, त्याचा बाजार होतोच. कारण माणूस सुख बाजारात(च) शोधतो. जे होधतोय ते आपल्यामध्येच असू शकते ते त्याला पटत नाही. आपण स्वविस्मरणाचा मुद्दा बरेच वेळा मांडता तो इथे रेलेवंट वाटतो. आपण कोण आणि काय आहोत हे व्यावहारिक पातळीवरही माणूस लक्ष्यात ठेवेत नाही. 'तुझा पगार किती, तू बोलतोस किती' हे विनोदी वाक्य प्रत्यक्षातही खरे आहे. माणूस आपल्या क्षमतांचे आणि मर्यादांचे भान ठेवीत नाही. स्वतःला तटस्थपणे न्याहाळीत नाही. 'पहावे आपणासी आपण' असे रामदासांनी लिहून ठेवले आहे, इतरांनीही लिहिले आहे. 'जगी सर्वसूखी असा कोण आहे, विचारी मना तूचि शोधूनि पाहे.' याचा अर्थ मला असा जाणवतो की, ' हे विचारी म्हणजे विचार करणार्‍या मना, तो (जगी सर्वसूखी असा) तूच आहेस, (फक्त) शोधून पहा.' जो विचार करतो, स्वतःचा शोध घेतो तो सर्वसुखी असतो. आत्मशोध हाच अंतिम शोध आहे आणि आत्मज्ञान हेच अंतिम ज्ञान आहे.

In reply to by राही

@ संजय आणि राही, दोघांचेही प्रतिसाद आवडले नि पटले देखील. फक्त... तत्त्वज्ञानाची मांडणी ही प्रत्येकासाठी आहे. ह्यामध्ये अत्यंत सामान्य व्यक्तीपासून ते साधक नि सिद्धापर्यंत देखील तत्त्वज्ञान आहे. दहावीला अभ्यास करताना तुझ्या कल्याणासाठी सगळा अभ्यास कर म्हणणं नि ते समोरच्या विद्यार्थ्याला मनोमन पटून त्यानं स्वतःहून अभ्यास करणं हे एक उदाहरण आणि तू अभ्यास केला नि चांगले मार्क मिळून पास झाला की अमुक मिळेल चं आमिष दाखवून अभ्यास करणं, करवणं ह्या मध्ये जर वेगवेगळ्या प्रकारे अभ्यासाच्या पद्धती वापरल्या तर बिघडतं कुठं? एक काळ असा येण्याची अपेक्षा आहे की आमिष दाखवून केलेला अभ्यास सुद्धा हा कल्याणाचाच आहे हे विद्यार्थ्याच्या लक्षात येईल. मात्र ह्यामध्ये परिणाम सारखा असल्यानं होणारं संभाव्य नुकसान टळलेलं असेल. (वेळ कमी जाईल, अभ्यासामध्ये रुचि निर्माण होईल, अभ्यासाचा पाया पक्का असेल.) सगुण भक्तीमार्गाचं तेच आहे. ज्या जगात राहायचं त्यातल्या लोकांशी फटकून वागून ह्या, तुला काही कळत नाही, तुझी अक्कल शून्य आहे, असं कधी असतं का? म्हणण्यापेक्षा त्या लोकांच्या पातळीवर उतरुन त्यांनाही बरोबर घेऊन, त्यांना चुचकारुन, त्यांच्या भाषेत समजावून त्यांचा उद्धार करण्याचं कार्य- महान कार्य- संतमंडळींनी सातत्यानं केलेलं आहे. त्यांच्या कार्याला नाकारण्याचं कारण आपल्याला नाही, अधिकार तर मुळीच नाही. विचारांमधला नि अनुसरले जाणारे मार्ग ह्यांतला फरक हा सातत्यानं राहीलच मात्र ध्येय समान असल्यास(तरच) त्याला विरोध करण्याचं कारण नाही...

In reply to by प्यारे१

माझा पहिला प्रतिसाद पाहा :
इतक्या बाळबोध आणि मूर्ख गोष्टीच समर्थन याला "विचारांची क्लॅरिटी" म्हणणं हा तर त्याहून मोठा विनोद
माझा आक्षेप गोष्टीला आणि तिच्या समर्थनाला आहे. त्या गोष्टीच्या बाळबोधपणाला आणि निराधारतेला आहे. अजूनही जर देव आकाशात आहे आणि तो आपल्याला तारेल असं वाटत असेल आणि आपण त्या काल्पनिक देवाची आरती करत असू तर `दहावी' कधी पास होणार? माझा फोकस विचारसरणीवर आहे व्यक्तीवर नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

म्हणूनच तुमच्याच शब्दात सांगितलं होतं लेख पुन्हा एकदा नीट वाचा. :) वाचला नाही ना लेख? लब्बाड! ;) दत्त जयंतीची गोष्ट अशी अशी आहे हे सांगून नंतर गोष्टीबाबत उहापोह होऊ शकतो हे माझं पहिलं विधान आहे. पारंपारिक पद्धतीनं दत्तजन्माची कथा अशी अशी सांगितली आहे ह्याबाबत (कथेच्या तपशीलाबद्दल)काही आक्षेप? कथा बाळबोध आहे पण तीच्च आजवर चालत आली आहे. देव आकाशात आहे नि तो मला तारेल असं मला (प्यारेला)वाटतंय हा आपलाच आणखी एक स्व-शोध. त्याबद्दल बोलण्याची इच्छा नाही. असो!

In reply to by प्यारे१

मग कुठे आहे तुमचा दत्त? लेख पूर्ण वाचला आहे त्याबद्दल तुम्ही नि:शंक राहा. आणि
श्रीगुरु कॄपेने दिल्या गेलेल्या ह्या दत्तांच्या कृपेने माझी संसारविषयक म्हणजे एकंदर प्रपंचाची 'काय होईल नि कसं होईल'ची चिंता दूर झाली आहे ....
यातनं तुम्ही लोकांना आरतीला लावून (स्वतःच्या धारणात्मक) भ्रमात नेतायं की नाही याचा विचार करा. तुम्ही वरकरणी "दोघांचेही प्रतिसाद आवडले नि पटले देखील " म्हणत असलात तरी पुढे "फक्त" जोडून कुठेही नसलेल्या देवाचीच (भक्तीमार्गाची) भलावण केली आहे. एक साधा प्रश्न आहे : जो अस्तित्वातच नाही त्याची आरती करुन उपयोग काय? आणि पटलं नसेल तर केवळ प्रतिवाद करता येत नाही म्हणून पटल्याचा बहाणा करण्यात अर्थ नाही. देव आहे ही जनमानसाची धारणा इतकी दृढ आहे की तीचं सहजी निराकरण होणं कठीण आहे. इथेच पाहा, तुम्ही देखिल पुढच्या आरतीचं लोकाग्रहास्तव ('लवथवती विक्राळा'ची वाट पाहतोय) आवताण घेतलंय. आणि ज्यांच्याकडे भारताचे भावी पंतप्रधान म्हणून बघितलं जातंय त्यांनी वाराणसीत 'रामराज्य आणेन' असा वादा केलायं. ज्या मॅच्युरिटीनं राहीनं विचार मांडलेत ती तुम्हाला प्रामाणिकपणे पटली असेल तर लोकमताला न जुमानता देव या कल्पनेचा अव्हेर करा. तुमच्या एका प्रामाणिक स्वीकारानं तुमच्या बरोबर इथल्या असंख्य सदस्यांना वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टीकोन लाभेल. ती एका नव्या पर्वाची सुरुवात असेल आणि पब्लिक फोरमचा तो सुयोग्य उपयोग होईल.

In reply to by संजय क्षीरसागर

____/\____ आईशप्पथ, वेड्यासारखा हसतोय. एकटाच्च. =)) देव- प्रतिमारुप ,अवताररुप, ईश्वररुप, ब्रह्मरुप- आहे. त्याची - सगुणरुपातल्या देवाची आरती होते. अवतारांच्या चरित्रांचं वाचन, स्मरण होतं, ईश्वराच्या आज्ञा पाळल्या जाव्यात अशी अपेक्षा असते नि ब्रह्म म्हणजेच तुम्ही म्हणता तो स्व, अर्धवटराव म्हणतात ते सच्चिदानंदरुप नि चैतन्य (आत्म तत्त्व, गुरुतत्त्व इ.इ.इ.) ह्याच्याशी भक्त एकरुप होतो. त्याला आपलं म्हटल्यानं आपला दृष्टीकोन बदलून आपल्या काळज्या मिटतात. (हा बायप्रॉडक्ट आहे.) मला तुमची काही मते नि राहींची काही मते पटतात, काही पटत नाहीत. माझ्या ह्या लेखानं कुणी अशा प्रकारची आरती करत असेल तर ती अत्यंत चांगली गोष्ट असेल. 'लवथवती विक्राळा'बद्दल महाशिवरात्रीच्या आसपास लिहावं म्हणतो. चालेल ना नीलकांत आणि संपादक मंडळ? :) बाकी मोदींची नि प्यारे ची तुलना अस्थानी, अत्यंत विसंगत नि चुकीची आहे. मोठा माणूस आहे तो!

In reply to by प्यारे१

अहो.. मी पण आहे सोबतीला... =)) रामराज्याबद्दलचे विचार वाचुन तर डोळे पांढरे व्हायची वेळ आलि आहे. आणि जरा जपा स्वतःला... भारतात वैज्ञानीक आणि वस्तुनिष्ठ दृष्टीकोन डेव्हलप परायची फार मोठी जिम्मेदारी आहे तुमच्यावर.