दत्त जयंतीनिमित्त भगवान दत्तात्रेयांच्या आरतीचा विचार करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगानं आधी दोन आरत्यांचा ( गणपतीच्या नि देवीच्या ) नि प्रतिसादांचा आढावा घेतला जावा ही विनंती.
ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवतांच्या अंशावताराची जयंती. खरंतर देव जन्म घेतात का असा प्रश्न येतो पण भाविकांना ईष्ट देवतेचं स्मरण करायची संधी मिळावी, त्याद्वारे भक्ती वाढीस लागावी हा हेतू.
दत्त जयंतीची कथा : अत्रि नामक ऋषींच्या पतिव्रता पत्नीची अनसूयेची परिक्षा घेण्यास स्त्रीमत्सरानं सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती उतावीळ होतात, आपापल्या पतिराजांना तयार करतात नि अत्रि नसताना त्यांच्या आश्रमात पाठवतात. भिक्षा मागताना आम्हाला नग्न होऊन भोजन दे अशी अट घालतात. ती आपल्या पातिव्रत्याच्या जोरावर तिघांना लहान बाळ करुन आपलं स्तन्य (दूध) वाढते. अनसूयेवर तिघे प्रसन्न, त्यांच्या बायका गप्प. वर माग म्हटल्यावर तुम्हा ति घांनीही माझं दूध प्यायलेलं आहे त्यामुळे तुम्ही तिघेही आता माझे पुत्र आहात इथेच वास करुन असा म्हटल्यावर त्रिमुखी दत्त बनून अवतार धारण होतो.
कथेबाबत अनेक प्रकारे उहापोह होऊ शकतो. मनोरंजनाचं साधन नसलेल्या नि गुलामीनं पिचत पडलेल्या समाजातला कथेकरी बुवा आपल्या कल्पनाविष्कारानं कथा अशा प्रकारे सांगू शकतो ह्यात आश्चर्य नाही. रुपकं म्हणून वापरलेल्या गोष्टींना घट्ट परंपरांचं स्वरुप येऊन त्यात कर्मठपण कधी आलं ते सांगता येत नाही. सध्या फक्त एवढंच लक्षात घेऊ या की पातिव्रत्याचं सामर्थ्य दाखवण्याबरोबर मनाची निर्वासन (वासनारहित) अवस्था असेल, भगवंताकडे जाताना कुठलाही आडपडदाच काय तर यत्किंचित देखील झाकलेपणा नसला तर, विचारांची क्लॅरिटी असेल तर भगवंत स्वतः घरी येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो.
पूर्ण आरती :
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त । अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत । जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोलवण ।एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥
(पाठ आहे पण हाताशी पटकन khapre.org वर मिळाली. कॉपी करुन घेतली)
आरती शब्दाचा एक अर्थ 'उपास्याबद्दल रती असेपर्यंत म्हणजे प्रेम असेपर्यंत करावयाची ती' असा आपण पाहिलेला आहेच. पुन्हा सांगावं असा हा विषय आहे. अध्यात्माबद्दल सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज असते. कारण ऐकलेलं पटकन 'आत' पोचत नाही . कारण इतर गोष्टींनी मन 'व्यापलेलं' असतं. असो.
ही संतश्रेष्ठ शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी रचलेली आरती आहे. २१ वेळा अंगावर थुंकणार्या यवनास शांतपणे आपल्या वागण्याद्वारे सुधारणारे, पितर भोजनावेळी ब्राह्मणभोजनाऐवजी दीनदलित जोडप्यांना जेवू घालणारे समाज सुधारक, यात्रा करुन परतताना गाढवाच्या मुखी गंगाजल ओतून भूतदया करणारे असे एकनाथ महाराज! स्वत:च्या उदाहरणातून शांतपणे समाजसेवा करता येते हे त्यांनी तेव्हाच दाखवून दिलेलं आहे.
पंगतीला पत्नीच्या पाठीवर एका उद्धटाने उडी मारली तेव्हा 'अगं सांभाळ, त्यांना पाडशील' म्हणून मिश्किलपणं त्याची जागा दाखवून देणारे, भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन नि अध्यात्माचे अवघड सिद्धांत सहज समजावून सांगणारे एकनाथ महाराज. कार्यालयीन कामकाजात एक पै चा हिशेब सापडेना म्हणून रात्रभर जागून तो शोधणारे व्यवहार दक्ष नि खाजगी कामासाठी सरकारी दिवा विझवून, स्वखर्चाच्या तेलाचा दिवा जाळणारे एकनाथ महाराज. विस्मृतीत गेलेल्या ज्ञानेश्वरीला शुद्ध प्रत करुन पुन्हा प्रचार करणारे एकनाथ महाराज जणू ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्याभोवतीची ही कर्मठपणाने फासणारी मुळीच जणू सोडवतात.
अशा सर्वार्थाने श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी रचलेली ही भगवान दत्तात्रेयांची आरती आहे.
मागे एका प्रतिसादात लिहील्याप्रमाणं भगवदतत्त्व सगळीकडं सारखंच. एकाच व्यक्तीला काका, मामा, बाबा, भाऊ, दादा, सर, साहेब, बंड्या म्हटल्याप्रमाणं कार्यानुसार नि कारणानुसार त्याचं नाम बदलतं. विश्व निर्मितीच्या कार्य शक्ती नि तेव्हाच्या अधिष्ठानाला ब्रह्मदेव, विश्वाचा पसारा सुरु राहण्याच्या कार्यशक्ती च्या अधिष्ठान देवतेला विष्णू नि तोचा संहार करण्याच्या शक्तीच्या अधिष्ठानाला महेश असं नाव आहे. हीच त्रैमूर्ती.
ज्या 'मोडस' मध्ये (अनुषंगाने) ती काम करते ते त्रिगुण. हालचालीशिवाय कार्य शक्य नाही. कुठलीही गोष्ट सुरु करण्यासाठी आवश्यक हालचाल अथवा जी क्रिया लागते तिला रजोगुण म्हणतात. नि सांभाळण्यासाठी आवश्यक असतं ते स्थैर्य. टिकणं. ह्या टिकण्याच्या मागं असणारा भाव असतो तो सत्त्वगुणाचा म्हणून ओळखला जातो. नि संपवण्यासाठी आवश्यक असतो तो तमोगुण म्हणजे संहार करण्याची क्रिया.
हल्लीच्या कोलॅबोरेशन च्या जमान्याच्या भाषेत बोलायचं तर दत्त भगवान हे एक 'टायअप' आहे तिन्ही गुणांच्या अभिव्यक्तीचं, तिन्ही प्रकारच्या शक्तींचं! पण ह्या तीन क्रिया म्हणजे भगवान दत्त नव्हेत किंवा हे तीन गुण म्हणजे दत्त नव्हेत. तर त्रिगुणात्मक म्हणजे तिन्ही गुणांचा आत्मा म्हणून म्हणजे ज्याला आपण मूळ स्त्रोत म्हणू शकू असे हे दत्त भगवान आहेत. मुळात ते काहीच करत नाहीत. ज्याप्रमाणं वीजेच्या बलावर हीटर नि रेफ्रिजरेटर दोन्ही चालून अनुक्रमे गरम नि थंड करण्याची कामं होतात पण वीज गरम किंवा गार नव्हे त्याप्रमाणं दत्त त्रिगुणात्मक आहेत खरे पण त्रिगुण म्हणजे दत्त नव्हेत तर त्रिगुण ज्याच्या अधिष्ठानावर काम करतात ती गोष्ट (इथं थोडं आणखी विश्लेषण म्हणजे असं एक जागी दाखवता येईल नि दुसरीकडं येणार नाही असं ते नसतंच मुळी. सबाह्य अभ्यंतरी पुढं येईलच)
दत्त म्हणजे दिलेला. कुणी दिला? कसा दिला? आपण वर पुराणातली कथा पाहिली. दत्तांच्या आईचं नाव अनसूया नि वडलांचं नाव अत्रि. कथा फार काही 'सांगणार्या' असतात. बहुतेकदा रुपक कथाच असतात त्या. आओअण नीट पाहिलं तर ह्या कथा पुष्कळ काही देऊ शकतात.
अ त्रि म्हणजे जे तीन च्या पलिकडे आहेत असे ते.
तीन गोष्टींची भली मोठी यादी आहे. तीन गुण -सत्त्व, रज, तम , तीन काल - भूत, वर्तमान, भविष्य, तीन अवस्था - जागृती, स्वप्न, सुषुप्ति, तीन देह- स्थूल, सूक्ष्म, कारण देह अशा सगळ्याच्या पलिकडं गेलेल्या व्यक्तीमध्ये दत्ताची अभिव्यक्ती शक्य आहे. (अथर्वशीर्षामध्ये त्वं गुण, देह, काल, अवस्था त्रयातीतः असं जे गणनायकाचं वर्णन आहे ते हेच्च्च्च! एकाच व्यक्ती चा हाक मारताना पुतण्याकडून काका नि दुसर्या बाजूनं भाच्याकडून मामा म्हणून उल्लेख येतो तसंच)
हेच अनसूया ह्या आईबद्दल. अन-असूय= असूया नसलेला/ली हे मनाचं स्वरुप असलेल्या व्यक्तीमध्ये दत्त भगवान येतात.
मुळात हे दत्त वगैरे का आणायचे जीवनात?
माणसाच्या जीवनात अनेक प्रकारच्या संघर्षामध्ये स्पर्धा, मत्सर, हेवेदावे असतात पण ज्या व्यक्तीला असूया नाही त्याला ह्या कशाचा त्रास होत नाही. आपल्याला वाटेल मग प्रगती कशी होणार? स्पर्धेशिवाय प्रगती कशी शक्य आहे ? उदाहरण घेऊ. शाळेत असताना एकाला ७५ % मिळाले तरी इतर ७०% च्या आसपास असल्यानं पहिला नंबर मिळायचा. एकदा असंच एकानं सांगितलं तुला ७५% मिळतात म्हणजे २५ % येत नाही का? डोळे उघडले. परिक्षा कितीची आहे? १०० % ची आहे ना? मग आपण १०० % साठी काम केलं पाहिजे. दुसरा ७० % वर असो अथवा ९५ % वर!
स्पर्धा कुणाची? कुणाशी? ह्या विचारामध्ये आपण इतरांशी तर नाहीच तर स्वतःशीसुद्धा स्पर्धा नाही करत. मला १०० % यावं एवढा भाव निर्माण होतो.
भूतकाळाची नि भविष्याची चिंता मुख्यत्वे भीतीपोटी असते. भीतीचा उगम पुन्हा आपण असू का नसू ह्यामध्ये असतो. एकदा आपण शरीर नाही तर चैतन्य आहोत हा भाव आत पक्का झाला की जमतं. थोडं अवघड वाटतं पण आधीच्या लेखात म्ह्टल्याप्रमाणं जर 'जे माझं आहे ते मी नाही' हे पक्कं झालं की माझा मोबाईल, घड्याळ म्हणजे मी नाही हे जसं मान्य तसं माझा हात, माझा पाय, माझं शरीर, माझं नाव, माझी शैक्षणिक पदवी, माझी संपत्ती, माझे नातेवाईक, माझं मन, बुद्धी चित्त म्हणजे मी नाही हे लक्षात येतं, पटतं. हळू हळू हे आत्मसात व्हायला लागतं. ह्यातून भीती जाते, चिंता जातात, काळजी जाते.
अनसूयेच्या पोटी येणारे दत्त ह्यासाठी आपल्यामध्ये आणावेत. असूया गेली नि भूत भविष्याच्या चिंता गेल्या की बरंचसं मन मोकळं होतं. मन मोकळं झालं की आनंद असतो, आनंद असला की समाधान असतं.
आपण पहिल्या ओळीतला पहिला चरण बघतोय अजून. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा 'जाणा' वर म्हटलेलं सगळं हे जाणण्याचीच तर प्रक्रिया आहे. नेमकं काय आहे हे एकदा समजलं की पुढचं सगळं एकदम स्वच्छ होऊन जातं.
माहिती असणं वेगळं, समजणं वेगळं, समजून घेणं वेगळं नि जाणणं वेगळं. हे जाणल्यावर पुन्हा वेगळं काही जाणण्याची गरज तर राहत नाहीच पण वखवख देखील थांबते.
हे एकदा समजलं म्हणजे जणू 'मास्टर की' सापडली!
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा.: असा हा (तिन्ही गुणांचे स्वामी एकत्र आलेला) अवतार तिन्ही लोकांचा राणा म्हणजे राजाच जणू. (बाकी आनुषंगिक म्हणून तमोगुणाचे स्वामी म्हणून शंकर तमोगुणी नाहीत तर ते त्याचे स्वामी आहेत. बर्याच जणांचा तसा समज पुराणकथांचा पाठिंबा असल्यानं जाणवतो खरा मात्र हे खरं नाही. आमच्या घाटपांडे काकांनी पोलिसात असताना अनेक जणांची पाठ फोडली असेल पण म्हणून ते रागीट ठरत नाहीत तसंच काहीसं! असो. महाशिवरात्रीला शंकराची आरती बघू अशी महादेवाला प्रार्थना!)
नेति नेति शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनिजन समाधी न ये ध्याना|
जोवर नेमका भाव समजत नाही तोवर गूढ आकलन होत नाही त्यामुळंच हे वेद शास्त्र नेति नेति (हे नाही, ते नाही असं) म्हणत राहतात नि कुठल्या अनुमानाप्रत येऊ शकत नाहीत. वर म्हटल्याप्रमाणं जे माझं ते मी नाही चा विचार अगदी ह्याच प्रकारे करता येऊन नेति नेति नि शंकराचार्यांच्या आत्मषटकाला जाऊन पोचतो.
'न जाणता कोटीवरी| साधने केली परोपरी| तरी मोक्षास अधिकारी| होणार नाही||' असं म्हणतानाचा समर्थ रामदासांचा भाव,
'तीळ जाळिले तांदूळ, काम क्रोध तैसेचि खळ' म्हणणारे तुकाराम महाराज, 'वस्तुर्सिद्धीर्विचारेण न कश्चित कर्मकोटिभि'
ह्या सगळ्याचा नि सुरवरमुनिजन योगी 'समाधी न ये ध्याना' चा एकंदर अर्थ हाच की योग्य मार्गानं सारासार विचार नि विवेक करुनच नेमकं काय हे समजून घेऊनच मोक्षपद प्राप्ती करुन घेतली जाऊ शकते (मुळात ते नित्यप्राप्त च आहे, चुकीच्या धारणांमुळं बंधन वाटतं (आरशावर घाण असली तर प्रतिबिंब दिसत नाही पण ते असतं तसं. आरसा स्वच्छ करावा लागतो))
जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता | आरती ओवाळीता हरली भवचिंता
भव चिंता: भव म्हणजे संसार. दुसरा अर्थ माझ्यापुरतं असलेलं जग. आपल्या आजूबाजूचंच. सगळ्याचा विचार काही ठराविक लोकांसाठी सोडून देऊ. (असतात तसे. असो द्यावेत) श्रीगुरु कॄपेने दिल्या गेलेल्या ह्या दत्तांच्या कृपेने माझी संसारविषयक म्हणजे एकंदर प्रपंचाची 'काय होईल नि कसं होईल'ची चिंता दूर झाली आहे असं नाथ महाराज म्हणतात तेव्हा ते आपल्यासाठी जास्त असतं. संत स्वतःसाठी बोलताना सुद्धा सगळ्यांचं हीतच पाहतात.
सबाह्य अभ्यंतरी म्हणजे सगळीकडे व्यापून असलेलं तत्त्व ते तूच आहेस. विश्वनिर्मिती ते विश्वाचा लय ज्याच्या सत्तेवर (बेसवर) चालतो ते चैतन्यरुप म्हणजे दत्त. ही गोष्ट अभाग्याला मात्र कळू शकत नाही.
पराहि परतली तेथ कैचा हा हेत, जन्ममरणाचा पुरलासे अंत|
आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलण्याची मूळ सुरुवात होते ती म्हणजे परावाणी. परा, पश्यन्ती, मध्यमा नि वैखरी अशा चार वाणी आहेत. वैखरी म्हणजे आपण जे बोलतो ते. मात्र परावाणी मध्ये मूळ सुरुवात होते असं मानतात.
ते तसंच का मानायचं? गणित सोडवायला एक 'क्ष' लागतो म्हणून. बस्स्स. समीकरण सोडवून 'क्ष' चं विसर्जन च अपेक्षित आहे. तर ही जी परावाणी आहे ती सुद्धा परतते असं दत्तात्रेयांचं स्वरुप आहे.
थोडासा विचार करुया. आपण कधी कधी शांत बसतो. अगदी शांत. काहीच विचार नाही. तेव्हा काय होतं? आतलं सगळं शांत असतं. मन हे करु का ते करु असं काम नसतं करत, बुद्धीला घ्यायला कुठला निर्णय नसतो, चित्त काही साठवून ठेवायला नसल्यानं गप्प असतं, तसंच विचाराचा उगम असलेली परावाणी सुद्धा आपल्या मूल स्थानावर असते. चक्र सुरुच नाही ना कसलं! त्यामुळं शांतीचा अनुभव येतो. ह्यालाच परावाणीचं मूलस्थानी परतणं म्हणायचं. जास्त डिटेल्स नकोत पण जेव्हा सगळं अत्यंत शांत असतं तेव्हा दत्ताचं दर्शन झालं असं म्हणायचं.
हे कधीकधी एका जन्मात शक्य होत नाही म्हणून 'जन्ममरणाचा अंत पुरतो'. जन्मो जन्म सुद्धा घालवावे लागतात.
दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला : अशा सातत्याच्या विचारातून कधीतरी जाणून घेतलेल्या अनुभवातून दत्त हा अनुभव येतो त्याला शाश्वततेकडे नेणार्या सतभावानं प्रणिपात म्हणजे अहं सोडून नमस्कार केला.(भाव म्हणजे जो स्थिर असतो तो तर भाव-ना म्हणजे अस्थिर भाव, अभाव म्हणजे नाहीच्च! )
अशा रितीने तत्त्व समजल्यानं आशीर्वाद लाभला नि जन्ममरणाचा फेरा म्हणजे हे जे 'मी नि माझं' चं खरं स्वरुप समजलं त्यामुळं त्या बंधनातून माझी मुक्तता झाली.
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन,
मीतूपणाची जाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान||
तत्त्व समजलेलं आहे, त्यामाग ची प्रेरणा जाणलेली आहे, जनार्दनस्वामी जे श्रीगुरु आहेत त्यांची कॄपा झालेली आहे अशा दुग्धशर्करायोगानं प्रारब्ध योगानं नि स्वप्रयत्नानं नाथ महाराजांना त्रिगुणातीत, अनसूय बुद्धीनं मिळालेल्या दत्ताचं ध्यान लागलंय, हे ध्यान लागल्यानं मनाचं, बुद्धीचं, चित्ताचं, अहंचं काम थांबून मनाची उत-मन म्हणजे जणू मन शिल्लकच नाही अशी अव स्था झालेली आहे. एकच तत्त्व सगळीकडं असल्याचा अनुभव, अनुभूती आल्यानं वेगळेपणा शिल्ल क नाही, मी आणि तू असं काही नाहीच सगळीकडं एकच एक असल्याचा भाव जागृत झालेला आहे.
असाच आनंदाचा ठेवा सगळ्यांना प्राप्त व्हावा हीच विनवणी श्री दत्तात्रेय, एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी नि श्रीगुरुंच्या चरणी अर्पण करतो.
सगळ्यांना दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
वाचने
45608
प्रतिक्रिया
246
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाई,
In reply to आमच्या सारख्या महामूर्ख by म्हैस
असं होतं (आणि ते अनुसयेला
पिलीयन रायडर
पण देव , धर्म ह्याच्यावर मतं
In reply to पिलीयन रायडर by म्हैस
>>>>अन भोंदूबाबांचं फावतं ते
In reply to पण देव , धर्म ह्याच्यावर मतं by बॅटमॅन
पण देव , धर्म ह्याच्यावर मतं
In reply to पिलीयन रायडर by म्हैस
हा प्वाइंट तर मी विसरलोच होतो
In reply to पण देव , धर्म ह्याच्यावर मतं by प्रचेतस
तेव्हा दत्ताची प्रचिती आलेली
In reply to हा प्वाइंट तर मी विसरलोच होतो by बॅटमॅन
ठ्ठो!!!!!
In reply to तेव्हा दत्ताची प्रचिती आलेली by मारकुटे
बाकी काय ओ म्हैसतै, बहुसंख्य
चार पुस्तके लिहिल्याने अमुक
In reply to बाकी काय ओ म्हैसतै, बहुसंख्य by म्हैस
>>चार पुस्तके लिहिल्याने अमुक
In reply to चार पुस्तके लिहिल्याने अमुक by बॅटमॅन
अरेच्या माझा प्रतिसाद हरवला
In reply to बाकी काय ओ म्हैसतै, बहुसंख्य by म्हैस
अहो म्हैसतै
In reply to बाकी काय ओ म्हैसतै, बहुसंख्य by म्हैस
प्यारे , batman माझ्या
(नुकताच बिकांचं शिष्यत्व
In reply to प्यारे , batman माझ्या by म्हैस
बिकाचालिसा किंवा बिका
In reply to (नुकताच बिकांचं शिष्यत्व by प्यारे१
सूचनेबद्दल आभारी आहे.
In reply to बिकाचालिसा किंवा बिका by मारकुटे
(No subject)
In reply to सूचनेबद्दल आभारी आहे. by प्यारे१
चार पुस्तके लिहिल्याने अमुक
म्हशे, तुला माहिती नाही
In reply to चार पुस्तके लिहिल्याने अमुक by म्हैस
असं कसं ? देव नसतो आणि त्याची
In reply to म्हशे, तुला माहिती नाही by बॅटमॅन
तथाकथित विज्ञानवाद्यांचा
In reply to असं कसं ? देव नसतो आणि त्याची by मारकुटे
मा.श्री. ज्यांनी हा प्रतिसाद
In reply to तथाकथित विज्ञानवाद्यांचा by बॅटमॅन
आणि ज्यांना पुल स्टाईल रेकणे
In reply to मा.श्री. ज्यांनी हा प्रतिसाद by बॅटमॅन
ब्याट्या, भैंस के आगे रोना
In reply to म्हशे, तुला माहिती नाही by बॅटमॅन
संपादीत होणार पहा तुमचा
In reply to ब्याट्या, भैंस के आगे रोना by सूड
गप रंव मरे!!
In reply to संपादीत होणार पहा तुमचा by मारकुटे
अगदी अगदी!!!!
In reply to ब्याट्या, भैंस के आगे रोना by सूड
@त्याने खंडोबाचा साक्षात्कार
In reply to चार पुस्तके लिहिल्याने अमुक by म्हैस
खंडो"बा
चा साक्षात्कार! येथे असंख्य धाग्यांवर खंडन करत फिरतो नाही का तो खंडो'बा! समांतर- चक्क आपण ज्याच्याशी भांडतोय..तोच हा आपला खंडोबा'चा नवा अवतार...ही साधी अनूभूती दत्तसांप्रदायिक आध्यात्मिक म्हैशीस(अजूनपर्यंत) येऊ नये,याचं आंम्हास लै लै आश्चर्य वाटतं!अगागागागागागागागागा काय काडी
In reply to @त्याने खंडोबाचा साक्षात्कार by अत्रुप्त आत्मा
चांगभलं!
थोडा वेळ थांबा...३३ कोटी देव
In reply to चांगभलं! by पैसा
अहो दत्त हा रूद्राचा अंशावतार
In reply to चांगभलं! by पैसा
मंदीरातून लाखो भुंगे येउन
In reply to अहो दत्त हा रूद्राचा अंशावतार by प्रचेतस
हो पण त्यावेळेस म्हणे दत्त
In reply to मंदीरातून लाखो भुंगे येउन by कवितानागेश
साक्षात औरंगजेबाला प्रचीती
In reply to मंदीरातून लाखो भुंगे येउन by कवितानागेश
हो.
In reply to मंदीरातून लाखो भुंगे येउन by कवितानागेश
आयला याच्या पण मल्टिपल
In reply to हो. by प्रचेतस
>>मग जेजुरी काय नैतर गाणगापूर
In reply to अहो दत्त हा रूद्राचा अंशावतार by प्रचेतस
व्हाया मुलखेड मार्गे आहे ते!
In reply to चांगभलं! by पैसा
थांबा थांबा बॅटमन.. "देव नसतो
एक र्हायलं का?
In reply to थांबा थांबा बॅटमन.. "देव नसतो by गवि
--गविल वागळे ...
In reply to थांबा थांबा बॅटमन.. "देव नसतो by गवि
मुळ मुद्याचा प्रतिवाद करता आला नाही की त्याला
यावं राजे यावं !! तुमचीच
In reply to मुळ मुद्याचा प्रतिवाद करता आला नाही की त्याला by संजय क्षीरसागर
तुम्ही थकाल पण काही उप्योग
In reply to मुळ मुद्याचा प्रतिवाद करता आला नाही की त्याला by संजय क्षीरसागर
आरती नंतरची आणि पूर्वीची
In reply to मुळ मुद्याचा प्रतिवाद करता आला नाही की त्याला by संजय क्षीरसागर
हा हंत ! दत्तोबांना च्यालेंज
In reply to आरती नंतरची आणि पूर्वीची by कवितानागेश
संपादित
In reply to हा हंत ! दत्तोबांना च्यालेंज by मारकुटे
धन्यवाद!
In reply to संपादित by मोदक
एकही मारा लेकिन सॉल्लिड मारा!
In reply to आरती नंतरची आणि पूर्वीची by कवितानागेश
तस्मात जगणं व्यर्थ आहे!
In reply to आरती नंतरची आणि पूर्वीची by कवितानागेश
अपेक्षित प्रतिसाद.
In reply to तस्मात जगणं व्यर्थ आहे! by संजय क्षीरसागर
आश नाझ्ग दुर्बातुलुक, आश
In reply to बळेच नामोल्लेखाचे कारण समजले by बॅटमॅन
हे काय आहे?
In reply to आश नाझ्ग दुर्बातुलुक, आश by पिलीयन रायडर
चित्श्क्ती
प्रतिसाद आवडला. मात्र आपण
In reply to चित्श्क्ती by राही
तेच तर
In reply to प्रतिसाद आवडला. मात्र आपण by प्यारे१
रिझल्ट काय ?
In reply to तेच तर by राही
असो.
In reply to रिझल्ट काय ? by प्यारे१
अगदी बरोबर आहे. आरसा स्वच्छ
In reply to असो. by राही
@ राही - अत्यंत दुर्मिळ आकलन आणि मांडणीतला वेगळेपणा
In reply to तेच तर by राही
देवाचा बाजार
In reply to @ राही - अत्यंत दुर्मिळ आकलन आणि मांडणीतला वेगळेपणा by संजय क्षीरसागर
@ संजय आणि राही,
In reply to देवाचा बाजार by राही
लोकांच्या पातळीवर उतरुन त्यांनाही बरोबर घेऊन......
In reply to @ संजय आणि राही, by प्यारे१
म्हणूनच तुमच्याच शब्दात
In reply to लोकांच्या पातळीवर उतरुन त्यांनाही बरोबर घेऊन...... by संजय क्षीरसागर
देव आकाशात आहे नि तो मला तारेल असं मला (प्यारेला) वाटतंय ...
In reply to म्हणूनच तुमच्याच शब्दात by प्यारे१
____/\____
In reply to देव आकाशात आहे नि तो मला तारेल असं मला (प्यारेला) वाटतंय ... by संजय क्षीरसागर
आईशप्पथ, वेड्यासारखा हसतोय. एकटाच्च.
In reply to ____/\____ by प्यारे१