//आयुर्वेद//
प्रयोजन-
स्वस्थस्य स्वास्थ रक्षणम,आतुरस्स विकार प्रशनम !! चरक संहिता
स्वस्थ (निरोगी)व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे व आतुर (रोगी) व्यक्तीचा विकार (रोग) बरा करणे.
आयुर्वेदाची व्याख्याः-
हिताहितं सुखं दुःखमायुस्तस्य हिताहितम !
मानं च तच्च यत्रोक्तमायुर्वेदःस उच्चते !!------चरक सुत्रस्थान.
आयुर्वेद म्हणजे काय ?
हितकर आयुष्य,अहितकर आयुष्य ,सुखकर आयुष्य ,दुखकर अयुष्य,यांचे तसेच या आयुष्यासाठीच्या हितकर म्हणजे पथ्यकारक व अहितकारक म्हणजे अपथ्यकारक गोष्टींचा अभ्यास ज्या शास्र्तामध्ये केला जातो,त्यास आयुर्वेद असे म्हणतात.
आता असा पश्न पडतो की हितकर ,सुखकर आयुष्य म्हणजे काय ? हितकर आयुष्य म्हणजे दिर्घकालिन सुखकारक, स्वस्थ आयुष्य होय.कधी कधी काही गोष्ठी तत्काळ सुखकारक वाटल्या तरी दिर्घकालिन आयुष्याच्या दृष्टीने शरिरास हानिकारक असतात.उदा.जिव्हासुख देणारे पाणीपुरी,बटाटावडा यासारखे पदार्थांचे अतीसेवन झाले तर ते अपचन,पित्ताचे विकार,मुळव्याध,केसांचे विकार इ.अनेक प्रकारचे आजार त्या मनुष्याच्या प्रकृतीनुसार उत्पन्न करतात.्या सर्वांचे उपाय ज्या शास्र्तात येतात तो आयुर्वेद होय.
• आधुनिक काळात आयुर्वेद शास्त्रचा उपयोग व त्याचे महत्वः-
सुखाने जगावे असे सर्वाना वाटते! पण जगण्याचे सुख फार थोडया लोकाना लाभते.भारतीयांनी जगाला दाखविलेले दोन राजमार्ग आयुर्वेद व योगासने. अमेरिकेत च्यवनप्राश विकला जातो! जर्मनीत आसन प्राणयामाचे वर्ग चालत्तात………………पण भारतातील [महाराष्ट्रातील] किती लोकांना आयुर्वेदाचे महत्त्व समजते?............ १
याचे महत्त्व सर्वांना उमगावे याकरिता आमचा हा प्रयत्नः………
आयुर्वेदाची प्रगती ही माणसाच्या अनुभवजन्य ज्ञानातून झाली आहे. आयुर्वेद हे पुरातन शास्त्र आहे परंतु आजही आयुर्वेदाची तत्त्वे बदललेली नाहीत. तिच तत्त्वे वापरुन आजही तितक्याच प्रभावीपणे रुग्ण बरे करता येतात ही गोष्टच आयुर्वेदाची प्रगल्भता स्पष्ट करण्यास पुरेसी आहे.
आयुर्वेदामध्ये रोग होऊच नये म्हणुन करावयाच्या गो्ष्टी (स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम) व रुग्णास रोग मुक्त करणे ( आतुरस्य व्याधी परिमोक्षः) या दोन्ही गोष्टीचे वर्णन आले आहे . ॠतुनुसार शरीरात होणाऱ्या बदलांचा व त्यावरील उपायांचा विचार फक्त आयुर्वेदामध्येच आला आहे.
फक्त आजारी पडल्यावर औषध घ्या असे आयुर्वेद सांगत नाही, आयुर्वेद सांगतो ‘’ हितकर आहार घ्या, निरामय ,स्वस्थ जीवन जगा.’’ वॄदधांनी वातुळ पदार्थ टाळावेत, तरुणांनी खवळते पित्त आवरावे, बालगोपाळांनी खोकला वाढविणारा कफ औषधांनी थोपवावा हेच आयुर्वदाचे सांगणे.
आज आपल्यापुढे अनेक महत्त्वाच्या समस्या आहेत . आजची तरुणपिढि ही उत्साह, तारुण्य , चैतन्य यांनी परिपुर्ण हवी,पण प्रत्यक्षात दिसताहेत केस पांढरे होणे, केस गळणे, डोळ्यांचे विकार, व व्यसनांच्या आधीन झालेले, स्पॉंडीलायसिस, लठ्ठपणा अशा विकारांनी जखडलेली आजची तरुणपिढी! अनेक स्त्रियाही घर व करियर सांभाळताना तारेवरची कसरत करताहेत पण त्याबरोबर आवश्यक तो आहार, आराम ,व्यायाम,योग्य औषधोपचार यांच्या अभावामुळे स्त्रीयांमध्ये आढळतात, अशक्तपणा, हिमोग्लोबीन कमी असणे ,पाळीच्या तक्रारी इ……
सध्याच्या धावपळीच्या जगात आजारापासुन मुक्त होण्यासाठी काही वेळा तात्कालिक आराम देण्या-या आधुनिक औषधांचे उपचार केले जातात. अशा उपचारांमुळे रोगाची लक्षणे नाहीशी झाल्यावर रोगमुक्त झाल्याची गैरसमजुत करुन घेतली जाते व रोगाच्या मुळ कारणांवर उपचार करण्याचे दुर्लक्ष होते.यावर उपाय एकच,तो म्हणजे पुर्वापार चालत आलेला आयुर्वेद आचरणात आणने.
कारण आयुर्वेद ही फक्त उपचार पद्धती नसून जीवन पद्धती आहे.
वाचने
11234
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
कारण आयुर्वेद ही फक्त उपचार
वाचतोय .
मस्त सुरुवात!
लेखन आवडले.
अनाहिता - आरोग्य विभाग.
In reply to लेखन आवडले. by रेवती
+ १
In reply to अनाहिता - आरोग्य विभाग. by प्रभाकर पेठकर
त्यापेक्षा इथे मुख्य बोर्
In reply to अनाहिता - आरोग्य विभाग. by प्रभाकर पेठकर
सदस्य व्हा.
In reply to त्यापेक्षा इथे मुख्य बोर् by आनन्दिता
+१ टु पैसाताई.
पहिला भाग आवडेश ..
मस्त सुरुवात....
पुभाप्र.
आयुर्वेद एक आदर्श जीवन पद्धती
सर्वांना धन्यवाद...
वाचतोय. पुभाप्र.
In reply to सर्वांना धन्यवाद... by बाबा पाटील
बाबा साहेब,
In reply to सर्वांना धन्यवाद... by बाबा पाटील
सुबोध सर्,...
In reply to बाबा साहेब, by सुबोध खरे
पहिल्याच लेखाच्या प्रतिसादात
In reply to सर्वांना धन्यवाद... by बाबा पाटील
पु.भा.प्र.
येऊ द्या बाबा.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
वा वा ! आयुर्वेदावर सुगम पण
एलोपेथीच्या समर्थकांकडून
अॅलोपथीचा दुस्वास का?
In reply to एलोपेथीच्या समर्थकांकडून by मारकुटे
सरासरी आयुष्यमान
In reply to अॅलोपथीचा दुस्वास का? by आनंद घारे
भारतातील आयुर्मानाबद्दलचा
In reply to सरासरी आयुष्यमान by चित्रगुप्त
साहेब, नमस्कार !
In reply to एलोपेथीच्या समर्थकांकडून by मारकुटे
राम राम
In reply to साहेब, नमस्कार ! by डॉ सुहास म्हात्रे
आयुर्वेद आणि ज्योतिष
आयुर्वेद आणि ज्योतिष
In reply to आयुर्वेद आणि ज्योतिष by चित्रगुप्त
माझा आणी ज्योतीष विद्येचा कधीच संबध आला नाही ....
वाचत आहे
उत्तम लेख.
अभिनंदन.
साधारण दिड ते दोन वर्ष ही
उत्तम होईल ही लेखमाला.
वाचते आहे.
वाचतेय.
कोणतेही शास्त्र सर्व रोगांवर
सर्व रोगांवर पूर्ण आणि हमखास इलाज!
In reply to कोणतेही शास्त्र सर्व रोगांवर by कंजूस
आयुर्वेद आणि आधुनिक
माझ्या अॅलर्जी चा उपचार