मिपावर आपण सारे मुख्यत" दोन गोष्टीसाठी येतो .व्यक्त होण्यासाठी व व्यक्त झालेल्याना प्रतिसाद देण्यासाठी. प्रिट मिडीयाचे मालक, संपादक निरनिराळ्या ईझम्सचे रंग फासून वावरत असतात. सुदैवाने मिपा सारखे माध्यम असा कोणताही एकच रंग घेऊन वावरत नाही. मिपा हे व्यक्तीगत आयुष्यातली कसे भिनत जाते याचे प्रत्यंतर आम्हा काहीना येणार होते.
१७ डिसेंबर २०१३ ची संध्याकाळ काही पुणेकरांसाठी एक अचानक जमलेला कट्टा या स्वरूपात अवतरली. अत्यंत अल्प काळात आपल्या दर्जेदार लेखनाने मिपाप्रिय ठरलेले श्री इस्पिक एक्का हे पुण्यात आले आहेत असे ब्याटम्यान याना कळले. एकमेकांच्या एरवी प्रत्यक्ष संपर्कात असलेल्या काही आयडी ना श्री ई. ए. याना भेटण्याची फार दिवसांची इच्छा होतीच. त्याला अत्यंत उदार मनाने 'इ ए' यानी प्रतिसाद द्यायचे ठरवले व बालगंधर्व रंगमंदिराच्या कॅफेट्रिया मधे प्रथम श्री वल्ली, चौरा , मालोजीराव , बॅटमॅन हे इस्पिक एक्काश्री ना भेटले. ते सर्वाना सुहास्यवदनाने भेटले व त्यानी आपल्या मुलाची ओळखही सर्वाना करून दिली.
गरम गरम चाय व कॉफी यांचे घोट घेत आम्ही काही सुरवातीचे प्रश्न श्री इस्पिक एक्का याना विचारू लागलो .आपल्या मिस्कील स्वभावाने व माहितीप्रचुर उत्तरानी त्यानीच खुद्द या मैफिलीत रंग भरावयास सुरूवात केली. गेली काही वर्षे ते
मध्यपूर्वेत एक मल्टी स्पेशालिटी मेडीकल युनिट मधे काम करताहेत. त्या निमित्ताने त्यानी द आफ्रिकेत काही देशाना भेट दिली आहे पण एरवी व्यक्ती म्हणून त्याना प्रवासाची जबर हौस आहे. त्यात काही वेळेस त्यानी सहकुटूंब ही प्रवास केलेले असून एकूण २४ देशाना आतापावेतो त्यानी भेटी दिल्यात असे समजले. मिपावर त्यांचा सध्या विएटनाम प्रवास गाजत आहे.साहजिकच दक्षिण पूर्व आशिया व हिंदू संस्कृति व राजवटी अशा विषयाकडे चर्चा वळली.तेवढ्यात बॅटमॅन आले . त्यानी व मालोजी रावानी मग एक्क्का यांचा ताबा घेतला. अंकोरवाट देवालयाची वास्तूशास्त्रीय माहिती चौ रा व वल्ली घेउ लागले तर ऐतिहासिक बाजू मालोजी, ब्याटोजी हे सरदार संभाळत राहिले. तेवढ्यात प्रशांत, अप्पा जोगळेकर, अत्रुप्त आत्मा, व फक्त ५० राव ही आले. मग गप्पाचा फड अधिक जमण्यासाठी परत एकदा चाय चा राउंड .
आता चर्चा " नॉर्वे ची सफर" हा विषय घेउन आली. आपण ऑरोरा पहाण्यासाठीच हिवाळा निवडला होता एरवी मध्यरात्रीच्या सूर्र्याचा चमत्कार पहायला उन्हाळ्यात जावे लागते हे त्यानी सांगितले. मग मध्यपूर्वेतील राज्यव्यवस्था खरे तर " राजे" व्यवस्था, अर्थव्यवस्था, बंधने, इमिग्रेशन, युरोपियन युनियन , शेगेन व्हिसा व युरो कंट्री या तील फरक
ई वर माहिती सगळ्याना मिळत गेली. दरम्यान श्री सागर म्हात्रे यानीही मोकळेपणाने मिपाकर असल्याप्रमाणेच जणू भाग घेण्यास सुरूवात केली. त्यांच्या प्रवासातील काही अप्रतिम फोटो पहावयास मिळाले. एव्हाना नउ वाजत आले होते. मग
सगळे म्हणाले चला जेवायला निघू. . एकमेकाशी गप्पा मारत संभाजी उद्यानाजवळील " मयूर" भोजन गृहात गेलो. ताटात
पांढराढोकळा, कचोरी,भाज्या,पापड , गुजराथी कढी,खिचडी( मुगडाळीची) गुलाबजामुन असे एकेक पदार्थ येऊन पडून लागले व
मुखांमधे नाहीसे होऊ लागले.
जेवणामधे गप्पांचा बहर कमी झाला होता. जेवणानंतर पन्नास राव व आत्मासाहेब लगेचच निघाले . बाकी मंडळी बालगंधर्व च्या गेटवर पुन्हा एका मैफिलीसाठी जमली. मग आपले स्वीस मधले काही अनुभव श्री इस्पिक एक्का यानी
सांगितले.तेथील पर्यटन व्यवस्था किती सक्षम बनविली गेली आहे. त्याचा अनोखा प्रवास झाला. मग भारतीय लोकांची
मनोवृती, राजकारण असे करत ओमानच्या राजाच्या केशकर्तकाच्या " थाटमाटाचा " किस्सा ( स्पेशल विमान धाडण्याचा)
ऐकल्यावर व लालूप्रसादांचा कमिशनचा किस्सा ऐकल्यावर हसून हसून पुरेवाट झाली.
आपण एरवी दिवस उत्तम गेल्यास " यू मेड माय डे " म्हणतो. तसे ती स्मरणीय संध्याकाळ संपविताना आमची सर्वांचीच
भावना श्री इस्पिक एक्का यांचे प्रति अशीच होती.
बालगंधर्व क्याफेटेरियात एका प्रसन्न क्षणी चौकटराजा, अत्रुप्त आत्मा, बॅटमॅन आणि मालोजीराव
अजून एक क्षण पकडताना
५० फक्त, चौकटराजा, बॅटमॅन, अत्रुप्त आत्मा, मालोजीराव, सागर म्हात्रे, उत्सवमूर्ती इस्पीकचा एक्का आणि प्रशांत.
मयुर हॉटेलच्या बाहेर भोजनानंद लुटल्यावर त्रुप्त पोटाने बाहेर पडताना
प्रशांत, इस्पीकचा एक्का, ५० फक्त, चौकटराजा, सागर, बुवा, मालोजीराव, ब्याम्या, अप्पा जोगळेकर आणि वल्ली.
*सर्व फोटो इस्पीकचा एक्का यांजकडून.
*सर्व फोटो इस्पीकचा एक्का यांजकडून.
वाचने
14396
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त व्रुत्तांत...
शुभेच्छा !
In reply to मस्त व्रुत्तांत... by मुक्त विहारि
फोटो खंय आसत काकांनु??
मस्त वृत्तांत.
ओ चौरा काका, अहो एवढी
हा शत्शब्द वृतांत होता काय?
नशिबवान आहात.
+१११
In reply to नशिबवान आहात. by प्रभाकर पेठकर
मुख्य म्हणजे आपली आठवण
In reply to नशिबवान आहात. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
In reply to मुख्य म्हणजे आपली आठवण by चौकटराजा
सहमत
In reply to नशिबवान आहात. by प्रभाकर पेठकर
फोटो ?????????????????????
मस्त कट्टा ओ काका.
मस्त वृत्तांत
>>>५० फक्त यांची या निमित्त
In reply to मस्त वृत्तांत by पैसा
होऊ दे बॅण्ड्विड्थ खर्च. मिपा
In reply to >>>५० फक्त यांची या निमित्त by प्यारे१
फोटो धाग्यातच अपडेटवलेत.
फोटो स्ट्रेच करून स्वत:ला
In reply to फोटो धाग्यातच अपडेटवलेत. by प्रचेतस
पारखी नजर
In reply to फोटो स्ट्रेच करून स्वत:ला by अभ्या..
काळे केस फकस्त शेवटच्या फोटोत
In reply to पारखी नजर by चौकटराजा
मस्त मज्जा आली कट्ट्याला.
In reply to काळे केस फकस्त शेवटच्या फोटोत by अभ्या..
मला घेतील का ?
In reply to मस्त मज्जा आली कट्ट्याला. by बॅटमॅन
अहो आपल्या देशात ट्यालेंटला
In reply to मला घेतील का ? by चौकटराजा
ब्याट्या, चौराकाका बेशिक
In reply to मस्त मज्जा आली कट्ट्याला. by बॅटमॅन
त्ये भंग बिंग
In reply to ब्याट्या, चौराकाका बेशिक by अभ्या..
कुंतलवधसत्राची हिंसा रोज करणे
In reply to ब्याट्या, चौराकाका बेशिक by अभ्या..
रामलीला च म्हनायचि ही
In reply to कुंतलवधसत्राची हिंसा रोज करणे by बॅटमॅन
वाढू दे वर्च. वाचु दे खर्च
In reply to रामलीला च म्हनायचि ही by अभ्या..
महान आहेस.
In reply to कुंतलवधसत्राची हिंसा रोज करणे by बॅटमॅन
>>"मोठ्या अनिवार ऐशा
In reply to कुंतलवधसत्राची हिंसा रोज करणे by बॅटमॅन
या दोन ओळी लिहिल्यास चालणार
In reply to >>"मोठ्या अनिवार ऐशा by सूड
मी पण कॉपी करणार हे वाघुळा .
In reply to या दोन ओळी लिहिल्यास चालणार by बॅटमॅन
वा वा!!! समविचारी लोक्स पाहुन
In reply to या दोन ओळी लिहिल्यास चालणार by बॅटमॅन
सत्यकथा एकदम भारी.
In reply to कुंतलवधसत्राची हिंसा रोज करणे by बॅटमॅन
खुंटापासोन ब्रह्मांडा एवढी होत जातसे.
In reply to सत्यकथा एकदम भारी. by चित्रगुप्त
आयला
In reply to खुंटापासोन ब्रह्मांडा एवढी होत जातसे. by बॅटमॅन
अगदी अगदी!!!
In reply to आयला by अभ्या..
@"मोठ्या अनिवार ऐशा
In reply to कुंतलवधसत्राची हिंसा रोज करणे by बॅटमॅन
@फोटो धाग्यातच अपडेटवलेत.>>>
In reply to फोटो धाग्यातच अपडेटवलेत. by प्रचेतस
अभ्या
कट्ट्यावर का असेना
वाहवा.
हायला
झक्कास कट्टा झालेला दिसतोय.
भारी कट्टा !
हायला, साला १७ ला तर मी
गुपचुप गुपचुप
सुमडी..
In reply to गुपचुप गुपचुप by बाबा पाटील
@कुन्ना कुन्नाला बोलवनार नाही
In reply to सुमडी.. by यसवायजी
अआ, एक कट्टा भरवा की तुमच्या
In reply to @कुन्ना कुन्नाला बोलवनार नाही by अत्रुप्त आत्मा
@ एक कट्टा भरवा की तुमच्या
In reply to अआ, एक कट्टा भरवा की तुमच्या by यसवायजी
अटोपशीर (कोण रे अटपला.
बैटमैन चे दर्शन जाहले !!!
हा अचानक कट्टा वाटत नाहीये,
@चौरा म्हणजे काठी टेकणारे
In reply to हा अचानक कट्टा वाटत नाहीये, by रेवती
मी पण.. मी पण..!!
In reply to @चौरा म्हणजे काठी टेकणारे by यसवायजी
मिपाचे लाडके गारूडी ज्याक
तुम्हीच व्हा स्वागताध्यक्ष
In reply to मिपाचे लाडके गारूडी ज्याक by आदूबाळ
सोलापूर कट्टा कधी रे अभ्या?
In reply to तुम्हीच व्हा स्वागताध्यक्ष by अभ्या..
सोलापूर कट्टा: संक्रांत.
In reply to सोलापूर कट्टा कधी रे अभ्या? by प्रचेतस
हाहाहा.
In reply to सोलापूर कट्टा: संक्रांत. by अभ्या..
बाब्बो.. जळवतास की रे...!! .
In reply to हाहाहा. by प्रचेतस
जे डी साहेब पुण्यात आहेत? अहो
In reply to मिपाचे लाडके गारूडी ज्याक by आदूबाळ
हे पुणेकर महणजे लोकांचा
In reply to जे डी साहेब पुण्यात आहेत? अहो by सुबोध खरे
जेडी पुण्यात आहे -
In reply to हे पुणेकर महणजे लोकांचा by अभ्या..
@तू पण सोलापुराहून यायचंस -
In reply to जेडी पुण्यात आहे - by आदूबाळ
जळजळ