✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कोणते हे "मुल निवासी नायक" दैनिक ज्याने स्वामी समर्थ, गजानन महाराज, आणि साईबाबा संत नव्हेत असे म्हटले

प
प्रमोद देर्देकर यांनी
Mon, 12/16/2013 - 13:49  ·  लेख
लेख
माझ्या वाचनात एक अनुदिनि आली की जिने फक्त ब्राह्मण ह्या जाती विरुद्ध लिहण्याचा जणु विडा उचलला आहे. या अनुदिनीने मला अजुन एक दैनिक "मुलनिवासी नायक" जे औरंगाबाद येथुन प्रसिद्ध होते या वृत्तपत्राचे एक पान डकवले ज्यात असे लिहले होते की , साईबाबा नेमके कोण होते, त्याच बरोबर श्री गजानन महाराज आणि अक्क्लकोट स्वामी महाराजाविषयी आक्षेपार्ह लिखाण केलेले आढळले त्या पानास इथे डकवले आहे. या पत्रा द्वारे ते म्हाणतात की १८५७ साली जे बंड झाले पण ते पुढे फसले. त्या बंडात सहभागी असलेले तात्यासाहेब टोपे, आणि नानासाहेब पेशवे हे भगवे वेष परिधान करुन भुमिगत झाले (इंग्राजांपासुन दुर पळण्याण्यासाठी) आणि त्यातील तात्या टोपे हे श्री गजानन महाराज म्हणून तर नानासाहेब पेशवे हे शिर्डीचे साईबाबा म्हणून प्रकटले असे म्हटले आहे. तर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दुसरे कोणी नसून पानिपतच्या युद्धभुमी वरुन पळालेले सदाशिवराव भावु आहेत असा शोध लावाला आहे. तर वर उल्लेखलेल्या अनुदिनीचा पत्ता अनिता पाटिल.ब्लोगस्पॉट असा आहे. सदर अनुदिनीमध्ये सवर्णद्वेष सहज पणे दिसुन येतो. खालील काही लेखाचे फक्त शिर्षक मी उदाहरणे देत आहे. १). शिवरायांचा अवसानघात करणारा 'कु'मंत्री मोरोपंत २). रामदास संत नव्हे; तर स्वराज्यातील जंत होता ३). शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला ४). शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे ५). एका लेखातील हा उल्लेख "औरंगजेबाने राजांना धर्मांतराचा आग्रह धरला नव्हता व संभाजीराजांनी धर्मांतरासाठी मुलीची मागणी केली नव्हती. राजांची हत्या झाल्यानंतर ब्राह्मणांनी आनंदोत्सव म्हणुन गुढीपाडवा सुरु केला." ( हसायला येते). ६). शेफारलेले बाळे आणि बाळ्या ( इथे सचिन, माधुरी, आणि मंगेशकरांचा दद्वेष) ७). हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही! ८). या पहा पु ल देशपांडेच्या अश्लील कोट्या ९). ब्राह्मणांच्या अश्लिल शिव्या १०). सनी लिओनला भारतरत्न का नाही? Why Bharat Ratna Not Been Conferred On Sunny Leone (हसून हसून पुरी वाट :-))) ) ११). अटल अटल, बोलत सुटल (वाजपेयीं विषयी द्वेष) १२). लोकमान्य नव्हे भटमान्य ११). प्लँचेटसाठी सावरकरांनाच आवाहन का? सावरकर : फाळणीचे गुन्हेगार ही अनुदिनी संपूर्णपणे ब्राह्मणद्वेषी लिखाण करण्यास वाहलेली आहे. माझी आपल्या मी.पा.वरिल श्री. जयंत कुलकर्णी , श्री. इन्द्रजित पवार या इतिहासप्रेमी सदस्यांना विनंती आहे की त्यांनी यावर काही प्रकाश टाकावा. धन्यवाद
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
44725 वाचन

💬 प्रतिसाद (159)

प्रतिक्रिया

मनुस्मृती ब्राह्मण पुरुष आणि

मारकुटे
गुरुवार, 12/19/2013 - 14:36 नवीन
मनुस्मृती ब्राह्मण पुरुष आणि शुद्र स्त्रीच्या संतानाला काय म्हणते? हास्यास्पद विधानाबद्दल तुमचे मताचा आदर आहे. मात्र असेच विचार कुरुंदकरांचे पण होते. कुरुंदकर कोण असा प्रश्न हास्यास्पद होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

महाभारत काळ मनुस्मृतीच्या

बॅटमॅन
गुरुवार, 12/19/2013 - 14:37 नवीन
महाभारत काळ मनुस्मृतीच्या अगोदरचा आहे सबब मनुस्मृतीचे क्लासिफिकेशन महाभारताला लावणे मूर्खपणा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

दोन्ही इस पुर्व दोनशे मधील

मारकुटे
गुरुवार, 12/19/2013 - 14:40 नवीन
दोन्ही इस पुर्व दोनशे मधील आहेत. महाभारतात मनुचे दाखले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

महाभारत ग्रंथ हा लै वर्षे

बॅटमॅन
गुरुवार, 12/19/2013 - 14:44 नवीन
महाभारत ग्रंथ हा लै वर्षे रीरैटिंग होत आलेला ग्रंथ आहे. काही आधीचे तर काही नंतरचे अशी लै भेसळ आहे त्यात. त्यामुळे महाभारतात मनूच का, अगदी यवनांचेही उल्लेख असले तरी आश्चर्य वाटायचं कारण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

यवनांचे उल्लेख येणारच. ग्रीक

मारकुटे
गुरुवार, 12/19/2013 - 14:48 नवीन
यवनांचे उल्लेख येणारच. ग्रीक आणि अयोनिअन (यवन) महाभारता आधीपासून ज्ञात आहेत. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ग्रीक आणि अयोनिअन (यवन)

बॅटमॅन
गुरुवार, 12/19/2013 - 14:52 नवीन
ग्रीक आणि अयोनिअन (यवन) महाभारता आधीपासून ज्ञात आहेत.
महाभारता आधीपासून म्हणजे ग्रंथाआधीपासून की त्यातल्या घटना घडल्या त्या लोहयुगाच्या आधीपासून? पर्शियाचा राजा डरायस याच्या एका स्किलॅक्स नामक ग्रीक एक्प्लोररच्या आधी (इसपू ५००) भारत अन ग्रीसचा संबंध आल्याचे वाचलेले नाही. त्यामुळे त्या काळच्या आधीचा पुरावा असेल तर बाय ऑल मीन्स मला सांगावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

अर्थात लेखन

मारकुटे
गुरुवार, 12/19/2013 - 14:54 नवीन
महाभारत ग्रंथलेखनाच्या आधी (इपु २००) महाभारत घडलं का नाही, घडलं तर कधी घडलं हे मी गौण मानतो. कारण जे लिहिलं आहे ते तसंच घडलं अस मी मानत नाही जे घडलं तेच लिहिलं असं मी मानत नाही. त्यामुळे चर्चा लेखनाचा काळ येवढीच व्याप्ती पकडून व्हावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ओके. महाभारताबद्दल तुम्ही

बॅटमॅन
गुरुवार, 12/19/2013 - 15:00 नवीन
ओके. महाभारताबद्दल तुम्ही उपस्थित केलेल्या शंका मलाही पटतात. मुद्दा एवढाच आहे, की स्मृतीप्रमाणे पाहिल्यास विसंगत वाटणार्‍या अनेक गोष्टी महाभारतात आहेत, उदा. बहुपतित्व. काहीतरी स्पष्टीकरण देऊन का होईना त्या ग्रंथामध्ये आहे तशा ठेवल्यात याचाच अर्थ त्या जुन्या समाजाचे नियम वेगळे होते. इथला वाद सुरू झाला तो व्यास ब्राह्मण होते की नव्हते यावरून. स्मृतीनुसारच सगळे पाहू शकत नाही हे सांगण्याचा प्रयत्न होता इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

कुरुंदकरांचे असे विचार असतील

मृत्युन्जय
गुरुवार, 12/19/2013 - 14:46 नवीन
कुरुंदकरांचे असे विचार असतील तर त्यांचेही विचार हास्यास्पद होते. केवळ कुरुंदकरांनी मांडले म्हणून मान्य करण्यात काहिच अर्थ नाही. शेंडा बुडखा नसलेली असली वाक्ये शोधुन त्यावर चिंतन करणे तर केवळ अमान्य. " ब्राह्मणांनी अनावश्यक कर्मकांडावर जास्त भर दिला" इतपत विधान मान्य होण्यासारखे आहे पण सरसकट " ब्राह्मणांकडे कर्मकांडाव्यतिरिक्त इतर ज्ञान नव्हते" हे चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

तुमच्या मताचा आदर आहे.

मारकुटे
गुरुवार, 12/19/2013 - 14:47 नवीन
तुमच्या मताचा आदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ब्राह्मणांकडे खरेच असे ज्ञान

बॅटमॅन
गुरुवार, 12/19/2013 - 14:49 नवीन
ब्राह्मणांकडे खरेच असे ज्ञान होते म्हणजे तरी काय होते? वैद्यक म्हटले तर अन्य जातींतही तरबेज वैद्य होते. क्यालेंडर म्हटले तर एकवेळ ठीक. पण बाकी ज्ञानाचा जण्रल समाजाला फार कमी उपयोग होता. अध्यात्म वैग्रे म्हणावे तर वेळोवेळी रिबेल उठून देशभाषांत आणत- ज्ञानेश्वर तुकाराम वैग्रे. मग यांची मोनॉपॉली होती तरी कुठल्या ज्ञानावर? ते जे कै होते ते लै कमी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हांग आश्शी

मारकुटे
गुरुवार, 12/19/2013 - 14:51 नवीन
आता कस्सं बोल्लात !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर

मृत्युन्जय
गुरुवार, 12/19/2013 - 15:03 नवीन
ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर जातीत ज्ञान नव्हते असे मी कधीच म्हटलेलो नाही. ब्राह्मणांकडे नव्हते या मुद्द्याला माझा आक्षेप आहे. बाकी असतीलच की इतर जातीत विद्वान लोक. अजुनही आहेत. जर्मन लोक लढवय्ये होते म्हणुन ब्रिट्स पळपुटे होते असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ते ठीक हो, ब्राह्मण एकजात ढ

बॅटमॅन
गुरुवार, 12/19/2013 - 15:11 नवीन
ते ठीक हो, ब्राह्मण एकजात ढ होते असे तरी मला कुठे म्हणायचे आहे? मुद्दा इतकाच आहे, की बह्वंशी ब्राह्मण ज्याला "ज्ञान" म्हणत त्याचा समाजाला वट्ट उपयोग नव्हता. सैद्धांतिक चिरफाड करून करून दिमाग मस्त तयार झाला होता पण त्याचे अ‍ॅप्लिकेशन प्रॅक्टिकल गोष्टींत करायला पाहिजे होते. जेवढे थोडेफार केले- वैद्यक अन खगोलशास्त्रात- त्यापेक्षा अजून जास्त करायला पाहिजे होते असे वाटते इतकेच. इतर समाजाला ज्ञान दिले नाही म्हणजे ही पद्धतशीर विचार करण्याची पद्धत दिली नाही. तो मुळात ज्ञानाच्या व्याख्येचाच घोळ म्हणावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

माझा प्रतिवाद लिमिटेड

मृत्युन्जय
गुरुवार, 12/19/2013 - 15:14 नवीन
माझा प्रतिवाद लिमिटेड मुद्द्यांना होता. त्याबद्दल आपले एकमत असल्याने इथेच थांबुयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ओक्के सार!!!!

बॅटमॅन
गुरुवार, 12/19/2013 - 15:17 नवीन
ओक्के सार!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अध्ययन, अध्यापन, यजन, याजन,

प्यारे१
गुरुवार, 12/19/2013 - 15:22 नवीन
अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान देणारा, घेणारा, बुद्धी तीक्ष्ण असून समाज उपयोगी कामे करणारा अशा गुणांच्या अधिकारी व्यक्तीला ब्राह्मण म्हणतात ना? गुणकर्म विभागशः??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

खालील वाक्य सोडून प्रतिसादाशी

श्रीगुरुजी
गुरुवार, 12/19/2013 - 14:36 नवीन
खालील वाक्य सोडून प्रतिसादाशी सहमत. >>> ब्राह्मणांपाशी अशी कोनतीही विद्या नव्हती जी दिली नाही म्हणून समाजाचं नुकसान झालं. काळानुसार स्वतःला बदलण्याची व बदलत्या काळाशी जुळवून घेऊन कर्मकांड व जातीय अस्मितेचा बाऊ न करता स्वतःची प्रगती करण्याची विद्या ब्राह्मणांनी समाजाला दिलेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

>>>कर्मकांड व जातीय अस्मितेचा

मारकुटे
गुरुवार, 12/19/2013 - 14:38 नवीन
>>>कर्मकांड व जातीय अस्मितेचा बाऊ न करता आमच्याकडे असं नसतं आणि परशुराम नृसिहांच्या बँडबाजा मिरवणूकी पाहिलेल्या दिसत नाहीत तुम्ही. आम्हाला देशस्थ / कोकणास्थ / यजुर्वेदी/ ऋग्वेदी चालत नाहीत हे वाक्य ऐकले नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

>>> आमच्याकडे असं नसतं आणि

श्रीगुरुजी
गुरुवार, 12/19/2013 - 14:42 नवीन
>>> आमच्याकडे असं नसतं आणि परशुराम नृसिहांच्या बँडबाजा मिरवणूकी पाहिलेल्या दिसत नाहीत तुम्ही. आम्हाला देशस्थ / कोकणास्थ / यजुर्वेदी/ ऋग्वेदी चालत नाहीत हे वाक्य ऐकले नाही का? या सर्व गोष्टी करणारे ब्राह्मण खूप कमी आहेत. बहुसंख्य ब्राह्मणांनी जानवे, संध्या, श्रावणी इ. कर्मकांडे व ब्राह्मण नेते/संत यांची अस्मिता बाळगणे व त्यांच्या बदनामीचा बाऊ करणे हे केव्हाच बंद केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

>>>आम्हाला देशस्थ / कोकणास्थ

मारकुटे
गुरुवार, 12/19/2013 - 14:44 नवीन
>>>आम्हाला देशस्थ / कोकणास्थ / यजुर्वेदी/ ऋग्वेदी चालत नाहीत हे वाक्य ऐकले नाही का? हे सररास लग्नामधे घडते. आणि बहुसंख्य ब्राह्मण अजून लग्न करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

>>> >>>आम्हाला देशस्थ /

श्रीगुरुजी
गुरुवार, 12/19/2013 - 14:47 नवीन
>>> >>>आम्हाला देशस्थ / कोकणास्थ / यजुर्वेदी/ ऋग्वेदी चालत नाहीत हे वाक्य ऐकले नाही का? >>> हे सररास लग्नामधे घडते. आणि बहुसंख्य ब्राह्मण अजून लग्न करतात. सध्याच्या काळात बहुसंख्य ब्राह्मण तरूण/तरूणी लग्नासाठी आपल्या पोटजातीचा आग्रह धरत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

असं तुम्हाला वाटतं.

मारकुटे
गुरुवार, 12/19/2013 - 14:49 नवीन
असं तुम्हाला वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

असं होत नाही असं तुम्हाला

मृत्युन्जय
गुरुवार, 12/19/2013 - 15:00 नवीन
असं होत नाही असं तुम्हाला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

मी तर आजकाल कुठल्याही

मृत्युन्जय
गुरुवार, 12/19/2013 - 14:58 नवीन
मी तर आजकाल कुठल्याही रस्त्यात, वाडीत, मिरवणुकांमध्ये, राजकीय सभांमध्ये, जातीय संमेलनांमध्ये "आंबेडकर, फुले आणि शाहू महाराज" यांच्या तसबिरी बघतो. क्वचित प्रसंगी शिवाजी महाराज देखील दिसतात. तुम्ही या बँडबाजा मिरवणुकी बघितलेल्या नसतील तर गेल्या १० वर्षात तुम्ही घराबाहेर पडलेले असण्याची शक्यता नाही. आणि हो. ९६ कुळी मराठा मुलगा / मुलगीच पाहिजे हा आग्रह धरणारे लोक तुम्ही बघितले नसेल तर जगातले ८ वे आश्चर्यच म्हणायला लागेल. ९६ कुळी नसतील तर केवळ मराठा असण्याच्या पुण्याईवर ९६ कुळी घराबरोबर संबंध जमवता येणे अवघड आहे. या अट्टाहासापायी आजकाल प्रत्येकजण स्वतःला ९६ कुळी म्हणवुन घेतो. आता ९६० कुळी म्हणायची पद्धत आणायला हवी त्यामुळे. ९६ कुळी समाजातल्या एका मित्राने ब्राह्मण मुलीशी लग्न करायचे म्हटल्यावर त्याच्या घरात काय गहजब झाला होता तेही माहिती आहे. त्यामुळे या असल्या टिमक्या वाजवणे बंद करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

>> त्यामुळे या असल्या टिमक्या

मारकुटे
गुरुवार, 12/19/2013 - 15:10 नवीन
>> त्यामुळे या असल्या टिमक्या वाजवणे बंद करा. ओ हो हो हो. अहो तापु नका इतके... माझ्याकडून तुमचा अपमान झाला असेल तर माफी मागतो. पण इतके रागावू नका. कसं आहे चर्चा म्हटली की मत मतांतरे होणारच. असं तापुन कसं चालेल. बर ब्राह्मणाने कसं असावं क्षमाशील, दयाळु, आर्जवी आणि लाघवी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

आपल्या मताचा आदर आहे

मृत्युन्जय
गुरुवार, 12/19/2013 - 15:11 नवीन
आपल्या मताचा आदर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

मान्य. जैन आणि बौद्धांनी

बॅटमॅन
गुरुवार, 12/19/2013 - 14:36 नवीन
मान्य. जैन आणि बौद्धांनी टनावारी रचना केलेली आहे संस्कृतात. पण ही रचना कधीपासून आणि कुणामुळे झाली हे पाहिल्यास माझ्या दाव्याला पुष्टी मिळते. व्यास हे ब्राह्मणच होते-पराशर ऋषींचा मुलगा. वाल्मिकी मात्र नव्हते. पण नंतरच्या काळात पहा की, लै कमी उदाहरणे सापडतील. होता होईल तो प्युअर संस्कृत इतर लोकांपर्यंत पोहोचली नाहीच. तुलनेने युरोपात लॅटिन मात्र सगळीकडे शिकवली जात असे. संस्कृत विद्या शिकून फार कुणी श्रीमंत होईल वैग्रे प्रकार कधीच नव्हता पण एक महत्त्वाची चूक म्हणजे थिअरी अन प्रॅक्टिकल यांची नीट सांगड युरोपासारखी आपल्या इथे कधी घातली गेली नाही. ब्राह्मण थिअरी मांडत एकदम शिस्तीने, बाकी समाज प्रॅक्टिकलही तेवढ्याच किंबहुना जास्त कुशलतेने करीत. पण दोहोंची सांगड कधी नीटपणे घातली गेली नाही. याला जबाबदार फक्त ब्राह्मणच आहेत असे नाही पण त्यांना हे समजायला हवे होते असे वाटते. समाजातला बुद्धिजीवी वर्ग म्हणून हे त्यांनी केले असते तर चांगले झाले असते. शिवाय हे अपेक्षिणे फार काही लै देखील नाहीये. असो, तो एका वेगळ्या धाग्याचा विषय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

होता होईल तो प्युअर संस्कृत

मारकुटे
गुरुवार, 12/19/2013 - 14:47 नवीन
होता होईल तो प्युअर संस्कृत इतर लोकांपर्यंत पोहोचली नाहीच अष्टाध्यायी मुखोद्ग्त करायची. पातंजलीचे भाष्य अभ्यासायचे. कात्यायनाची टीका समजून घ्यायची. मग साहित्य अभ्यास करुन थेट आनंदवर्धनाचे ध्वन्यालोकापर्यंत भरतुहरी वाचायाचा. आयुश्याची तिशी उलटते. एवढं करुन खायला काय मिळणार? बहुजन समाजाला गरज वाटली नसावी प्युअर संस्कृत शिकायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

याला ब्राह्मणही तितकेच

बॅटमॅन
गुरुवार, 12/19/2013 - 14:57 नवीन
याला ब्राह्मणही तितकेच जबाबदार आहेत. संस्कृत शुद्ध ठेवण्याच्या नादात तिचे महत्त्व कमी कमी करत नेले या लोकांनी. त्याचे काही दूरगामी परिणाम झाले खरे. म्हणजे संस्कृत भाषेत काही स्पेशल होतं असे नाही पण पद्धतशीरपणे एखादी गोष्ट शिकणे, विकसित करणे हा कुठलीही विद्याशाखा शिकायचा एक प्रकार असतो. संस्कृत विद्या सोडता अन्य प्रॅक्टिकल शास्त्रांमध्ये थिअरीचा शिरकाव जर बर्‍यापैकी प्रमाणावर झाला असता, तर भारत होता त्यापेक्षाही एका वेगळ्याच उंचीला गेला असता. युरोपमध्ये नेमके हे झाल्याने ते लोक एका वेगळ्याच उंचीवर गेले. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

ब्राह्मणही तितकेच जबाबदार

मारकुटे
गुरुवार, 12/19/2013 - 15:00 नवीन
ब्राह्मणही तितकेच जबाबदार आहेत. संस्कृत शुद्ध ठेवण्याच्या नादात तिचे महत्त्व कमी कमी करत नेले या लोकांनी. प्रतिसादाशी सहमत. वरील वाक्य वेगळे काढले कारण पाणिनी नंतर वैयाकरण्यांनी भाषा बदलते हे तथ्य मान्य केले पण अंमलात आणअले नाही. वेगळ्या भाषा जन्मत आहेत हे सोईस्कर विसरले. आणि पाणिनीला भगवान बनवून तो म्हणतो तेच खरे असं करुन संस्कृतमधे बदल होऊ दिले नाहीत. तीच जुनाट शब्दांची कसरत करत राहिले. पतंजलीला सुद्धा धाप लागलेली दिसते. असो. चर्चा करुन आनंद वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वरील वाक्य वेगळे काढले कारण

बॅटमॅन
गुरुवार, 12/19/2013 - 15:23 नवीन
वरील वाक्य वेगळे काढले कारण पाणिनी नंतर वैयाकरण्यांनी भाषा बदलते हे तथ्य मान्य केले पण अंमलात आणअले नाही. वेगळ्या भाषा जन्मत आहेत हे सोईस्कर विसरले.
इथे अंमळ असहमत. हेमचंद्र वैग्रे लोकांनी प्राकृतचे व्याकरण लिहिले, दक्षिणेत तमि़ऴचे तोलकाप्पियम तर कन्नडचे कविराजमार्गम् हे व्याकरण लिहिले गेलेच होते. पण अन्यत्र हे इतके दिसले नाही. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. ते एक असो पण अन्य भाषांचे अस्तित्व नाकारणे हा मुद्दा नव्हता, फक्त त्यांनाही महत्त्व देणे हा प्रकार उत्तरेत झाला नाही. आणि एकूणच संस्कृतचे क्षेत्र धार्मिक सोडून नंतर प्रचंड विस्तारले, जरी संस्कृत काव्यनाटकशिलालेख इ. मध्ये जास्तजास्त दिसू लागली तरी विषयांची व्याप्ती शास्त्रांत कधी तितकी दिसली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

बाकी चर्चेचा आनंद इज

बॅटमॅन
गुरुवार, 12/19/2013 - 15:24 नवीन
बाकी चर्चेचा आनंद इज म्युच्युअल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आजही?

सुनील
गुरुवार, 12/19/2013 - 15:59 नवीन
अन्य भाषांचे अस्तित्व नाकारणे हा मुद्दा नव्हता, फक्त त्यांनाही महत्त्व देणे हा प्रकार उत्तरेत झाला नाही
हे आजदेखिल होते आहे काय? ;) बाकी चर्चेचा आनंद घेत आहेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा हा हा

बॅटमॅन
गुरुवार, 12/19/2013 - 16:00 नवीन
हा हा हा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

गागाभट्टाना बोलावला कि ते

लोटीया_पठाण
Tue, 12/17/2013 - 21:44 नवीन
गागाभट्टाना बोलावला कि ते स्वतः आले राज्याभिषेकाची कलपना घेऊन??
  • Log in or register to post comments

पहिली गोष्ट म्हणजे

प्रमोद देर्देकर
Wed, 12/18/2013 - 09:04 नवीन
पहिली गोष्ट म्हणजे राज्याभिषेक हा शब्द चुकिचा आहे. अहो सर्व राज्याचा का अभिषेक करायचा आहे? नाही ना? मग. मला वाटते तो शब्द

राजाभिषेक

आहे. काराण शिवाजी राजांचा अभिषेक करायाचा आहे. पण कालौघात तो "य" डकवला जावुन ज चा ज्या झाला तो कायम्चा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लोटीया_पठाण

पिळवणूक

सुनील
Wed, 12/18/2013 - 09:16 नवीन
कालौघात तो "य" डकवला जावुन ज चा ज्या झाला तो कायम्चा.
अच्छा. म्हणजे हे थोडेसे "पिळवणूक" शब्दासारखे झाले! फसवणे वरून फसवणूक हे ठीकच. परंतु, पिळवणे असा शब्द नसून तो पिळणे असा आहे. तेव्हा, पिळणूक हा शब्द वापरायला हवा!! असो, चर्चा वाचीत आहेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

अगदी बरोबर, तरी शंका येते की

म्हैस
Wed, 12/18/2013 - 13:07 नवीन
अगदी बरोबर, तरी शंका येते की गझनीचा महमूद किंवा खिलजी वैग्रे लोक तिथे देवळे पाडापाड करीत असताना हे भगवंतराव काय स्वर्गलोकाच्या टूरला गेले होते का? >>>>
भगवंताने सगळ्याला हाथ, पाय दिले अहेत. बुद्धी दिली आहे . सगळ्या गोष्टी देवानेच करायच्या असतील तर तुम्ही काय नुसते खायला काळ आणि भुईला भर आहात काय? तो गझनी एवढ्या लांब येवून इथली देवळे पडतो तेव्हा देव तुम्हाला म्हणाला होता का नुसत माकडासारख बघत बसा म्हणून? तो काय तुमचा नोकर आहे का? श्री क्रीश्नांनी हातामध्ये शास्त्र घेतल नवतं . हातात शस्त्र घेवून लढाई अर्जुनाने केली होती . हे माहित नाही का? ते लोक सुधा आपल्या देशाचं , धर्माचं रक्षण करायचं सोडून तुमच्यासारखे म्हशी आणि रेड्यावर comments करत बसले होते म्हणून तर मुसलमान, इंग्रजांचं फावलं
  • Log in or register to post comments

सगळ्या गोष्टी आम्हीच करायच्या

बॅटमॅन
Wed, 12/18/2013 - 13:13 नवीन
सगळ्या गोष्टी आम्हीच करायच्या तर देवाची गरजच काय =)) तुमच्यासारख्यांमुळे भोंदूबाबांचं फावतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

+१

टवाळ कार्टा
Wed, 12/18/2013 - 15:59 नवीन
+१ बाकी मुलेबाळे पण देवाचीच क्रुपा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

>>तो गझनी एवढ्या लांब येवून

सूड
Wed, 12/18/2013 - 19:36 नवीन
>>तो गझनी एवढ्या लांब येवून इथली देवळे पडतो तेव्हा देव तुम्हाला म्हणाला होता का नुसत माकडासारख बघत बसा म्हणून? गो बाये!! माणसापेक्षा देव बलवान ना? मग त्यानंच स्वतःच रक्षण का नाय केलंन्?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

शतक

जेपी
Wed, 12/18/2013 - 13:11 नवीन
बास करा आता
  • Log in or register to post comments

गो बाये!! माणसापेक्षा देव

म्हैस
गुरुवार, 12/19/2013 - 15:50 नवीन
गो बाये!! माणसापेक्षा देव बलवान ना? मग त्यानंच स्वतःच रक्षण का नाय केलंन्?
अरे पण देव फक्त देवळात असतो , देवूळ वाचाव्ल्याने देवाचं रक्षण होतं अस कुणी सांगितलाय तुम्हाला? देवूळ फोडल्याने का कुठं देवाचं अस्तित्व नष्ट होतं? तसं असतं तर हा गझनी कीस झाड कि पत्ती ? देवाच्या सामर्थ्याची कल्पना सामान्य माणसाच्या आवाक्यात आहे का?देवळाच रक्षण करण हे आपल कर्तव्य आहे . गझनीच्या वेळचा इतिहास जर आपण वाचला असेल तर आपल्या लक्षात येईल अफाट संपत्ती , सगळ्या सुखसोयी असल्यामुळे आपले लोक , राजे रजवाडे कसे नुसते ऐतखावू झाले होते
  • Log in or register to post comments

अरे पण देव फक्त देवळात असतो ,

बॅटमॅन
गुरुवार, 12/19/2013 - 15:53 नवीन
अरे पण देव फक्त देवळात असतो , देवूळ वाचाव्ल्याने देवाचं रक्षण होतं अस कुणी सांगितलाय तुम्हाला?
असं असेल तर
देवळाच रक्षण करण हे आपल कर्तव्य आहे
तर यात विरोधाभास नाही का? आणि
देवाच्या सामर्थ्याची कल्पना सामान्य माणसाच्या आवाक्यात आहे का?
इतका सामर्थ्यवान देव चार देवळेही वाचवू शकला नाही तर...हॅ हॅ हॅ, बाकीचे सोडाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

>>अरे पण देव फक्त देवळात असतो

सूड
गुरुवार, 12/19/2013 - 15:59 नवीन
>>अरे पण देव फक्त देवळात असतो , देवूळ वाचाव्ल्याने देवाचं रक्षण होतं अस कुणी सांगितलाय तुम्हाला? देवूळ फोडल्याने का कुठं देवाचं अस्तित्व नष्ट होतं? तेच की !! ही तुमची अक्कल 'तो गझनी एवढ्या लांब येवून इथली देवळे पडतो तेव्हा देव तुम्हाला म्हणाला होता का नुसत माकडासारख बघत बसा म्हणून?' हे लिहीताना तुमची बुद्धी कोणत्या कुरणात चरायला धाडली होतीत ते सांगाल का, म्हैसबाई? देव सगळीकडे असतो मग देऊळ पाडलंनीत किंवा ठेवलंनीत काही फरक पडत नाही ही उपरती आता कशी झाली? बाकी प्रत्येक धाग्यावर आपला आयडी सार्थ करुन दाखवायचं ठरवलंच असाल तर तुमचं चालू द्या. इति लेखनसीमा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

.

उद्दाम
Mon, 12/23/2013 - 21:46 नवीन
देवूळ वाचाव्ल्याने देवाचं रक्षण होतं अस कुणी सांगितलाय तुम्हाला? हायला, म्हशे, मग बाबरी पाडून देऊळ बांधायची काय गरज आहे गं ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

सगळ्या गोष्टी आम्हीच करायच्या

म्हैस
गुरुवार, 12/19/2013 - 15:58 नवीन
सगळ्या गोष्टी आम्हीच करायच्या तर देवाची गरजच काय
देवाची गरज काय आहे हे समजणं तुझ्या बुद्धीच्या बाहेरचं आहे बाळा . त्यामुळे तू त्याचा विचार करणं सोडून दे. वेळ आली कि तुला ते आपोआप समजेलच . तोपर्यंत वाट बघत बस .
तुमच्यासारख्यांमुळे भोंदूबाबांचं फावतं.
देवाचा , आमच्यासारख्या लोकांचा भोन्दुबाबांशी काय संबंध? भोंदूबाबा तर तुमच्या सारख्या लोकांना गंडवायला बसलेत . कारण देव म्हनला कि भोंदू बाबा आला हे तुमच्यासारख्या लोकांचं समीकरण आहे
  • Log in or register to post comments

शेप्रेट प्रतिसाद देणार होतो

बॅटमॅन
गुरुवार, 12/19/2013 - 16:03 नवीन
शेप्रेट प्रतिसाद देणार होतो पण सुडक्यानें माझें कष्ट वाचवलेंनीत (व्याक्रण ब्रोब्र आहे का रे?).
ही तुमची अक्कल 'तो गझनी एवढ्या लांब येवून इथली देवळे पडतो तेव्हा देव तुम्हाला म्हणाला होता का नुसत माकडासारख बघत बसा म्हणून?' हे लिहीताना तुमची बुद्धी कोणत्या कुरणात चरायला धाडली होतीत ते सांगाल का, म्हैसबाई? देव सगळीकडे असतो मग देऊळ पाडलंनीत किंवा ठेवलंनीत काही फरक पडत नाही ही उपरती आता कशी झाली? बाकी प्रत्येक धाग्यावर आपला आयडी सार्थ करुन दाखवायचं ठरवलंच असाल तर तुमचं चालू द्या. इति लेखनसीमा !!
इतकी देवभक्त म्हैस आमच्यासारख्या मूर्ख मर्त्य लोकांबरोबर विकारांच्या चिखलात डुंबत बसते याची बाकी मौज वाटली. तुमच्या देवाला चालतं का गं हे? मारे देवदेव करायचं अन शंका उपस्थित केली की शिव्या घालायच्या. हेच का तुमचे उच्च आचरण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

असं असेल तर

म्हैस
गुरुवार, 12/19/2013 - 16:02 नवीन
असं असेल तर
जर तर च्या गोष्टी कशाला करताय? ते सत्य आहे ते बोला ना .
इतका सामर्थ्यवान देव चार देवळेही वाचवू शकला नाही तर
देवून देवाने बांधलेल नाहीये . ते माणसाने बांधलेल आहे . तेव्हा देवळ वाचवण्याची जबाबदारी माणसांची आहे . देवाची नाही .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा