✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कोणते हे "मुल निवासी नायक" दैनिक ज्याने स्वामी समर्थ, गजानन महाराज, आणि साईबाबा संत नव्हेत असे म्हटले

प
प्रमोद देर्देकर यांनी
Mon, 12/16/2013 - 13:49  ·  लेख
लेख
माझ्या वाचनात एक अनुदिनि आली की जिने फक्त ब्राह्मण ह्या जाती विरुद्ध लिहण्याचा जणु विडा उचलला आहे. या अनुदिनीने मला अजुन एक दैनिक "मुलनिवासी नायक" जे औरंगाबाद येथुन प्रसिद्ध होते या वृत्तपत्राचे एक पान डकवले ज्यात असे लिहले होते की , साईबाबा नेमके कोण होते, त्याच बरोबर श्री गजानन महाराज आणि अक्क्लकोट स्वामी महाराजाविषयी आक्षेपार्ह लिखाण केलेले आढळले त्या पानास इथे डकवले आहे. या पत्रा द्वारे ते म्हाणतात की १८५७ साली जे बंड झाले पण ते पुढे फसले. त्या बंडात सहभागी असलेले तात्यासाहेब टोपे, आणि नानासाहेब पेशवे हे भगवे वेष परिधान करुन भुमिगत झाले (इंग्राजांपासुन दुर पळण्याण्यासाठी) आणि त्यातील तात्या टोपे हे श्री गजानन महाराज म्हणून तर नानासाहेब पेशवे हे शिर्डीचे साईबाबा म्हणून प्रकटले असे म्हटले आहे. तर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दुसरे कोणी नसून पानिपतच्या युद्धभुमी वरुन पळालेले सदाशिवराव भावु आहेत असा शोध लावाला आहे. तर वर उल्लेखलेल्या अनुदिनीचा पत्ता अनिता पाटिल.ब्लोगस्पॉट असा आहे. सदर अनुदिनीमध्ये सवर्णद्वेष सहज पणे दिसुन येतो. खालील काही लेखाचे फक्त शिर्षक मी उदाहरणे देत आहे. १). शिवरायांचा अवसानघात करणारा 'कु'मंत्री मोरोपंत २). रामदास संत नव्हे; तर स्वराज्यातील जंत होता ३). शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला ४). शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे ५). एका लेखातील हा उल्लेख "औरंगजेबाने राजांना धर्मांतराचा आग्रह धरला नव्हता व संभाजीराजांनी धर्मांतरासाठी मुलीची मागणी केली नव्हती. राजांची हत्या झाल्यानंतर ब्राह्मणांनी आनंदोत्सव म्हणुन गुढीपाडवा सुरु केला." ( हसायला येते). ६). शेफारलेले बाळे आणि बाळ्या ( इथे सचिन, माधुरी, आणि मंगेशकरांचा दद्वेष) ७). हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही! ८). या पहा पु ल देशपांडेच्या अश्लील कोट्या ९). ब्राह्मणांच्या अश्लिल शिव्या १०). सनी लिओनला भारतरत्न का नाही? Why Bharat Ratna Not Been Conferred On Sunny Leone (हसून हसून पुरी वाट :-))) ) ११). अटल अटल, बोलत सुटल (वाजपेयीं विषयी द्वेष) १२). लोकमान्य नव्हे भटमान्य ११). प्लँचेटसाठी सावरकरांनाच आवाहन का? सावरकर : फाळणीचे गुन्हेगार ही अनुदिनी संपूर्णपणे ब्राह्मणद्वेषी लिखाण करण्यास वाहलेली आहे. माझी आपल्या मी.पा.वरिल श्री. जयंत कुलकर्णी , श्री. इन्द्रजित पवार या इतिहासप्रेमी सदस्यांना विनंती आहे की त्यांनी यावर काही प्रकाश टाकावा. धन्यवाद
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
44725 वाचन

💬 प्रतिसाद (159)

प्रतिक्रिया

स्वागत आहे

आनन्दा
Tue, 12/17/2013 - 11:49 नवीन
या चर्चेत आपले स्वागत आहे.. आपल्या विचारांनी या चर्चेला एक निराळीच उंची मिळेल यात शंका नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

.

उद्दाम
Tue, 12/17/2013 - 13:34 नवीन
हम गया नहीं , हम अभी जिंदा है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

हा समज पहिल्यांदा ऐकतोय.

बॅटमॅन
Tue, 12/17/2013 - 12:19 नवीन
हा समज पहिल्यांदा ऐकतोय. स्वामी समर्थ ऊर्फ श्री. बापट (नाव माहिती नाही) हे १८५७ च्या उठावात सहभागी असून नंतर मार्ग बदलला असे वाचले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

नृसिंह सरस्वती

llपुण्याचे पेशवेll
Tue, 12/17/2013 - 12:45 नवीन
श्री स्वामी समर्थ म्हणजे कर्दळीवनात जाऊन गुप्त पणे राहीलेले नृसिंह सरस्वती. असेच ऐकलेले आहे आणि ते योग्यही वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+११११११

अनिरुद्ध प
Tue, 12/17/2013 - 12:50 नवीन
+११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

त्या दोहोंचा काळ तरी बघा मालक

बॅटमॅन
Tue, 12/17/2013 - 12:51 नवीन
त्या दोहोंचा काळ तरी बघा मालक कमीतकमी. आता औतारबितार म्हण्णार असाल तर आमची अळीमिळी गुपचिळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

त्या दोहोंचा काळ तरी बघा मालक कमीतकमी

अनिरुद्ध प
Tue, 12/17/2013 - 12:56 नवीन
आपला अभ्यास वाढ्वा मालक असे सुचवायची माझ्या सारख्या पामराची काय कुवत नाही,असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ऑं? कोणाला होता हा प्रतिसाद

मृत्युन्जय
Tue, 12/17/2013 - 13:02 नवीन
ऑं? कोणाला होता हा प्रतिसाद बॅट्ञाला तर नाही ना? विचारायचे कारण एवढेच की माझ्या अल्प माहितीनुसार पनिपताची लढाई १७६१ साली झाली त्यावेळेस सदाशिवरावभाऊ साधारण ३० वर्षाचे होते. तर स्वामी समर्थांचा काळ साधारण १८५० चा आहे चू.भू.द्या.घा. भाऊ १२० - १५० वर्षे जगले असे जर आपले म्हणणे असेल तर गोष्ट वेगळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

हा ना राव, हे कैच्याकै आहे.

बॅटमॅन
Tue, 12/17/2013 - 13:05 नवीन
हा ना राव, हे कैच्याकै आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मृत्युन्जयजी

प्रमोद देर्देकर
Tue, 12/17/2013 - 13:30 नवीन
मृत्युन्जयजी पण ज्याने कोणी हे लिहले आहे त्याने स्वतःहाचा फोन नं दिला आहे. आपण त्याच्या शी चर्चा करु शकतो. तसेच तो म्हणतात की स्वामी चे निर्वाण हे इ.स.१८०० साली झाले म्हणजे स्वामी ७१ वर्षे जगले. दुसरे असे की ते अक्कलकोटला पण जावुन आलेत आणि आवाहन केले की हे खरेखोटे करुन दाखवा म्हणुन म्हाणजे मी तसे अनिता पाटिलच्या ब्लॉग वर वाचले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

स्वामींचे निर्वाण १७६१ सालीच

मृत्युन्जय
Tue, 12/17/2013 - 13:41 नवीन
स्वामींचे निर्वाण १७६१ सालीच झाले आणि ते आलटुन पालटुन सदाशिव राव भाऊ आणि स्वामी समर्थ हा खेळ खेळायचे असे नाही लिहिले म्हणजे मिळवली. उद्या हे महान लोक बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच शिवाजी महाराज असे लिहायलाही कमी करणार नाहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

और ये लगा सिक्सर..

चिगो
गुरुवार, 12/19/2013 - 16:29 नवीन
उद्या हे महान लोक बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच शिवाजी महाराज असे लिहायलाही कमी करणार नाहित.
अरे देवा.. दोघांबद्दलही नितांत आदर असूनही ह्या शक्यतेचा विचार करुनच अशक्य हसायला होतंय.. =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

>>> तसेच तो म्हणतात की स्वामी

श्रीगुरुजी
Wed, 12/18/2013 - 11:57 नवीन
>>> तसेच तो म्हणतात की स्वामी चे निर्वाण हे इ.स.१८०० साली झाले म्हणजे स्वामी ७१ वर्षे जगले. श्री स्वामी समर्थांनी महासमाधी शके १८०० मध्ये म्हणजेच इसवी सन १८७८ मध्ये घेतली. ते जर पानपतातले भाऊसाहेब असते, तर १८७८ साली त्यांचे वय कमीतकमी १५० वर्षांचे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

साहेब, दत्त संप्रदाय हा कै

बॅटमॅन
Tue, 12/17/2013 - 13:02 नवीन
साहेब, दत्त संप्रदाय हा कै आमच्या अभ्यासाचा विषय नव्हे. ऐकीव अन वाचीव म्हायतीवरच काय ते बोलतो. त्यानुसार नृसिंह सरस्वतीनामक साधू/संत हे बहामनी/आदिलशाही काळातले होते तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे एकोणिसाव्या शतकातले होते. अवतार वैग्रे कल्पना इथे लागू होतील/नै वैग्रे मला कल्पना नाही. किमान या दोघांच्या लैफटैममध्ये शेकडो वर्षांचे अंतर आहे इतकेच सूचित करावयाचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

(No subject)

प्रचेतस
Tue, 12/17/2013 - 13:06 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

.

उद्दाम
Tue, 12/17/2013 - 13:25 नवीन
तीच तर गंमत आहे. नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यात ३०० वर्षे की कितीतरी जास्त काळ आहे. पण 'तेच हे ' असे मानायला लोकांना प्रॉब्लेम नसतो. पण सदाशिवभाउ म्हणजे स्वामी समर्थ असे कुणी म्हटले की हेच लोक उद्गारतात ! आँ ! १२० वर्ष माणूस कसा जगेल? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

१५० वर्षे

मृत्युन्जय
Tue, 12/17/2013 - 13:39 नवीन
१५० वर्षे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

नाही

आनन्दा
Tue, 12/17/2013 - 13:50 नवीन
सदाशिवराव भाऊ १२० वर्ष जगले असतील तर त्याबद्दल काहीच आक्षेप नाही. त्यांची जात काढण्याला आहे. हं.. आता सदाशिवरावभाऊ भूमीगत होऊन १२०+ वर्षे धडधाकटपणे जगले होते असे मान्य करायचे असेल तर प्रश्नच नाही. चित भी मेरी पट भी मेरा... ब्रिगेडी लोकांच्या वाट्याला मी जात नाही ते त्याच्यामुळेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

त्यात

अनिरुद्ध प
Tue, 12/17/2013 - 13:31 नवीन
शेकडो वर्षांचे अंतर होते,हे मान्यच आहे,कारण श्री स्वामी समर्थ यांना प्रत्यक्ष पाहीलेल्यांनी सुद्धा त्यान्ची कातडी(skin) ही खूप जुनी वाटत असल्याचे वर्णन केले आहे ते सुद्धा KODAK या कम्पनीच्या विदेशी माणसाने त्यांचा फोटो काढला होता असे ऐकुन आहे,बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ते सुद्धा KODAK या कम्पनीच्या

ऋषिकेश
Tue, 12/17/2013 - 14:06 नवीन
ते सुद्धा KODAK या कम्पनीच्या विदेशी माणसाने त्यांचा फोटो काढला होता असे ऐकुन आहे
कसे शक्य आहे? श्री समर्थांचे निर्वाण १८७८चे तर कोडॅक कंपनीची स्थापना १८८८ची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

आँ?

गवि
Tue, 12/17/2013 - 14:08 नवीन
KODAK या कम्पनीच्या विदेशी माणसाने त्यांचा फोटो काढला होता असे ऐकुन आहे,बाकी काही नाही.
आता कॉड्याक कंपनीच्या पहिल्या फोटोचे उगमवर्ष शोधणे आले. सापडले.. १८९२ (अक्षरी अठराशे ब्याण्णव) साली कंपनी स्थापन झाली असे दिसते. सतराशेच्या शतकात स्वामी समर्थ असतील तर तेव्हाच कॉड्याकचे प्री-लाँच बुकिंगरुपात पदार्पण झाले असावे असे वाटून कॉड्याकविषयीचा आदर वाढला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

>>>कॉड्याकचे प्री-लाँच

थॉर माणूस
Tue, 12/17/2013 - 14:18 नवीन
>>>कॉड्याकचे प्री-लाँच बुकिंगरुपात पदार्पण झाले असावे असे वाटून कॉड्याकविषयीचा आदर वाढला. *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

यात

अनिरुद्ध प
Tue, 12/17/2013 - 14:20 नवीन
मी माझी माहिती ही ऐकीव आहे असे उध्रुत केले आहे ते खरेच आहे असे माझे म्हणने नाही,तसेच वरिल प्रतिसादात श्री बट्ट्मण्ण यानी श्री स्वामी समर्थ हे एकोणिसाव्या शतकात होते असे म्हटले आहे,तेव्हा माझे वाचन योग्य असावे असे वाटले,म्हणुनच हा प्रतिसाद देण्याची हिम्मत केली,बाकी मी काही ईतिहास अभ्यासक वगैरे नाही,माझी माहीती चुकिची असेल तर क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

क्षमस्वबिमस्व नको हो लगेच.

गवि
Tue, 12/17/2013 - 14:34 नवीन
क्षमस्वबिमस्व नको हो लगेच. जरा गंमत केली इतकंच. त्यानिमित्ताने अतिअवांतर करुन पाहतो. नॅशनल जॉग्राफिकच्या वेबसायटीवरुन जगातला पहिला फोटोग्राफ १८२६ साली काढला गेलेला, पाहायला मिळाला. Image removed. अधिक माहितीचा दुवा: http://photography.nationalgeographic.com/wallpaper/photography/photos/milestones-photography/niepce-first-photo/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

त्या दोहोंचा काळ तरी बघा मालक

ऋषिकेश
Tue, 12/17/2013 - 14:12 नवीन
त्या दोहोंचा काळ तरी बघा मालक कमीतकमी. आता औतारबितार म्हण्णार असाल तर आमची अळीमिळी गुपचिळी
गुपचिळीच श्रेयस्कर आहे बॅट्या! ऐकीव कथा अशी की श्री नृसिंह सरस्वती तप करण्यासाठी (का समाधीसाठी? तपशील विसरलो) जंगलात गेले. पुढिल ३००+ वर्षांत तिथे त्यांच्या भोवती एक वारूळ तयार झाले. एकदा एका लाकूड तोड्याने ते वारूळ फोडले तर आतून श्री समर्थ प्रकटले.चुभुद्याघ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खरे आहे.

बॅटमॅन
Tue, 12/17/2013 - 14:22 नवीन
खरे आहे. बाकी या कथेबद्दल धन्यवाद, पहिल्यांदाच ऐकली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

बॅट्या

प्रमोद देर्देकर
Tue, 12/17/2013 - 14:49 नवीन
नाही बॅट्या हे अगदि असेच त्रोटक वर्णन मराठी विकीपिडियावर दिले आहे.
जीवन[संपादन] विद्यमान आंध्रप्रदेशातल्या श्री शैल्यम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून ते प्रकट झाले, अशी मान्यता प्रचलित आहे.[१] त्यांनी तेथून आसेतुहिमाचल भ्रमण केले. इ.स. १८५६-इ.स. १८५७ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. इ.स. १८७५ सालच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते, त्या वेळी त्यांनी फडक्यांना "सध्या लढायची वेळ नाही" असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. सबसे बडा गुरू.. गुरूसे बडा गुरू का ध्यास.. और उससे बडे श्री स्वामी समर्थ महाराज... इ.स. १४५७ च्या सुमारास (माघ वद्य १, शके १३८०)[२] श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली व ती वारूळावर पडली. ही स्वामी महाराजांची लीलाच की त्या उद्धवाचे निमित्त साधून त्यांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली - तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

असेल हो, अमुक अमुक कथा असेल

बॅटमॅन
Tue, 12/17/2013 - 15:06 नवीन
असेल हो, अमुक अमुक कथा असेल याबद्दल अविश्वास नव्हताच. कथेच्या सत्यतेवर अविश्वास दर्शवला इतकेच. नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या दोन्हीही व्यक्ती भूतलावर प्रत्यक्ष होऊन गेल्या हे मलाही पटतेच. पण ते ३०० वर्षे वैग्रे पटत नाही. कुणाला पटत असेल तर पटो बापडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

ही कथा पहिल्यांदाच समजतेय.

थॉर माणूस
Tue, 12/17/2013 - 14:28 नवीन
ही कथा पहिल्यांदाच समजतेय. त्या बद्दल धन्यवाद. गुपचिळीबद्दल सहमत. अशा कथांमधे उगाच अती लॉजिक लावत बसू नये, काही उपयोग होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

असेच

अनिरुद्ध प
Tue, 12/17/2013 - 12:26 नवीन
लोकांमध्ये बरेच समज गैरसमज पसरावण्यात येतात असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

जय जय स्वामी समर्थ

वेताळ
Tue, 12/17/2013 - 14:02 नवीन
आम्ही आपले स्वामीच्या चरणी पाया पडतो......बाकी त्याचा इतिहास तपसायचा प्रयत्न केलेला नाही.जय जय स्वामी समर्थ....
  • Log in or register to post comments

आम्ही

अनिरुद्ध प
Tue, 12/17/2013 - 14:10 नवीन
सुद्धा श्री स्वामी समर्थांच्या पायाच पडतो,पण हे ऐकीव सन्दर्भ हे फोटोसहीत आहेत हे वाचनात आले आहे हाच माहीत असलेला ईतिहास ईथे व्यक्त केला ईतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

ऐसी अक्षरे वरील हा प्रतिसाद

प्रसाद प्रसाद
Tue, 12/17/2013 - 16:42 नवीन
ऐसी अक्षरे वरील हा प्रतिसाद वाचावा - http://www.aisiakshare.com/node/1190#comment-15792 हा ब्लॉग अनिता पाटील या फेक नावाने कोणी एका पुरुषाने लिहिला होता, त्याबद्दल बऱ्याच दिवसापूर्वी अगदी त्याला कसे पकडले ह्याचे साद्यंत वर्णन वाचले होते, तो दुवा आत्ता सापडत नाही आहे, सापडल्यावर देतो. वरील लिंक मध्ये या ब्लॉगरची माहिती आहेच.
  • Log in or register to post comments

ते सगळं मान्य. पण ह्या

सूड
Tue, 12/17/2013 - 17:13 नवीन
ते सगळं मान्य. पण ह्या प्रतिसाद ज्या कोणा व्यक्तीचा आहे त्याचंच नाव ब्लॉगवर हे (बाई/ बुवा) अभिमानाने मिरवतंय ते पाह्यलं का? दुर्लक्ष करा राव. असले धागे काढून आणि लिंका देऊन माहिती नसणार्‍यांना पण हा ब्लॉग माहिती करुन देण्याचं काम फुकटात होतंय. मन चिंती ते वैरी न चिंती: प्रमोद देर्देकर ह्याच ऐसि वरच्या सुप्रिया जोशी, अनिता पाटील आणि रविंद्र तहकीक तर नव्हेत? दया कुछ तो गडबड है !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद प्रसाद

"तहकीकात" करो (दया)

आदूबाळ
गुरुवार, 12/19/2013 - 12:52 नवीन
"तहकीकात" करो (दया)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

>>>>>> या पत्रा द्वारे ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/17/2013 - 17:08 नवीन
>>>>>> या पत्रा द्वारे ते म्हाणतात की १८५७ साली जे बंड झाले पण ते पुढे फसले. त्या बंडात सहभागी असलेले तात्यासाहेब टोपे, आणि नानासाहेब पेशवे हे भगवे वेष परिधान करुन भुमिगत झाले आणि त्यातील तात्या टोपे हे श्री गजानन महाराज म्हणून तर नानासाहेब पेशवे हे शिर्डीचे साईबाबा म्हणून प्रकटले असे म्हटले आहे. खरं तर असा एक लेख कोणत्या तरी मासिकात छापून आल्याचं मला आठवतं. बाकी वरच्या सर्व गोष्टी थोतांड आहेत पण काही शक्यता तपासता येतात का ? नसेल तर सोडून द्यावे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

इथे सवर्ण एकमेकांशी

म्हैस
Tue, 12/17/2013 - 17:28 नवीन
इथे सवर्ण एकमेकांशी भांड्तायेत . त्याच्याशी आपल्याला काही देण घेण नहि. पण गजानन महाराज , स्वामी समर्थांचा उल्लेख आला म्हणून हा प्रतिसाद . प्रमोद देर्देकर - अगदी सहमत . ज्यांना पटत नसेल त्यांनी सोडून द्यवे. ज्यांना अनुभव हवा असेल त्यांनी घ्यावा . ३०० वर्षे सामान्य लोकांसाठी खूप जास्त आहेत म्हणून आपला विश्वास बसत नाही . ईश्वरासाठी ३०० वर्षे काहीच नाहीत . अजून १ गोष्ट . इथे ब्राह्मणांचा द्वेष करायचा नाहीये पण हे सत्य आहे कि मुसलमान राजवटीत ह्या ब्राह्मणांना भिक मागणं सुधा मुश्किल झाल होत. देवाची पूजा करणं , मंदिरात जाण सुधा दुरापास्त झालं . शिवाजी महाराजांनी ह्यांना भयमुक्त केलं . पण महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला 'शिवाजी भोसले' क्षत्रिय नाहीत म्हणून त्यांना राज्याभिषेक करता येणार नाही म्हणून १ सुधा ब्राह्मण तयार झाला नहि. शेवटी जिजाबाई ना काशीहून गागाभात्तांना बोलवावं लागलं . बाकी ब्राह्मणांचे हजारो वर्षांपासून चालत आलेले प्रताप तर सगळ्यांनाच माहित आहेत
  • Log in or register to post comments

३०० वर्षे सामान्य लोकांसाठी

बॅटमॅन
Tue, 12/17/2013 - 17:36 नवीन
३०० वर्षे सामान्य लोकांसाठी खूप जास्त आहेत म्हणून आपला विश्वास बसत नाही . ईश्वरासाठी ३०० वर्षे काहीच नाहीत .
अगदी बरोबर, तरी शंका येते की गझनीचा महमूद किंवा खिलजी वैग्रे लोक तिथे देवळे पाडापाड करीत असताना हे भगवंतराव काय स्वर्गलोकाच्या टूरला गेले होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

अगदी बरोबर, तरी शंका येते की

सुहास..
Tue, 12/17/2013 - 17:41 नवीन
अगदी बरोबर, तरी शंका येते की गझनीचा महमूद किंवा खिलजी वैग्रे लोक तिथे देवळे पाडापाड करीत असताना हे भगवंतराव काय स्वर्गलोकाच्या टूरला गेले होते का? >>>> अगगग !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अरे? आपलं काय ठरलंय? लॉजिक

थॉर माणूस
Tue, 12/17/2013 - 17:47 नवीन
*lol* अरे? आपलं काय ठरलंय? लॉजिक शोधायचं नाही. आहे हे असं आहे. कथा आहेत राव त्या, इतिहास थोडीच आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

होय ओ, कथाच आहेत, पण त्यांवर

बॅटमॅन
Tue, 12/17/2013 - 17:50 नवीन
होय ओ, कथाच आहेत, पण त्यांवर कुणी लिटरली विश्वास ठेवू लागलं की अशा शंका येतात, तोपर्यंत सगळं ठीक असतं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस

माधवजी

अनिरुद्ध प
Tue, 12/17/2013 - 18:58 नवीन
आपल्याला ह्या प्रष्णाचे उत्तर OMG या हिन्दी चित्रपटात मिळेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

इथे ब्राह्मणांचा द्वेष करायचा

लोटीया_पठाण
Tue, 12/17/2013 - 21:42 नवीन
इथे ब्राह्मणांचा द्वेष करायचा नाहीये पण हे सत्य आहे कि मुसलमान राजवटीत ह्या ब्राह्मणांना भिक मागणं सुधा मुश्किल झाल होत. देवाची पूजा करणं , मंदिरात जाण सुधा दुरापास्त झालं . शिवाजी महाराजांनी ह्यांना भयमुक्त केलं . पण महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला 'शिवाजी भोसले' क्षत्रिय नाहीत म्हणून त्यांना राज्याभिषेक करता येणार नाही म्हणून १ सुधा ब्राह्मण तयार झाला नहि. शेवटी जिजाबाई ना काशीहून गागाभात्तांना बोलवावं लागलं . बाकी ब्राह्मणांचे हजारो वर्षांपासून चालत आलेले प्रताप तर सगळ्यांनाच माहित आहेत
त्याकाळच्या ब्राह्मणांनी केलेला विरोध कुठच्या ऐतिहासिक दस्तावेजात नमूद आहे ?? कारण हा मुद्दा गेली काही वर्ष चेपू अन ओर्कुट वरून फिरतोय पण कुठेही त्याचा संदर्भ दिलेला वाचनात आला नाही. तो विरोध नसून; राज्याभिषेकासाठी क्षत्रिय असणे गरजेचे असून त्याबाबत काय स्टान्स घ्यावा अशी शंका उपस्थित केली गेली असावी, असा खुलासा हि वाचल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

इथे ब्राह्मणांचा द्वेष करायचा

पिलीयन रायडर
Wed, 12/18/2013 - 12:04 नवीन
इथे ब्राह्मणांचा द्वेष करायचा नाहीये
आणि मग लगेच हे ही...
बाकी ब्राह्मणांचे हजारो वर्षांपासून चालत आलेले प्रताप तर सगळ्यांनाच माहित आहेत
ऑं?? बाई.. मिळाला वेळ म्हणुन काहीही लिहीत सुटणार का? धागा काय, तुम्ही लिहीताय काय? उगाच जातीची भांडणं इथे आणु नकात. तुमच्या मनात ब्राह्मणांविषयी ज्या काही बर्‍या वाईट भावना आहेत त्या तुम्च्या पाशीच ठेवा. इथे मळमळ काढु नका. अजुन बरेच धागे आहेत तुम्ची ब्राहणांविषयीची मते सांगायला. तिकडे बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

बाकी काही असो पण संस्कृत

बॅटमॅन
Wed, 12/18/2013 - 16:03 नवीन
बाकी काही असो पण संस्कृत विद्या स्वतःपुरतीच ठेवणे ही ब्राह्मणांची घोडचूक होती. शिवाय ते अन्य जातींच्या धंद्यांत घुसायचे पण अन्य जातींचा त्यांच्या धंद्यातला शिरकाव त्यांनी कधी खपवून घेतला नाही- लै थोडे अपवाद आहेत त्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

कोण म्हणतय की चुका केल्या

पिलीयन रायडर
Wed, 12/18/2013 - 16:13 नवीन
कोण म्हणतय की चुका केल्या नाहीत ब्राहमणांनी? पण माझे २-३ प्रश्न आहेत (तुलाच असे नाही..) १. अशी कोणती जात आहे ज्यांच्या कडुन चुका झाल्याच नाहीत? माणुस म्हणला की चुक आलीच.. २. बर तरी खुप मोठी चुक आहे, नाही विसरता येणार... पण म्हणुन वाट्टेल ते बरळायच कारण नाही. पुरावे द्या आणि बोला. तसं नसेल तर अनिता पाटीलचा ब्लॉग आणि असे प्रतिसाद ह्यात फार फरक रहाणार नाही. (तसही ब्राहमण विषयावर गरळ ओकणार्‍या लोकांकडुन मी कधीही लॉजिकल प्रतिवाद ऐकला नाहीये.. ते फक्त आधंळा द्वेष करतात.. अशां सोबत बोलायची गरजही वाटत नाही खरं तर) ३. मुख्य प्रश्न.. ब्राह्मण आणि त्यांच्या चुका हा या धाग्याचा विषय आहे का? मग ओढुन ताणुन का उतरायच त्या विषयावर..? असा सुरु होऊन मग तो परत आरक्षण आणि इ टिपि़कल मुद्द्यावर येणार. आणि तरीही चर्चा करायची असेल तर ह्याच विषयाला वाहीलेले अनेक धागे आहेत, ते वापरा / स्वतःचा धागा काढा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अशी कोणती जात आहे ज्यांच्या

बॅटमॅन
Wed, 12/18/2013 - 16:20 नवीन
अशी कोणती जात आहे ज्यांच्या कडुन चुका झाल्याच नाहीत? माणुस म्हणला की चुक आलीच..
या कार्पेटखाली ब्राह्मण किंवा अन्य जातींच्या चुका झाकणे चूक आहे. बाकी अनिता पाटील अँड हर इल्क हे लोक फक्त आंधळा द्वेष करतात यावर दुमत असायचे कारण नाही. फक्त आपल्या चुकांवर पांघरूण घालू नये इतकेच म्हणावयाचे आहे. असो. बाकी एका वाक्यावरून इतके वर्क्ड अप व्हायचे कारणही नव्हते असे मला वाटते. कारण अशा हजारो निर्गुणी मतपिंका तथाकथित उदंड विद्या शिकलेले टाकत असतात. पण त्यांमधील म्याटर पाहता "त्याला कोण पुसे?" असेच म्हणावे लागते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

बर आता तु म्हणतोयस तर असो..

पिलीयन रायडर
Wed, 12/18/2013 - 16:23 नवीन
बर आता तु म्हणतोयस तर असो.. फक्त धागा आणि विषय न पहाता कसहि करुन ह्याच विषयावर उतरणे ह्या प्रकाराचाच कंटाळा आलाय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

>>>संस्कृत विद्या स्वतःपुरतीच

मारकुटे
गुरुवार, 12/19/2013 - 14:27 नवीन
>>>संस्कृत विद्या स्वतःपुरतीच ठेवणे ही ब्राह्मणांची घोडचूक होती. संस्कृत ब्राह्मणांपुरती नव्हती. संस्कॄतमधे जैन आनि बौद्धांनी खुप लिहिले आहे. अब्राह्मण हिंदूंच्या किती रचना आहेत याची गणतीच नाही. (उदा. वाल्म्इकी आणि व्यास ब्राह्मन नव्हते.) ब्राह्मणांकदे होती ती केवळ कर्मकांडाची निरर्थक बडबड. तिला तेव्हाही अर्थ नव्हता आजही नाही. ब्राह्मणांपाशी अशी कोनतीही विद्या नव्हती जी दिली नाही म्हणून समाजाचं नुकसान झालं. आजही जेव्हा कर्मकांडाची विद्या (!) सर्वांना उपलब्ध आहे तेव्हा ती शिकणारे किती? आणि असे शिकलेले असूनही त्यांना न बोलावता केवण बामनालाच बोलवणारे किती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कृष्ण द्वैपायन सत्यवतीच्या

मृत्युन्जय
गुरुवार, 12/19/2013 - 14:32 नवीन
कृष्ण द्वैपायन सत्यवतीच्या पोटी पराशर ऋषींशी तिच्या असलेल्या संबंधातुन जन्मले. पराशर ऋषी माझ्या मते ब्राह्मण होते. सत्यवती नव्हती. अश्या संततीला माझ्या मते ब्राह्मणच संबोधिले जायचे. बाकी त्याकाळी ब्राह्मणांकडे ज्ञान नव्हते ("ब्राह्मणांकदे होती ती केवळ कर्मकांडाची निरर्थक बडबड") हे अतिशय हास्यास्पद विधान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा