Skip to main content

चारा घोटाळ्यातील लालूप्रसादांना मिळाला जामीन

लेखक सचीन यांनी शनिवार, 14/12/2013 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
बिहारमधील चारा घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लालूंची सुटका झाली आहे.लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळ्यातून जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले आहेत.लालूंनी भ्रष्टाचार केला असेल तर न्याय व्यवस्था त्यांचा योग्य न्याय करेलच. बर्याच जणांना असे वाटते कि लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरच लालुना बाहेर काढले असावे?काय असेल ते असो मात्र लालूंचे एका गोष्टी साठी नेहमीच कौतुक वाटत राहील ती म्हणजे अडवानींची रथयात्रा रोखण्याची हिम्मत. लालू प्रसादांची धडाडी , बेदरकारपणा मला आवडतो. बाबरी मस्जिद पतनानंतर अक्ख्या देशभर दंगे पेटले होते अपवाद बिहारचा.आपले राज्य दंगलमुक्त राखण्यात तेव्हा लालूंनी मोठी भूमिका बजावली होती. महाराष्ट्र स्वताला पुरोगामी राज्य समजते ते अक्षरशः दंगलीच्या आगीत पोळत होते. माणुसकीचा, माणसाचा मुखवटा गळून पडला होता नि आतले हिस्त्र श्वापद दिसत होते विरुद्ध धर्मियाच्या नरडीचा घोट घ्यायला चटावलेले. आपले तीक्ष्ण सुळे पाजळत वाट पाहत असलेले दुसऱ्या जमातीची... आतुरतेने. त्यांच्या रक्ताने आपला धार्मिक कंड शमवायला. मग ती निरागस पोरेबाळे असोत कि पुढील आयुष्याचे स्वप्न मनाशी रंगवणारी नवयुवती. धार्मिक श्वापदे त्यांचा फडशा उडवून दुसरा नरबळी शोधायला जात....पुरोगामी ? म्हणवणाऱ्या राज्यांची हि अवस्था तर बिहार सारख्या राज्यांचे हाल काय होतील. पण तेव्हा मोठ्या निग्रहाने लालुप्रसादानी दंगल बिहार मध्ये होवू दिली नाही त्यांच्यातील कठोर प्रशासकाचे ते एक रूप नक्कीच सुखावणारे होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21032
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

In reply to by मृत्युन्जय

लालूंचे किती गुणगान करावे? ते तुरुंगात गेले असतांना. जेलरने त्यांना तंबाखू मळून दिली असे वाचलेले आहे. कुठे ते इंग्रजांच्या जमान्यातील स्वातंत्र्यसैनिकांना त्रास देणारे जेलर आणि कुठे हे लोकनेत्यांच्या साठी झटणारे जेलर. मला तरी हे वाचून एक भारतीय म्हणून बरेच काही तरी वाटले.

In reply to by मुक्त विहारि

तुरुंगात गेले असतांना. जेलरने त्यांना तंबाखू मळून दिली असे वाचलेले आहे>>>>>>>>>>>>>>> छान..कोठल्या वृत्तपत्रात वाचले ते आम्हालाही सांगा म्हणजे आम्हीही वाचू

In reply to by सचीन

हे बरे आहे राव.... तुम्ही माहिती न वाचता टंकायचे आणि मग आम्ही ती पुरवायची. असो... आता तुम्ही बिहारमध्ये न जाता पण लालू विषयी लिहू शकता तर , अशा बातम्या तुम्ही कशा काय वाचणार?

In reply to by मृत्युन्जय

बरोबर....९५० करोड चा चारा खाणे म्हणजे येड्यागबाळ्याचे काम नव्हे. त्यासाठी सिंघम सारखी जिगर आणी बकासुरासारखी फिगर लागते....

In reply to by होबासराव

धन्यवाद... हीच बातमी एक-दोन मराठी पेपरमध्ये पण आली होती...

जेलरच्या पत्नीने त्यांच्या विपुल कर्णकेशसंभाराच्या वेण्या घालून त्यात एकेक गजराही माळला होता म्हणतात. खरे खोटे तो पशुपतीच जाणे!

आप जेल मे थे तो नितिश ने बिहार का बिल्कुल महाराष्ट्र बना दिया! http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5272400163989472408&S…संपादकीय&NewsDate=20131218&Provider=-&NewsTitle=छूट%20गईले%20ललवा%20हमार!%20(ढिंग%20टांग)

बाहेर आल्या आल्याच लालुंनी 'राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी योग्य' असे वक्तव्य केले तर काल सोनिया गांधी 'लालुंच्या सुटकेने आनंद झाला' असे म्हणाल्या. हे बघुन लालुंना लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठींबा द्यायला राजी करण्यासाठी दोन महीने तुरुंगात ठेवले असे वाटले ;)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

बाहेर आल्या आल्याच लालुंनी 'राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी योग्य' असे वक्तव्य केले>>>>>> जे लालुना कळते ते तुम्हाला कळू नये ह्याचे आश्चर्य वाटते

In reply to by सचीन

लालू जेलबाहेर, मोदींना आव्हान "आता मोदींचे काही खर नाही" हे म्हणायचे विसरलात का सचिन ? चला तुमचे आणखी एक विनोदी वाक्य आता मी गेस करतो "झुंजार आणि सामान्य माणसांची जाण असणारा तसेच बिहार चा कायापालट करणारा ढाण्या वाघ आता मोदी नावाच्या बकऱ्या वर तुटून पडणार"

In reply to by सचीन

हा पराकोटीचा भ्रष्ट, असंस्कृत, गलिच्छ मनुष्य इतका कोडगा आणि निर्ढावलेला कसा आहे हे बघायला मिळते आहे. जामिनावर सुटला तर जणू निर्दोषच सुटला असा आव आणतो आहे. ह्या नालायक माणसाचे भाषण ऐकून लोक आपले मत बदलतील अशा दिवास्वप्नात रहाणार्‍यांची कीव येते. एक विनोदी प्रोग्राम ऐकायला जाऊ असे म्हणत ह्या आचरटाचे तोडलेले तारे ऐकायला लोक येतील. एखादा डोंबार्‍याचा खेळ, तोंडे वेडीवाक्डी करणारा विदुषक इतकीच ह्या माणसाची लायकी. बघू या काय दिवे लावतात हे कडबाकिंग!

ह्याचे उत्तर ओळखायचे असेल तर तो काय प्रकारची पोपटपंची करतो आहे ते पहा. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/lalu-on-Modi/articleshow/… युवराज राहुलजींपुढे केजरीवाल वा मोदी हे कःपदार्थ आहेत असे ह्या इसमाचे म्हणणे आहे. जामिनावर सोडताना काय अटी घालून सोडले आहे ते ओळखणे अवघड नसावे! सुमार केतकर, दिग्गी, फार काय महाराणी सोनियांनाही अतीरंजित वाटेल अशा प्रकारची राहुलस्तुतीचे आवर्तन ह्या पशुने चालवले आहे. लालूसारख्या भ्रष्ट बरबटलेल्या हीन जनावराचे क्यारेक्टर सर्टिफिकिट कितपत फायद्याचे ठरेल ते काळच सांगेल.

सचीन तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है सचीन हमारा नेता है .....

In reply to by सचीन

लालूनं तारे तोडून लै दीस झाले. लोकं खो खो हस्ली आनि इसारली बी. आता तर राऊलच्या मायेनी बी त्येला सांगीतलं की बाबा ह्ये तुला जमनार न्हाय. उगं त्वोंडावर पडून फाय्दा न्हाय. लालू काय आप्ले पलवे चाटायला एका पायावर हुबा है, त्येला काय जेल चुकवाय्चिय. आनि लालूचे तल्वे चाटाय्ला पन काय्बाय लोकं अस्तात, त्यानाबी काय्तरि चारा लालू ताकत आसल नायतर तो चारा टाकल या आशेनं ति लोकं झुरत अस्त्याल. पन हा फुटकळ धागा परत पर्त वर आनायचा क्शीन प्रय्त्न बघून तुम्ची लैच कीव वाट्ली