ग. दि. मा यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये शेटफळे या गावी झाला. अभंग, भावगीत, बालगीत, लावणी, आरत्या, भूपाळी, अंगाई, समूहगीते, राष्ट्रगीते इत्यादी बरोबरच 'दो आंखे बारह हाथ', 'पेडगावचे शहाणे', 'जगाच्या पाठीवर' यासारखे दर्जेदार चित्रपट लिहणारे अद्वितीय शब्दप्रभू ! 'इंद्रायणी काठी देवाची आळंदी', 'कानडा राजा पंढरीचा' या सारखे अभंग, 'नाच रे मोरा', 'गोरी गोरी पान' या सारखी बालगीते, 'जाळीमंधी पिकली करवंध', 'बुगडी माझी सांडली गं' यासारख्या लावण्या लिहणाऱ्या गदिमांनी 'जग हे बंदिशाळा' सारखे कटू सत्य जगापुढे मांडले.
स्वातंत्रपूर्व काळामध्ये बेचाळीसच्या लढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पाठीमागे पोलीस त्यांना अटक करण्यासाठी लागले असताना क्रांतिसिंह नाना पाटील एका झोपडीमध्ये लपण्यास आसरा घेतात त्यावेळी एक वृद्धा आपल्या सुनेबरोबर त्यांना लपण्यास मदत करते आणि पोलीस आल्यानंतर माझी लेक जावई असल्याचे सांगून पोलिसांना चकवा देते. ह्या भावुकप्रसंगावर मराठी साहित्यातील वाल्मिकी गीतरामायणकार कवी. ग. दि. माडगूळकरांनी केलेली कविता मित्रांसाठी -
लपवलास तू का थेरडे
झोपडीत या कुणी फरारी,
'देवाशप्पत नाही दादा'
दोन कापरे ओठ हलले,
गळीत देह तो बाजूस सारून,
झोत विजेचे आतच घुसले,
कोण दोन ते त्या खाटेवर
पुसे शत्रूचा एक शिपाही,
लाजून, दबकून सांगे वृद्धा,
दादा माझी लेक जावई,
अंधारातच खाटेवरुनी
क्रांतिवीर तो बाजूस होई,
नवोढेस त्या म्हणे
'पुन्हा मी तुझ्याच पोटी येईन आई'
नवोढेसही गहिवर दाटे,
शब्द फुटेना नयनी गंगा,
कूस फाडूनी तुझ्यासारख्या
रणमर्दाला द्यावी जागा,
सखोल डोळे गळू लागले
कुरवाळूनिया त्या दोघांना,
अश्रुखाली पुनःश्च भिजवी,
वीराला ती वृद्ध अंगना ,
बेचाळीसच्या बलवंतांना,
असा लाभला दिव्य आसरा,
लोकशक्तीच्या सामर्थ्यावर
चिरंजीव हो मग सातारा
कवी :- ग. दि. माडगुळकर
त्यांच्या स्मृतीस अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली !
वाचन संख्या
8821
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
गदिमा यांच्या
गदिमां बद्दल काय बोलावे?
+ १०००
In reply to गदिमां बद्दल काय बोलावे? by ज्ञानोबाचे पैजार
वा साजिदसाहेब! तीन अण्णांचे
सुंदर कविता!
+१
In reply to सुंदर कविता! by प्यारे१
सहज सोप्या रचना
नववी सिद्धी !
अभिवादन
अचूक शब्द योजनेचा जादूगर
गदीमांना जाऊन आता ३५ च्या वर