✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

समलैंगिकतेला गुन्हा ठरविण्याच्या संदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णया विषयी आपले काय मत आहे ?

म
मारवा यांनी
Wed, 12/11/2013 - 18:53  ·  लेख
लेख
ताज्या बातमी नुसार सुप्रीम कोर्टाने २००९ मध्ये दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात निकाल दिलेला आहे. या अनुसार आता दोन समलैंगिक व्यक्तीं मधील लैंगिक संबध हे आता कायद्यानुसार कलम ३७७ नुसार हे गुन्हा मानण्यात येतील. आणि या फ़ौजदारी गुन्ह्यानुसार अशा संबध ठेवणारया व्यक्तीला अधिकात अधिक १० वर्षांच्या शिक्षेची कायद्यात तरतुद आहे. या निकाला मुळे अनेक वर्षांपासुन आपल्या मुलभुत मानवी हक्कांसाठी लढा देणारया समलैंगिकाच्या चळवळीला जबर धक्का बसलेला आहे. या निर्णयांवर प्रतिक्रीया देतांना वृंदा करात यांनी असे म्ह्टले आहे की “हा अतिशय चुकीचा निर्णय आहे दोन प्रोढ व्यक्तींनी परस्पर संमतीने केलेल्या संबधाना बेकायदा ठरविणे चुकीचे आहे.” तर बाबा रामदेव यांनी अशी प्रतिक्रीया दिलेली आहे की समलैंगिकता ही मुळात अनैसर्गिक आहे आणि हे फ़क्त एक वाईट व्यसन फ़क्त आहे. शिवाय त्यांनी समलैंगिकांना आपल्या आश्रमात येण्याच निमंत्रण दिलेल आहे आणि अस सांगितले आहे की ते ह्या व्यसनापासुन समलैंगिकांची मुक्ती करुन देउ शकतात. तर एक संवेदनशील विचारी भारतीय नागरीक म्हणुन या सुप्रीम कोर्टाच्या निर्णया कडे आपण कशा रीतीने बघतात ? एकंदरीत समलैंगिकता ही तुम्हाला विकृती वाटते की नाही ? यात समलैंगिकाच्या मुलभुत मानवी हक्कांची पायमल्ली झाली आहे अथवा नाही ? एकुण समाजाला हा निर्णय अधोगती कडे नेणारा आहे की प्रगती कडे? कृपया यावर गंभीर रीत्या मतप्रदर्शन करावे ही अतिशय नम्र विनंती.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
45572 वाचन

💬 प्रतिसाद (205)

प्रतिक्रिया

या संबंधी कायदा करणे का जरूरी

मनीषा
गुरुवार, 12/12/2013 - 11:38 नवीन
या संबंधी कायदा करणे का जरूरी आहे? कारण हा सर्वस्वी वैयक्तीक, खाजगी प्रश्नं आहे. त्यातून समाजाला काही त्रास होतो आहे का? कारण हा प्रश्नं हल्लीच बातम्यांमधे झळकायला लागला आहे. त्या आधी असे लोक नव्हते का? आणि अशा व्यक्तींमुळे समाजात काही अशांतता, धोका इ. निर्माण झाल्याचे ऐकीवात नाही. किंवा अशा व्य्क्तींमुळे समाजाची सांस्कृतीक, नैतीक अथवा धार्मिक हानी झाल्याचेही उदाहरण नाही. अशा संबंधाना सामाजिक मान्यता मिळू नये.. (असं मला वाटतं), पण तो गुन्हा का समजावा? यात जबरदस्तीने केलेला संबंध असेल तर तो गुन्हा आहे, पण तो भिन्नलिंगी संबंध ठेवणार्‍यां साठी पण गुन्हाच आहे ना? मग वेगळा कायदा कशाला? समलिंगी संबंध मला नैसर्गिक/ नॉर्मल आहेत असे वाटत नाही. (कदाचित माझे या संदर्भातील ज्ञान अती तोकडे असल्यामुळे असेल) . शास्त्रीय दृष्ट्या देखिल असे संबंध असणे योग्यं नसावेत कारण दोन भिन्न अधिभार (+ve, -ve)असलेल्या धृवात (पोलस) आकर्षण असते. समान अधिभारांमधे आकर्षण नसते. मला वाटते असे लोक विकृत नाहीत पण आजारी समजावेत. त्यांना समुपदेशनाने समजवायचा प्रयत्नं करावा अन्यथा त्यांना त्यांच्या पद्धतीने राहू द्यावे. पण कायदे करून त्यांना समाजापसून वेगळे करू नये. आणि समलिंगी सबंध असणार्‍या व्यक्तींनी उगीचच "प्राऊड टु बी गे " वगैरे फलक झळकावून आपल्या लैगिकतेचे प्रदर्शन करू नये. तुमच्या प्रवृत्ती निसर्गदत्त आणि सहज आहेत असे तुम्ही समजताना ना ? मग त्या तशाच स्विकारा. म्हणजे आपल्या वेगळे असण्याचे जाहीर प्रदर्शन करायचे आणि मग समाज आम्हाला वेगळे समजतो म्हणून दूषणे द्यायची.. याला काय अर्थ आहे? (अवांतर : हा कायदा केला तरी अंमलात कसा आणणार? म्हणजे कुणीतरी तक्रार करायला हवी ना? )
  • Log in or register to post comments

Homosexuality is biologically

खटासि खट
गुरुवार, 12/12/2013 - 11:49 नवीन
Homosexuality is biologically natural, not deviant. "Gay rights" are not "special" rights. They are human rights. "Gay rights" are not now being "granted." Instead, they are no longer -- or should no longer be -- being taken away. Homosexuals are humans. So, naturally, they deserve all the same human rights that heterosexuals do, including the rights to employment, housing, marriage, hospital visits, and inheritance. Without discrimination. http://www.standard.net/stories/2013/03/22/homosexuality-biologically-natural-not-deviant ( गेल्या काही अनुभवातून आपण जी बाजू मांडतो आहोत त्यापैकी आपण एक आहोत असं नाही हे आवर्जून सांगावे असं वाटू लागलेलं आहे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

समलिंगी संबंध मला नैसर्गिक/

मारवा
गुरुवार, 12/12/2013 - 18:04 नवीन
समलिंगी संबंध मला नैसर्गिक/ नॉर्मल आहेत असे वाटत नाही. (कदाचित माझे या संदर्भातील ज्ञान अती तोकडे असल्यामुळे असेल) There is almost unanimous medical and psychiatric opinion that homosexuality is not a disease or a disorder and is just another expression of human sexuality. Homosexuality was removed from the Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders (DSM) in 1973 after reviewing evidence that homosexuality is not a mental disorder. In 1992, the World Health Organisation removed homosexuality from its list of mental illnesses in the International Classification of Diseases (ICD 10). Guidelines of the ICD 10 reads: “disorders of sexual preference are clearly differentiated from disorders of gender identity and homosexuality in itself is no longer included as a category.” According to the Amicus brief filed in 2002 by the American Psychiatric Association before the United States Supreme Court in the case of Lawrence v. Texas: “According to current scientific and professional understanding, however, the core feelings and attractions that form the basis for adult sexual orientation typically emerge between middle childhood and early adolescence. Moreover, these patterns of sexual attraction generally arise without any prior sexual experience.” [page 7 of Amicus brief] Thus, homosexuality is not a disease or mental illness that needs to be, or can be, 'cured' or 'altered', it is just another expression of human sexuality.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

हुम्म्म्म

इरसाल
गुरुवार, 12/12/2013 - 13:27 नवीन
काय बोलणार आता ? Image removed.
  • Log in or register to post comments

अतिशय योग्य निर्णय !!!

मंदार कात्रे
गुरुवार, 12/12/2013 - 15:19 नवीन
समलैंगिकतेला गुन्हा ठरविण्याच्या संदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णया बद्दल न्यायालयाचे हार्दिक अभिनन्दन ! अतिशय योग्य निर्णय !!!
  • Log in or register to post comments

जस्ट नाऊ फ्रॉम फेसबुक

सुहास..
गुरुवार, 12/12/2013 - 16:56 नवीन
जस्ट नाऊ फ्रॉम फेसबुक समलैंगिकताना कळवळा वाला ,बळेच जास्ती सुधरेलपणना आव आणि राहीनात .. जर समजा यासना भाऊ ,बहीण.पोऱ्या,पोर ,बाप नी समलिंगी लफडा कयात ते यासले खपयी का ??
  • Log in or register to post comments

+५००

Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 12/12/2013 - 17:28 नवीन
+५००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

वं तेनी बही

इरसाल
गुरुवार, 12/12/2013 - 21:35 नवीन
कसा दिधा वासुभौ, नवं काही करी र्‍हायनु असं दाखाडाले ह्या लोके तठे तेस्ले सपोर्ट करी र्‍हायनात. पन तेस्नावर वखत पडु द्या देखा कस मांघे मिरच्या बयतस त्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

मृगनयनी च्या मताशी सहमत अहे.

म्हैस
गुरुवार, 12/12/2013 - 17:24 नवीन
मृगनयनी च्या मताशी सहमत अहे. खरं तर समलैंगिक म्हणून कोणी जन्माला येत ह्याला काही शास्त्रीय पुरावा आहे का? आणि हे फॅड आत्ताच का आलंय? उगीच सीनेमा मध्ये बघून , काहीतरी विकृत पुस्तके वाचून , इंटरनेट वर बीभत्स काहीतरी बघून त्यातला एखादा जरी गुण आपल्याशी जुळला कि आपण समलैंगिक आहोत अशी धारणा करून घेणारे लोक अहेत. लाखो वर्षांपासून मानवजात पृथ्वीवर आहे . पण हि थेरं आत्ताच्या काही वर्षातच का सुरु झाली आहेत? स्त्री आणि पुरुष अश्या २ जाती का बनवल्या गेल्या आहेत? हि तर निसर्गात प्रचंड ढवळा ढवळ झाली . तेव्हा असा गुन्हा करणार्यांना शिक्षा होणं बरोबर अहे. ह्या लोकांना नसतात काही कामं . मग असं काहीतरी सुचतं . म्हणतात न रिकामं मन , सैतानाचं घर. म्हणूनच समलैंगिकतेच्या नावाखाली असले सैतानी विचार सुचतात . मला वाटतं हि खचितच विकृती आहे आणि अश्या लोकांना मानसोपचार तज्ञांकडून योग्य उपचार मिळाले . त्यांचं योग्य councelling झालं तर त्यांची हि विकृती जावू शकते .
  • Log in or register to post comments

कृपया वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या तज्ञांवर तरी भरवसा ठेवा

मारवा
गुरुवार, 12/12/2013 - 18:10 नवीन
मला वाटतं हि खचितच विकृती आहे आणि अश्या लोकांना मानसोपचार तज्ञांकडून योग्य उपचार मिळाले . त्यांचं योग्य councelling झालं तर त्यांची हि विकृती जावू शकते . There is almost unanimous medical and psychiatric opinion that homosexuality is not a disease or a disorder and is just another expression of human sexuality. Homosexuality was removed from the Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders (DSM) in 1973 after reviewing evidence that homosexuality is not a mental disorder. In 1992, the World Health Organisation removed homosexuality from its list of mental illnesses in the International Classification of Diseases (ICD 10). Guidelines of the ICD 10 reads: “disorders of sexual preference are clearly differentiated from disorders of gender identity and homosexuality in itself is no longer included as a category.” According to the Amicus brief filed in 2002 by the American Psychiatric Association before the United States Supreme Court in the case of Lawrence v. Texas: “According to current scientific and professional understanding, however, the core feelings and attractions that form the basis for adult sexual orientation typically emerge between middle childhood and early adolescence. Moreover, these patterns of sexual attraction generally arise without any prior sexual experience.” [page 7 of Amicus brief] Thus, homosexuality is not a disease or mental illness that needs to be, or can be, 'cured' or 'altered', it is just another expression of human sexuality.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

अतिशय योग्य निर्णय..स्वागत

Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 12/12/2013 - 17:35 नवीन
अतिशय योग्य निर्णय..स्वागत आहे या निर्णयाच. आता मिपावर पण गे,लेस्बिअन परेड निघेल की काय याची भिती वाटायला लागली आहे.
  • Log in or register to post comments

९५% लोक वागतात त्यापेक्षा

म्हैस
गुरुवार, 12/12/2013 - 17:57 नवीन
९५% लोक वागतात त्यापेक्षा वेगळं, याला अनैसर्गिक म्हटलं जातं.
मुळीच नाही . एखादा कुणी काही वेगळा केला जे समाज्याच्या हिताचं, इतरांचं ध्यान वाढवणार , इतरांचं जीवन सुखी करणार असेल तर सगळे त्याचा उदो उदोच करतात . शास्त्रज्ञ , संत , उद्योजक हे ह्या ९५% टक्क्यांच्या बाहेर जावून काही करतात म्हणूनच ते तसे असतात
निसर्गाने प्रजननक्षम बनवून देखील ब्रम्हचारी व्यक्ती प्रजनन करत नाहीत. हे अनैसर्गिक वाटत नाही का? ब्रम्हचर्य ही देखील मानसिक विकृती म्हणावी का?
निसर्गाने हाथ , पाय, दात देवून देखील दिसेल त्याला बुक्क्या मारत, लाथा घालत, चावत न सुटणे हे अनैसर्गिक वाटत नाही का ……… असंच म्हणण्यासारख आहे . दिलेल्या गोष्टीचा वापर करणे , न करणे का व्यैयक्तिक प्रश्न अहे. त्याचा चुकीचा वापर होतो तेव्हा तो सामाजिक प्रश्न होतो
  • Log in or register to post comments

भारताप्रमाणे मागासलेल्या ऑस्ट्रेलिया समलिंगी विवाह

वेताळ
गुरुवार, 12/12/2013 - 18:01 नवीन
बेकायदेशिर ठरवले गेले आहेत, मग आता?
  • Log in or register to post comments

ह्म्म्म !!

सूड
गुरुवार, 12/12/2013 - 18:53 नवीन
चाललेली चर्चा म्हणजे कोणाच्या म्हशी नि कोणाक उठाबशी !!
  • Log in or register to post comments

+१

प्यारे१
गुरुवार, 12/12/2013 - 19:09 नवीन
+१ अगदी अगदी! =)) तावातावाने (म्हणजे ताव(इथे फूल्स कॅप कागद अपेक्षित ) भरभरुन) चर्चा करणारे मिपाकर पाहून अम्मळ 'नैसर्गिक' मौज वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आपल्या म्हशी!

साती
गुरुवार, 12/12/2013 - 20:35 नवीन
नसती उठाठेव ही मुळीच नाही. हळुहळू आपली मुलेही सेक्श्युअली अवेअर होणार आहेत. अश्यावेळी जर होमो इज ऑल्सो अ नॉर्मल वे ऑफ लिविंग हे त्यांच्या कानीकपाळि सतत आदळलं गेलं तर चुकून होणारी पर्वर्जन्स, पौगंडावस्थेतील लैंगिक साहसे यांनाच ते नॉर्मल समजतील आणि आयुष्यातल्या एका मोठ्या सुखाला मुकतील अशी सार्थ भिती मला वाटते. हे होऊ नये म्हणून तरी समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता मिळू नये असे मला वाटते. पॉलिटिकली करेक्ट रहावे किंवा आयसीडीमधून समलैंगिकता काढून टाकलीय याकरिता माझे वैयक्तिक मत काय आहे याची चर्चा करणे चुकीचे ठरू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

डॉक पौगंडावस्थेत ९०%

मृत्युन्जय
Fri, 12/13/2013 - 11:45 नवीन
डॉक पौगंडावस्थेत ९०% मुलामुलींच्या मनात कधी ना कधी समलैंगिक व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटते हे खरे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

सगळं मान्य.

सूड
Fri, 12/13/2013 - 14:49 नवीन
>>हळुहळू आपली मुलेही सेक्श्युअली अवेअर होणार आहेत. अश्यावेळी जर होमो इज ऑल्सो अ नॉर्मल वे ऑफ लिविंग हे त्यांच्या कानीकपाळि सतत आदळलं गेलं तर चुकून होणारी पर्वर्जन्स, पौगंडावस्थेतील लैंगिक साहसे यांनाच ते नॉर्मल समजतील आणि आयुष्यातल्या एका मोठ्या सुखाला मुकतील अशी सार्थ भिती मला वाटते. सगळं मान्य. आमच्या कॉलेजात सेक्स एज्युकेशनवर दोन दिवसांचा सेमिनार झाला होता. (आता सेक्स एज्युकेशन म्हटल्यावर लगेच भुवया उंचावतील. सेक्स एज्युकेशन म्हणजे फक्त स्त्रीपुरुष संबंध नव्हे तर अगदी बायकांची मासिक पाळी म्हणजे काय, त्या दिवसात त्यांना किती त्रास होतो इथपासून ते मूल जन्माला देताना बाईला किती त्रास सोसावा लागतो इथवर सगळं व्याख्यात्याने सांगितलं. शेवटी हेही म्हणाला की तुम्हाला जन्म देताना तुमच्या आईनेही हा त्रास भोगलेला आहे, तेव्हा तिचा किती आदर राखायचा ते तुम्हीच ठरवा. घरात आई असेल, बहीण असेल महिन्यात ठराविक दिवशी ती चिडचीड करताना दिसली तर तिचा प्रॉब्लेम काय आहे ते समजून घ्या. ह्या गोष्टी त्या तुम्हाला सांगू शकत नसतील, समजून घेणं तुमचं काम आहे. हे इतक्यासाठी लिहावं लागलं की सेक्स एज्युकेशन म्हटलं की "लग्नानंतर पहिल्या रात्री आणि त्यानंतर काय करायचं हेच शिकवत असणार" किंवा "या गोष्टी शिकवायची गरज नसते " असा सूर काढणारे काही महाभाग आहेत.) तर आता मूळ मुद्दा, या व्याख्यात्यानेही आम्हाला समलिंगी संबंध हे नैसर्गिकच असतात त्यामुळे त्यात वावगं काहीच नाही असं सांगितलं होतं. त्यावरुन आमची झालेली धारणा अशी की हे शाकाहार-मांसाहाराइतकं सहज असावं. काही लोकांना प्राणी हे अन्न म्हणून खाणं पटत नाही ते शाकाहारी असतात आणि जे चवीनं खातात ते मांसाहारी. त्यामुळे उद्या कोणीही मला तो/ती समलिंगी असल्याचं सांगितलं तर थोडासा धक्का बसेल पण त्या व्यक्तीला मी लगेच बाजूला काढणार नाही. (निदान अजून तरी असं वाटतंय.) माझा मुद्दा हा होता की इथे काथ्याकूट करुन काय निष्पन्न!! मुळात या विषयातल्या जाणकारांतच इतके मतभेद असतील तर आमच्यासारख्या सामान्यांनी तो मुद्दा उगाच का चघळत बसावं. कोर्टाने निर्णय दिला म्हणून लगेच काही आभाळ कोसळलेलं नाहीये. ज्यांना या पद्धतीने आनंद घ्यायचा असतील ते घेतीलच. आपण इथे काथ्याकूट करत बसण्यात अर्थ काय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

+११११

प्यारे१
Fri, 12/13/2013 - 15:10 नवीन
+११११ नेमकं. लाईक्ड रे सूडकेश्वर. 'बाऊ' केला जातोय दोन्ही बाजूंनी तो नसावा एवढंच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

+१

मालोजीराव
Fri, 12/13/2013 - 19:13 नवीन
'बाऊ' केला जातोय दोन्ही बाजूंनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

+१००००

शिद
Fri, 12/13/2013 - 15:13 नवीन
मुळात या विषयातल्या जाणकारांतच इतके मतभेद असतील तर आमच्यासारख्या सामान्यांनी तो मुद्दा उगाच का चघळत बसावं. कोर्टाने निर्णय दिला म्हणून लगेच काही आभाळ कोसळलेलं नाहीये. ज्यांना या पद्धतीने आनंद घ्यायचा असतील ते घेतीलच. आपण इथे काथ्याकूट करत बसण्यात अर्थ काय !!
नाहीतर काय? फुकटच्या वांझोट्या चर्चा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

+१००

अर्धवटराव
Sat, 12/14/2013 - 02:27 नवीन
माणसाची (किंवा सजीवाची म्हणुया) कामेच्छा इतकी जबरदस्त पॉवरफुल्ल आहे कि कुठल्याहि कायद्याने, नितीनियमाने, सामाजीक संकेताने वा धार्मीक कर्मकांडाने तिला थोपवता येत नाहि. येत्या काहि वर्षात मेनी-टु-मेनी असे लैंगीक संबंध समाजात प्रस्थापीत झालेले असतील; मग त्यात वैवाहीक, विवाहबाह्य, समलिंगी, विषमलिंगी, इलेक्ट्रोनीक, बायो-मेकॅनीकल, कदाचीत मनुष्येतर प्राणी हे सर्व आलं. कुणी कितिही काथ्या कुटला तरिही हे होणारच. त्यातुन काहि दु:ष्परिणाम समोर आले आणि ते काहि जणांना उमजले तर तेव्हढ्यापुरतं एक नवीन प्रिकॉशनरी पद्धत माणुस विकसीत करेल. मनुष्यप्राण्याची हौस.... बाकि काहि नाहि. अवांतरः पण याबद्द्ल काथ्याकुट करण्यात काय अर्थ असं म्हणु नका राव. मनोरंजनाचा एव्हढा मोठा खजीना अन्यथा कुठे उपलब्ध होणार ? हुषारी आणि शहाणपण, नसलेली हुषारी आणि नसलेलं शहाणपण, काव्य-शास्त्र-पुराण-विज्ञान-कला-संस्कृती-हटवादीपणा-बुद्ध्यांक-हॅप्पी बड्डे केक-अ/नसलेली अक्क्ल काढणे... आणि काय काय वापरलेली भेळ अन्यथा कुठे चाखायला मिळेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

म्हणजे माणसाची वादविवादेच्छा

कवितानागेश
Sat, 12/14/2013 - 12:35 नवीन
म्हणजे माणसाची वादविवादेच्छा जास्त पॉवरफुल आहे म्हणायची.. :P चालुद्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अर्र गिरजाप्रसादभाऊ ते

अभ्या..
Sat, 12/14/2013 - 13:32 नवीन
अर्र गिरजाप्रसादभाऊ ते वैचारिक मैथुनाचा संदर्भ आत्ता लागला बघा ;-) . . बाकी मोउतै तुमचे हे गुलाबी मार्जारमुख अन पाभेंचा निळ्वर्तुळाकार अगदी गर्दित टांगा उठून दिसावा तसे दिसतात प्रतिसादाच्या गर्दित. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

+१

सौंदाळा
Fri, 12/13/2013 - 15:28 नवीन
+१ याच आशयाचे लिहायचे होते पण कोणत्या शब्दात लिहावे समजत नव्हते. तुम्ही अगदी नेमक्या शब्दात सांगितले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

.

उद्दाम
गुरुवार, 12/12/2013 - 19:14 नवीन
पण समलिंगी माणसाला तुरुंगात घालून काय साध्य होणार? तसेही तुरुंगातील पब्लिकही समलिंगीच बनलेलं असतं. म्हणजे १० वर्षे याला तुरुंगात घातलं तर हा काय तिथे ब्रह्मचर्य सत्य अस्तेय म्हणत बसेल का? तिथेही तो तेच करणार.. मग बाहेर त्याचं तो काय करतो ते त्याला करु द्यावं. ... हेच उत्तम नै का? :)
  • Log in or register to post comments

हाय रे कर्मा!

स्टुपिड
गुरुवार, 12/12/2013 - 20:55 नवीन
सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय, चर्चा काय! आग रामेश्वरी अन बंब सोमेश्वरी असला प्रकार! अरे काय चाल्लंय काय! तीन तीन डॉक्टर लोक काय सांगतात ते निदान ऐकून समजून तरी घ्यायचा प्रयत्न करा!!
  • Log in or register to post comments

स्वैराचार

काळा पहाड
Fri, 12/13/2013 - 00:38 नवीन
स्वैराचार
एक डॉक्टर असून तुमचं या बाबतीत असं मत असेल तर आमच्या सारख्या सामान्यांची काय कथा. भारताला खरंच जगातल्या शास्त्रीय संशोधनाचा अभ्यास करण्याची गरज आहे. बाय द वे, संस्कारांबद्दल खालील व्याख्या वाचली: 'Sanskar' is a process, which transforms a person into an ideal & outstanding personality by eradicating/controlling the negative mental tendencies existing in him and by inculcating human values & qualities to make him more dynamic, discreet, duty conscious and responsible towards himself as well as family and the society. सोसायटी ही फक्त तुमच्या विचारांच्या मनाच्या माणसांची बनत नाही. त्यात वेगवेगळ्या मतप्रवाहाचे लोक सुद्धा असतात. म्हणून फक्त माझेच ते संस्कार आणि इतरांचे ते स्वैराचार हा हट्टाग्रह झाला. समाजातल्या डॉक्टर, शिक्षक, वकील अशा लोकांनी समाज प्रबोधनात पुढे असण्याची गरज असते. आपल्या पूर्वाग्रहांच्या ठिसूळ पायावर तर्कशून्य व शास्त्रीय कसोटीवर न टिकणारा युक्तीवाद करण्याची नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

शब्दांबद्दल माफी

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 12/13/2013 - 03:28 नवीन
शब्दांबद्दल माफी मागण्यापेक्षा या विषयाचा अभ्यास वाढवून विधानं केलीत तर बरं होईल. वैद्यकाचा अभ्यास करून, त्याचा व्यवसाय करणाऱ्यांनी बाळगलेली अंधश्रद्धा ("स्वैराचार", "औषधाची गरज") पाहून जास्त त्रास होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

आदीती ताई....

बाबा पाटील
Fri, 12/13/2013 - 08:24 नवीन
माफी हा शब्द फक्त मी वापरलेल्या शब्दांबद्दल होता,मताबाबात नाही. जे वापरले ते श्ब्द अतिशय जाणिवपुर्वक वापरले होते कारण मागच्या आठ दहा वर्षात जो काही वैद्यकिय व्यवसाय करत आहे तो आयुर्वेदाचा या मध्ये सेक्स मेडीसिन किंवा लैंगिक समस्यांवर उपचार करण्यास जे रुग्न येतात त्यात एकुन रुग्नांच्या सरासरी ४० टक्के प्रमाण असते.आनी त्यातल्या ६० टक्के रुग्नांना या खुळचट कल्पनांपाइ फक्त योग्य सल्ल्याची गरज असते. दुर्देवाने मागच्याच आठवड्यात असेच एक तरुण जोडपे आले होते लग्नाला सहाच महिने झालेले,त्यातला पुरुषाला हाच प्रॉब्लेम होता जवळ जवळ दोन तास त्याच्याशी सगळ्या गोष्टी समजाउन सांगत होतो.त्याच्यासाठी उपचार ही देता आले असते,पण मध्येच मुलाच्या आईने अत्यंत वाईटपद्धतीने त्या बिचार्‍य पोरीवरच आक्षेप घेतले,शेवट २३-२४ वर्षाची पोर लग्नाला सहा महिने होउन गेलेत अश्यापद्धतीने जर संसार असेल तर यातुन काय निश्पन्न होणार.ही एक केस नाही कित्येक संसार यातुन बर्बाद होताना डोळ्या समोर पाहिले आहेत.मेणबत्या पेटवुन बोंबा मारण फार सोप असत हो प्रत्यक्षात अश्या केसेस ज्यावेळेस हँडल कराव्या लागतात ना कळत आपले भारतीय संस्कार आणी स्वैराचार यातला फरक काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

>>>मेणबत्या पेटवुन बोंबा मारण

प्यारे१
Fri, 12/13/2013 - 15:14 नवीन
>>>मेणबत्या पेटवुन बोंबा मारण फार सोप असत हो प्रत्यक्षात अश्या केसेस ज्यावेळेस हँडल कराव्या लागतात ना कळत आपले भारतीय संस्कार आणी स्वैराचार यातला फरक काय. खळ्ळ खट्याक! -बाबा पाटील फॅन फाऊंडेशन अध्यक्ष प्यारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

विषय काय, प्रतिसाद काय?

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 12/13/2013 - 20:25 नवीन
विषय काय, प्रतिसाद काय? तुमच्या कोणा एका गिऱ्हाईकाला संभोग कसा करावा हे समजत नाही म्हणून समलैंगिक जन्माला आलेल्या भलत्याच कोणी लोकांनी त्यांच्या मेंदूच्या वायरींगप्रमाणे वागू नये? आणि भारतीय संस्कार म्हणजे नक्की काय? मनुस्मृति का कामसूत्र? मनुस्मृतिमधे समलैंगिकतेला शिक्षा दिलेली आहे. कामसूत्र, मध्य भारतातली १० व्या, १२ व्या शतकात बनवलेली अनेक शिल्पं, जुनी चित्रं यांमधे समलैंगिकता चितारलेली आहे. गिऱ्हाईकांमधे तुम्हाला दिसलेले पॅटर्न्स शास्त्र म्हणून लोकांनी स्वीकारावेत अशी इच्छा असेल तर ते शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडा. तुमच्या विषयात जी काही जर्नल्स प्रसिद्ध होत असतील, लॅन्सेटसारखी, ती वाचा. Peer reviewed journals मध्ये भावनांना हात घालून आणि संस्कृतीच्या आणाभाका देऊन विज्ञानाच्या नावाखाली मनुवाद आणि अंधश्रद्धा पसरवत नाहीत. मेणबत्त्या लावून भावना प्रकट करणाऱ्यांना कमी लेखण्याआधी थोडा विचार करा. अहिंसेने लढा चालवणारे नेल्सन मंडेला ५-६ दिवसांपूर्वी गेले, जगभरातून त्यांच्या मृत्युबद्दल दुःख व्यक्त झालं. खळ्ळखटॅकला मराठी "संस्कृती" बनवणारे नेते गेले तेव्हा जगभरात किती देशांमधे ही बातमी आली? मेणबत्ती समुदायला नावं ठेवणाऱ्या सुशिक्षित लोकांकडून विज्ञान, वैज्ञानिक विचारसरणी आणि तर्काची होणारी कत्तल अपेक्षित म्हणावी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

प्रश्न व्यवहारात काय घडत त्याचा आहे.

बाबा पाटील
Fri, 12/13/2013 - 23:40 नवीन
तो एक रुग्न तसा असा विषयच नाही असे कित्येक आहेत्,दुर्देवाने त्याचे प्रमाण दर वर्षी वाढतच आहे.इकडुन तिकडुन सर्च करुन लेक्चर झाडण आणी आपण शहाणे आहोत असे दाखवण वेगळ आणी प्रत्यक्षात असे रोगी हाताळण वेगळ्, हे एकतर खुपच शांत असतात किंवा प्रचंड आक्रास्ताळे.या गोष्ठींना आळा घालण केवळ आणी केवळ त्यांना योग्य समोपदेशन करुन्,त्याचबरोबर काही सायकॅट्रीस्ट व एन्डोक्रॅनोलोजिस्ट काही आयुर्वेदिक औषधे यानेच शक्य होत आहे,सध्या आम्ही काही मित्र अश्या रुग्नांवर संयुक्त उपचार करत आहोत आणी त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. पण तुमच्या सारखे जर काही विकृतीलाच प्रकृती म्हणु लागले तर्,शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न ज्याचे त्याचे स्वातंत्र्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

.इकडुन तिकडुन सर्च करुन ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 12/14/2013 - 05:19 नवीन
.इकडुन तिकडुन सर्च करुन ...
तुम्ही कुठून शिकलात मग? तुम्ही हे सगळं संशोधन स्वतः केलेलं आहे असा तुमचा दावा आहे का? बघू या तुमचे रीसर्च पेपर्स. तुम्हाला समलैंगिकता वेगळी आणि हेटरो लोकांच्या लैंगिक अडचणी हे वेगळे मुद्दे आहेत हेच समजलेलं नाहीये. अजून काय बोलणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

.

उद्दाम
Sat, 12/14/2013 - 10:58 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

समलैंगिकतेला संस्कृती अथवा

प्यारे१
Sat, 12/14/2013 - 00:40 नवीन
समलैंगिकतेला संस्कृती अथवा किमान समाजात जुन्या काळापासून आहे म्हणून प्रवृत्ती म्हणून सिद्ध करु पाहणारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! मनुस्मृति कुणी नि कशी नि कधी राबवली त्याचा संदर्भ द्याल काय? कामसूत्रामध्ये दिलेलं आहे म्हणून ते खरंच आहे (सगळे लोक झाडून असं करत होते असं) असं असतं का? ती चित्रं का नि कधी नि काय कारणानं आकारास आली ह्याबाबत काय अभ्यास? माणसातली समलैंगिकता नैसर्गिक नि मुख्य म्ह्णजे जन्मजात असते असा काही अभ्यास झालेला आहे का? काय विदा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

एखादी प्रवृत्ती फक्त तुलनेने

बॅटमॅन
Sat, 12/14/2013 - 01:17 नवीन
एखादी प्रवृत्ती फक्त तुलनेने कमी लोकांत आढळते म्हणून ती विकृती होते काय? अ‍ॅबसेन्स ऑफ प्रूफ हा प्रूफ ऑफ अ‍ॅबसेन्स होतो काय? एखादी गोष्ट सरसकट असली तर प्रवृत्ती असते अन म्हणून अ‍ॅक्सेप्टेबल असते काय- उदा. बायकांना मारहाण वगैरे?
ती चित्रं का नि कधी नि काय कारणानं आकारास आली ह्याबाबत काय अभ्यास?
तुम्हीच सांगा काय अभ्यास आहे तो. समलैंगि कता ही विकृती आहे म्हणून कंठशोष करणार्‍यांवरच बर्डन ऑफ प्रूफ पडते तसे सिद्ध करण्याचे.
माणसातली समलैंगिकता नैसर्गिक नि मुख्य म्ह्णजे जन्मजात असते असा काही अभ्यास झालेला आहे का? काय विदा?
किमान एक विदाबिंदू मिपावरच आहे, तो सोयीस्करपणे दुर्लक्षित करून बिनबुडाची तर्कटे मांडत बसल्यास वाढदिवसाचा केक कुणाला आणावा ते दिसतंच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

लिंक : http://en.wikipedia.org/wiki/Khajuraho_Group_of_Monuments

प्यारे१
Sat, 12/14/2013 - 02:16 नवीन
While the sexual nature of these carvings have caused the site to be referred to as the Kamasutra temple, they do not illustrate the meticulously described positions. Neither do they express the philosophy of Vatsyayana's famous sutra. As "a strange union of Tantrism and fertility motifs, with a heavy dose of magic" they belief a document which focuses on pleasure rather than procreation. That is, fertility is moot.[citation needed] The strategically placed sculptures are "symbolical-magical diagrams, or yantras" designed to appease malevolent spirits. This alamkara (ornamentation) expresses sophisticated artistic transcendence over the natural; sexual images imply a virile, thus powerful, ruler.[7] ह्यावर आव्हानं देता येणार आहेत, ही अधिकृत माहिती नाही हे देखील मान्य. पण किमान एवढं तरी दिसतं की समलैंगिकता कधीही सामान्यपणं (कॉमन प्रॅक्टीस) केली गेलेली गोष्ट नव्हे. ती जाणीवपूर्वक डेव्हलप केली गेलेली गोष्ट आहे. ह्यात मिपावरच्या व्यक्तीचा विषय म्हणाल तर जन्मजात जाणवणरी गोष्ट नव्हे ती जशी मिसळपाववर 'बिंबवली' जात आहे. नैसर्गिकच्या आपल्या व्याख्येप्रमाणे असेल देखील नैसर्गिक पण जन्मजात खचित नाही. डावरे लोकांप्रमाणे वगैरे. बाकी माणसानं आपल्या बुद्धीनं अनेक बदल करुन घेतले आहेत. अनेक न जमणार्‍या गोष्टी इच्छाशक्तीच्या जोरावर केलेल्या आहेत. नैसर्गिक गोष्टींना स्ट्रीमलाईन केलेलं आहे. समलैंगिकतेबाबत त्या गोष्टीचा त्रास होत नसेल तर चालू द्या की! (मी वर कुठंही विकृती म्हटलेलं नाहीये. माझ्या मुखी तो शब्द घालू नये) बाकी समलैंगिकता हेच जीवन असं म्हणालात तरी आमची काहीही हरकत नाही. पेंड्युलमच्या एका झोल्याच्या विरोधात आपण दुसर्‍या बाजूला तर स्वीकारत नाही आहोत ना हे पाहिलं की झालं. डॉक्टर म्हणून बाबा पाटलांना काही अनुभव आलेले असतील त्यांनी तसे मांडले असावेत. ते व्यक्तीशः पटलेले आहेत. स्वगतः जिकडची धुणी तिकडंच धुणे हा कार्यक्रम खुद्द मालकिण बाईने 'कांदा करेल वांदा' नं खोटा पाडलेला दिसला. नेहमीचं सोयिस्कर धोरण तिथं देखील दिसलंच. तत्त्वतः सारखंच! =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

शेंडा ना बुडखा

बॅटमॅन
Sat, 12/14/2013 - 03:00 नवीन
ह्यावर आव्हानं देता येणार आहेत, ही अधिकृत माहिती नाही हे देखील मान्य. पण किमान एवढं तरी दिसतं की समलैंगिकता कधीही सामान्यपणं (कॉमन प्रॅक्टीस) केली गेलेली गोष्ट नव्हे. ती जाणीवपूर्वक डेव्हलप केली गेलेली गोष्ट आहे.
खजुराहोची मंदिरे तंत्रमार्गातील सिंबॉलिझमने प्रभावित आहेत यावरून समलैंगिकता अनैसर्गिक आहे हे कसे ठरवले? हे म्हणजे गोठ्यातल्या गाईला कालवड झाली म्हणून आज मी डब्यात पोहे आणले म्हणण्यापैकी आहे.अन वात्स्यायन हे भारतीय कामशास्त्रातले एकमेव नाव असे समजणार्‍यांनाही एक केक भेट. एक खजुराहोच्या उदाहरणावरून पूर्ण जगावर निष्कर्ष काढू पाहणे, मधल्या कसल्याही लिंकचा विचार न करणे हे ही लौकिकाला साजेसंच आहे.
ह्यात मिपावरच्या व्यक्तीचा विषय म्हणाल तर जन्मजात जाणवणरी गोष्ट नव्हे ती जशी मिसळपाववर 'बिंबवली' जात आहे. नैसर्गिकच्या आपल्या व्याख्येप्रमाणे असेल देखील नैसर्गिक पण जन्मजात खचित नाही. डावरे लोकांप्रमाणे वगैरे.
पुन्हा तेच! जन्मजात गोष्ट बर्‍याच वर्षांनी समजणे आणि जन्मतः समजणे यात गुणात्मक फरक नक्की काय आहे? समजा मला क्लासिकल म्यूझिक आवडते हे क्लासिकल म्यूझिक ऐकल्याशिवाञ समजले नाही तर त्यात अनैसर्गिक काय आहे? बेसिकचा भयंकरच लोच्या आहे.
बाकी माणसानं आपल्या बुद्धीनं अनेक बदल करुन घेतले आहेत. अनेक न जमणार्‍या गोष्टी इच्छाशक्तीच्या जोरावर केलेल्या आहेत. नैसर्गिक गोष्टींना स्ट्रीमलाईन केलेलं आहे. समलैंगिकतेबाबत त्या गोष्टीचा त्रास होत नसेल तर चालू द्या की! (मी वर कुठंही विकृती म्हटलेलं नाहीये. माझ्या मुखी तो शब्द घालू नये)
हॅ हॅ हॅ. माहिती चेक करायचा आळस आहे की धादांत असत्य असले तरी माझेच म्हणणे खरे म्हणून दामटायचे आहे? जर समलैंगिकता हे मानवी "इन्व्हेन्शन" असेल- तुमच्याच भाषेत बोलायचे झाले तर- तर मग मानवेतर प्राण्यांत असा बिहेवियर दिसतो त्याची संगती आपली नैसर्गिक बुद्धी काय लावणारे जरा कळूद्या. माहिती चेक कराञचा वकूब नसणे हे जरा नवीनच आहे माझ्यासाठी. http://en.wikipedia.org/wiki/Homosexual_behavior_in_animals
बाकी समलैंगिकता हेच जीवन असं म्हणालात तरी आमची काहीही हरकत नाही.
आपला सल्ला अन प्रवचने आपल्याकडेच ठेवावीत, अन्य लोकांना त्याची गरज असल्याच्या भ्रमात उपदेश करत फिरू नये.
पेंड्युलमच्या एका झोल्याच्या विरोधात आपण दुसर्‍या बाजूला तर स्वीकारत नाही आहोत ना हे पाहिलं की झालं.
या विधानाला काय शेंडा ना बुडखा. समजा गे-पण हे नैसर्गिक आहे असे म्हटल्यास यातून काय सिद्ध होते? आणि कशाचा स्वीकार अन त्याने नक्की काय आभाळ कोसळणारे? धड विदा नाही अन लॉजिक तर नाहीच नाही. सारासार विचार करता येत असेल तर काही अर्थ आहे चर्चेत, अन्यथा मुक्ताफळ नामक कॅटॅगिरीतच याची जिम्मा होते.
डॉक्टर म्हणून बाबा पाटलांना काही अनुभव आलेले असतील त्यांनी तसे मांडले असावेत. ते व्यक्तीशः पटलेले आहेत.
धनंजय यांचा लेखही मला व्यक्तिशः पटलेला आहे. सो व्हॉट?
स्वगतः जिकडची धुणी तिकडंच धुणे हा कार्यक्रम खुद्द मालकिण बाईने 'कांदा करेल वांदा' नं खोटा पाडलेला दिसला. नेहमीचं सोयिस्कर धोरण तिथं देखील दिसलंच. तत्त्वतः सारखंच!
हॅप्पी बर्थडे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

(No subject)

प्यारे१
Sat, 12/14/2013 - 03:03 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(No subject)

बॅटमॅन
Sat, 12/14/2013 - 03:14 नवीन
*ROFL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बिवेअर!अ‍ॅबसेन्स ऑफ प्रूफ हा

कवितानागेश
Sat, 12/14/2013 - 12:44 नवीन
बिवेअर! अ‍ॅबसेन्स ऑफ प्रूफ हा प्रूफ ऑफ अ‍ॅबसेन्स होतो काय?> हे स्टेट्मेंट कुणालाही कधीही कुठल्याही दिशेने मारता येइल! ;) बाकी चालुद्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा हा हा

बॅटमॅन
Sat, 12/14/2013 - 13:19 नवीन
हा हा हा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

सहमत

मराठी कथालेखक
Sun, 12/15/2013 - 12:44 नवीन
आदिती, तुमची लेखन शैली आवडली.. खळ्ळ खट्याक वाल्यां संस्कृतीरक्षकांना माझाही विरोध आहे. थोडे अवांतर : हे संस्कृतीरक्षक काही वर्षापुर्वी वॅलेंटाईन डे ला तोडफोड करुन संस्कृतीरक्षण करायचे. मग त्यांच्या कळाले की यामुळे त्यांची लोकप्रियता कमी होते आहे , मग त्यांनी ते प्रकार बंद केलेत. एकुणात काय तर त्यांचे संस्कृतीरक्षण वा पुरोगामित्व मतांच्या गणितावर अवलंबून असते, एखाद्या विषयाचा खोलवर अभ्यास वा उहापोह नसतोच कधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ठरवण्याचा अधिकार नक्की कोणाला (आणि कधी ?)

अगोचर
गुरुवार, 12/12/2013 - 21:46 नवीन
काय नैसर्गिक अणि काय नाही ते ठरवण्याची गरज आहे. ते ठरवण्याचा अधिकार नक्की कोणाला ? कुठल्याही प्राण्यानी केलेले कोणतेही कृत्य किंवा कोणताही विचार हा साकल्यानि पाहता निसर्गाचाच भाग आहे. माझे व्यक्तिगत मत असे आहे की हा व्यक्तीस्वातन्त्र्याचा प्रश्न आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात मी नाही, कारण कायदे बनवण्याचे काम संसदेचे आहे, ह्या कायद्यात सुधारणा व्ह्यावी असे वाटते, पण न्यायालयानी त्यात हस्तक्षेप करायला हवा होता की नाही ह्याबद्दल मत देण्याएवढा माझा अभ्यास नाही. ह्या ह्या लेखामधे ब्रिटिश कायद्याचा ह्यासंदर्भातला प्रवास दिला आहे, आपले कायदे सुद्धा कळानुरुप अभ्यासले गेले आणि गरजेनुसार बदलले पाहिजेत. आणि महत्वाचे म्हणजे हा अतिशय कॉण्ग्रेस च्या पथ्यावर पडलेला निर्णय आहे. सध्याची राजकिय परिस्थिती बघून त्यांनीच उद्युक्त केला असावा अशी शंका मला येते. ह्यानी दोन उद्देश सफल होतात - १) निवडणुका आणि त्यात झालेले मतांतर यापासून लोकांचे लक्ष वळवणे. २) अनेक कट्टर हिंदु संस्थांचा (रामदेव बाबा वगैरे) कायमच समलिंगी प्रश्णांना विरोध होता. आणि त्यांचा मोदी आणि भाजपा ला उघड पठिंबा आहे, त्यामुळे राहुल आणि काँग्रेस च्या न्यायालयाविरोधात प्रतिक्रिया लगेच वाचनात आल्या, आणि त्यांना ती मते तरी खेचता येतिल, आणि मोदि / भाजपाला (त्यांचे मत आणि काळाची गरज काहीही असली तरि) सावध प्रतिक्रिया द्यावी लागेल (मी तर अजुन वाचली नाही.. ) कळावे, लोभ असावा.
  • Log in or register to post comments

काय ठरलं मग?

काळा पहाड
गुरुवार, 12/12/2013 - 22:43 नवीन
काय ठरलं मग?
  • Log in or register to post comments

राजकारण - कायदा आणि आडाखे...

विकास
गुरुवार, 12/12/2013 - 22:49 नवीन
वरती काहींच्या प्रतिसादांमध्ये राजकारण्यांसदर्भात लिहीले गेले आहेच. येथे किंचित सविस्तर... भादंवि कलम ३७७ हे जुनाट आहे. नाझ फाउंडेशनच्या अपिलमधे म्हणल्याप्रमाणे, "It is based on Judeo-Christian moral and ethical standards which conceive of sex on purely functional terms, that is, for procreation." तरी देखील त्यात समलिंगी अथवा तत्सम शब्द नाही आहेत. वर इतर प्रतिसादात देखील आले आहेच, ते इतकेच म्हणते: Unnatural offenses.--Whoever voluntarily has carnal intercourse against the order of nature with any man, woman or animal, shall be punished with 1*[imprisonment for life], or with imprisonment of either description for a term which may extend to ten years, and shall also be liable to fine. Explanation.-Penetration is sufficient to constitute the carnal intercourse necessary to the offence described in this section. त्यातून बरेच अर्थ निघतात, पण एखादाच वकील हवा आहे ज्याला इतकेच सिद्ध करायचे आहे की Unnatural offenses म्हणजे काय ते. पण असे गृहीत धरूयात की ते कलम तसेच राहत आहे आणि ते समलिंगींच्या विरोधात आहे. मग नाझ फाउंडेशन अथवा तत्सम इतर सेवाभावी संस्थांना सरकारमान्यता कशी मिळते? ते अधिकृतपणे काम कसे करू शकतात. थोडक्यात हा मुद्दा केवळ या कलमापुरता मर्यादीत नाही. तर त्यातील सर्व कंगोरे वगैरे वन्स फॉर ऑल काढून टाकणे महत्वाचे आहे असे वाटते. सुप्रिम कोर्टाने न्यायपत्रिकेत शेवटी काय म्हणले आहे? While parting with the case, we would like to make it clear that this Court has merely pronounced on the correctness of the view taken by the Delhi High Court on the constitutionality of Section 377 IPC and found that the said section does not suffer from any constitutional infirmity. Notwithstanding this verdict, the competent legislature shall be free to consider the desirability and propriety of deleting Section 377 IPC from the statute book or amend the same as per the suggestion made by the Attorney General. थोडक्यात त्यांना दिल्ली हायकोर्टाने काढलेला अर्थ बरोबर का चूक असे विचारले होते त्यांनी सांगितले तसा अर्थ काढणे चूक आहे पण कायदा बदल्यास योग्य होईल असे देखील त्यांचे मत असावे असे वाटण्यास जागा आहे. आता राजकारणी काय म्हणाले? खटला चालू असताना आरोग्य मंत्रालयाकडून ३७७ नाझ फाउंडेशनच्या बाजूने अधिकृत मत होते तर गृहमंत्रालयाचे मत हे ३७७ आहे तसे ठेवावे असे होते. म्हणूनच आज सुशीलकुमार शिंद्यांचे “We have to abide by the decision” असे आणि इतकेच मत प्रसिद्ध झाले आहे. सोनीया गांधींनी डरकाळी फोडली आहे. राजकारणी (कुठल्याही पक्षाचा/विचाराचा असोत), शिंकला तरी त्यात राजकारण असते. त्यामुळे एरवी गप्प रहाण्यात पंतप्रधानांशी स्पर्धा करणार्‍या सोनीयाजींनी अथवा राहूल गांधींनी आत्ता कळवळून बोलणे यात आश्चर्य काहीच नाही. काँग्रेसचे जयराम रमेश यांच्यासारखे काही मंत्री/नेत्यांनी स्पष्ट शब्दात कोर्टाच्या निर्णयाचा विरोध केला आहे. भाजपा कडून सुषमा स्वराज सोनीया गांधींच्या प्रतिक्रीयेचा संदर्भ घेत म्हणाल्या, ""There is no need to be so disappointed. The Supreme Court has said the government can frame a law, Call an all-party meeting, draft a proposal. Just saying it is unfortunate won't serve any purpose, We will react when we see the government's proposal. We cannot react to the apex court judgment" भाजपाचे राज्यसभेचे खासदार आणि राष्ट्रीय खजीनदार, पियुष गोयल यांनी "There's nothing unnatural in these relationships and I hope the law is amended at the earliest." असे म्हणले आहे. मोदी आणि जेटलींची विधाने अजून तरी दिसलेली नाहीत. समाजवादी, तॄणमूल आणि संयुक्त जनतादल यांना निर्णय योग्य वाटला आहे आणि ते कायदा बदलण्याच्या विरोधात आहेत. आडाखा: भारतीय जनता अजून समलिंगी समाजाबाबत "ओपन माईंडेड" आहे अशातला भाग नाही. त्यात सर्वच राजकीय पक्षांचा मतदार येतो. त्यामुळे काँग्रेसने कितीही डरकाळ्या फोडून आपले लिबरलत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी कायदा व्गैरे बदलण्यास ते संसदेत काही ठोस करतील असे वाटत नाही. नुसताच आवाज करायचा पण काही करायचे कसे नाही हे लोकपाल बिला संदर्भात आत्ता बघणे झाले आहेच आणि अजून्ही बघत आहोतच. त्यामुळे हे फारच सोपे आहे. पण एकंदरीत काँग्रेस नेतृत्व आणि अगदी भाजपा नेतृत्व देखील (इतर पक्षांचे माहीत नाही) समलिंगींना हक्क देण्याच्या विरोधात असतील असे वाटत नाही. तपशील कसा असेल हा अर्थातच मुद्दा आहे/राहील. त्यामुळे मला वाटते की, २०१४च्या निवडणुका होईस्तोवर हे घोंघडे परत एकदा भिजवून सुप्रिम कोर्टात टाकले जाईल, जर योग्य कारणावरून परत कोर्टात गेले आणि सुप्रिम कोर्टाने योग्य निर्णय दिला तर केस-लॉ होईल आणि राजकारण्यांना काही निर्णय न घेता, सुप्रिम कोर्टाची आज्ञा शिरसावंद्य मानतील.
  • Log in or register to post comments

काय फालतूपणा चालवलाय राव.

बॅटमॅन
गुरुवार, 12/12/2013 - 23:38 नवीन
काय फालतूपणा चालवलाय राव. धनंजय यांचा लेख वाचायचे तरी कष्ट घेतलेत का मिपावरच्या डाक्तरांनी? http://www.misalpav.com/node/3827
  • Log in or register to post comments

सहमत

नंदन
Fri, 12/13/2013 - 00:07 नवीन
शिवाय समलैंगिकता इतकी वर्षं नव्हती - पाश्चात्यांच्या प्रभावामुळे सुरू झाली - मुलं टीव्हीवर पाहून समलिंगी बनतील इ. म्हणणार्‍यांनी खजुराहो वा अन्य ठिकाणची शिल्पं किंवा मनुस्मृतीसारख्या ग्रंथांतले उल्लेख पाहिले/वाचले नसावेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नैतर काय! तरी नशीब ते

बॅटमॅन
Fri, 12/13/2013 - 00:12 नवीन
नैतर काय! तरी नशीब ते सेक्शन्स ब्रिटिश आगमनानंतर आले असे कोणी म्हणत नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा