✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

समलैंगिकतेला गुन्हा ठरविण्याच्या संदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णया विषयी आपले काय मत आहे ?

म
मारवा यांनी
Wed, 12/11/2013 - 18:53  ·  लेख
लेख
ताज्या बातमी नुसार सुप्रीम कोर्टाने २००९ मध्ये दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात निकाल दिलेला आहे. या अनुसार आता दोन समलैंगिक व्यक्तीं मधील लैंगिक संबध हे आता कायद्यानुसार कलम ३७७ नुसार हे गुन्हा मानण्यात येतील. आणि या फ़ौजदारी गुन्ह्यानुसार अशा संबध ठेवणारया व्यक्तीला अधिकात अधिक १० वर्षांच्या शिक्षेची कायद्यात तरतुद आहे. या निकाला मुळे अनेक वर्षांपासुन आपल्या मुलभुत मानवी हक्कांसाठी लढा देणारया समलैंगिकाच्या चळवळीला जबर धक्का बसलेला आहे. या निर्णयांवर प्रतिक्रीया देतांना वृंदा करात यांनी असे म्ह्टले आहे की “हा अतिशय चुकीचा निर्णय आहे दोन प्रोढ व्यक्तींनी परस्पर संमतीने केलेल्या संबधाना बेकायदा ठरविणे चुकीचे आहे.” तर बाबा रामदेव यांनी अशी प्रतिक्रीया दिलेली आहे की समलैंगिकता ही मुळात अनैसर्गिक आहे आणि हे फ़क्त एक वाईट व्यसन फ़क्त आहे. शिवाय त्यांनी समलैंगिकांना आपल्या आश्रमात येण्याच निमंत्रण दिलेल आहे आणि अस सांगितले आहे की ते ह्या व्यसनापासुन समलैंगिकांची मुक्ती करुन देउ शकतात. तर एक संवेदनशील विचारी भारतीय नागरीक म्हणुन या सुप्रीम कोर्टाच्या निर्णया कडे आपण कशा रीतीने बघतात ? एकंदरीत समलैंगिकता ही तुम्हाला विकृती वाटते की नाही ? यात समलैंगिकाच्या मुलभुत मानवी हक्कांची पायमल्ली झाली आहे अथवा नाही ? एकुण समाजाला हा निर्णय अधोगती कडे नेणारा आहे की प्रगती कडे? कृपया यावर गंभीर रीत्या मतप्रदर्शन करावे ही अतिशय नम्र विनंती.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
45572 वाचन

💬 प्रतिसाद (205)

प्रतिक्रिया

ह्म्म.. हे खरे आहे. पण यात

ऋषिकेश
गुरुवार, 12/12/2013 - 16:08 नवीन
ह्म्म.. हे खरे आहे. पण यात हार्मोनल घटकांचा मोठा सहभाग आहे असे अनेक तज्ञांचे मत असल्याचे वाचनात येते. किमान, ज्या गोष्टी एखाद्या व्यक्तीला "हेट्रोसेक्स्युअल" करतात (खरेतर ज्यामुळे एखादी व्यक्ती हेट्रोसेक्स्युअल असते) त्याच घटकांचे वेगळेपण दुसर्‍याला होमोसेक्श्युअल करतात (त्याच मुळे दुसरी व्यक्ती होमोसेक्स्युअल असते) इतपत विधान ग्राह्य आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

नाही

साती
गुरुवार, 12/12/2013 - 18:44 नवीन
नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

कदाचित रुग्ण म्हटल्यामुळे

मारवा
गुरुवार, 12/12/2013 - 17:50 नवीन
कदाचित रुग्ण म्हटल्यामुळे आपणास संताप आला असेल पण सध्या असिडीटी किंवा सर्दीचा रुग्ण असतो त्या तर्हेने मी म्हटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सुबोध सर या संदर्भात आपले काय मत आहे ?

मारवा
गुरुवार, 12/12/2013 - 17:58 नवीन
कदाचित रुग्ण म्हटल्यामुळे आपणास संताप आला असेल पण सध्या असिडीटी किंवा सर्दीचा रुग्ण असतो त्या तर्हेने मी म्हटले. या लेखावरील आपले मत वाचावयास आवडेल The American Psychological Association, American Psychiatric Association, and National Association of Social Workers stated in 2006: “ Currently, there is no scientific consensus about the specific factors that cause an individual to become heterosexual, homosexual, or bisexual—including possible biological, psychological, or social effects of the parents' sexual orientation. However, the available evidence indicates that the vast majority of lesbian and gay adults were raised by heterosexual parents and the vast majority of children raised by lesbian and gay parents eventually grow up to be heterosexual. ” The Royal College of Psychiatrists stated in 2007: “ Despite almost a century of psychoanalytic and psychological speculation, there is no substantive evidence to support the suggestion that the nature of parenting or early childhood experiences play any role in the formation of a person's fundamental heterosexual or homosexual orientation. It would appear that sexual orientation is biological in nature, determined by a complex interplay of genetic factors and the early uterine environment. Sexual orientation is therefore not a choice. ” The American Academy of Pediatrics stated in Pediatrics in 2004: “ Sexual orientation probably is not determined by any one factor but by a combination of genetic, hormonal, and environmental influences. In recent decades, biologically based theories have been favored by experts. Although there continues to be controversy and uncertainty as to the genesis of the variety of human sexual orientations, there is no scientific evidence that abnormal parenting, sexual abuse, or other adverse life events influence sexual orientation. Current knowledge suggests that sexual orientation is usually established during early childhood. ”
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मी मूळ काय लिहिले आहे

सुबोध खरे
गुरुवार, 12/12/2013 - 19:30 नवीन
मी मूळ काय लिहिले आहे ते लक्षात न घेता काही लोकांनी गहजब केला. म्हणून ते परत उधृत करीत आहे "तसेच एखादा पुरुष म्हणून जन्माला आला परंतु त्याला इतर पुरुषांचे आकर्षण वाटते हा त्याचा दोष नाही.(तसेच स्त्रियांचे आहे) हा त्याच्या मेंदूचे वायरिंग तसे असल्याने होते.(केमिकल लोच्या सारखे). कदाचित यावर उद्या औषध निघू शकेल.आपण त्यांना समजावून घेणे हे आवश्यक आहे. कायदा केंव्हाच कालबाह्य झाला आहे. आणि तो बदलणे अत्यावश्यक आहेच." उद्या जर मेंदूचे वायरिंग सुधारण्याचे औषध निघाले तर त्या व्यक्तीला रुग्ण मानण्याची तयारी असेल काय? टक्कल पडणे यावरही काही औषधे आहेत आणी ती देणाऱ्या डॉक्टरकडे येणाऱ्या माणसाला आपण रुग्ण नाही तर काय म्हणणार. डावरे पण यात मेंदूमध्ये कोणतीच विकृती नाही. तेंव्हा टक्कल आणी डावरे पण यात गल्लत नको. मनोविकार तज्ञांनी असे म्हटले आहे कि आज उपलब्ध असलेल्या निदानाच्या पद्धतीप्रमाणे अजूनतरी कोणतीही विकृती समलिंगी व्यक्तीमध्ये सापडलेली नाही. म्हणजे पुढे सापडणार नाही असे नव्हे(सापडेल असेही नाही). समलिंगी व्यक्तीना आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर राहण्याचा अधिकार मिळावा असेच मी म्हणतो. पण केवळ रुग्ण म्हटल्यामुळे काही लोकांना राग आला आणी ते अनैसर्गिक पासून कंडोम वापरणे अनैसर्गिक पर्यंत घसरले. नाकाने पाणी पिणे हेही अनैसर्गीकच आहे म्हणून त्याचा इलाज करायला पाहिजे हे चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

सहमत

रामपुरी
Fri, 12/13/2013 - 02:44 नवीन
डॉ. शी नेहेमीप्रमाणे सहमत. यावर जास्त संशोधन होणे गरजेचे आहे आणि डॉ म्हणतात तशी विकॄती सापडलीच तर त्यावर औषध सुद्धा. समलैंगिकांपैकी बरेच जण हे लहान वयात अशा प्रवॄत्तीना बळी पडल्याने किंवा एक फॅड म्हणून किंवा अशाच काही कारणानी समलैंगिक "बनतात" असा एक मुद्दा वाचनात आल्याचे स्मरते. कोठे केंव्हा ते काही केल्या आठवत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

या विषयावर काही ठिकाणच्या

खटासि खट
गुरुवार, 12/12/2013 - 10:50 नवीन
या विषयावर काही ठिकाणच्या चर्चा वाचनात आल्या होत्या याआधीही. एखादी व्यक्ती डावखुरी असते म्हणजे ती रुग्ण असते का ? ती विविधता आहे तसंच समलैंगिकतेबाबत आहे. अमेरिकन तसंच ब्रिटीश मानसोपचार तज्ञांच्या सोसायटीने याबद्दल जाहीर केलेल्या लेखांच्या लिंक्स लगेचच हातासरशी देता येत नसल्याने अधिक भाष्य करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

साहेब असंगत आचरण(DEVIATION)

सुबोध खरे
गुरुवार, 12/12/2013 - 11:02 नवीन
साहेब असंगत आचरण(DEVIATION) आणी विविधता(VARIATION) यात गल्लत होत आहे. माणूस डावरा असतो ते त्याचा उजवा मेंदू जास्त सशक्त असतो म्हणून तसेच दोन्ही मेंदू समान असणारे त्यामुळे दोन्ही हात सारख्याच क्षमतेने वापरणारे सुद्धा आहेत(AMBIDEXTROUS) यात अनैसर्गिक काय आहे? भिन्नलिंगी संभोगातून संतती निर्माण व्हावी हा निसर्गाचा संकेत आहे. समलिंगी संभोगातून काय निष्पन्न होणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

संतती होणं हाच निकष असेल तर

खटासि खट
गुरुवार, 12/12/2013 - 11:09 नवीन
संतती होणं हाच निकष असेल तर ज्या भिन्नलिंगी जोडप्यांना संतती होत नाही त्यांना वाळीत टाकणार का ? संतती होण्यासाठीच विवाह केले पाहीजेत का ? निव्वळ आनंदासाठॉ दोन व्यक्तींनी एकत्र राहील्यास त्यांना गुन्हेगार ठरवणार का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

माफ करा मी विविधता हा शब्द

खटासि खट
गुरुवार, 12/12/2013 - 11:15 नवीन
माफ करा मी विविधता हा शब्द मराठी प्रतिशब्द म्हणून वापरला. मला Natural Diversity म्हणायचं होतं (मराठी शब्द = वैविध्य हाच आहे कि नाही माहीत नाही).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

@खटासि खट -

सुबोध खरे
गुरुवार, 12/12/2013 - 13:57 नवीन
संतती होणे हा निकष नाही. आणि आनंदासाठी दोन व्यक्ती एकत्र आल्या तर तो गुन्हा नक्कीच नाही. पण जोवर हकायदा बदलत नाही तोवर समाजाने त्यांना सन्मानजनक वागणूक देणे हे आवश्यक आणि अपेक्षित आहे. समलिंगी संभोग हे वैविध्य नसुन केंद्रापासून मार्ग विचलन(deviation) आहे. शंभर टक्के लोक एकच परिमाणात येणार नाहीत हि वस्तुस्थिती आहे. वंश सातत्य हे निसर्गाच्या मुलभूत प्रेरणेतील एक आहे. समलिंगी संभोग हे त्यात बसत नाही एवढेच मला म्हणायचे होते पण कदाचित माझ्या मुलभूत समज शक्तीत काहीतरी घोटाळा असावा( बेसिक मध्ये लोच्या). असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

बेसिकमध्येच लोचा!

ऋषिकेश
गुरुवार, 12/12/2013 - 11:17 नवीन
भिन्नलिंगी संभोगातून संतती निर्माण व्हावी हा निसर्गाचा संकेत आहे. समलिंगी संभोगातून काय निष्पन्न होणार?
संततीप्राप्ती हा भिन्नलिंगी संबंधातील संभाव्य परिणाम आहे, शारीरीक संबंधांमागचा उद्देश नव्हे! बाकी कंडोम वापरून संबंध ठेवणे हे इतर कोणत्याही संबंधांपेक्षा अनैसर्गिक आहे. मग ते वापरून सम/भिन्नलिंगी व्यक्तींनी संभोग करणे हा गुन्हा आहे असेही म्हणावे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

संततीप्राप्ती हाच भिन्नलिंगी

सुबोध खरे
गुरुवार, 12/12/2013 - 13:44 नवीन
संततीप्राप्ती हाच भिन्नलिंगी संबंधाचा उद्देश आहे.संभाव्य परिणाम नाही. निसर्गात प्राणी आपल्या आनंदासाठी नव्हे तर संततीसाठीच संबंध ठेवतात आणि त्यासाठी कित्येक नरांमध्ये युद्ध होते. काही जातीच्या कोळ्या मध्ये मादी नराला खाउन टाकते. काही जातीत नर मृत्यू पावतो. असे असूनही नर संबंध साठी उद्युक्त होतो. मांजर चित्ता या प्राण्यांमध्ये मादीसाठी संबंध हा अतिशय दुखःदायक असतो त्यामुळे त्यांचे प्रणयाराधन हे अतिशय वादळी असते हे सर्व वंश सातत्य टिकण्यासाठी निसर्गाने निर्माण केले आहे. माणूस हा एक प्राणीच आहे आणि मानवाने अंतः प्रेरणेवर(instinct) अजून पूर्ण विजय मिळवलेला नाही. तरीही नको असलेल्या संततीला जन्म देऊ नये यासठी संतती नियमन वापरणे हे पूर्ण निसर्गाच्या विरुद्ध नाही कारण वासना हि निसर्गाने निर्माण केली आहे. तिचे शमन व्हावे पण नको असलेली संतती जन्माला घालणे नको यासाठी ती साधने वापरणे अनैसर्गिक कसे? कंडोम वापरणे (सम किंवा भिन्न लिंगी व्यक्तीने) हा गुन्हा कसा? संतती नको म्हणून कंडोमचा शोध लावला गेला समलिंगी संबंधासाठी नाही. गुदद्वाराची त्वचा हि शारीरिक संबंधासाठी बनलेली नाही. ती त्वचा तोंडातील त्वचे इतकीच( एकाच थराची) नाजूक असते. परंतु योनीची त्वचा निसर्गाने संबंधासाठीच बनविली असल्याने ती बहु थराची आणि जाड असते.शिवाय उद्दिपनाने त्यात वंगण( lubrication) तयार होते. असे कोणतेही वंगण आपल्या गुदद्वारात नसते किंवा तयार होत नाही. समलिंगी संबंधाने आपले गुदद्वार सैल पडून शौचावरील ताबा जातो. अस कोणताही परिणाम योनीत होत नाही. अर्भकाचा जन्म होण्यासाठी योनी दहा सेमी पर्यंत ताणली जाउ शकते. हेसार्व आम्हाला आमच्या एम बी बी एस च्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या अर्धा वर्षात बेसिक म्हणून शिकवले जाते. आता आमच्या बेसिक मध्ये लोच्या आहे असे आपल्याला वाटत असेल तर बोलणे थांबवू या. मी पण परत शाळेत जाऊन पाहतो( back to school) कि नव्या जमान्याचे ज्ञान काही बदलले आहे काय? असो आपले मत आपल्यापाशी. “Discussion is an exchange of knowledge; argument is an exchange of ignorance”
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

संततीप्राप्ती हाच भिन्नलिंगी

ऋषिकेश
गुरुवार, 12/12/2013 - 14:08 नवीन
संततीप्राप्ती हाच भिन्नलिंगी संबंधाचा उद्देश आहे.संभाव्य परिणाम नाही.
=)) असो. बाकी प्राणी आणि माणसे हे एकमेकांपेक्षा वेगळे आहेत का ते आधी नक्की करा मग आपण परिणाम काय नी उद्देश काय ते ठरवु. कंडोम वापरताना म्हणता प्राणी व माणूस यांना लावायचे नियम वेगळे असावेत. मात्र पहिल्या परिच्छेदात शारिरिक संबंध ठेवतानाचे नियम सांगताना म्हणताय प्राण्याच्या अंतःप्रेरणेचे नियम माणसांनाही लावावेत! म्हणून म्हटलं बेसिकमध्ये लोचा आहे. (बेसिक म्हणजे पुस्तकी माहितीत नव्हे बेसिक मतांत)
गुदद्वाराची त्वचा हि शारीरिक संबंधासाठी बनलेली नाही. ती त्वचा तोंडातील त्वचे इतकीच( एकाच थराची) नाजूक असते. .............. हेसार्व आम्हाला आमच्या एम बी बी एस च्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या अर्धा वर्षात बेसिक म्हणून शिकवले जाते
माणसाचे आतडे/दात वगैरे शाकाहारी अन्नासाठी बनल्यासारखे दिसते पण माणसाला मेंदू नावाचा अवयवही (सामान्यत: प्रत्येकाला) दिला असल्याने माणूस मांसाहारही मांसावर प्रक्रिया करून खातो- पचवू शकतो. कोणताही प्राणी अन्य प्राण्यांचे दूध पिऊन वाढत नाही माणूस वाढतो. इतरही अनेक उदाहरणे थोडक्यात काय माणसाला प्रत्येक गोष्ट निसर्गाने पुरवली नाहोये कारण त्याला "तल्लख मेंदु" दिला आहे. आता त्याचा वापर न करता केवळ निसर्गदत्त गोष्टीच वापरायच्या ठरवल्या तर अजूनही माणूस जंगलातच असता किंबहुना कदाचित जगूच शकला नसता. असो. माणसाशी संबंधीत असे मुद्दे स्पष्ट मांडलेत तर प्रतिवाद करता येईल अन्यथा "आर्ग्युमेंट" शिवाय हाती काही लागणार नाही यावर सहमत. समांतर: मुखमैथून, गुदमैथुन, हस्तमैथुन अनैसर्गिक आहे हे तुमचे मत फक्त समलिंगी व्यक्तींपुरतेच आहे का भिन्नलिंगींनाही लागु आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

संततीप्राप्ती हाच भिन्नलिंगी

शैलेन्द्र
गुरुवार, 12/12/2013 - 17:55 नवीन
संततीप्राप्ती हाच भिन्नलिंगी संबंधाचा उद्देश आहे.संभाव्य परिणाम नाही. Lol
यांत हसण्यासारखं काय होतं ते खरचं समजल नाही. बाकी समलींगी आकर्षण हे जणुकीय(अनुवांशिक नव्हे) आहे का, आणि असेल तर त्याचा उद्देश काय? ज्यांनी सेल्फिश जीनबद्दल वाचलय त्यांना असे प्रश्न नक्कीच पडतात. पुनरुत्पादन हे नुसत्या संभोगाचेच नाही तर संपूर्ण सजीव आयुष्याचे कारक आहे, मग समलैंगीकतेची प्रेरणा हा नैसर्गीक दोष मानायचा का? असे बरेच प्रश्न विज्ञानाला पडतात, व त्याची उत्तरे अजुन मिळायचीत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

कारण

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 12/12/2013 - 20:52 नवीन
Evolutionary psychology या विषयावर संशोधन करणाऱ्या एका प्राध्यापकाचं व्याख्यान ऐकलं. (तुम्हीही इथे पाहू-ऐकू शकता.) त्यात त्यांचं म्हणणं असं की समलैंगिकतेचं एकच एक असं, उत्क्रांतीजनक कारण नाही. तसं असतं तर ते आत्तापर्यंत सापडलं असतं. पण त्यासाठी दोन-चार कारणं असावीत आणि प्रत्यके कारणाचं २०-३०% महत्त्वं असावं. त्यातलं एक कारण मला आठवतंय ते म्हणजे समलैंगिक लोकांची स्वतःची मुलं असू शकत नाहीत. (आता तंत्रज्ञान आलेलं आहे, पण हा उत्क्रांतीशी संबंधित प्रश्न आहे.) समलैंगिक आपल्या भावंडांच्या मुलांचं रक्षण, त्यांचं भरण-पोषण यात महत्त्वाची भूमिका बजावतात. भावंडांची मुलं आणि व्यक्तीची गुणसूत्रं २५% समान असतात. गुणसूत्रांचं सातत्य राखण्याचं हे कारण. समलैंगिक पुरुषांवर जनानखाना सांभाळण्याची जबाबदारी देता येते हे आणखी एक कारण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

मुखमैथून, गुदमैथुन, हस्तमैथुन अनैसर्गिक आहे

सुबोध खरे
गुरुवार, 12/12/2013 - 20:17 नवीन
मुखमैथून, गुदमैथुन, हस्तमैथुन अनैसर्गिक आहे.मग ते समलिंगी असो कि भिन्न लिंगी त्यात शंका नाही. नाकाने पाणी पिणे हेसुद्धा अनैसर्गिक आहे म्हणून तो गुन्हा ठरत नाही तसेच गुदमैथुन, मुख मैथुन हा गुन्हा असू नये. दुर्दैवाने ३ ७ ७ कलम जेंव्हा पास केले तेंव्हा त्या वेळेच्या समजुतीप्रमाणे समलिंगी संबंधाला गुन्हा ठरविले गेले आहे. (हस्त मैथुन मध्ये दोन व्यक्ती येत नसल्यामुळे त्याला वेगळे परिमाण लावावे लागेल. शिवाय त्या कायद्याप्रमाणे PENETRATION होत नसल्यामुळे तो या कायद्याच्या अखत्यारीत येत नाही. हस्त मैथुन हे अनावर भावनांना वाट करून देण्याचा एक रस्ता आहे ). आपणाला अनैसर्गिक म्हटल्यामुळे एवढा राग का येतो ते समजत नाही. (बायकोने नवर्याला मारणे हे सुद्धा अनैसर्गिक आहे पण कित्येक मूक नवरे मार खाऊन गप्प बसतातच कि ) प्रत्येक कायदा हा बरोबर असतोच असे नाही. याचे एक उदाहरण म्हणजे स्त्री भ्रूण हत्या विरोधी कायदा--यात जो रेडियोलोजीस्ट किंवा स्त्रीरोग तज्ञ गर्भलिंग चिकित्सा करतो आणी/किंवा गर्भपात करतो तो दोषी आहेच यात वाद नाही पण जे जोडपे स्त्री गर्भहत्या करते त्याच्या विरुद्ध कोणताही गुन्हा होत नाही. मनुष्यवधाचा कायदा -- खून करणारा गुन्हेगार आहेच पण सुपारी देणारा हासुद्धा तितकाच गुन्हेगार असतो. पण स्त्री भ्रूण हत्या कायदा त्याबद्दल काहीच म्हणत नाही. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

मुखमैथून, गुदमैथुन, हस्तमैथुन

राजेश घासकडवी
Fri, 12/13/2013 - 04:52 नवीन
मुखमैथून, गुदमैथुन, हस्तमैथुन अनैसर्गिक आहे.
अहो, जरा जपून विधानं करा हो. हस्तमैथुन - घोडे, कुत्रे, हरणं आणि माकडंदेखील करतात. मनुष्यजातीतला जवळपास प्रत्येकजण जे सहजगत्या आपलंआपण कोणी न शिकवता शिकतो त्याला अनैसर्गिक कसं म्हणता? उद्या तुम्ही चुंबन घेणंही अनैसर्गिक म्हणाल. मुखमैथुन - हेदेखील वेगवेगळ्या प्राण्यांत आढळून आलेलं आहे. गुदमैथुन - हे तर कित्येक प्राण्यांमध्ये दिसून आलेलं आहे. आता तुम्ही जर अनैसर्गिक या शब्दाची व्याख्याच तुमच्या मनासारखी केली असेल तर ती स्पष्ट तरी करा, म्हणजे चर्चा करण्याची गरज पडणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

केवळ प्राण्यांमध्ये दिसली

सुबोध खरे
Fri, 12/13/2013 - 09:44 नवीन
केवळ प्राण्यांमध्ये दिसली म्हणून तिला नैसर्गिक मानणे हे बरोबर नाही. मिझोरम मध्ये एका जातीचे पक्षी एका विविक्षित दिवशी शेकडोंच्या संख्येने आत्महत्या करताना आढळून आले. ते नैसर्गिक असेल का? सापांमध्ये दुसर्या नराबरोबर संबंध ठेवणाऱ्या मादीला नर एखादे वेळी खाउन टाकतो. मार्जार कुळातील नर आपल्याच जातीच्या( पण आपल्या नसलेल्या) अर्भकांना मारून टाकतो म्हणजे मादी परत माजावर येउन त्याच्याशी संपर्क करते. अशी उदाहरणे मानवात आपण स्वीकार कराल काय? मी समलिंगी संभोग अनैसर्गिक का आहेत ते कारणासहित स्पष्ट केले आहे. अनैसर्गिक म्हणजे बेकायदेशीर असे नव्हे. नाकाने पाणी पिणे हे सुद्धा अनैसर्गिक आहे म्हणून ते बेकायदेशीर धरून त्या व्यक्तीचे नाक कापाल काय? तसेच समलिंगी संबंध हे अनैसर्गिक आहेत म्हणून ते बेकायदेशीर ठरवून त्यांना शिक्षा करावी हे चुकीचे आहे इतकेच मी म्हटले होते. त्यावर काही विद्वान लोकांनी गदारोळ केला होता. चुंबनाचे मूळ उद्दिष्ट काय हे आपण मला सांगाल काय? त्याचा आणि अनैसर्गिक संबंधाचा काय संबंध? असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अवांतर : संतती नियमन हे काही

अनुप ढेरे
गुरुवार, 12/12/2013 - 18:23 नवीन
अवांतर : संतती नियमन हे काही धर्मांच्या नियमात बसत नाही असं ऐकलं होतं. त्यांच्यासाठी तरी लैंगिक संबंध हे प्रजननासाठीच असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

http://www.amazon.com

खटासि खट
गुरुवार, 12/12/2013 - 11:27 नवीन
http://www.amazon.com/Biological-Exuberance-Homosexuality-Diversity-Stonewall/dp/031225377X नैसर्गिक कशाला आणि अनैसर्गिक कशाला म्हणायचं ? तुम्हाला जे अनिसर्गिक वाटतंय तेच निसर्गतः असल्याने काहींचा नाईलाज आहे. उद्या अशा लोकांचं बहुमत झाल्यास कायदे काय असतील किंवा असावेत असं वाटतं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पूर्ण वाक्याचा रेफ. घ्या हो

कपिलमुनी
गुरुवार, 12/12/2013 - 15:02 नवीन
>> तोवर तरी त्या माणसाला गुन्हेगार नव्हे तर एक रुग्ण म्हणून वागवणे आवश्यक आहे. त्याच्या अगोदर त्यांनी कयद्या बद्दल भाष्य केले आहे .. जर कायदा बदलला तर गुन्हेगार ठरवायची वेळ येणार नाही ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

खरे साहेब,

चौकटराजा
गुरुवार, 12/12/2013 - 16:01 नवीन
माझ्या वाचना प्रमाणे असे लैंगिकतेचे वायरिंग मेंदूत असते पण ते परिस्थितीनुसार बदलतेही ! याच विषयावर शबाना आजमी असलेला " फायर" हा सिनेमा आहे. मी जर ड्रग्ज प्रमाणे समजा या रोगाच्या आहारी गेलो असेल व उठ सूट समाजातील पुरूषाना " गळाला" लावायचा प्रयत्न करायला लागलो. तर यात कायदा व वैद्यक यांचा प्रवेश होतो. एरवी समतोल आहार न घेणार्‍याला देखील रुग्ण ठरवावे लागेल व जास्त झोपणार्‍याला देखील म्हणूनच hurting to other soul चा मुद्दा मांडला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

काही लोक बायसेक्शुअल असतात ते

परिंदा
गुरुवार, 12/12/2013 - 18:38 नवीन
काही लोक बायसेक्शुअल असतात ते या वायरिंगच्या बदलामुळे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

काहीही खाणार्‍याला काय म्हणाल ?

चौकटराजा
Fri, 12/13/2013 - 09:43 नवीन
man v/s wild हा कार्यक्रम आपण पहात असाल तर त्यातला श्री बेअर हा आळ्या सुद्धा खातो. मांसाहारी लोकाना देखील किळस येईल असे ते दिसते. तरीही मी पूर्ण शाकाहारी असूनही बेअरला अनकॉमन मानतो अननॅचरल नाही. या दुनियेत अनैसर्गिक काहीही नाही अगदी असेलच तर ..... तर ती मानवी संस्कृति आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

सुप्रीम कोर्टाचं निकालपत्र

खटासि खट
गुरुवार, 12/12/2013 - 10:41 नवीन
सुप्रीम कोर्टाचं निकालपत्र कुणी वाचलंय का ? जितकी माहीती आतापर्यंत मिळाली त्यावरून दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालपत्रातील दोन परीच्छेदाचा विषय सर्वोच्च न्यायालयापुढे होता. अशा वेळी ज्या भागावर निकाल दिला गेला आहे त्यावरच विचार होतो कि कोर्टापुढे नव्याने पुरावे सादर करणं शक्य असतं याबद्दल कायद्याचे पदवीधर सांगतील. खूप खोलात न जाता सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली न्यायालयाने पुरेसा विदा न जमवताच निर्णय दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे असं आतापर्यंतच्या चर्चा ऐकताना कळालं. नैसर्गिक कि अनैसर्गिक याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे का ? माझ्या माहीतीप्रमाणे त्यांनी फक्त कायद्याचा विचार केला आहे. संसदेत जो काही जुना पुराणा कायदा आहे त्यात बदल करण्याची निकड संसदेला भासली नाही म्हणजेच जुन्या कायद्याला संसदेची मान्यता आहे असं कोर्टाने भाष्य केल्याचं समजतं. कायदा जेव्हां केला गेला तेव्हां समलैंगिकांबद्दल जी भावना होती त्याप्रमाणे तो केला गेला. त्यानंतर वेळोवेळी आलेल्या संसद सदस्यांना समलैंगिकांसाठी काही कायदा अस्तित्वात आहे याचीही जाणीव नसेल, तसंच कुणी आम्ही समलैंगिक असल्याने आमच्या हक्कांचं काय असं विचारलंच नसल्याने तो प्रश्न कधीही ऐरणीवर आलेला नसणार. गेल्या काही वर्षात पाश्चात्य देशातून समलैंगिकता ही विकृती नसून नैसर्गिक विविधता आहे असं मानसोपचार तज्ञांना आढळून आलेलं आहे. त्या व्यक्तीचा कल समलिंगक संबंधांकडे असणे ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे, याला ती व्यक्ती बिल्कुल जबाबदार नाही, तसंच ती व्यक्ती कुठल्याही प्रकारे मानसिकदृष्ट्या आजारी नाही हे सिद्ध झाल्याने समलैंगिक व्यक्तींना माणूस म्हणून जगू द्यावं असा विचार पुढे आला. भारतात तोपर्यंत अर्थातच कसल्याच हालचाली, जागृती नव्हती. काही व्यक्ती आण संस्था यांनी हा प्रश्न सतत लावून धरल्याने आम्ही समलैंगिक आहोत हे सांगणा-या व्यक्ती पुढे आल्या. तोपर्यंत तेबेकायदेशीर कृत्य असल्याने कुणी पुढेच येत नव्हतं. पोलिसांनी अशा लोकांचा अनन्वित छळ केल्याचे रिपोर्ट्स काही संस्थांनी प्रसिद्ध केले आहेत. उच्च न्यायायल्याच्या निकालाच्या ज्या भागावर सर्वोच्च न्यायायलाने टिप्पणी केली आहे त्यापुरताच हा मामला मर्यादीत असल्याने ही सर्व माहीती नव्याने वरच्या न्यायालयात ठेवता येत नाही असं ऐकून आहे. उच्च न्यायालयाने मात्र समलैंगिकतेबाबतचा कायदा घटनेच्या इतर दोन कलमांना छेद देत असल्याने तो रद्द ठरत असल्याची भावना बोलून दाखवली होती. मेडीया लगेचच कोर्टाने नवा कायदा केला अशा स्वरूपाच्या बातम्या देत असल्याने ज्युडीशिअल अ‍ॅक्टीव्हिझम बाबत चर्चा सुरू होतात. असे विषय किमान माहीती न घेता प्रतिक्रिया दिल्या गेल्याने गैसरसमजात भर पडत जाते. आता इतकं झाल्यानंतर हा विषय ज्युडीशिअरीकडे नेण्याचे सगळे मार्ग बंद झाले आहेत. यावर फक्त संसदेत नव्याने चर्चा होऊन कायदा होईल अशी आशा करायला हरकत नाही. बहुसंख्यांकाकडून झुंडशाहीने कायदे बनल्यास राज्यसभेवर विचारी सदस्य असावेत या दृष्टीने तिचं अस्तित्त्व होतं. त्याला गेल्या काही वर्षात हरताळ फासण्यात आलेला असला तरी राज्यसभेकडून अनेकदा बरेच कायदे पुन्हा पाठवण्यात आले आहेत. तसंच राष्ट्रपतींना कायदा संसदेकडे परत पाठवण्याचा अधिकार देशाचा प्रथम नागरीक म्हणून आहेच. तसंच सर्वोच्च न्यायायलयाचं मत मागवलं जात असल्याने आणि नुकतंच इतकं मंथन झालेलं असल्याने न्यायपालिकेकडून योग्य ते मत दिलं जाईल याची आशा वाटते. या संदर्भात काम करणा-या व्यक्ती, संस्था संसदेत कायदा बनताना आपल्याकडची माहीती आणि भूमिका संसदेपुढे ठेवतीलच. या पार्श्वभूमीवर न्याय देणारा कायदा बनण्यास अडचण नसावी असं मानण्यास खूप जागा आहे. तस्मात कोर्टाने काहीतरी नव्याने कायदा बनवला आहे असं समजून भुई धोपटण्याचं कारण नाही. तसंच प्रायव्हेट मधे तुम्ही काय करता याची घरोघरी जाऊन चौकशी होईल असंही समजण्याचं कारण नाही. जगण्याचा अधिकार हिरावून घेतला वगैरे गळे काढण्यालाही अर्थ नाही. खुले आम अशा व्यक्तिंना एकत्र राहण्यात कायद्याने अडचण होईल इतकंच. पण जर विपरीत कायदा बनलाच तर मात्र दुर्दैव समजून पुन्हा सर्वोच्च न्यायालयात त्या कायद्याला आव्हान देणं इतकंच हाती राहतं.
  • Log in or register to post comments

प्रजननक्षमता हा निसर्गा सरळ साधा नियम आहे...

बाबा पाटील
गुरुवार, 12/12/2013 - 11:03 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे व अजुन तरी असे नमुने बाळ जन्माला घालु शकत नाही मग जर निसर्गाने जर मनुष्य प्राण्याला भिन्नलिंगी प्रजननक्षम बनवले असेल तर हा प्रकार थोडा मानसिक विकृतीत मोडत नाही का ? मग भले त्याला गुन्हेगार नका म्हणु पण अश्या नमुन्यांना उपचाराची नक्की आवश्यकता असते.
  • Log in or register to post comments

निसर्गाने प्रजननक्षम बनवून

परिंदा
गुरुवार, 12/12/2013 - 11:25 नवीन
निसर्गाने प्रजननक्षम बनवून देखील ब्रम्हचारी व्यक्ती प्रजनन करत नाहीत. हे अनैसर्गिक वाटत नाही का? ब्रम्हचर्य ही देखील मानसिक विकृती म्हणावी का? त्यांच्यावर उपचार करावेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

हा हा.. याच नियमाने कंडोम

ऋषिकेश
गुरुवार, 12/12/2013 - 11:29 नवीन
हा हा.. याच नियमाने कंडोम वापरणार्‍यांना, गर्भनिरोधक गोळ्या घेणार्‍यांनाही मानसिक उपायांचे कोर्सेस लावावे लागतील ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

तंत्रज्ञान विकसित होत

खटासि खट
गुरुवार, 12/12/2013 - 11:30 नवीन
तंत्रज्ञान विकसित होत असल्यानं अशा लोकांना बाळ जन्माला घालणेही अशक्य नाही. पण मुळात विषयच तो नाही. लैंगिक वैविध्य हे निसर्गानेच घडवून आणलेलं असल्याने "वेगळं" ठरणा-या व्यक्तींना आपण केवळ बहुसंख्यांक असल्याने अस्पृश्य ठरवणार का, हा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

ब्रम्हचर्य ही देखील मानसिक विकृती

सुबोध खरे
गुरुवार, 12/12/2013 - 14:01 नवीन
ब्रम्हचर्य ही देखील मानसिक विकृती आहे असे नाही. कुत्र्यांच्या कळपात फक्त पुढारी नर आणि मादी प्रजोत्पादन करतात इतर नर आणि माद्या नाही.निसर्गात जो नर सशक्त नाही त्याला मादी मिळत नाही. पण हे सुप्रजानना साठी कदाचित आवश्यक असावे.सक्तीचे ब्रम्हचर्य वा खुशीचे अनैसर्गिक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

बाबा पाटील जी मेहरबानी करुन हा लेख वाचावा

मारवा
गुरुवार, 12/12/2013 - 17:41 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/International_Day_Against_Homophobia_and_Transphobia
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

बाबा पाटील जी मेहरबानी करुन हा लेख वाचावा

मारवा
गुरुवार, 12/12/2013 - 17:42 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/International_Day_Against_Homophobia_and_Transphobia
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

माझ्या वैद्यकिय अनुभवानुसार ही फक्त विकृतीच....

बाबा पाटील
गुरुवार, 12/12/2013 - 18:27 नवीन
माझ्या मागच्या आठ दहा वर्षाच्या वैद्यकिय व्यवसायात एकच गोष्ठ लक्षात आली की ही जी जमात आहे त्यांना उपचाराची नितांत आवश्यकता आहे फक्त शाररिक नाही तर मानसिक देखिल कारण यांच्या मेंदुत प्रचंड मोठा केमिकल लोच्या झालेला असतो. जन्मतः तृतियपंथी असन वेगळ आणी नंतर नको ते इंटरेस्ट डेव्हलप होन वेगळ.या नंतरच्या प्राण्यांना उपचाराची खरच आवश्यकता असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

बाबा पाटील

साती
गुरुवार, 12/12/2013 - 18:59 नवीन
बाबा पाटील, सहमत. मारवा विकीपिडियावरच्या लिंक्स हा पुरावा ग्राह्य धरण्याजोगा नाही. अशीच एक चर्चा मागे दुसर्‍या संस्थळावर झाली होती आणि तिथे मी वर खरे डॉ यांनी मांडलेली मते मांडली होती. असो, मी मात्र आत्तापर्यंत जितके होमो पाहिलेत ते सगळे परिस्थितीवश , कुतुहुल म्हणून , गंमत म्हणून झालेले होते . अजून होमो स्त्री मी प्रत्यक्ष पाहिली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

.या नंतरच्या प्राण्यांना

परिंदा
गुरुवार, 12/12/2013 - 19:16 नवीन
.या नंतरच्या प्राण्यांना उपचाराची खरच आवश्यकता असते.
मग यावर वैद्यकिय/मानसिक उप्चार आहेत का? कोणी तसे उपचार घेतले आहेत का? बरा झाल्याची उदाहरणे आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

आक्षेप

साती
गुरुवार, 12/12/2013 - 20:15 नवीन
माझ्या पाहण्यात कित्येक पुरुष अश्याप्रकारे काऊंसेलिंगनंतर किंवा कालपरत्वेही होमो किंवा बायसेक्श्युअल ओरिएंटेशन कडून हेटेरोसेक्श्युअल झालेले आहेत. मात्रं समलैंगिकता समर्थकांचा यावर असा आक्षेप असतो की आपण वेडे किंवा वेगळे ठरू नये म्हणून बरेच होमो मन मारून हेटेरो रिलेशन्स स्विकारतात. माझे जरी प्रॅक्टिसमध्ये असे निरीक्षण नसले तरी या विरूद्ध पुरावा द्यावा असा पुरेसा डाटा मजकडे नाही. (माझी मुख्य प्रॅक्टिस एंडॉक्रिनॉलॉजीची आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

आपल या विषयी काही ही म्हणण

सुहास..
गुरुवार, 12/12/2013 - 11:06 नवीन
आपल या विषयी काही ही म्हणण नाही ...म्हणाल तर अश्या बाबतीत सहसा आम्ही नितीन थत्ते मोड मध्ये असतो ...पण आज ची ही चर्चा वाचुन ..... लोक मान्यतेसाठी किंवा अमान्यतेसाठी कोर्टाकडे का जात आहेत हा प्रश्न मला पडला ...समाजाने त्यांच्याकडे आदराने पहावे म्हणुन असेल ..तर जबरदस्तीने वा कोर्टाच्या आदेशाने पब्लीक कधीपासुन आदर करायला लागले ब्वा ?
  • Log in or register to post comments

फक्त स्विकार करावा, कायद्याने

खटासि खट
गुरुवार, 12/12/2013 - 11:24 नवीन
फक्त स्विकार करावा, कायद्याने त्रास देऊ नये इतकाच उद्देश आहे. कायदा झाला म्हणजे शनिवारवाड्यावर भव्य सत्कार समारंभ ठेवावा किंवा अभिनंदनाचे फ्लेक्स लावावेत असं कुणी म्हटलेलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

हम्म !

सुहास..
गुरुवार, 12/12/2013 - 11:45 नवीन
फक्त स्विकार करावा, >>> कोणी ? कायद्याने की समाजाने ...समाजाने म्हणाल तर यातील फक्त म्हणताना जेव्हढे सोप्पे लिहायला वाटते, तितके अवघड समाजमान्यता करण्यास ( अर्थात तिकडे उसगावात बसुन , किंवा त्या संस्काराशी नेमका भारतीय समाज पध्दतीशी तुलना करून, समाजमनाचा अभ्यास बाजुला ठेवुन " फक्त स्विकार करावा " हे ही तितकेच सोप्पे ..) कोर्टापुढे तुम्ही, वाद-प्रतिवाद करत, पुराव्याअभावी वा पुराव्यानिशी काहीही साबित करु शकता , तितके सोप्पे ते समाजात नाही ....असो ...हा संवाद पुन्हा ...भारत विरूध्द इंडिया असा व्हायचा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

मनिषा यांच्या प्रतिसादाखाली

खटासि खट
गुरुवार, 12/12/2013 - 11:53 नवीन
मनिषा यांच्या प्रतिसादाखाली लिंक दिलेली आहे. बाकि समाज सहजासहजी बदलत नाही असं म्हणायचं असेल तर खरच वेगळा विषय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

लोक मान्यतेसाठी किंवा

ऋषिकेश
गुरुवार, 12/12/2013 - 12:03 नवीन
लोक मान्यतेसाठी किंवा अमान्यतेसाठी कोर्टाकडे का जात आहेत हा प्रश्न मला पडला ...समाजाने त्यांच्याकडे आदराने पहावे म्हणुन असेल ..तर जबरदस्तीने वा कोर्टाच्या आदेशाने पब्लीक कधीपासुन आदर करायला लागले ब्वा ?
कारण सद्य कायदा असे संबंध ठरवणार्‍या व्यक्तीला क्रिमिनल - गुन्हेगार ठरवतो. यामुळे पोलिसांपासून अनेकांच्या हातात अश्या व्यक्तींना त्रास द्यायला आयते साधन मिळते. त्यांना आपलेसे करा/स्वीकारा वगैरे लांब राहिले याच्याशी सहमत आहेच पण त्यांना किमान त्रास देऊ नका - त्यांना कायद्याने गुन्हेगार ठरवू नका असे किमान म्हणणे सध्या आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

+१

सुबोध खरे
गुरुवार, 12/12/2013 - 14:02 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारे

मृत्युन्जय
गुरुवार, 12/12/2013 - 11:10 नवीन
समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारे कलम ३७७ किती लोकांनी वाचले आहे ही शंका आहे: Whoever voluntarily has carnal intercourse against the order of nature with any man, woman or animal, shall be punished with imprisonment for life, or with imprisonment of either description for term which may extend to ten years, and shall also be liable to fine. Explanation: Penetration is sufficient to constitute the carnal intercourse necessary to the offense described in this section माझे कायद्याचे आणि "carnal intercourse" या शब्दांचे ज्ञान आणि आकलन थोडे आहे पण जेवढे मला कळले त्या अनुसार विचार करता समलैंगिकता सोडुन खालील गोष्टीही बेकायदेशीर आहेतः १. एका पुरुषाने एका स्त्रीबरोबर (अगदी लग्नाची बायको असेल तरीही) गुदद्वारातुन केलेला संभोग. २. एका पुरुषाने एका स्त्रीबरोबर (अगदी लग्नाची बायको असेल तरीही) मुखाद्वारे केलेला संभोग. कायदा म्हणतो " Penetration is sufficient to constitute the carnal intercourse ". Penetration कश्यात हे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे योनी वगळता इतर कुठल्याही अवयवाशी अथवा वस्तुशी संबंधित Penetration असेल तर ते कलम ३७७ मध्ये येते. याचा अर्थ यात केवळ समलैंगिक येत नाहित तर सर्वसामान्य माणसे देखील येतात. वरच्या २ उदाहरणांचा संदर्भ लक्षात घेता धार्मिक आणि कायदेशीर पद्धतीने विवाहबंधनात अडकलेले भिन्नलिंगी Adventurous जोडपी देखील येतात. आता "Against the order of nature" या शब्दांचा विचार करुयात. "order of nature" म्हणजे काय? यात केवळ Vaginal Intercourse येतो का? तर नाही. निसर्गाची आज्ञा ही आहे की स्त्री आणि पुरुषांनी (रादर नराने आणि मादीने) अपत्यप्राप्तीसाठी संभोग करावा. हा मुद्दा थोडा विवादास्पद आहे. पण तरीही कायद्याच्या भाषेत बोलायचे झाल्यास त्याचा अर्थ वरीलप्रमाणेच होतो. तर मग संततीनिरोधक साधने वापरुन केलेला कुठलाही संभोग कलम ३७७ च्या व्याख्येत येइल. म्हणजे अगदी लग्नाच्या नवरा बायकोने जरी निरोध वापरुन संभोग केला तर तो "Against the order of nature" असेल. इतर स्त्री पुरुषांमधला संभोग तर यात येणारच येणार (संतती प्रतिबंधक साधने वापरल्यास). तसेच जर एखाद्या दांपत्याने संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया करुन घेतली तर त्यानंतर केलेला प्रत्येक संभोग बेकायदा असेल. संततीची अपेक्षा न ठेवता निव्वळ आनंदासाठी केलेला प्रत्येक् संभोग बेकायदा ठरेल. आता ३७७ एकुण सगळ्यांच्याच घराच्या उंबरठ्यावर आल्यासारखा वाटतो ना?
  • Log in or register to post comments

गुन्हे विज्ञान शाखेचा अभ्यास

सुबोध खरे
गुरुवार, 12/12/2013 - 14:13 नवीन
गुन्हे विज्ञान शाखेचा अभ्यास करताना आम्हाला शिकवले होते ते असे कि अनैसर्गिक संभोग (मौखिक वा गुदद्वारात) मग तो नवरा आणि बायकोत असेल तरीही तो गुन्हा आहे. यात बायकोशी तिच्या इच्छे विरुद्ध संभोग हि येतो(फक्त तो बलात्कारात न धरता sexual assault मध्ये येतो(तेंव्हा येत असे). संतातीनियमक साधने वापरणे हा गुन्हा ठरू शकत नाही कारण आपल्याला किती मुले होऊ देणे हा माणसाचा आणि स्त्रीचा मुलभूत हक्क(fundamental right) आहे आणि त्यासाठी वापरात येणारी साधने हि कायद्याच्या अख्त्र्यारीत येतात. शिवाय नको असलेल्या अर्भकाचा गर्भपात यात संतती नियामक साधनाचे अपयश हे सर्वात महत्वाचे कारण आहे. त्यामुळे संततीनियमनाची साधने वापरून केलेला संभोग हा बेकायदेशीर आहे हा मुद्दाच गैर लागू आहे.(exclusion clause). आपले म्हणणे अशा तर्हेने समर्थनीय होणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

संतातीनियमक साधने वापरणे हा

ऋषिकेश
गुरुवार, 12/12/2013 - 14:25 नवीन
संतातीनियमक साधने वापरणे हा गुन्हा ठरू शकत नाही कारण आपल्याला किती मुले होऊ देणे हा माणसाचा आणि स्त्रीचा मुलभूत हक्क(fundamental right) आहे
जर गुदमैथुन,मुखमैथुन अनैसर्गिक आहे तर कंडोम लाऊन संभोग नैसर्गिक कसा याचे उत्तर मिळाले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

डॉक समलैंगिकता हाही घटनेच्या

मृत्युन्जय
गुरुवार, 12/12/2013 - 14:27 नवीन
डॉक समलैंगिकता हाही घटनेच्या कलम २१ नुसार वैयक्ति स्वातंत्र्याच्या विरोधात जातो. इथेही म्हणजे कलम १५ किंवा २१ अनुसार देखील कायद्याची एक पाचर मारुन ठेवलेली आहेच ही गोष्ट वेगळी. पण हे अमान्य करता येत नाही की Absence of Freedom of Sexual Orientation हे घटनेच्या मुलभूत सिद्धांताच्या अगदी विरोधी आहे. मूल होउ न देणे किंवा गर्भपात करुन घेणे हे जर मूलभूत हक्कांमध्ये मोडत असेल तर मग लैंगिक स्वातंत्र्य का नाही? मी काय योग्य आणि काय अयोग्य या मुद्द्यावर नाही आहे. तो वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. पण कलम ३७७ इतके कालबाह्य आहे की मी लिहिलेले सगळे प्रसंग / घटना / अभिव्यक्ती कलम ३७७ नुसार गुन्हा ठरतो. अगदी नसबंदी सुद्धा. नसबंदी विरुद्ध गुन्हे दाखल होत नाहित कारण त्याचा प्रसार सरकार स्वतः करते आहे. मग शिक्षा नक्की कोण करणार? पण लैंगिक स्वातंत्र्याबाबत तसे नाही म्हणुन गुन्हे दाखल होतात, छळवणुक होते, शिक्षा होते. आणि समलैंगिकता सोडा पण वैवाहित भिन्नलिंगी जोडप्यांचे दोघांच्या पुर्ण संमतीन होणारे लैंगिक आचरण देखील ३७७ नुसार गुन्हा आहे (योनीसंबंध सोडुन) तर मग ३७७ कालबाह्य नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कलम ३ ७ ७ संपूर्णपणे कालबाह्य

सुबोध खरे
Fri, 12/13/2013 - 10:50 नवीन
कलम ३ ७ ७ संपूर्णपणे कालबाह्य आहे हे मी सर्वात प्रथम म्हटलेच होते. आणि तो कायदा पूर्णपणे बदलाने हि काळाची गरज होती परंतु आपल्या कल्याणकारी विधायकानी मतांसाठी काहीही केले नाही कारण धर्म मार्तंड लोकांच्या विरोधात जाण्यापेक्षा कोर्टवर राळ उडविणे किती सोपे आहे हे आपण पहिलेच आहे. जर (अगदी काल परवा पर्यंत) २०१३ मध्ये निर्भया प्रकरणात कायद्यात बदल केला तेंव्हा सुद्धा विधायकानी हा कायदा बदललेला नाही. अगोदर सुद्धा १ ९ २ व्या कायदा आयोगाने ३ ७ ७ प्रकरण वगळावे असे सांगूनही सरकारने काहीही केले नाही त्याअर्थी सरकारला ते मान्य आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जर एखादा कायदा २० १ ३ साली विचार विनिमय होऊनही हे कलम कायम ठेवले आहे तर ते कालबाह्य कसे हे विचारत न्यायालयाने फक्त त्याची घटनात्मक वैधता ठरविली आणि हा निकाल दिला. आपले सर्व अति शहाणे(पुरोगामी) शहाणे( संसद सदस्य) आणि अर्धे शहाणे (जनता) यांनी न्यायालयाच्या विरुद्ध राळ उठविली. आपले अटर्नी जनरल वहानवटी यांनी सुद्धा न्यायालयाने पुरोगामी होण्यासाठी काही केले नाही म्हणून टाईम्स ऑफ इंडिया मध्ये वक्तव्य केले आहे. त्यांना लोकांसमोर हे विचावेसे वाटते कि आपल्या (मुसलमान) समाजाला दुखवू नये म्हणून तुम्हीसुद्धा राजकीय दृष्ट्या चतुर वक्तव्ये करता? असो मिळाला तर मी त्या निकालाचा दुवा देईनच पण त्या निकालात स्पष्टपणे असे म्हटलेले आहे जर संसद सदस्यांना ते कलम मान्य आहे आणि गेल्या तेरा वर्षात अनेक वेळा त्यावर विचार होऊन आणि त्याला संलग्न कायद्यात फेरफार होऊनसुद्धा त्यांनी हे कलम तसेच ठेवले तर (ते रद्दबातल ठरवणे) त्यांचे काम न्यायालयाने करणे कितपत बरोबर होईल? आम्ही फक्त त्त्या कल्माची घटनात्मक वैधता तपासून पाहिली. दिल्ली उच्च न्यायालयाने सुद्धा ते घटनात्मक वैध आहे असेच म्हटले आहे फक्त उच्च न्यायालयाने परस्पर संमतीने समलिंगी सम्भोग करणे हा गुन्हा नाही इतकेच म्हटले आहे. असो. "sitting on judgement of disputed or partial facts is not prudent ." "It is easy to blame someone than do something constructive."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मी तो निकाल थोडाफार वाचला आहे

मृत्युन्जय
Fri, 12/13/2013 - 11:43 नवीन
मी तो निकाल थोडाफार वाचला आहे डॉ़क. त्यामुळे माझा प्रतिसाद प्रथमपासुन ३७७ च्या उपयुक्ततेबद्दलच होता. न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने किंवा समलैंगिकांच्या अधिकारांच्या अनुसाराने मी तो लिहिलेला नाही. पण इथे काय नैसर्गिक आणि काय अनैसर्गिक हे ठरवणार्‍या बहाद्दरांना कायद्याने काय नैसर्गिक ठरवले आहे याबद्दल कितपत माहिती आहे हे दाखवुन देण्यासाठी तो प्रतिसाद होता. तुम्ही यातला निदान काही भाग तरी व्यवसायाच्या निमित्ताने जाणुन घेतला आहे. ज्यांनी कलम ३७७ मुळातच वाचले नाही आहे त्यांनी समलैंगिकतेबद्दलच्या कायद्याबद्दल बोलणे किती हास्यास्पद ठरु शकते हे दाखवण्यासाठी तो प्रतिसाद दिला होता. ३७७ ची व्याप्ती फक्त समलैंगिकांबद्दल नाही आहे. जर उद्या एखाद्याने कायद्यावर बोटच ठेवायचे म्हटले तर ९०% प्रौढ (आणी कदाचित ९५% विवाहित) जनता गजाआड करायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

निसर्गाने प्रजननक्षम बनवून

परिंदा
गुरुवार, 12/12/2013 - 11:26 नवीन
निसर्गाने प्रजननक्षम बनवून देखील ब्रम्हचारी व्यक्ती प्रजनन करत नाहीत. हे अनैसर्गिक वाटत नाही का? ब्रम्हचर्य ही देखील मानसिक विकृती म्हणावी का? त्यांच्यावर उपचार करावेत का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा