Skip to main content

अभिव्यक्ती स्वतंत्र खरोखरच आहे का आपल्याकडे?

लेखक विदेशी वचाळ यांनी बुधवार, 11/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
अभिव्यक्ती स्वतंत्र खरोखरच आहे का आपल्याकडे? मध्यंतरी कधी तरी एक बातमी ऐकली होती. फेस्बुक वर कोण्या नेत्या बद्दल काही आक्षेपार्ह मजकूर लिहील्याबद्दल एका मुलीला पोलिसांनी तुरुंगात टाकले म्हणून. नंतर त्याच्यावर बरेच कमी जास्त ऐकले. नेते म्हणाले की हे काही चांगले नाही. मुलीला तुरुंगात डांबणे योग्य नाही. मग पोलिस म्हणाले की तिला एतारांकडून धोका होता म्हणून तिच्या सुरक्षे साठी तिला तुरुंगात ठेवले होते. काहीही का? उद्या एखाद्याचा खून करतील, आणी म्हणतील की उगाचच दुसर्‍यांनी केला असता, तो वाचावा म्हणून आम्हीच केला. पोलिस हे पक्षपाती नसावेत ना? आणी असले तर त्यांच्या चुका माफ नसाव्यात ना? ज्या नेत्या वर आपल्याला विश्वास आहे त्याच्याबद्दल कोणी काही म्हणाले तर एवढ्या थराला जायचे का? आणि एवढा कसला विश्वास? जाणते अजाणतेपणी चुका होत नसतील का नेत्या कडून? आणि अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणजे मला "वाटते ते" बोलण्याची मुभा नाही का? का ते फक्त घटनेत असते आणी सत्यात नसते? हा तंतू काढण्या मागे केवळ चर्चा हा हेतू आहे. आणि मला पक्के माहिती आहे की चर्चा करून कितीसा फरक पडतो ते. पण निदान लहान मुलांना अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणजे काय ते नीट समजले तर पुढची पिढी सुड्न्य असेल.

वाचने 9587
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

पण निदान लहान मुलांना अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणजे काय ते नीट समजले तर पुढची पिढी सुड्न्य असेल.
माझ्या मते अनेक वयाने वाढलेल्या लहान मुलांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय हे शिकवण्याची गरज आहे.
ज्या नेत्या वर आपल्याला विश्वास आहे त्याच्याबद्दल कोणी काही म्हणाले तर एवढ्या थराला जायचे का?
प्रस्थापित व्यवस्था स्वतःला टिकवण्यासाठी कुठच्याही थराला जाते याची जितीजागती उदाहरणं अजूनही आपल्या आसपास आहेत. मुगाबे या झिंबाब्वेच्या हुकमशहाने आपली सत्ता टिकवण्यासाठी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा गळा घोटला. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात वृत्तपत्रांवर निर्बंध आणले. स्टालिनचा इतिहास तर सर्वज्ञातच आहे. आपल्यावर अगदी मंदशीदेखील टीका सहन न होणं हे हुकुमशाहीचं व्यवच्छेदक लक्षण आहे. एके काळी माध्यमं महाग होती, तेव्हा हे निर्बंध आणणं सोपं होतं. इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वव्यापी झाल्यानंतर हे नियंत्रण कठीण झालेलं आहे. तरीही चीनसारखी उदाहरणं आहेतच. आपल्याला गैरसोयीचं असलेलं सत्य दडपून टाकण्याची प्रथा अजूनही टिकून असल्यामुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्य पुरेसं दिसत नाही असंच म्हणावं लागतं.

In reply to by राजेश घासकडवी

>>>आपल्यावर अगदी मंदशीदेखील टीका सहन न होणं हे हुकुमशाहीचं व्यवच्छेदक लक्षण आहे. आणि मला एखादी गोष्ट आवडत नाही अथवा पटत नाही म्हणून नव्या प्रकारच्या उद्धारकर्त्याचं सोंग घेऊन श्रद्धा स्थानांवर हल्ले करणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गैरवापराचं नि त्यावर उलटून कुणी बोललं की रडणं नि दुसर्‍याची अक्कल काढणं हे आत्यंतिक दुटप्पीपणाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. चालायचंच! तत्त्वतः सारखंच. =)) एवढं बोलून मी माझं भाषण संपवलेलं आहे. :)

In reply to by प्यारे१

आणि मला एखादी गोष्ट आवडत नाही अथवा पटत नाही म्हणून नव्या प्रकारच्या उद्धारकर्त्याचं सोंग घेऊन श्रद्धा स्थानांवर हल्ले करणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गैरवापराचं नि त्यावर उलटून कुणी बोललं की रडणं नि दुसर्‍याची अक्कल काढणं हे आत्यंतिक दुटप्पीपणाचं व्यवच्छेदक लक्षण आहे.
अहो मी आपलं मुगाबेबद्दल बोललो. आता तोही कोणाचं श्रद्धा स्थान असेल तर त्याला मी काय करणार? त्याचे समर्थक मलाही 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करणारा' म्हणतील. तेवढा धोका मी झिंबाब्वेमध्ये राहत नसल्यामुळे पत्करतो.

In reply to by प्यारे१

आज खूप दिवसांनी मिसळपाववर लॉगिन झालो आणि पहिलीच प्रतिक्रिया ही वाचली. दिल खूष झाले बघा. एकदम टू द पॉईंट. टाळ्या.

पण उदाहरण चुकलं. त्या विशिष्ट घटनेत पोलीसांनी केलं ते योग्यच होतं. राडा कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी केला.

आपल्या घटनेने दिलेले अधिकार अन स्वातंत्र्य हे अनिर्बंध नसून मर्यादित स्वरूपाचे आहे. राज्यघटना अन तिला अनुसरून आलेले विविध कायदे, तसेच कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी निर्माण झालेली व्यवस्था अन तिचे लिखित अन अलिखित संकेत हे amongst the citizens of country एखाद्या कराराच्या कलामांसारखे काम करतात. नागरिक म्हणून यांचे पालन करणे हि सर्वांची जवाबदारी आहे. उपरोल्लेखित घटनेत, त्या मुलीने आपल्या घटनादत्त स्वातंत्र्याचा सामाजिक संकेत धुडकावून अनुचित वापर केला असेही म्हणता येईल. तिचा हेतू कदाचित साफ असेलही, पण यामुळे एखाद्या मोठ्या जनसमुदायाच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यताच जास्त होती. सो पोलिसांनी केलेल्या कारवाई च्या तीव्रतेबद्दल वाद होऊ शकतो, पण काहीतरी कारवाई करणे हेही तितकेच गरजेचे होते.

"अभिव्यक्ती स्वतंत्र खरोखरच आहे का आपल्याकडे?" - होय, अभिव्यक्ति स्वतंत्र आहेत पण त्यांना स्वैराचाराचे स्वातंत्र्य नाहीये.

In reply to by बॅटमॅन

@ लोटिया स्वतंत्र हे कधीच मर्यादित नसते. तसे असते तर आपण १९४७ पुर्वी पण स्वतंत्र होतोच असे म्हणावे लागेल. @ मी-आहे-ना त्या उदाहरणात उक्ती होती, आचार नव्हता. त्या व्यक्ती ने फक्ता मत व्यक्ता केले होते. ती चुक नसावी. @अर्धवट पोलिसांनी केले ते बरोबर कसे बुआ? कारण नसताना कोण्या व्यक्ती ला तुरुंगात टाकणे योग्या आहे का? का कोणाला सुरक्षा द्यायची म्हणजे तुरुंगात टाकायचे? असे असेल तर सगळे नेते तुरुंगाताच ठेवावेत. निदान सुरक्षेचा खर्च तरी कमी होईल. @प्यारे बोलन्याबद्दल मला प्रॉब्लेम नाहीए. पण टीका सहन ना होऊन मुद्द्यावरून गुद्द्यावर येणे चुकीचे वाटते. असो, मला वाटते की त्या व्यक्तीने केले ते, व्यक्‍तिगत अधिकारात बसणारे होते. पोलिसांनी केले ते अधिकाराचा गैरवापर दर्शक होते. पण मी चुकीचा असु शकतो. विवा

In reply to by विदेशी वचाळ

त्याकरता तुम्हाला सेन्सेटीव्ह प्रसंगी तणाव कसा निर्माण होतो, मुंबई किती बिकट परिस्थितीत फसु शकते, पोलीसांना कसल्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं याचा अभ्यास करावा लागेल. आणि हो, आमच्या नावाबद्दल आम्हि फार सेन्सेटीव्ह आहोत बरं...त्याची मोडतोड करु नका प्लीज.

In reply to by विदेशी वचाळ

@ लोटिया स्वतंत्र हे कधीच मर्यादित नसते. तसे असते तर आपण १९४७ पुर्वी पण स्वतंत्र होतोच असे म्हणावे लागेल.
मी भारतीय राज्यघटनेने नमूद केलेल्या मुलभुत अधिकार अन स्वातंत्र्य याबद्दल लिहिलंय, ते मर्यादित स्वरुपाचेच आहे. आणि तसाही कुठलीही व्यक्ती संपूर्णपणे स्वतंत्र कधीच नसते.

इलेक्ट्रोनिक मिडीयाला अभियक्ती स्वातन्त्र्य नसलेलेच बरे अशी परिस्थिती आहे. बहुतेक एलेक्ट्रोनिक मिडीयांचा केवळ शोबाजी , तिखट चोपडलेल्या बातम्या , सनसनाटी यांवरच जास्त भर आहे. भारतात तरी इलेक्ट्रोनिक मिडीया फर उथळपणे वागतो असे नेहमी दिसून आलेय. उदा: २६/११ चा हल्ला. त्याचे हे लोक लाईव्ह टेलीकास्ट दाखवत होते. त्याचा फायदा अतीरेक्यानाच झाला. आजची समलैंगीक सम्बंधांबद्दलचा कोर्टाचा निर्णय.. इतक्या फालतु मुद्द्याला असे काही उचलून धरलेय की भारतापुढील सर्वात मोठ्ठा प्रश्न हाच असावा असा समज निर्माण होतो. त्या मुद्द्यापुढे दिल्लीतील निवडणूकांचा मुद्दाही बाजूला पडला

उदाहरणावरून अभिव्यक्तीस्वातंत्र्य ठरवण्याऐवजी, नक्की व्याख्या काय असावी आणि कायद्याप्रमाणे काय आहे, हे समजले तर योग्य चर्चा करण्यास मदत होईल.

In reply to by विकास

मग आम्ही तुम्हाला मुगाबे म्हणू (कारण मला ते एकच नाव माहिती आह) :Pे

In reply to by पैसा

त्यांना मुगांबे म्हणूया! विकास मुगांबे!!! कसं मस्त कोकणीही वाटतंय!!!! ;)

In reply to by पिवळा डांबिस

उद्या माझं कालवण पण करून मस्त लागतयं म्हणाल हो! ;)

In reply to by विकास

तसे करण्याचे स्वातंत्र्य म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे !!!!! विवा

In reply to by पिवळा डांबिस

त्यांना मुगांबे म्हणूया! विकास मुगांबे!!! कसं मस्त कोकणीही वाटतंय!!!!
आयला खरंच की. मुगांबे खुश हुआ! ज्योसेफ स्टालिनच्या जागी ज्योती स्टालिन म्हटलं तर कदाचित गोयचं कोणीतरी सुद्धा वाटेल. ;)

अभिरुची व्यक्त करणे म्हणजे अभिव्यक्ती असावे. मेज़ मराठी एवढे चांगले नाही. पण हा बहुदा बहुव्रिही संधी प्रकार असावा. @पैसा ताई व्याख्या आवडली. सोपी आहे. त्या हिशोबने स्वातंत्र्य असले काय आणी नसले काय सारखेच आहे. @विकास रिप्लाइ आवडला @वीजुभौ बातम्या अशाच असतात. त्यातले तथ्य बाहेर यायला वेळ लागतो. प्रसंगीक पत्रकारिता आणी सत्यधारित पत्रकारिता ह्यात हाच तर फरक आहे. आणी सत्यधारित पत्रकारिताच ठेवायची असे म्हणाले तर नेहमीच "बैल गेला अन्न झोपा केला" किंवा "वरती मागून ..." असे होईल. त्यामुळे प्रसंगीक पत्रकारिता ही त्या अणुषंगानेच घ्यायचे असते. विवा

आपल्या देशात ६०/७०% लोक दारिद्र्यात जगतात, आणि संध्याकाळी मुलांना खायला काय घालू या प्रश्नाचा विचार करण्यात अर्ध्याहून अधिक बायकांचं आयुष्य जातं तिथे भुकेपुढे इतर प्रश्न बेमतलब ठरतात. जिवंत रहाणे हाच मोठा संघर्ष असेल तर इतर सगळ्या गोष्टी चैन ठरतात. प्रचंड लोकसंख्या आणि सगळ्याच प्रकारची उपासमार बर्‍याच गुन्ह्यांना आमंत्रण देते. ही परिस्थिती कमी करण्यासाठी आपण काही करू शकतो का? बाकी काही शक्य नसेल पण निदान आपल्या मुलांना आणि मुलींना अभिव्यक्तीस्वातंत्र्य चांगलं आणि वाईट यातला फरक ओळखायला शिकवलं तरी पुरे. एक एक करून अभिव्यक्तीस्वातंत्र्य मागणारे नागरिक वाढतील तसे असले प्रकारही कमी होतील. मी कमालीची अशावादी आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रतिसादाचा मथळा/शिर्षक कंसात असल्याने मी फुकटचे विडंबन म्हणून वाचायला लागलो. पहीली ओळ झाली हसू येईना, म्हणलं पुढे असेल...नंतर वाटल, भलतच अवघड विडंबन आहे, पण तेव्हढ्यात शेवटून दुसर्‍या ओळीत वाचलं आणि कळलं! ;) असो, प्रतिसादातील प्रमुख भावनेशी सहमत. लहानपणापासून अभिव्यक्तीस्वातंत्र्य शिकवायला हवे. अर्थात अशा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा समोरच्या व्यक्तीबद्दल आदर राखत वापर करणे हे देखील शिकवणे महत्वाचे असते. समोरच्याबद्दल विशेष करून जर विभिन्न विचारांची व्यक्ती असेल आणि तिच्याबद्दल टॉलरन्स नसेल आणि नुसतेच स्वतःचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य माहीत असेल तर ते तसे न ठरता अरेरावी ठरेल असे वाटते.

In reply to by विकास

"गप्प बसा नाहीतर उडवून टाकेन" मंत्रामुळे त्रास देणारे आणि घाबरणारे असे दोन गट तयार होतात. ते थांबेल तेव्हा आपोआप बराच फरक पडेल. आणि कन्फ्युजन ही सुद्धा एक अभिव्यक्तीच आहे. विकासराव मुगांबे, मी तुमच्या अभिव्यक्तीचे स्वागत करते.

काहीही असो. विव [वा नाही कारण ते "वचाळ" आहेत "वाचाळ" नाहीत.] हळू हळू मिपा वर प्रसिद्धीकडे वाटचाल करू लागले आहेत. उत्तम. ही मी अ.स्वा. वापरून केलेली कॉमेंट आहे...एवढे अ.स्वा. आपल्याला मिळते की राव...

कायदा बियदा कळत नाही. आपल्या बोलण्याने आधीच दु:खात असलेल्यांच्या भावना दुखावण्याचं स्वातंत्र्य कायद्याने दिलेलं असलं तरी ते वापरलंच पाहीजे का हे कळण्यासाठी त्या ज्ञानाची गरज पडत नसावी.