✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन

उ
उद्दाम यांनी
Fri, 12/06/2013 - 12:43  ·  लेख
लेख
हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन हिंदु धर्मात दहन केले जाते. पण एक माणूस जाळायला लाकूड फार लागते. विजेवरची दहन सोय सगळीकडे उपलब्ध नसते. त्यामुळे हिंदु लोकानाही दफनाची सोय करता येईल काय? ( सध्या लिंगायत समाजात अशी पद्धत आहे. ) दफनाला लाकूड लागत नाही. शिवाय ठराविक काळ ८-१० वर्षे वगैरे गेला की त्याच जागेत पुन्हा पुन्हा दफन होऊ शकते. दफन करायचे असेल तर हिंदु धर्मातही एक सोय आहे. मोठा संत होणे आणि समाधी घेणे, पण सामान्याना ते जमणारे नाही. मग सामान्याना अशी सोय आपल्या धर्माने किंवा शासनाने का केली नाही? तसेच एखादी व्यक्ती स्वतःला निधर्मी समजत असेल ( पण जन्माने हिंदु असेल ) तर तिचीही सोय होईल. हिंदुनी पुढाकार घेऊन हिंदुंसाठी दफनभूमी करावी, अशा विचाराचे कुणी आहे का? अशी दफनभूमी सध्या कुठे आहे का? ( याबाबत धर्म काय सांगतो, हे संबंधितानी जरुर पहावे. पण आपण मेल्यावर एक झाड मरु नये अशी तळमळ असलेल्यानी याबाबत चिंता करायची गरज नाही. ) , एका पंचक्रोशीत तरी अशी सोय हवी. मेडिकल कॉलेजात देणे, हाही सर्वाना जमणारा पर्याय नाही. ( आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. :) आता पुन्हा स्वतः मढे होऊन अजून पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही. :) ) हिंदु धर्मात सरसकटपणे दहन आणि दफन असे दोन ऑप्शन उपलब्ध होऊ शकतील का? याची चर्चा अपेक्षित आहे. दहन : सत्य की थोतांड हा विषय इथे अपेक्षित नाही. ( पण तरीही कुणी चर्चा करत असल्यास त्याला प्रतिबंध केला जाणार नाही. :) ) शाहण्याने आपुले थडगे खणावे आणि खणताना गाणे म्हणावे. :)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
37329 वाचन

💬 प्रतिसाद (143)

प्रतिक्रिया

हा हा हा

बॅटमॅन
Mon, 12/09/2013 - 14:08 नवीन
हा हा हा :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

चर्चा वाचली.

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 12/08/2013 - 16:34 नवीन
चर्चा वाचली. त्यात एक मुद्दा जाणवला की दफन करायला फार जागा लागते. भारतातल्या सगळ्या हिंदु लोकांनी दफन करायचे ठरवले तर जागा कमी पडेल. इथे आपण गृहित धरतोय की मृतदेह आडवा जमिनीत दफन करायचा. त्या ऐवजी जर त्याचे उभ्याने दफन केले तर? जागा कमी लागेल. त्यातही जमिनीत खोल बोअर मारुन एकावेळी एका पेक्षा अधिक मृतदेह कमीत कमी जागेत दफन करता येतील. या पर्याया मुळे दहना ऐवजी दफन पर्यावरण पुरक ठरेल का?
  • Log in or register to post comments

ह्याला म्हनतात

अत्रन्गि पाउस
Mon, 12/09/2013 - 19:10 नवीन
लाटारल ठ्यीन्किंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

पन हे तर "व्हर्टीकल" ठींकींग

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 12/11/2013 - 18:30 नवीन
पन हे तर "व्हर्टीकल" ठींकींग हाय त्याच काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

त्यातही जमिनीत खोल बोअर मारुन

विजुभाऊ
गुरुवार, 12/12/2013 - 18:07 नवीन
त्यातही जमिनीत खोल बोअर मारुन एकावेळी एका पेक्षा अधिक मृतदेह कमीत कमी जागेत दफन करता येतील.
बोअर मारल्यावर पाणी लागले तर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

.

उद्दाम
गुरुवार, 12/12/2013 - 19:06 नवीन
बरं आहे की . आधी ५० वर्षे पाण्यासाठी बोअर वापरायची. मग हाडं कुजुन त्याचं तेल होईल. मग तीच बोअर तेलाची विहिर म्हणून वापरायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

काय बोअर मारताय राव

बॅटमॅन
Fri, 12/13/2013 - 01:33 नवीन
काय बोअर मारताय राव =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

मग हाडं कुजुन त्याचं तेल होईल

गब्रिएल
Fri, 12/13/2013 - 13:03 नवीन
मग हाडं कुजुन त्याचं तेल होईल.आयला, इतकं डोंबलाचं सायन्सचं अज्ञान आहे तर वैचारिक धागा काठायचा आव काय म्हणुन? सरळ जोक, विनोद, टिंगलटवाळी आसा विषय या धाग्याला द्यायचा ना, हाकानाका :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

.

उद्दाम
Fri, 12/13/2013 - 13:26 नवीन
आमचा धागा चितळे मास्तरच्या शिकवणीगत असतो. इथे गोदीच्या पदरापासून एलफिस्टनच्या स्पेलिंगापर्यंत सगळं ज्ञान- अज्ञान खुलेपणाने चर्चायची परवानगी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल

म्हंजे तेच. उद्दामपणे केलेला

गब्रिएल
Fri, 12/13/2013 - 14:01 नवीन
म्हंजे तेच. उद्दामपणे केलेला जोक, विनोद, टिंगलटवाळी Image removed.; शिरेपना काडिचा न्हाय. खर्का नाय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/13/2013 - 15:00 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

हे बाकी आवडलं

बॅटमॅन
Mon, 12/16/2013 - 12:13 नवीन
हे बाकी आवडलं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

देहदानासाठी निरोगी

एम.जी.
Mon, 12/09/2013 - 12:12 नवीन
देहदानासाठी निरोगी शरीरापेक्षा मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स अस्तील तर विद्यार्थ्यांना जास्त ज्ञान मिळते का ?
  • Log in or register to post comments

.

उद्दाम
Mon, 12/09/2013 - 13:20 नवीन
नॉर्मल आणि अ‍ॅबनॉर्मल दोन्हींसाठी दोन स्वतंत्र विषय असतात. दोन्हीकडे त्याप्रमाणे अवयव लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एम.जी.

निरोगी शरीर महत्त्वाचे.

प्रभाकर पेठकर
Mon, 12/09/2013 - 13:20 नवीन
माझ्या माहितीनुसार मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स असणारे, कुपोषित 'बेवारशी' मृतदेह मिळतात पण आरोग्यसंप्पन्न, व्यवस्थित पोषण झालेले देह आणि पर्यायाने आतील अवयव जसे यकृत, हृदय, फुफ्फुसे, मुत्रपिंड इ.इ.इ. महत्त्वाचे शारीरिक भाग प्रत्यक्ष अभ्यासण्यासाठी उपलब्ध होत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एम.जी.

दफन सुरु करणे हा रोगापेक्षा

म्हैस
Mon, 12/09/2013 - 15:06 नवीन
दफन सुरु करणे हा रोगापेक्षा इलाज जालीम प्रकार वाटतो.
सहमत आहे .
पण समजा मृत्यूनंतर काही संवेदना शिल्लक राहात असेलच (बाहेरुन मोजता येणारी किंवा दिसणारी नसली म्हणून आतून नसेलच असं ठाम म्हणता येत नाही आणि ते जिवंतपणी कळणं अशक्य.) अशा वेळी पूर्णपणे अंत होणे असं काही व्हायला वेळ लागत असेल तर जे आहे ते लवकर जाळून मोकळं केलेलं बरं.
कुठेतरी वाचलं होतं . शरीराचा मृत्यू झाला तरी वासनादेह शरीर भोवतीच काही काळ घुटमळत असतो . जाळल्यामुळे तो लवकर पार्थिव देहापासून मुक्त होतो आणि पुढच्या प्रवासाला जातो . म्हणून हिंदू धर्मात जाळण्याची पद्धत आहे
  • Log in or register to post comments

.

उद्दाम
Tue, 12/10/2013 - 09:08 नवीन
हाच नियम लावायचा झाला, तर सगळे प्राणीही जाळून टाकायला नकोत का? खाण्यासाठी कोंबडी कापली, प्रेत जाळायला झाड कापले तर त्यांच्या आत्म्याचे काय होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

काय ठरलं शेवटी?

कवितानागेश
Mon, 12/09/2013 - 16:33 नवीन
काय ठरलं शेवटी?
  • Log in or register to post comments

मना है।

प्रभाकर पेठकर
Mon, 12/09/2013 - 16:44 नवीन
मृतदेह जाळण्यात वृक्ष संपत्तीचा र्‍हास होतो. पुरण्यामुळे जमीन कमी पडेल, जंतू संसर्गाचा धोका आहेच. अवयव दान केले तरी बाकीच्या देहाची विल्हेवाट लावावीच लागते. विद्युत दाहिनीस भयंकर प्रमाणात वीज लागते. आधीच वीजेच्या कमतरतेने ग्रस्त महाराष्ट्रास उच्च दाबाची वीज वापरणे जरा कठीणच आहे. गॅस दाहिनी प्रणालीनुसार माणशी एक सिलेंडर, नातेवाईकांनी आपापल्या घरून आणला तरच शक्य आहे. तेंव्हा सध्यातरी......

मरना मना है।

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

जर मरना मना है तर जगणे

बॅटमॅन
Mon, 12/09/2013 - 17:20 नवीन
जर मरना मना है तर जगणे त्याहूनही मना असायला पायजे. सक्तीने नसबंदी प्रोग्र्याम वापरलाच पायजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

नसबंडीने जगण्याला मनाई होत

मृत्युन्जय
गुरुवार, 12/12/2013 - 13:37 नवीन
नसबंडीने जगण्याला मनाई होत नाही. जन्माला घालायला मनाई होते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नसबंडीने जगण्याला... ही बंडी

गब्रिएल
गुरुवार, 12/12/2013 - 15:31 नवीन
नसबंडीने जगण्याला... ही बंडी कोंन्ती? डिसेंबर्च्या थंडिला बरियका !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सगळ्या प्रकारच्या थंडी आणि

मृत्युन्जय
गुरुवार, 12/12/2013 - 16:46 नवीन
सगळ्या प्रकारच्या थंडी आणि गरमीला उत्तम. आजच घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल

खाण्यासाठी कोंबडी कापली,

म्हैस
Wed, 12/11/2013 - 18:24 नवीन
खाण्यासाठी कोंबडी कापली, प्रेत जाळायला झाड कापले तर त्यांच्या आत्म्याचे काय होते?
कोंबडीच शरीर लगेच नष्ट होता नाही का? लगेच त्याला धुवून बिवून शिजवला जातं . पुरलेल्या मृतदेहाच काही लगेच विघटन होत नाही . वासना देह हा मनुष्यात strong असतो . कारण वासना मनुष्यांना अस्ते. प्राण्यांना , झाडांना नहि. झाडांच्या संवेदना अतिशय क्षीण असल्यामुळे त्यांना अतिशय कमी वेदना होतात . तसेच हि प्रथा जेव्हा सुरु झाली तेव्हा वाळलेली झाडं विपुल प्रमाणात होति कारण हिरवं झाड विनाकारण तोडू नये असं हि हिंदू धर्म शास्त्रांमध्ये सांगितलेल अहे.
  • Log in or register to post comments

.

उद्दाम
गुरुवार, 12/12/2013 - 14:02 नवीन
म्हशे, अगं कोंबडी हे फक्त उदाहरण म्हणून होते. रस्त्यावर मांजर मेले, गाडीखाली बेडूक मेला, कावळ्याने चोचीने उंदीर फाडला ... इथे तर ही शरीरे लगेच नष्ट होत नाहीत. मग त्यांच्या आत्म्याचे काय होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

अश्या खंग्री पद्धतिने

गब्रिएल
गुरुवार, 12/12/2013 - 15:27 नवीन
अश्या खंग्री पद्धतिने मर्लेल्या प्रान्याचा आत्मा एकाद्या उद्दाम प्रान्याच्या रुपामद्ये जन्म घेतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

=))

टवाळ कार्टा
गुरुवार, 12/12/2013 - 19:54 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल

.

उद्दाम
गुरुवार, 12/12/2013 - 19:03 नवीन
हिंदु लिंगायतांच्यात शरीर पुरतातच की. त्यांचा आत्मा घुटमळत नाही का? एकाच हिंदु धर्मात लिंगायतांना एक पद्धत आणि इतरांना दुसरी प्द्धत , असं डिस्क्रिमिनेशन का आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

इथे तर ही शरीरे लगेच नष्ट होत

म्हैस
गुरुवार, 12/12/2013 - 18:02 नवीन
इथे तर ही शरीरे लगेच नष्ट होत नाहीत. मग त्यांच्या आत्म्याचे काय होते?
सांगीतल ना वासना मनुष्यांना अस्ते. प्राण्यांना , झाडांना नहि. अश्या प्राण्यांचे देह लगेच पुढच्या जन्माला जातात. प्राण्यांना चांगलं वाईट कळण्याची बुद्धी नसल्यामुळे त्यांना पाप पुण्याची भानगड नस्ते.
  • Log in or register to post comments

+१

प्यारे१
गुरुवार, 12/12/2013 - 18:35 नवीन
+१ मनुष्य शरीर सोडून इतर सगळ्या भोगयोनी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

ते मरु देत.

सूड
गुरुवार, 12/12/2013 - 20:10 नवीन
ते मरु देत. डू आयडींनी जालीय आत्महत्या केली तर त्यांचा आत्मा घुटमळतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आत्महत्याच काय, खून किंवा वध

प्यारे१
गुरुवार, 12/12/2013 - 21:29 नवीन
आत्महत्याच काय, खून किंवा वध झाला तरी घुटमळतो, मोक्ष लाभत नाही. एकतर पुनर्जन्म किंवा ह्या लोकावरुन त्या लोकावर.... जाणकार सांगतात ब्वा! आम्हाला माहिती नश्शे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

@ डू आयडींनी जालीय आत्महत्या

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/13/2013 - 00:54 नवीन
@ डू आयडींनी जालीय आत्महत्या केली तर>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

नुसताच घुटमळत नाही तर धागे पण

मृत्युन्जय
Fri, 12/13/2013 - 12:40 नवीन
नुसताच घुटमळत नाही तर धागे पण काढतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

.

उद्दाम
गुरुवार, 12/12/2013 - 19:02 नवीन
वासना असणं नसणं ही एक गोष्ट आहे. पाप पुण्याची जाणीव ही वेगळी गोष्ट आहे. प्राण्यांना , झाडाला वासना नसते असं कुणी सांगितलं? वासना असो वा नसो, आत्मा तर असतोच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

.

उद्दाम
Fri, 12/13/2013 - 11:31 नवीन
म्हशे, तुझे हे विचार वाचून एक अभद्र शंका उचमळली बघ .. तू म्हणतेस शरीर नष्ट नाही झालं की आत्मा घुटमळतो. वर काही लोक अवयवदानाचा आग्र्ह करताना म्हणाले आहेत.. की ते मेल्यावर सात अवयव दान करु शकतील म्हणून ... मग असे जर कुणी केलं तर मग त्यांचा आत्मा सात ठिकाणी घुटमळणार का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

डास झुरळे ढेकुन , देवीचे

विजुभाऊ
गुरुवार, 12/12/2013 - 18:09 नवीन
डास झुरळे ढेकुन , देवीचे जम्तु , शेतातली कीड याचंया आत्म्याचे काय होते? बोकड ,कोंबडी मारल्यावर तिचे भूत झाले तर ?
  • Log in or register to post comments

डास झुरळे ढेकुन , देवीचे

परिंदा
गुरुवार, 12/12/2013 - 19:01 नवीन
डास झुरळे ढेकुन , देवीचे जम्तु , शेतातली कीड याचंया आत्म्याचे काय होते?
त्यांच्या अतृप्त आत्म्यांचे भूत होत असावे. पण जसे माणसाचे भूत माणसालाच झपाटते, दिसते, त्रास देते, इतर प्राण्यांना नाही; तसेच कोंबडी, बकरा यांचे भूत पण कोंबडी, बकरा यांनाच बाधत असावे. याबद्दल एखाद्या कोंबडी, बकर्‍याचे मत, अनुभव जाणून घेण्यास उत्सुक आहे. :)
  • Log in or register to post comments

आपण जसे आपल्या मृतदेहाची

परिंदा
गुरुवार, 12/12/2013 - 19:06 नवीन
आपण जसे आपल्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याविषयी धागे काढून वाद्/चर्चा करतो, तसे कोंबडी, बकरा असे प्राणी काय करत असावेत? त्यांनाही नैसर्गिक मृत्यू यावा असे वाटत नसेल का? :)
  • Log in or register to post comments

वासना असणं नसणं ही एक गोष्ट

म्हैस
Fri, 12/13/2013 - 11:31 नवीन
वासना असणं नसणं ही एक गोष्ट आहे. पाप पुण्याची जाणीव ही वेगळी गोष्ट आहे. प्राण्यांना , झाडाला वासना नसते असं कुणी सांगितलं? वासना असो वा नसो, आत्मा तर असतोच ना?
आत्मा असणं आणि वासना असणं ह्या २ वेगळ्या गोष्टी आहेत . आत्म्याचं मूळ स्वरूप हे शुद्ध , पवित्र ,वासनारहितच अहे. वासना आली कि तिथे पाप आलं . असो हा विषय वेगळा आहे . पण प्राण्यांना वासना असतात हे जर उदाहरणासह सांगाल काय?
  • Log in or register to post comments

.

उद्दाम
Fri, 12/13/2013 - 13:21 नवीन
म्हशे, अजुन एक डब्बल अभद्र शंका उचमळली बघ. एकाच्या शरीरात दुसर्‍याचा अवयव दान करुन बसवला आहे. काही वर्षे जगून तोही मेला. तर त्याच्या शरीराभोवती दोन आत्मे घुटमळतील का? :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

नाही तो होरक्रक्स होईल. हॅरी

परिंदा
Fri, 12/13/2013 - 15:59 नवीन
नाही तो होरक्रक्स होईल. हॅरी पॉटरमध्ये हॅरी जसा वोल्डमोन्डचा होरक्रक्स होतो ना तसा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

मग असे जर कुणी केलं तर मग

म्हैस
Fri, 12/13/2013 - 15:31 नवीन
मग असे जर कुणी केलं तर मग त्यांचा आत्मा सात ठिकाणी घुटमळणार का?एकाच्या शरीरात दुसर्‍याचा अवयव दान करुन बसवला आहे. काही वर्षे जगून तोही मेला. तर त्याच्या शरीराभोवती दोन आत्मे घुटमळतील का?
हे त्या आत्म्यावर depend आहे त्याने किती ठिकाणी घुटमळायच . घुटमळनं काही compulsary नहिये. कसं असतं, बराच वेळ मेलेल्या माणसाला कळतच नाही तो मेलाय म्हणून . आणि कळल्यावर मग त्याला दुख होत. आयुष्यभर माझ माझ म्हणून ज्या गोष्टींवर आपल फार प्रेम असतं ती गोष्ट तुटली , फुटली , हरवली कि आपल्याला दु:ख होता न. मग इतकी वर्ष ज्या शरीराने साथ दिली त्या शरीराला सहज सोडायला आत्मा तयार नसतो. म्हणून तो तिथे घुटमळतो. म्हणून ते शरीर लवकर नष्ट करून टाकणं आवश्यक असत म्हणजे त्याला जास्त त्रास होत नाही . एखादी गोष्ट तुटली कि आपण त्याला पुन्हा जोडून वापरण्याचा प्रयत्न करतो . पण ती खूपच damage झाली तर तिला फेकून देवून आपण विसरून जतो. साधारण तसच
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा